Login

घरटं भाग 2

Story Of
ईरा जलद कथा मालिका
कथेचे नाव_घरटं
भाग _2

रामा रोज रात्री दमून भागून घरी यायचा जेवणावळी झाल्या की मिणमिणत्या उजेडात अंथरुणाला अंग टेकायचा.बाबा यायच्या आधी आपला अभ्यास पूर्ण करून पांडू अंथरून टाकायचा.जेवण झाली की मग आईला भांडी धुण्यासाठी मदत करायचा आपल्या लेकराची काळजी बघून म्हाळसा धन्य व्हायची दुसरीकडे लक्ष्या सगळ्या गावात हिंडू फिरून कितेकाच्या त्रासाचं समाधान कमरेला बांधून जेऊ खाऊन मस्त झोपलेला असायचा त्याच्याकडे पाहून पांडू ला खूप वाईट वाटायचं.आपला भाऊ असा आळशी आणि उनाड असल्याचं त्याला खूप दुःख व्हायचं.. बाबाला त्रास नको म्हणून दिवसभर लक्ष्या ने केलेल्या उनाडक्या पांडू अजिबात बाबाला कळू देत नसे.उलट बाबाला समाधान वाटावे म्हणून त्याचा अभ्यास स्वतः पूर्ण करून तो बाबाला दाखवे हे सर्व पांडू चे गुण म्हाळसा ला ठाऊक होते.तीही मोठ्या प्रेमाने त्याला समजून घ्यायची पणं लक्ष्याच कसं व्हायचं हा प्रश्न तिला भेडसावत असे.
"म्हाळसा…आपली तिन्ही बी पोरं लई गुणी हैत"
"व्हय..ई पांडू तर अवघा ईठोबाचा अवतार हाय..तुम्ही कसली बी काळजी करू नगसा "
"न्हाई ग म्या कसली काळजी करू…समद मनासारखं घडतंय पोरं हुशार हैत्त…आई बा बी धडधाकट हाईत म्या कसली बी काळजी नाय बघ…आता शिवारात चांगलं पीक आलं की तुला सोन्याची बोरमाळ करायचं म्हतूया.."
"आव सोन्यासारख माझं घर सोण्यावाणी तीन पोरं आणि सोण्यापरिस चककात माझा धनी हाय मग आणि कशाला पाहिजेत ते सोनं "
बायकोची साथ बघून रामा सुखावून जाई. होतीच तशी ती लग्न झाल्यापासून कितीतरी संकट आली पण म्हाळसा ने कधी रामा चा हात सोडला नाही.पाऊस चांगला पडला तर पीक येई नाहीतर दुष्काळ ठरलेला असे.त्यात कटकसर करून ती संसारात हातभार लावी सासू सासरे तिचं खूप कौतुक करत आपल्या रामाचा फुललेला संसार बघून आई बाबाला आनंद होई…असच फुलत चाललेला संसाराचा गाडा दोघांच्या अथक मेहनतीने सुंदर आकार घेत होता.
दिवसामागून दिवस जाऊ लागले शेतातील पीक कमी जास्त येऊ लागले. मुले ही मोठी होऊ लागली मोठा पांडू दहावीला गेला तसा त्याचा अभ्यासाचा जोर वाढला. लक्ष्या जिथं होता तिथच होता..

क्रमशः


©®सविता पाटील रेडेकर
नेसरी

🎭 Series Post

View all