ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा
लघुकथा
घर...घर...
"आमचं कुठलं आलंय घर...  आमचं  तर विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर. आज इथे तर उद्या तिथे."
शितली त्या अनोळख्या मुलीची समजूत घालत म्हणत होती. दहा-बारा वर्षाचं पोर ते. खूप घाबरलेलं.
"काय सांगू हिला ही तर चांगल्या घरची मुलगी दिसते."
शितली तिच्या पाठीवरुन हात फिरवत होती.
शितलीने हळूच तिला शांत करत तिचे नाव विचारले.
"काय सांगू हिला ही तर चांगल्या घरची मुलगी दिसते."
शितली तिच्या पाठीवरुन हात फिरवत होती.
शितलीने हळूच तिला शांत करत तिचे नाव विचारले.
ती अनोळखी मुलगी म्हणजे,दुसरी तिसरी  कुणी नसून ती, ज्या निर्माणाधीन बंगल्याचा आपल्या कुटुंबाने आधार  घेतलाय,आपला तोडका मोडका संसार थाटलाय,आपण आपली  पथारी पसरतोय त्या डॉक्टरांचीच ही मुलगी भव्या आहे हे तिच्या बोलण्यावरुन शितलीच्या लक्षात आले. शितलीलाही काहीच माहिती नव्हते.
भव्या समोरच्या रस्त्यावरुन सायकलने टिवीशनला निघाली होती. तिच्या मागे कुत्रा लागला. ती घाबरून ओरडत होती. म्हणून शितलीने धावत जाऊन शिताफीने  त्या कुत्र्याला मागे पिटाळले. शितलीला माहित होते तो कुत्रा पिसाळलेला आहे. आणि ती घाबरलेल्या भव्याला घेऊन इमारतीत आली. भव्या साधारण शितलीपेक्षा दोनेक वर्षांनी लहान असेल.
शीतलीने दाखविलेल्या हिम्मतीचे भव्याला कौतुक वाटले. ती खूप घाबरलेली होती . शितली तिच्याशी इकडल्या तिकडल्या गप्पा मारत तिला सामान्य स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती.
शीतलीने दाखविलेल्या हिम्मतीचे भव्याला कौतुक वाटले. ती खूप घाबरलेली होती . शितली तिच्याशी इकडल्या तिकडल्या गप्पा मारत तिला सामान्य स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती.
बोलण्याच्या ओघात ती शीतलीला विचारत होती,
" तुझे घर कुठे आहे? तू कुठे राहते?"
" तुझे घर कुठे आहे? तू कुठे राहते?"
शीतली सहज म्हणून गेली,
"हेच तर घर आहे आमचे..."
भव्या विचारात पडली हे तर आमचे घर ...बांधणे सुरू आहे अजून भिंतीही उभ्या झाल्या नाहीत,आणि ही काय म्हणते की हेच माझे घर ?
तिच्या बालमनात अनेक प्रश्नांचा गुंता तयार झाला.
तिच्या बालमनात अनेक प्रश्नांचा गुंता तयार झाला.
याला तर न दार, न खिडक्या, न भिंती... इथे कशी राहतात ही लोकं?
भव्या बघत होती तीन विटांवर मांडलेली चूल बाजूला लाकडं पडलेली. दोन-चार अल्युमिनियमची काळीकुट्ट झालेली भांडी. दोन-तीन उघडी नागडी लेकरं आजूबाजूला फरशांचे विटांचे तुकडे घेऊन खेळत होती.
भव्या बघत होती तीन विटांवर मांडलेली चूल बाजूला लाकडं पडलेली. दोन-चार अल्युमिनियमची काळीकुट्ट झालेली भांडी. दोन-तीन उघडी नागडी लेकरं आजूबाजूला फरशांचे विटांचे तुकडे घेऊन खेळत होती.
आलिशान बंगल्यात राहणारी ती तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं नव्हे कल्पनेच्या पलीकडलं होतं.
पण भव्याला शीतलीचं बोलणं ऐकून धीर तर आलाच होता आणि तिच्या लक्षात आले होते की ही सुशिक्षित आहे.
भव्या त्या दिवशी घाबरलेली असल्यामुळे आणि तिची पहिलीच भेट असल्यामुळे ती फारशी बोलली नाही.
पण ही इथे कशी राहते ?तिला घर नाही का?
बाकी सगळ्यांचे राहणे, वागणे, बोलणे बघून तिच्या लक्षात आले होते की ही कुठेतरी शिकते आहे . सगळ्या जिज्ञासा तिच्या मनात तशाच अनुत्तरीत होत्या.

 शितलीने बोलत बोलत तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवले.
इकडे शितलीचेही विचार चक्र वेगाने फिरत होते.
आम्हा भटक्या लोकांना स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही का?
..........
..........
 "काय जीव अटकलाय त्या घरात कोण जाणे सारखं माझं घर माझं घर..."
जिजा काकू जरा त्राग्यानेच
पण थकलेल्या स्वरात शरदरावांना म्हणत होत्या.
जिजा काकू जरा त्राग्यानेच
पण थकलेल्या स्वरात शरदरावांना म्हणत होत्या.
दवाखान्यात खाटेवर लागली होती घर घर
तरी मन आक्रंदत होतं माझं घर माझं घर
 ही अवस्था होती शरदरावांची. त्यांचं सारखं सुरू होतं मला दवाखान्यात राहायचं नाही. मला घरी घेऊन चल...मला घरी घेऊन चल.
त्यांना त्यांचा अंतिम काळ जवळ दिसत होता आणि आपले मरण दवाखान्यात होऊ नये ते आपल्या घरातच व्हावं ही इच्छा त्यांनी आपल्या बायको पोरांजवळ बोलून दाखवली होती.
मुलांना वाटायचे आज नाही उद्या बरे वाटेल.
कसं असतं ना श्वास असेपर्यंत आस असते.
जिजा काकू म्हणाल्या, "अहो त्या शेजारच्या महाजनांच्या बंगल्यासारखा सुसज्जित सर्व सोयींनी युक्त बंगला असता तर समजू शकले असते तुमचा आग्रह घरी चल घरी चलचा.

