निरगुडवाडी हे छोटंसं पण शांत गाव. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, अंगणात झाडू मारण्याचा आवाज, आणि ओट्यावर उकळणाऱ्या चहाचा सुवास — सगळं वातावरण प्रसन्न करणारं.
अशाच एका सकाळी मंगला चुलीपाशी बसून चहाचं पातेलं हलवत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं — कारण तिच्या मुली, चांदणी आणि रुपाली, दोघीही अभ्यासात हुशार, स्वभावानं गोड आणि संस्कारी होत्या.
पण हे समाधान सगळ्यांच्या मनात नव्हतं.
मंगलाच्या सासूबाई — गंगाबाई — ओट्यावर बसल्या होत्या. त्यांनी कपाळावरचा घाम पुसतच टोमणा मारला,
“मंगला , दोन मुली झाल्या, पण अजून देवाने मुलगा दिला नाही.”

मंगला शांतपणे म्हणाली—
“आई, मुलगी असो की मुलगा, देवाची देणगी एकसारखीच असते. त्या पण आमचं नाव उजळवतील.”

गंगाबाईचा चेहरा वाकडा झाला,
“काय उजळवतील? परक्या घरात जातील. आपला दीप तर दुसऱ्यांच्या अंगणात उजळेल!”

तेव्हा आतून वसंत आला — मंगलाचा नवरा.
तो नेहमीच शांत, संयमी स्वभावाचा माणूस.
“आई, मुलींचं असं काही कमीपण नाही. त्या पण आपला अभिमान वाढवतील, बघाल तुम्ही.”

गंगाबाईने रुसून हात झटकले आणि आत निघून गेल्या.
वसंतचा लहान भाऊ विजय आणि त्याची बायको रेखा — दोघंही घरात अहंकारानं वागायचे.
विजयला एक मुलगा आदित्य होता.त्या आनंदात ते दोघं स्वतःला श्रेष्ठ समजत होते.

रेखा नेहमी म्हणायची—
“आम्हाला देवाने मुलगा दिला. आता घराचं नाव आमचं मुलगाच पुढे करेल . तुमच्या मुली तर एके दिवशी निघून जातील.”

मंगला काही बोलायची नाही. ती फक्त हसून म्हणायची—
“देव सगळ्यांना आपापला वाटा देतो रेखे. आपण फक्त आपल्या वाटचालीत चांगुलपणा ठेवूया.”

मात्र प्रत्येक टोमणा तिच्या अंत:करणात काट्यासारखा रुतायचा.
त्या रात्री ती देवासमोर बसून मनातल्या मनात प्रार्थना करायची —
“देवा, या मुलींना एवढं यश दे की त्यांच्यामुळे या घरात कोणालाही कमीपण वाटू नये.”

गंगाबाई कधीच मुलींशी प्रेमानी बोलल्या नाही. सारखीच हाडतूड करत होत्या. आणि आदित्य घरचा दिवा आहे म्हणून त्याचे सगळेच हट्ट पूर्ण करायच्या.
काळ सरत गेला.
चांदणीने बारावी उत्तीर्ण केली — संपूर्ण तालुक्यात पहिली.
गावातल्या शाळेतील शिक्षकही म्हणाले—
“मंगला ताई, तुमची मुलगी तर गावाचं नाव मोठं करेल.”

मंगला आनंदानं चमकली, पण सासू आणि जाऊ मात्र कुजबुजत म्हणाल्या—
“मुलगी शिकवून काय उपयोग? लग्नात सगळी विद्या विसरते!”

वसंत मात्र ठाम होता.
“माझी चांदणी इंजिनिअर होईल. आम्ही तिला शिकवणार.”

गंगाबाई थोडं नाराज झाल्या,
“मुली शहरात शिकायला? काय बोलतोस वसंत! लोक काय म्हणतील?”

वसंत म्हणाला,
“लोक काय म्हणतात ते त्यांनी बघावं, आमचं भविष्य आम्ही बघू.”

असं म्हणून त्याने चांदणीला शहरात इंजिनिअरिंगसाठी पाठवलं.
पहिल्यांदा ती एकटीच ट्रेनने शहरात गेली तेव्हा मंगल्याच्या डोळ्यात पाणी होतं.
“धाकटी रुपाली, आईचं बोट घट्ट धरून विचारली —
‘आई, आपली ताई आपल्याला सोडून जाईल का?’
मंगला म्हणाली, ‘नाही ग, तुझी ताई शिकून आपल्याला उजेड दाखवेल.’”

शहरात चांदणीने खूप कष्ट घेतले.
घरून फार पैसे मिळत नव्हते, पण तिने पार्ट-टाइम शिकवणी घेतली.
अनेक वेळा ती उपाशी झोपली, पण अभ्यास कधी कमी पडू दिला नाही.

चार वर्षांनी तिचं स्वप्न पूर्ण झालं — ती गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर ठरली.
मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली.
पहिला पगार मिळताच ती सरळ गावाला आली.
मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली.
पहिला पगार मिळताच ती सरळ गावाला आली.
गावातले लोक आश्चर्यानं बघत होते.
ती सगळ्यांसमोर आई-वडिलांच्या पायाशी पहिला पगार ठेवून म्हणाली,
“हा माझा पहिला मान — तुमच्यासाठी.”

वसंतच्या डोळ्यांत अभिमानाचं पाणी आलं.
गंगाबाईंच्या डोळ्यातही पश्चात्ताप दाटला.

दरम्यान रुपालीने एमबीए केलं.
तिने गावात स्त्री स्वावलंबन केंद्र सुरू केलं.
“शिकलेली स्त्री स्वतःचा संसार उभी करू शकते,” ती म्हणायची.
शिवणकाम, संगणक प्रशिक्षण, हस्तकला अशा अनेक गोष्टी ती शिकवू लागली.
गावातल्या कित्येक बायका तिच्या मदतीनं स्वतःचा व्यवसाय सुरू करू लागल्या.

गावातली लोकं आता म्हणू लागली —
“मंगलाच्या मुलींनी गावाचं नशीबच बदललं!”
“मंगलाच्या मुलींनी गावाचं नशीबच बदललं!”
विजयचा मुलगा — आदित्य — मोठा झाला, पण वाया गेला.
दारू, जुगार, वाईट संगत — हेच त्याचं आयुष्य झालं.
एक दिवस पोलिसांनी त्याला चोरीच्या आरोपाखाली पकडलं.
गावभर बातमी पसरली.
विजय आणि रेखा लोकांच्या नजरेत खाली पडले.
त्या रात्री ते दोघं मंगलाकडे आले.आणि मुलाला पोलीस स्टेशन मधून सोडवण्यासाठी रुपालीची मदत मागितली.
ते दोघं म्हणाले —
“ताई, आम्ही चुकीचं बोललो.
तुमच्या मुलींनी खरंच घराचं नाव वाढवलं,
आणि आमचा मुलगा तर...”

ते बोलणं पूर्ण करू शकले नाहीत.
मंगला शांतपणे म्हणाली—
“रेखा, विजय, देव आपल्याला कधी ना कधी शिकवतोच.
मुलगा असो किंवा मुलगी, संस्कार महत्वाचे.”

काही महिन्यांनी जिल्ह्यात मोठा समारंभ झाला.
चांदणीला राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाला,
तर रुपालीला महिला समाजसेविका सन्मान.

त्या दिवशी मंचावर गंगाबाई स्वतः उपस्थित होत्या.
सगळ्यांसमोर त्यांनी अभिमानानं सांगितलं, —
“आज मला समजलं — मुली ओझं नसतात, त्या देवाचा आशीर्वाद असतात.”

गावातील सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला.
विजय आणि रेखा सुद्धा डोळ्यात पाणी आणून म्हणाले—
“आम्ही चुकलो ताई, पण तुमच्या मुलींनी खरोखर करून दाखवलं."

त्या रात्री मंगला देवघरात दिवा लावत म्हणाली,
“देवा, लोकांनी टोमणे मारले, पण माझ्या मुलींनी त्या टोमण्यांना उत्तर दिलं — त्यांच्या कर्मानं.
आज मला जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळालं.”
चांदणी आणि रुपाली आईच्या मिठीत शिरल्या.
तिघींचे डोळे ओले झाले — पण ते अश्रू अभिमानाचे होते.

मुलगी म्हणजे जबाबदारी नाही, ती घराचा सन्मान असते.
ती फुलते तेव्हा घरात सुगंध पसरतो, आणि ती उडते तेव्हा आकाशही तिच्या तेजाने उजळून निघतं.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा