Login

घटस्फोट;सुरवात प्रेमाची-23

Gh


यानंतर मात्र शीखी आणि समिधा दोघी ही निशब्द होतात...
खरच पुरूष त्याचा घटस्फ़ोटाचे दुख दारु पिऊन, किंवा लगेच दुसर लग्न करून पचवतो...पण स्त्रीया हे दुख कसे पचवत असतील ना?"

शीखी समिधा सोबत बोलत होती...तेव्हा तिला लक्षात आलं का, समिधाची मानसिक अवस्था ही नॉर्मल नाही.
तेवढ्यात, शीखी तिला पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी यासाठी प्रोत्साहन करत होती.

शीखी- मॅडम, सध्या तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्ती कोणी आली आहे का?

समिधा सूर बदलत," सध्या ना... माझं कशातच लक्ष नाही आणि गेले चार दिवस झाले.. मी घराबाहेर पाणी पडत नाही...
शीखी, अजून काही बोलायला जाणार...
ईतक्यात, समिधा-"प्लीज मॅडम.. मला एकटीला राहू द्या.. तुम्ही आता येऊ शकता...

शीखीला पर्याय नसतो..ती तिथून उठते.

सुपर लक्ष्मी समीधाच्या अपार्टमेंट मध्ये येत, समिधाच्या मेडला बोलण्याचा प्रयत्न करत होती....
सुपर लक्ष्मी- ताई, मला समिधा मॅडमच्या इथे काही काम मिळेल का हो..बघा ना...मला सध्या कामाची खूप गरज आहे...


ती मेड- काम आणि तिच्याकडे....ती दोन-दोन दिवस आंघोळ करत नाही.. खात पीत नाही... मीच गेल्या आठ दिवसापासून तिच्याकडे जात नाही..

सुपर लक्ष्मी- का जात नाही... पैसे कमी देते?

तीमेड- नाही हो ताई...उलट गेल्या चार महिन्यापासून ती दुप्पट रक्कम देते; पण केवळ आठ दिवसातून एकदा घरी बोलवते.. घर आवरायला लावते झालं...

तर नीर वॉचमन समोर येत, तो पोलिस ऑफिसर असल्याचा सांगतो.. तसेच गेल्या पंधरा दिवसापासून चे सीसीटीव्ही फुटेज तो वॉचमन कडून मिळवतो.

नीर लवकर क्वार्टरला येत, तिथे सीसीटीव्ही फुटेज चेक करत होता... तेवढ्यात तो आवाज देत, "मामा..मला पाणी द्या बरं."

तेवढ्यात नीर समोर पाण्याचा ग्लास येतो. नीर समोर कोण आहे हे न बघता..
नीर- "कधीकधी ना मला या ड्युटीचा खरच कंटाळा येतो... त्यापेक्षा वाटतं शिपाई झालो तर बरं झालं असतं.. दिवसभर आराम करा... महिन्याकाठी पगार मिळवा...
(तो मोठा श्वास घेत) तुम्ही बटाटेवडे तळताय का.. झाल्या झाल्या मला द्या... मला बटाटेवडे खूप आवडतात.. असं म्हणून तो वरती बघणार इतक्यात त्याला समोर शीखी दिसली...

शीखी- मामाचा मुलीची तब्येत ठीक नाही...त्यामुळे ते घरी गेले.. असे म्हणून ती आत मध्ये जाते.


तेवढ्यात ऑफिसर अय्यर आणि ऑफिसर बद्री तिथे येत, नीरसर, तुम्ही आम्हाला बोलावलं?

नीर त्यांचा समोर पेन ड्राइव करत,"हे घ्या.. समीधाच्या अपार्टमेंटचा सीसीटीव्ही फुटेज आहेत... यात काही संशयाचा पद वाटलं ते मार्क करा... तेवढ्यात इन्स्पेक्टर कावेरी सुपर लक्ष्मी आणि रश्मी पण तिथे येतात.

कावेरी- अरे वा...एवढ्या महिनाभरापासून आज पहिल्यांदा किचनमधून घमघमाट सुटला...


शीखी ट्रे मध्ये डिश घेऊन येत, "कावेरी...माझं काम लवकर आटोपलं. त्यामुळे विचार केला स्वतःच काहीतरी बनवावं..
असं म्हणून ती बटाटेवडे सगळ्यांसमोर करते.. नीर त्या बटाटे वड्यांना बघतो त्याला शीखीच्या हातचे बटाटेवडे खूप आवडायचे.

पण ते असे हावर्या सारख घेण त्याला योग्य वाटत नव्हतं.. त्यामुळे तो शीखी त्याला ऑफर करण्याची वाट बघत होता...
इतक्यात सगळ्या ऑफिसर्सने दोन-तीन करत सगळेच बटाटे वडे स्वतःच्या डिशमध्ये घेतात... कोणी नीरला ऑफरही करत नव्हतं.
सुपर लक्ष्मी- अयो... आपण नीरसरांसाठी तर काहीच ठेवलं नाही..
सुपर लक्ष्मी शीखीला बघत, माझ पोटच भरल नाही..आत मध्ये अजून बटाटेवडे आहेत का?

शीखी नकारार्थी मान हलवत, "जेवढे बटाटे होते...तेवढ्याचे वडे केले.

कावेरी तिच्या डिश मधला उरलेला बटाटावडा शीखी समोर करत", तुला नाही खायचे का?"
शीखी- ऍक्च्युली मला बटाटावडा अवडत नाही...

अय्यर- काही म्हणा शीखी मॅडम, महिनाभराने घरचे जेवण खाल्ल्यासारख वाटतं आणि हे बटाटेवडे....
बद्री लगेच उठत, "बटाटे वडे तर खुसखुशीत असे होते. असं वाटतं," आपके हाथ चूम लू."

नीर रागात येत, "आता खाल्ले ना बटाटेवडे.. तर हात चूमायची काय गरज आहे?
रश्मी- आणि तसेही तुम्ही हात चूमल्यानंतर.. तिच्या हातची चवही निघून जाईल असं म्हणताच कावेरी रश्मी आणि शीखी हसत होत्या.


तेवढ्यात विराज तिथे येतो, "शीखी मॅडम, सॉरी.. तुम्ही ऑफिसर्स आहात तुम्हाला किचनची जबाबदारी मिळणार नाही."

शीखी- मला तसही ती जबाबदारी ही नको....ऍक्च्युली ना, मी खूप जणांना फुकट खाऊ घातल... आता खूप पस्तावा होतो... आता तीच चूक परत करायची नाही...

विराज रागात येत, "किती जणांना फुकट खाऊ घातल होत?"

विराजला रागात बघून नीर ही तिथून उठत, "शीखी मॅडम ने बऱ्याच कुत्र्यांना खाऊ घातल असेल...तुम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं?

नीर अनावधान विराजला कुत्र असं म्हणल्यामुळे विराज रागाने तिथून निघून जातो...
तो लगेच श्रुतीला कॉल करत," हॅलो श्रुती.. माहित आहे आज त्या मुलीने नीरला तिच्या जाळ्यात अडकवण्यासाठी अलाउड नसताना... किचनमध्ये आली  त्याच्या आवडते बटाटेवडे बनवले...

श्रुती- विराज, काहीही करून तू त्या शीखीला नीर पासून लांब ठेव.. आपला नीर भोळा आहे रे...तिला त्या मुलीची जादू माहित नाही...

विराज- हो...अग एवढेच काय, त्या मुलीने तर नीरला जळवण्यासाठी एका डमी मुलाला इकडे बोलवून घेतलं आणि काय तिचा तोरा... त्या मुलासोबत काय मिरवत होती.. काय हसत होती...मला माहिती आहे.. हे सगळं मुद्दाम ती नीरला जळवण्यासाठी करते.

श्रुती- आई आता झोपली, आई उठताच मी तिला नीर साठी ताबडतोब मुलगी बघण्यास सांगते....पण विराज, मला वाटतं या इथल्या गोष्टी शीखीच्या आईच्या कानावरही गेल्या पाहिजे... जेणेकरून शीखीला तिच्या फॅमिली कडून प्रेशर येईल.

विराज - शीखीची बहीण आहे ना... ती कोण...तिचा नंबर मिळव.. किंवा शीखीच्या इथल्या एक-दोन मैत्रिणी असतील ना.. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर.

श्रुती- अरे तिची बहिणीची मैत्रीण होती ना.. तिचा मला परवाच फोन आला होता... एक काम करते, तिलाच बोलून घेते.. त्यामुळे आपोआप आपले मेसेज  दिशा पर्यंत जातील.

विराज- आपल्याला हे लवकरच कराव लागणार आहे.. तुझा भाऊ तर तिच्यासमोर मला कुत्रा म्हणाला...मला खूप अपमानास्पद वाटल...

श्रुती रागात येत, "काय...तो तुला कुत्रा म्हणाला.. त्याची हिम्मत कशी झाली, त्याला काय वाटतं.. मी तुला असेच सोडेल...आता आई करवी त्याला चांगलं बोलणं खाऊ घालेल...


विराज कॉल कट करत कुस्तीत हसतो... नीर आणि शीखी तुम्हाला काय वाटतं मी असताना तुम्ही दोघे परत एकत्र होताल...कधीच नाही...


नीर रागात  फुटेज बघत होता.
अय्यर- नीरसर तुमची चिडचिड होत आहे...बहुदा तुम्हाला भूक लागली असेल.

नीर- नाही.. मला भूकच लागत नाही.

त्याच्यासमोरच सीसीटीव्ही फुटेज चेक करत असलेल्या शीखीला हसू येत होतं. कारण नीरला भूक लागली तर त्याची सतत चिडचिड व्हायची...

तेवढ्यात शीखी उठत, "अरे मी माझं ब्लूटूथ वरतीच विसरल.. "कावेरी, मी आत्ता घेऊन येते..असं म्हणून ती किचनमध्ये जाते आणि परत वरती कॉटर्स कडे जाते...


तेवढ्यात विराज तिथे येत," गाईज आज कोणाच्या काय काय फर्माईश आहेत?

अय्यर- रोजच्या प्रमाणेच पोळी, पातळ पातळ वरण.. बेचव भाजी.. असं म्हणून ते सगळे ऑफिसर हसत होते...

विराज- तुमची जर इच्छा असेल तर मी नॉनव्हेज जेवण बनवू शकतो...

नीर- काही गरज नाही, आमच्या स्कॉड मधल्या काही लेडीज त्यांना व्हेजिटेरियन जेवण लागतं.. आम्हाला जर नॉनव्हेज खायचं असेल तर आम्ही बाहेरून मागवू...

सर्व ऑफिसर रेस्ट करण्यासाठी आपापल्या रूम कडे वळतात...नीर त्याच्या रूम मध्ये येतो...तो मोबाईल,पेन ड्राईव्ह बेडवर टाकत..
नीर-"बटाटे वडे करता येतात.. तिला तर माहित आहे ना.. बटाटेवडे म्हणजे माझं वीक पॉईंट... एखादा वडा ऑफर केल्यावर कुठे बिघडतं का आणि तो अय्यर आणि बद्री एका हातात दोन-तीन वडे घेत आध्याशा सारख खात होते..

तो चिडचिड करत होता.. टेबलावरचं बॉटल घेत पाणी उचलतो; पण अचानक त्याचे लक्ष त्या टेबलावर वळतं.. ते बघताच त्याला आश्चर्य वाटतं.."अरे हा हॉटपॉट तो इथे कसा आला असेल...
असं म्हणून नीर तो हॉटपॉट काढतो.. तर त्यामध्ये गरम गरम सात आठ बटाटेवडे होते.

नीर दोन्ही मुठीत वडे घेत आणि तिथे बाजूला असलेली मीरचा घेत एकामागून एक वडे खात होता...

पण त्याच्या डोळ्यातून अचानक पाणी निघतं.. ते पाणी मीरचीमुळे होतं का शीखीने त्याच्यासाठी मुद्दाम ठेवलेल्या वड्यामुळे होतं..हे त्याचे त्यालाच ठाऊक नव्हतं...