 पण आपलं ते कुडाचं खोपटं.फुटक्या कौलाचे छप्पर. घरातच  कोपऱ्यात बनवलेलं न्हाणीघर. पावसाळ्यात टप टप टपके लागतात झोपडीला. कोणत्या आडोशाला सात्री अंथरावी ते कळत नाही.
 आता पोरं कमाईचे त्यांनी तुमची व्यवस्था येथे केली आहे ना चांगली त्या गळक्या घरात कुठे बरं झोपणार? आणि वारंवार बाथरूमला जावे लागते तुम्हाला, कसे जाणार?
" ती वेळ येणारच नाही गं जिजा... तुम्ही घरी घेऊन तर चला " शरद राव कळवळून बोलत होते.
 जिजा काकूंना कळेना काय करावे मुलांना फोन केलेला. ते उद्या पोहोचतील.तोवर यांना कसे सांभाळू आणि काय सांगू.
हे दृश्य शीतली तिथे काम करता करता  पहात होती.आणि हा संवाद ऐकत होती.
आपलं घर मग ते कसंही असू देत छोटं, मोठं, झोपडी ,बंगला पण प्रत्येकाला आवडतं असतं,प्रिय असतं.
शितली भव्याला पटकन बोलून तर गेली होती ,
"आमचं कुठलं आलय घर... विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर."
"आमचं कुठलं आलय घर... विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर."
राहून राहून शीतलीच्याही मनात सारखा विचार येत होता आपलं ही असंच एखादं घर असावं.जिथून कोणी आपल्याला हाकलणार नाही.
हे काय या बिल्डिंगचं काम झालं की त्या बिल्डिंगमध्ये पथारी पसरा .त्या बिल्डिंगचा काम झालं की अजून दुसरी शोधा.
शितलीच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती.
म्हणूनच ती महाजन काकूकडे शिकायला जात होती.
त्या बदल्यात त्यांचं बागकाम करून देत होती .अडलं पडलं एखादं कामही करून देत होती.
शितलीच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती.
म्हणूनच ती महाजन काकूकडे शिकायला जात होती.
त्या बदल्यात त्यांचं बागकाम करून देत होती .अडलं पडलं एखादं कामही करून देत होती.
 त्यांनीही तिला लळा लावला होता.
काकूंनी काही आपली कामे तिने करावित म्हणून तिला ठेवून घेतलेलं नव्हतं. त्या निवृत्त शिक्षिका होत्या. त्यांनी तिच्या ठिकाणची जगण्याची दृष्टी, शिकण्याची इच्छा,तिची बुद्धीमत्ता बघून तिला स्वतः बोलावून घेतलं होतं.

शीतली ही मन लावून अभ्यास करत होती.
आता तिला अक्षर, अंक ओळख झाली होती.
बिल्डिंगचे काम बघायला इंजिनियर लोक आले की त्यांच्या गोष्टी शितली ऐकायची. तिच्याही मनाने ठाणले होते मला असेच इंजिनियर बनायचे.
Where there is a will there is a way असं म्हणतात. इच्छा असेल तर मार्ग सापडतोच.

अनपढ शितली अआई गिरवता गिरवता बघता बघता इंजिनियर  बनली. पुढे UPSE ची कठीण परिक्षा एकाच प्रयत्नात चांगली पास झाली.
कलेक्टर बनली.आता तर तिला चांगले क्वार्टर मिळाले होते.नोकर चाकर सगळंच सुख हात जोडून उभं होतं.
कलेक्टर बनली.आता तर तिला चांगले क्वार्टर मिळाले होते.नोकर चाकर सगळंच सुख हात जोडून उभं होतं.
पण 'स्वतःचे घर 'डोक्यातून गेले. नव्हते.
तिने ,जिथे तिच्या मनात स्वतःच्या घराचे स्वप्न बीज पेरले गेले होते त्या ठिकाणी एक सुंदर बंगला बांधला. त्याला नाव दिले 'तीर्थ'.
तिने ,जिथे तिच्या मनात स्वतःच्या घराचे स्वप्न बीज पेरले गेले होते त्या ठिकाणी एक सुंदर बंगला बांधला. त्याला नाव दिले 'तीर्थ'.
ती परत आपल्या  व्यवसायाकडे वळली. आणि एक  उत्तम बांधकाम व्यावसायिक बनली.
कित्येक बंगले, इमारती, फ्लॅट सिस्टीमची घरे असे विविध प्रकारची घरे बांधण्यात तिचा मोलाचा वाटा राहिला.
तिचं डिझायनिंग स्किल बघून तिच्याकडे मोठ मोठ्या अपार्टमेंटस् ची कामे आलीत.
कित्येक बंगले, इमारती, फ्लॅट सिस्टीमची घरे असे विविध प्रकारची घरे बांधण्यात तिचा मोलाचा वाटा राहिला.
तिचं डिझायनिंग स्किल बघून तिच्याकडे मोठ मोठ्या अपार्टमेंटस् ची कामे आलीत.
भटक्याचं जीवन जगणाऱ्या तिच्या आई वडीलांना तिच्या बंगल्यात स्थिरता मिळाली.अत्यंत आनंदाने त्यांनी अंतिम श्वास घेतला.
शितली कृतकृत्य झाली होती.
©®शरयू महाजन
शितली कृतकृत्य झाली होती.
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा