Login

घटस्फोट;सुरवात प्रेमाची-26

Gh
नीर आणि शीखी दोघेही क्वार्टरकडे निघाले... ते दोघे आता मेन गेटमध्येच होते तेवढ्यात नीरला त्याची आई, श्रुती,विराज आणि वडील दिसले.... ते चौघे दिसताच," शीखी तु वरती हो."
शीखी, त्यांच्या समोर खाली मान घालून निघून जाते...
नीर विराजला बघत, "काय निरोप मिळाला आणि तुमचे एवढं धाडस का,माझ्या कामाच्या ठिकाणी फॅमिली ड्रामा करण्यासाठी आलात?

दामिनी, शीखी ज्या रस्त्याने गेले तिकडे बघत, "फॅमिली ड्रामा कोण करत तेच बघण्यासाठी आलो होतो....

श्रुती नीर समोर येत, "नीर, तिला म्हणाव ती जे स्वप्न बघते ना...
नीर-"कोणत...?
श्रुती- "परत तुझ्या कुशीत संसार थाटायच... आम्ही ते स्वप्न साकार होउ देणार नाहीत...तिला एक लाज-लज्जा नसेल; पण आम्हाला समाजात राहावं लागतं. समाजात आम्हाला मानसन्मान आहे... हिच्यासारखं नाही धडसोड वृत्ती...

तेवढ्यात नीरचे बाबा समोर येत," हे बघ.. आतापर्यंत श्रुती आणि तुझी आईच तुला बोलायचे... त्यामुळे मी शांत होतो; पण आता प्रत्यक्ष डोळ्यांनी समोरच दृश्य बघून...तुला सांगतो, का परत त्याच मुलीच्या भानगडीत पडू नकोस... जी दोन वर्ष ही तुझ्यासोबत संसार करू शकली नाही, ती पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत काय राहणार?
नीरखाली मान घालून उभा होता, त्यानंतर तो त्याच्या आई-वडिलांना बघत,
"जस्ट कलीग म्हणून बोलत होतो....मला सुद्धा माझ्या मर्यादा माहित आहेत, आणि हे सुद्धा माहित आहे का, या नात्याने तेव्हाच दम तोडला आता तुम्ही चौघे खंबीर असताना ते नात परत जिवंत होण शक्य नाही... असं म्हणून तो त्याच्या रूम कडे वळाला.

भिंती आडून शीखी हे सगळं ऐकते... त्यानंतर ती क्षणभर डोळे बंद करते, जेव्हा डोळे उघडते तर समोर नीर होता... तो तिच्यासमोर मान खाली घालून निघून जातो.

शीखी तिच्या रूम मध्ये जाते, ती मोठा श्वास घेत वरती बघत ,"नीर.! तू स्वतःसाठी कधीच का स्टॅन्ड घेऊ शकत नाही... अरे तुला जे हवं, जो निर्णय घ्यायचा...त्या दृष्टीने तू कधीच का बोलत नाही...राहिला आपल्या नात्याचा प्रश्न, तर मी ही एक्सेप्ट करते, आता ते नातं नव्याने जन्मुच शकत नाही....

रात्री दीड वाजता नीरला श्रावणी आणि शुभम चा कॉल आला,

नीर त्या दोघांवर चिडत, ते चौघे उपदेश द्यायचं काम करून निघून गेले, आता तुम्ही दोघे राहिलात ना... द्या मला उपदेश?
श्रावणी त्याला चिडवत,"दादा, रात्री बारा वाजता दोघेही घराच्या बाहेर एकमेकांना मस्तपैकी बोलणं... किती रोमॅन्टिक वाटत असेल ना?
शुभम- दादा, ती तुला अजूनही तेवढेच मोकळं बोलती का रे?

श्रुती  - अरे शुभम... ती त्याच्या मिठीत पडली,म्हणजे बघना ती त्याला मोकळच बोलली असेल... पण नीर दादा, जेव्हा ती मिठीत पडली.. तेव्हा तुला कसं फील झालं रे?
नीर - श्रावणी बेटा, माझ्याकडे गन आहे आणि त्यामुळे मी कोणाचेही एन्काऊंटर करू शकतो.
शुभम-"तर एक काम करायचं ना, ते जेव्हा तुला उपदेश द्यायला आले, तेव्हा त्या चौघांचे एन्काऊंटर करायचं असतं... म्हणजे तुमच्या नात्यातील काटे तरी कायमचे संपले असते..."
नीर-" श्रावणी आणि शुभम, रात्रीचा दीड वाजतोय.. मला आता झोपू द्या."

शुभम- दादा, एक मिनिट... ऐक, त्यादिवशी तू दारूच्या नशेमध्ये मला प्रश्न विचारत होता का, "तिच अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे का, त्या दिवशी मी दिलेलं उत्तर तुझ्या लक्षात राहिलं नसेल पण मी परत एकदा उत्तर देतो,"तीच तुझ्यावर प्रेम नाही तर खूप.. प्रेम आहे.."

नीर कुस्तीत हसत, "पण शुभम.. आमच्या नात्याला परत एकदा तेच रूप नाही भेटणार...."
श्रावणी लगेच उत्तरते, "ते रूप भेटू शकणार नाही.. कारण तू दुतोंडी आहे.. जेव्हा नशे मध्ये असतो... तेव्हा तुझ्या मनातल्या खरा भावना सगळ्यांसमोर मांडतो आणि त्या भावनेनुसार तुला अजूनही शीखी आवडते आणि तिच्या सोबतच राहायची इच्छा आहे; पण जेव्हा प्रॅक्टिकल होतो ना... तेव्हा तुझं हे स्वाभिमान-अभिमान आई-वडिलांचे मत... तुझ्या चेहऱ्यावर येतं, ज्या दिवशी तुझ्यातली हे दोन तोंड एक होतील... तेव्हा तुझ्या नात्याला रूप द्यायचं काम कर.
नीर- आणि तुला हे ही चांगलंच ठाऊक आहे.. हे कधी एकत्र होणारच नाही.....

शुभम- दादा, त्याची काळजी करू नकोस, तुझं प्रेम आहे ना.. ते प्रेम, तुम्हाला एकत्र करणार आहे.

इकडे सकाळी शीखी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडते, ती बाहेर येताच तिला धक्का बसतो.. कारण समोर शीखीचे आई-वडील होते.

शीखीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तेवढ्यात सुवर्णा तिच्यासमोर येत," का ग काही चोरी-बीरी केलीस का, तूझा चेहऱ्यावरचा रंगच उडाला?
शीखी- ती उसने अवसान आणत..."तसं काही नाही.. तुम्ही अचानक इथे, आणि या महिन्यात माझा बर्थडे ही नाही.. जे सरप्राईज देण्यासाठी आला असताल?

शीखीची आई, सहा महिन्यांनी भेटतो.. आई-वडिलांना नमस्कारही करणार नाही.

शीखी बळजबरी नमस्कार करत, "माझ लक्ष नव्हतं ना, इकडे काही काम होतं का?
सुवर्णा- आता काय फॉर्मलीच बोलणार का,आम्हाला आत मध्ये घेणार नाहीस?
शीखी- येथे स्पेशल यार्ड आहे..  कॉमन लोकांना अलाउड नाही.. हवं तर आपण इथल्या कॅफेमध्ये जाऊ...

शीखीचे बाबा- कॉफी घेत..." शीखी, परवा आलेला मुलगा वेल सेटल होता आणि मेन म्हणजे त्याचा फॅमिली मध्ये... तो एकटाच होता..सो,तुला दुसरा त्रासही झाला नसता..
पण आम्हाला एक आश्चर्य वाटतं.. संध्याकाळी बोलताना त्याने स्पष्टपणे होकार दिला, पण अचानक असं काय झालं.. का रात्री नकार मिळाला?

शीखी- बाबा,मला खरंच काही माहित नाही.
शीखीचे बाबा- माहित नाही.. हे जर उत्तर असेल तर ठीक आहे, पण यामध्ये तुझं आणि त्या नीरचा काही स्वार्थ असेल तर.. लक्षात ठेव..आमच्या एवढा वाईट कोणी नाही आणि आम्ही तुझे आई-वडील आहोत... त्यामुळे तुझ्या भविष्याची चिंता आहे; म्हणूनच तुला ठणकावून सांगतो, दोघ कलीग आहात तर कलिग पुरताच रहा... उगाच त्यासाठी बटाटे वडे, रात्री तुम्ही दोघ बाहेर जाऊन भेटणं.. या गोष्टी टाळ.
शीखीला आतून तिच्या आई-वडिलांचाही राग येत होता, पण ती स्वतःच्या रागाला कंट्रोल करत,"बाबा, जर मला त्याच्यासोबत राहायचं असतं तर मी तुमच्या दोघांनाही जुमानल नसतं...मला माझ्या नात्याच्या मर्यादा माहित आहे, आणि जे नातं ऑलरेडी मेल आहे...ते परत जिवंत होऊ शकत नाही.. हे सत्य सुद्धा माहित आहे.........
शीखीची आई- तर ठीक आहे, पुढच्या पंधरा दिवसांनी तुला बघण्यासाठी एक मुलगा येणार आहे... त्या मुलाला होकार देशील!"

शीखी आश्चर्याने बघत,"मी बळजबरी होकार देणार नाही आणि तुम्हाला कितीदा ठणकावून सांगते का, मला लग्नच करायचं नाही.
त्यानंतर ती स्वतःचा राग शांत करत," तुमची उद्याचीच गाडी असेल तर तुम्हाला इथे हॉटेल बुक करून देऊ का?"

शीखीचे बाबा,"त्याची काही गरज नाही.. आम्ही रात्री उतरल्या-उतरल्याच हॉटेल बुक केलं, आणि हो...तो मुलगा बघेपर्यंत, तुमचा साखरपुडा करेपर्यंत मी आणि तुझी आई दिल्लीतच राहणार.

शीखीला धक्का बसला, ती त्या दोघांना बघत म्हणाली,"तुम्ही माझ्यासाठी नाही तर मी आणि नीर जवळीक साधु नये या करता येथे राहतात?
सुवर्णा- तुला हवं तर तू ते समजू शकतेस... कसं असतं ना, आपलं मूल जर अयोग्य दिशी जात असेल; तर त्याच्यावर वचक ठेवण्याचा अधिकार आई-वडिलांना असतो, त्या अधिकाराने आम्ही इथे राहणार आहोत.....

शीखी-"तुम्ही दोघे इथे राहता.. मला काहीच प्रॉब्लेम नाही; पण तुम्हाला हवं तेव्हा मी इथे तुमच्यासाठी अवेलेबल राहू शकणार नाही.. अगदी इमर्जन्सी असेल तरीही.....

शीखीची आई-"त्याची काळजी तू करू नको, पण स्वतःच्या भावनांना कंट्रोल कर.....

इकडे इन्स्पेक्टर अय्यरचा एसीपी विश्वास ला कॉल येतो,"हॅलो सर.. समिधा, खाली येत नव्हती,पण एक व्यक्ती सतत तिच्या मागावर होता.. हो सर.. हो सर त्याचा फुटेज, हे रश्मी मॅडमनी काढलेल्या स्केच प्रमाणे मॅचे होत आहे...

एसीपी विश्वास-" हे बघ...आता आपल्याकडे आता दोन महिन्याची वेळ आहे, त्यामुळे आपण त्याच्या मागावर असल पाहिजे.. तुम्ही लगेच इन्स्पेक्टर कावेरीला कॉल करा.
अय्यर इन्स्पेक्टर कावेरी ला कॉल करतो,"हॅलो, कावेरी मॅडम.. एसीपी विश्वास ना तुम्हाला बोलायचं आहे."

कावेरी-" जय हिंद सर.. बोला?
एसीपी विश्वास- जय हिंद, इन्स्पेक्टर कावेरी.. मला त्या कीलरच्या लिस्ट मधील पुढची शिकार कोण आसु शकते याची माहिती हवी?

कावेरी- सर सॅटर्डे संडे आणि दोन ऑक्टोबर असल्यामुळे कोर्टाला सुट्टी आहे... पण मला अजून दोन-तीन दिवसाचा अवधी भेटल्यास, मी सगळी माहिती काढेल.

एसीपी विश्वास- आपल्याकडे जास्त वेळ नाही इन्स्पेक्टर कावेरी, हवं तर मी तुमच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढेल, त्यामुळे तुम्हाला स्वतः कोर्ट्यात जाऊन इन्वेस्टीगेशन करता येईल.

इन्स्पेक्टर कावेरी-"ओके सर...तुम्ही स्पेशल ऑर्डर काढा.. मी इन्वेस्टीगेशन करेल.