घर

This poem is about home and expectation from home.

                                                                                     घर

ज्याला चार भिंती

छप्पर ज्याच्या वरती

मोठा परिसर सभोवती

यालाच लोक घर म्हणती

घर असावे नेहमी भरलेले

एकमेकांच्या प्रेमाने बनलेले

राग, स्वार्थ द्वेष सोडून

त्याग,प्रेम,स्नेहाने भरलेले

घराकडून असते एकच अपेक्षा

घरी आपली करावी प्रतीक्षा

आल्यावर घरी व्हावे स्वागत

हेच असते देवाकडे मागत

जेव्हा आपण असतो घरापासून दूर

त्याच्या आठवणीने व्हावे आतुर

श्वासाश्वासात भरलेले माझें

असे  ते घरटे मला पाहिजे

© शीतल महामुनी माने