भाग १
काय ग चपात्या आज जास्त केल्यास? काही विशेष आहे का? समीरच्या बोलण्याने रूपा भानावर आली.
अरे हो, अरे रोज आपल्या पुरत्याच करते, आज घाई गडबडीत जास्त झाल्या.
चल चल उशीर होईल, हा टिफीन घे. मला पण मग ऑफिस पर्यंत ड्रॉप कर, उशीर होईल नाहीतर मला. अस म्हणत रूपा आणि समीर सर्व नीट आवरून ऑफिसला निघाले. दार बंद करताना पण रूपा जरा वेगळ्याच विचारात होती.
समीरने तिला तिच्या ऑफिस जवळ सोडलं. ती रोजच्या सारखं बाय न करताच आत शिरली. समीर गाडी घेवून पुढे निघाला. ही रूपा पण ना, आई बाबा मुंबई मध्ये आले की नको त्या अपेक्षेने त्यांची वाट पाहते. जे झाल ते झाल. विसरायचं ते नाही. असा स्वतःशी पुटपुटत स्वतःच्या ऑफिस जवळ पोहोचला.
रूपा देखील आज कामाच्या दुनियेतून, जरा भूतकाळाच्या विचारात गुंग झाली. किती सुंदर दिवस होते ते. समीर आणि मी कॉलेज पासून एकत्र, मैत्रीचे बंध रेशमी बंधात कधी गुंफले कळलेच नाही. तेव्हा दोन्ही कुटुंबाच्या संमतीने सारे कसे छान जुळून आलेले. मी करियर ओरिएंटेड असून सुद्धा सासूबाईंनी छान जुळवून घेतलेलं. आईच्या हाताखाली मी घरातील पण सारे काही शिकली होते. त्यामुळे सासू आणि जावेला जमेल तशी मदत करून मी ऑफिसला निघायची. घरात मोठे दिर जावू, आणि त्यांची छोटी परी, सासू सासरे आणि आम्ही दोघे असा हसरा परिवार.
सारेच सर्वांशी जुळून घेत होते. पण मला एक आवडत नव्हत. इतरांच्या अगदीच खासगी आयुष्यात सुद्धा साऱ्यांनाच सर्व जाणून घ्यायची घाई असायची. मला पण सासू आणि जावू सतत, तू हे केलं का? ते केलं का? मग पाळणा कधी हलवता? ऑफिस मध्ये आज काय केलं? तू उदास का? हसते का? अशा असंख्य प्रश्नांनी भंडावून सोडत.
मी एकदा मग समीरच्या कानावर हे सर्व घातलं. तर तो मलाच बोलला, मी म्हणूनच त्या सर्वांपासून जरा अलिप्त राहतो. मग तू का त्यांच्यात मिसळून राहते? तोंडावर उत्तरं दे.
अरे समीर मी कशी उत्तरं देणार? तू आधीपासून अलिप्त राहतो, त्यांना ते पटत, मी कस राहणार? मी सून आहे. माझी बदनामी होईल. त्यावर समीर सरळ बोलला, स्वतः मधला "स्व" जपायचा असेल तर कोणालाच डोक्यावर घेवू नकोस. बर म्हणत मी गप्प झाली.
त्या दिवशी कहरच झाला शेजारच्या काकी आमच्याकडे आल्या होत्या, तर त्यांनी मला बाळा बद्दल विचारले. मी बोलली एवढ्यात नाही विचार, आधी जॉब.
तर त्या काही बोलणार तेव्हड्यात माझी सासू च बोलली, हे नको ते काय सांगते ग त्यांना. काही नाही अहो वनारे वहिनी, पुढच्या वर्षी नक्कीच दोघांचे तीन दिसतील हे.
अस म्हणून सर्व हसू लागले. वनारे काकी गेल्यावर, मी जरा चिडून च सासू ला बोलली, तुम्ही काही पण का सांगता बाहेरच्यांना? आम्ही मुलाबद्दल नाही विचार केला.
तेव्हड्यात जावू बाई पण बोलली अस थोडेच आहे, पुढच्या वर्षी हवंच हा.
जेवताना सर्व जेवण आवडीचे होते, तरी जेवायची इच्छा नव्हती. दोन घास खावून मी सरळ उठून आत जाणार, तेव्हड्यात सासू बाई बोलल्या, आता अस कमी जेवून होणार नाही. पोटभर जेव.
मी भूक नाही सांगून सरळ उठून गेली. सकाळी उठून टिफीन बनवताना मी गप्प च होती. छोटी मुळे वहिनी सकाळी लवकर उठत नसे, सासू आणि मी सकाळचं आवरत असू, त्यावेळी सासू मला बोलली. रूपा, " एक तरी मुल हवंच ग" बाकी तू सर्व गुण संपन्न आहेसच. ह्यावर रूपा कसलाही विचार न करता, सासूला ताडकन बोलली. मला मुल एवढ्यात नको, आणि परत हा विषय मला घरात नको. माझे करियर मला प्रिय आहे. बस...अस म्हणत,चिडून मी कामावर आले,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा