घर की मुर्गी दाल बराबर.
पहा पहा त्याअग्रवालच्या शलाका ला, किती स्मार्ट आहेइतक्या लहान वयात क्लब ची प्रेसिडेंट आहे येवढ्या मोठ्या गृप ला सांभाळते. म्हणूनच तिची सासू येवढा भाव खात असते .,क्लब स्वतःच्या मालकिचाच समजते.
आपल्या टेलेंट चा उपयोग करायला हवा! नाहीतर काय फायदा इतकं शिकून सवरून?
न्यूज पेपर मधे आलेले क्लब चे फोटो आणि बातमी वाचून, आपल्या नवर्या कडे पहात ललिता बाई फणकारल्या.
यजमान सुधाकर ,त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही ते पाहून किचनमध्ये जात सुनेला ऐकवत बडबडल्या ह्याला म्हणतात नशीब.
किचन मधे स्वतःचा आणि मुलीचा टिफिन भरता भरता आदितीने बाहेर येऊन पेपर पाहिला आणि म्हणाली खरंच शलाका इज ग्रेट.
पहा पहा किती छापून आलोय पेपर मध्येतिच कौतुक. ललिता अजून बडबडी.
अदितीच्या लक्षात येत होतं कि, हे सगळे टोमणे तिला मारले जातात आहे ,सकाळी सकाळी वाद नको म्हणून ती काही न बोलता कपडे बदलायला खोलीत चालली गेली .
संध्याकाळी आदितीने किचन मधले सगळे काम पूर्ण करुन आर्या ला अभ्यासाला बसवले, तिची फायनल परीक्षा चालली होती म्हणून वेळ काढून ती तिच्या अभ्यासाकडे लक्ष देत होतीआणि त्याचबरोबर आपल्या शाळेच्या कॉप्याही चेक करत होती.
ललिताबाई शोप चघळत बाहेर हॉलमध्ये टीव्ही पाहत बसल्या होत्या ,तेवढ्यात त्यांच्या मैत्रिणीचा सुनंदाचा फोन आला
“अगं ललिता पुढच्या महिन्यात वार्षिक समारोह आहे ना क्लबचा तेव्हा एक कुकिंग आणि सिंगिंग कॉम्पिटिशन आहे सुनांसाठी स्पेशल, मी तर आमच्या सुनीताला भाग घ्यायला म्हणते आहे तुही तुझ्या अदिती ला सांग

हो गं सांगते पण तिला काही फार आवड नाहीये, माहित नाही दिवसभर काय करत असते शाळेत जाते आणि घरी येते, ललिताने चिडून म्हटले.
रात्री झोपायच्या आधी आदिती प्यायचे पाणी भरत होती तेवढ्यात सुधाकर राव स्वयंपाक घरात आले.
हे बघ अदिती तुही स्वतः करता थोडा वेळ काढत जा .तू पण का नाही भाग घेत या स्पर्धांमध्ये?
“हो बाबा, सध्या परीक्षा चालू आहे ना शाळेतल्या त्यामुळे वेळच नाही मिळत पण मी प्रयत्न करते.”
“ पहा तुझ्या सासूलाही थोडे बरे वाटेल.”

सकाळी आदितीने ललिता समोर सांगितले” आई मी कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये नांव देते.”
“करणार काय आहे पण तू ?ललिताबाईंना काही चैन पडत नव्हत!”
“ आई अजून पुष्कळ उशीर आहे कॉम्पिटिशन ला तोपर्यंत आर्याची परीक्षा ही संपून जाईल व माझ्या शाळांनाही सुट्ट्या लागतील.

स्पर्धेच्या दिवशी ललिताबाई आपल्या मैत्रिणींबरोबर नटून सजून क्लबला पोचल्या.सगळे सदस्य आलेले होते पण अग्रवाल बाई दिसत नव्हत्या!
अगं त्या अग्रवाल ला काय पायघड्या घालून आणणार आहे? ललिता ने सुनंदा ला विचारले?
“तुला ठाऊक नाही ?अग मोरीत पाय घसरून पडली हाड मोडले आहे! मी गेले होते बघायला.
“मला कां नाही बोलली? मी पण आले असते मला तिचे घर पहायचे होते.”
“काय पहायचे होते? सगळी कडे नुसता पसारा पाणी ही द्यायला कोणी नव्हतं., खूप त्रासलेली दिसत होती
म्हणाली शलाका शापिंग ला गेली आहे.
ती फार बीझी असते. पण खरं सांगू शलाकाच मुळी घरात लक्षच च नाही .सर्व घर नोकरांच्या भरवशा वर.

तेवढ्यात कार्यक्रम सुरू झाला, स्पर्धक आपल्या आपल्या टेबलावर आपल्या आपल्या बनवलेलल्या डिश घेऊन उभ्या होत्या.
अदितीही त्यातच उभी होती. जजमेंट करता प्रसिद्ध रोहिणी ताईंना बोलावले होते. त्यांनी प्रत्येकीची डिश चाखून पाहिली व काही प्रश्न विचारले आणि रिझल्ट लिहून क्लबच्या अध्यक्ष जवळ दिला.
आता सगळ्यांनाच उत्सुकता होती, हॉलमध्ये बसलेल्या बायकांमध्ये चर्चा चालू होती त्यांच्यामते पिझ्झा बर्गर सँडविच सारखे नवेपदार्थ सगळ्यात बढीया होते. तेच जिंकतिल.
ललिता च्या बाजूला रेखा आणि सुनंदा बसल्या होत्या “रेखा ने सुनंदा ला विचारले तुझ्या सुनेने बर्गर कसा बनवला चटणी छान दिसत होती”आणि तुझ्या मीनाक्षी ने पिझ्झा मधे लाल पिवळ्या सिमला मिरची घातली कुठून आणली सध्या खूप महाग आहे,
हो तर पन्नास रुपयांची एक मिळाली.
ललीता, तुझ्या अदिती ने काय बनवलं ग?
अगदीच सिंपल?
हे सर्व ऐकून ललिता चापारा चढला होता अदिती ला अगदी च अक्कल नाही ये तरी आपण विचारले तेव्हा म्हणाली घरात आहे सामान त्यातून बनवेन.
ती कडवटपणे म्हणाली
सगळ्यांना कुठे जमतं छान बनवणं?
तेवढ्यात रिझल्ट लागला असे ऐकून सर्व जणी कान देवून ऐकू लागल्या.

निर्णायक मॅडम रिझल्ट घोषित करत म्हणाल्या “तसे तर सर्वांनी एकापेक्षा एक व्यंजन बनवले होते पण ते सर्व जंक फूड होते, घरगुती मसाल्यांचा प्रयोग करून बनवलेले “पौष्टिक सोया दलिया कटलेट” मला खूप आवडले मुख्य म्हणजे त्यांच्यात सर्व भारतीय मसाले प्रमाणात घालून त्याची पौष्टिकता वाढवली”म्हणून प्रथम पुरस्कार ची मालकीण आदिती शर्मा आहे. क्लबच्या सगळ्या सदस्यांनी टाळ्या वाजवून अदितीच स्वागत केल. रेखा सुनंदा ने ललिता चे अभिनंदन केले.
बक्षीस घेता घेता आदिती म्हणाली हे आमचे पारंपारिक व्यंजन आहे हे मी इथे सासरी आल्यानंतरच शिकले. अशा तऱ्हेने सांगत तिने आपल्या सासरचा मान वाढवला.
मागे खुर्चीवर बसलेल्या ललिता बाईं मनातल्या मनात विचार करत होत्या अदिती ला मी नेहमीच दुसऱ्या सुनां समोर कमतर समजत आले पण आज तिने माझा मान वाढवला. मी कधीही तिच्या गुणांचे कौतुक नाही केले जेव्हा की घर नोकरी सगळ्यांमध्ये ती सामंजस्य ठेवून होती.
हे सर्व करता करता तिला आपल्या स्वतःसाठी फारसा वेळही मिळत नसे.
काय वाटत असेल तिला सासूला आपली काहीच किंमत नाही हे जाणवताच ललीताबाईंना स्वतःह चीच लाज वाटू लागली.

_____________________________
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा