दोघेही नीरचीच वाट बघत होते...
नीर खाली उतरताच दामिनी त्याला अडवत,"नीर,तू खरोखर सांग.. तुला ती मुलगी तुझ्या आयुष्यात परत हवी...? तसं असेल तर सांग, आम्ही तिच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांचे हात-पाय जोडून तीला तुझ्या आयुष्यात परत आणू."

नीर उपेक्षित हसत, "माझं आयुष्य म्हणजे तुमची देण झाल आहे...माझ्या आयुष्यात तुम्हाला हवं तेव्हा हवी ती व्यक्ती पाठवा आणि हवं तेव्हा त्या व्यक्तीला हाकलून द्या..."
तेवढ्यात शुभम आणि श्रावणी सुद्धा नीर मागे उभा राहतात..
श्वेता- आई, तू म्हणालीस ना काल हा दारू पिऊन बरळत होता,..मी तुला ठणकावून सांगते..हे सगळं त्या शीखीमुळे झाल असेल...
नीर काहीच बोलत नव्हता.. तो स्तब्धपणे सगळं ऐकत होता..
एवढ्यात श्रावणी श्रुती समोर येत,
"श्रुती, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे,..त्याचा लग्नावेळेसही तू सतत सगळे दोष शीखीला द्यायची, आता ती तुझ्या, दादाच्या आयुष्यापासून खूप दूर गेली आहे.. तरी ही तू सगळ्या गोष्टीसाठी तिला जबाबदार धरतेस?

श्रुती रागात येत, "कारण नीरच्या प्रत्येक अपयशाला केवळ आणि केवळ शीखीच जबाबदार आहे... काल सुद्धा तू सो कॉल ऍडव्हान्स बर्थडे पार्टी दिली, त्यात तू शीखीला बोलवली आणि तिथे हा तिला बघतो आणि ही त्याला जेलस करायचं काम करते..
त्यामुळेच तो रात्री दारू पिऊन बरळत होता..
रस्त्यावर पावसात काय भिजत होता.
त्यामुळेच तो रात्री दारू पिऊन बरळत होता..
रस्त्यावर पावसात काय भिजत होता.
नीर आश्चर्याने श्रुतीला बघत होता.
शुभम तिच्या समोर येत, "तुला आणि विराजला केवळ आणि केवळ एवढाच काम असतं का ग..तो विराज तुला लावून देतो.. तू इथे येऊन आईला लावते.
दामिनी नीर समोर येत, "तुला शेवटचं सांगते.. त्या मुली पासून लांब रहा... ती परत तुझ्या आयुष्यात यायला नको...
श्रावणी नीरला बघत, "दादा.. आता तरी बोलायचं धाडस कर..."
नीर- मला माझ्या कामासाठी उशीर होतोय, असं म्हणून तो तिथून निघून जातो.
नीर- मला माझ्या कामासाठी उशीर होतोय, असं म्हणून तो तिथून निघून जातो.
नीर त्याच्या क्वार्टरला येतो. तेवढ्यात रिसेप्शन जवळ एक व्यक्ती शीखीची चौकशी करत होता.
तो व्यक्ती- मॅम, शीखी वानखेडे यांना बोलायचं होतं.
रिसेप्शनिस्ट-"हो..शीखी मॅडमने तुमच्याबद्दल सांगलं होतं... मी त्यांना लगेच कॉल करते.. रिसेप्शनिस्ट शीखीला कॉल करते.
दहा मिनिटात शीखी खाली येते..
तेवढ्यात नीर आणि ती समोरासमोर येतात. शीखी नीरला टाळत त्या व्यक्तीसमोर येते.
तेवढ्यात नीर आणि ती समोरासमोर येतात. शीखी नीरला टाळत त्या व्यक्तीसमोर येते.
नीर वर जाणार होता; पण तो व्यक्ती कोण आहे... यासाठी तो तिथेच थांबला.
शीखी आणि तो व्यक्ती बाहेर निघून जातात. नीर त्याच्या रूम कडे निघाला...तेवढ्यात विराज समोर येत," कसा आहेस नीर?"
नीर कुस्तीत हसत, "विराज.. प्लीज माझ्या लाईफ पासून लांब रहा आणि माझी,शीखीची प्रत्येक गोष्ट माझ्या घरच्यांपर्यंत नेणं बंद कर.. प्लीज!"
विराज- "अरे..अस का बोलतोस...नीर ॲक्च्युली मला काळजी आहे तूझी... मला रात्री श्रुतीचा कॉल आला होता, ती तूझ्या बद्दल विचारत होती, तेवढ्यात तू शीखी मागे निघालास...
मी तेवढेच श्रुतीला सांगलं.. ती अजून काही म्हणल का?
नीर- "विराज, कधीकधी वाटतं.. आपण उगाच स्त्रियांना नाव ठेवतो,..खर तर आपल्यात काही पुरुष असे असतात..जे स्त्रियांच्या पलीकडे लोकांचा बोभाटा करतात..आता तरी प्रत्येकाच्या आयुष्यात इंटरफेअर करणं बंद कर.
विराज- अरे कसे इंटरफेअर करणं बंद करू.., आता हेच बघ ना, श्रावणीने ऍडव्हान्स बर्थडे पार्टी अरेंज केली... त्यात तिने तिच्या बहिण-भाऊजीला बोलवायचं टाळलं आणि बोलवलं कोणाला... त्या मुलीला... जी दोन वर्षातच सगळ्या सोबत संबंध तोडला... पण ठीक आहे, श्रुती आईकरवी श्रावणीला चांगलच समजावेल...
नीर रागात समोर निघून जातो.. तो रूम मध्ये येताच श्रावणीला कॉल करतो.
श्रावणी फोन उचलताच रडत होती...नीर तिला समजावत," काय झालं श्रावणी, नक्कीच आई,
काही बोलली असेल ना?
काही बोलली असेल ना?
श्रावणी- हम्म.. दादा मला मान्य आहे...ती आपल्या सगळ्यांपासून लांब गेली.. तिच आईच नातं कसं का असेना.. पण शीखी माझ्यासोबत खूप चांगली राहायची... अगदी माझी बेस्ट फ्रेंड सारख मला समजून घ्यायची... मी जर तीला माझ्या बर्थडे पार्टी मध्ये बोलावलं, तर कुठे काय बिघडलं?
नीर- श्रावणी, हे सगळे समजदार असते तर आपल्याला एवढा त्रास झाला असता का... हे बघ,तू तुझ्या परीने शीखी सोबत तुला जसं वाटलं तसं वागायचा प्रयत्न केलाच ना..
पण ते बोलतात ते ही खोटं नाही आता ती आपल्या पासून खूप दूर गेली.. तिला आपल्या आयुष्यात परत कशाला बोलवायचं?
श्रावणी- (ती क्षणभर काहीच बोलत नाही, त्यानंतर स्पष्टपणे म्हणते) मला शीखीला परत बोलवायचं आहे, कारण यातच माझ्या दादाचा सुख आहे...
नीर मोठा श्वास घेत, कॉल कट करतो.
नीर फ्रेश होऊन परत खाली येतो.
लन्च साठी सगळे ऑफिसर्स तिथे जमा होते.
विराज तिथे थांबत," शीखी मॅडम, आता आलेले गेस्ट कोण होते?
शीखी- विराज सर, आपण पर्सन आहोत.. ॲज-अ-पर्सन आपल्याला लाईफ मध्ये भरपूर लोक असतात...त्यापैकी कोणी ना कोणी आपल्याला भेटायला येतातच...तूम्हाला प्रत्येक लोकांचा रेफरन्स देणार बंधनकारक आहे का?"

शीखीने केलेल्या अपमानामुळे विराजचा चेहरा चांगलाच पडला.
विराज रागाने तिथून निघून जातो... शीखी एकटक जाणार्या विराजला बघते, त्यानंतर तिचं लक्ष नीर वर जात...तो त्याच हसण दाबत होता..
सगळ्या ऑफिसरचा आता मिशन संदर्भात डिस्कशन चालू होतं...
अर्धा तासानंतर लगेच कॉन्फरन्स हॉलमध्ये सेशन चालू होणार होत.
अर्धा तासानंतर लगेच कॉन्फरन्स हॉलमध्ये सेशन चालू होणार होत.
सगळे ऑफिसर सेशनला अटेंड होतात. तेवढ्यात एसीपी विश्वास आणि इन्स्पेक्टर शर्मा तिथे हजर होतात.
एसीपी विश्वास- ऑफीसर कावेरी, यांनी मांडलेल्या तथ्यानुसार आपल्याजवळ समिधा चोप्राला वाचवण्यासाठी केवळ सहा दिवसच शिल्लक आहेत. आपल्याला समिधा चोप्रावरती लक्ष द्याव लागणार आहे...
सो ऑल ऑफिसर, इकडची जुजबी माहिती काढण्याची जबाबदारी मी माझ्या काही ऑफिसर्स ना देणार आहे...
सो तुम्ही सर्व ऑफिसर्स आता सुमिधा चोप्रा, एन.एम.डी.सी कॉटरच्या मागे राहणाऱ्या कामगार वस्तीतला तो वॉचमन.. त्यासोबत इतरही वॉचमन या सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवा..

इन्स्पेक्टर अय्यर आणि इन्स्पेक्टर कावेरी एन.एम.डी.सी च्या कामगार वस्तीत जातील...
तर शीखी युट्युबर समिधा ला भेटण्यासाठी तिच्या घरी जाईल...
ऑफीसर नीर, तिच्या अपार्टमेंटच्या बाहेर बारीक लक्ष ठेवणार....
तर ऑफीसर रश्मी आणि बद्री समिधाच्या दोन चार दिवसापासून च्या सोशल मीडियावरील कमेंट चॅटिंग याचा परीक्षण करतील...
तर ऑफीसर रश्मी आणि बद्री समिधाच्या दोन चार दिवसापासून च्या सोशल मीडियावरील कमेंट चॅटिंग याचा परीक्षण करतील...
तर ऑफिसर सुपर लक्ष्मी समिधा चोप्राच्या मेड सोबत ओळख करून घेतील...
सगळे ऑफिसर एसीपी विश्वासने दिलेली जबाबदारी पार पाडत होते..
सगळे ऑफिसर एसीपी विश्वासने दिलेली जबाबदारी पार पाडत होते..
दुपारी शीखी समिधाच्या घरासमोर येते... ती बेल वाजताच समिधा दार उघडते.. ती सेफ्टी डोअर च्या आतूनच शीखीची चौकशी करत," आपण कोण?"
शीखी तिला स्वतःच youtube चॅनल असल्याचं सांगत..."मॅम मी फेमस youtube वरचा इंटरव्यू घेते, जर तुमची परमिशन असेल तर मला तुमचा इंटरव्यू देताल?
समिधा शीखीला दार काढत आत घेते.....
शीखी- मॅम, ऍक्च्युली माझं स्वतःच यूट्यूब चैनल आहे, त्यात मी डीवोर्सी महिलांच त्यांच्या डिवोर्स नंतरच स्ट्रगल, सक्सेस याविषयी माहिती देऊन इतर महिलांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करते...

समिधा- ओ.. ठीक आहे, चालेल.
शीखी इंटरव्यूचा पहिला प्रश्न विचारते.., जो कधी-कधी ती स्वतःलाच विचारायची...
"मॅडम, स्वतःचं लग्न मोडण... कस वाटत?"
शीखी इंटरव्यूचा पहिला प्रश्न विचारते.., जो कधी-कधी ती स्वतःलाच विचारायची...
"मॅडम, स्वतःचं लग्न मोडण... कस वाटत?"
समिधा- "नुसत लग्न मोडणं हा विषय असला तर बोलण्यासाठी खूप चांगला असतो.. पण जेव्हा स्वतःचच लग्न मोडत..त्याच दुख,वेदना,शब्दात ही मांडू शकत नाही....समिधा पाणावलेल्या डोळ्याने बोलत होती....
"ऍक्च्युली खरं तर हा शब्द पचवायलाच मला सहा सात महिने लागले. त्यानंतर स्वतःला कंट्रोल करायला शीकत गेले...
"ऍक्च्युली खरं तर हा शब्द पचवायलाच मला सहा सात महिने लागले. त्यानंतर स्वतःला कंट्रोल करायला शीकत गेले...
सहा-सात महिन्यानंतर वास्तविकतेचे भान कळालं. तेव्हा मनाने निर्णय घेतला.. बस झालं आता मोडलेल्या गोष्टीवर असंव गाळण...आता उठायचं, जगायचं...स्वतःसाठी कमवायचं आणि बघा तेच तर करते...
मी, आता स्वतःच्या पायावर उभी आहे..भरपूर पैसा कमावते...
समिधा अचानक नैराश्यात जात," पण आता विचार येतो, का या सगळ्याच करायचं तरी काय?
मी, आता स्वतःच्या पायावर उभी आहे..भरपूर पैसा कमावते...
समिधा अचानक नैराश्यात जात," पण आता विचार येतो, का या सगळ्याच करायचं तरी काय?
*****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा