घरकाम म्हणजे बायकोचेच का?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
"नेहा, चहा झाला आहे. लवकर बाहेर ये, नाहीतर थंड होईल," कार्तिक म्हणाला.
कार्तिकने आईला चहा दिला इतक्यात नेहा पण आली.
"डॅडी, माझं दूध बनवलं आहे ना?" गार्गी म्हणाली.
"हो माझ्या पिल्लूसाठी दूध बनवलं आहे," कार्तिक गार्गीला जवळ घेत म्हणाला.
नेहा दूध घेऊन आली आणि गार्गीला पाजलं. दूध पिऊन गार्गी खेळायला लागली. तिघांनी मिळून चहा घेतला आणि गप्पा सुरू झाल्या.
"आई, तुला काही हवं आहे का? आम्ही मार्केटमधून भाज्या घेऊन येतो. तू काहीच करू नकोस, आज मी जेवण बनवणार आहे," कार्तिक म्हणाला.
"मी फक्त गार्गीसोबत खेळणार आहे. कायं गार्गी, तुला चालेल ना?" कार्तिकची आई म्हणाली.
गार्गी लगेच आजीला बिलगली.कार्तिक आणि नेहा मार्केटला गेले.गार्गी आजीसोबत खेळली. नंतर आजीने तिला छान गोष्ट सांगितली. गार्गीला झोप यायला लागली. आजीने तिला रूममध्ये नेऊन झोपवलं.
गार्गी झोपली की आई बाहेर आली. तिने गार्गीची खेळणी नीट ठेवली, घर झाडलं आणि बाकी सगळं आवरलं.
तोपर्यंत कार्तिक आणि नेहा मार्केटमधून परत आले. त्यांनी आणलेल्या वस्तू आईकडे दिल्या आणि फ्रेश होऊन आले.
तोपर्यंत कार्तिक आणि नेहा मार्केटमधून परत आले. त्यांनी आणलेल्या वस्तू आईकडे दिल्या आणि फ्रेश होऊन आले.
आईने भाज्या साफ करायला घेतल्या होत्या. नेहा आली आणि ती पण भाज्या साफ करायला बसली. दोघी गप्पा मारत काम करत होत्या.
कार्तिक आला आणि त्यांच्या जवळ बसून मदत करू लागला. नेहाला कॉल आला म्हणून ती रूममध्ये गेली तेवढ्यात दरवाजा वाजला.आई उठत होती पण कार्तिक उठून दरवाजा उघडतो. त्यांची आत्या आली होती.
"आत्या, या ना," कार्तिक म्हणाला.
"आत्या, या ना," कार्तिक म्हणाला.
आत्याला पाणी आणून दिलं. आत्या पाणी घेत होत्या पण कार्तिककडे आश्चर्याने बघत होत्या. कार्तिकने आत्याला चहा करून आणला, आता तर आत्याचे डोळे विस्फारले.
कार्तिकची आई भाज्या फ्रिजमध्ये ठेवत होती. कार्तिकने तिथे झाडून घेतलं.तेवढ्यात नेहा आली. तिने आत्याला पाहिलं आणि पाया पडली.
"आत्या, कधी आलात?" ती म्हणाली.
"आत्या, कधी आलात?" ती म्हणाली.
"मला बराच वेळ झाला," आत्या म्हणाल्या.
गार्गी उठली. नेहा तिला फ्रेश करून घेऊन आली.
आई आणि आत्या बोलत बसल्या. गार्गीही त्यांच्यासोबत खेळत होती. कार्तिकने गार्गीला खायला आणून दिलं.
आत्या सगळं पाहत होत्या पण गप्प होत्या.
थोड्यावेळाने कार्तिक आणि नेहाने जेवण बनवलं. त्यांनी जेवण करून घेतलं. नेहा गार्गीला जेवण भरवत होती, त्यामुळे तिला वेळ लागला. तोपर्यंत कार्तिकने बाकीची ताटं किचनमध्ये नेऊन ठेवली.
थोड्यावेळाने कार्तिक आणि नेहाने जेवण बनवलं. त्यांनी जेवण करून घेतलं. नेहा गार्गीला जेवण भरवत होती, त्यामुळे तिला वेळ लागला. तोपर्यंत कार्तिकने बाकीची ताटं किचनमध्ये नेऊन ठेवली.
नेहाचं जेवण झाल्यावर तिने बाकीचं आवरलं.
ते सगळे गप्पा मारत बसले.
ते सगळे गप्पा मारत बसले.
"वहिनी, माझ्या भावाने कधीच घरात काम केलं नाही. पण कार्तिक घरातलं सगळं काम करतो. कार्तिक, तू का करतोस घरातलं काम? नेहा लवकर काम करून गार्गीकडे बघेल. तिला खायला पण तू देतोस," आत्या म्हणाल्या.
"ताई, यांनी कधीच घरकाम केलं नाही. सगळं मी एकटी करत होते – मुलांना बघत होते, घर सांभाळत होते पण मला छान वाटतं, माझा कार्तिक घरातलं काम करतो," कार्तिकची आई कौतुकाने म्हणाली.
"आत्या, नेहा पण नोकरी करते. तीही दमते. मी बाबांना घरात फक्त ऑर्डर देताना पाहिलं आहे. पण मी असं करायचं ठरवलं नाही. म्हणून मी नेहा आणि आईला मदत करतो. मी नोकरीला जातो, नेहाही जाते. दिवसा आई गार्गीला सांभाळते. तीही दमते. मुलांनी घरात काम केलं तर काय बिघडलं? आता काळ बदललायं. बायका बाहेर काम करतात, मग आम्ही घरात काम केलं तर काय होतं?" कार्तिक शांतपणे म्हणाला.
"कार्तिकचे किती छान विचार आहेत! मला माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटतो," नेहा म्हणाली आणि गार्गीला जवळ घेतलं.
"तरीही मला वाटतं, नेहानेच सगळं करायला हवं" आत्या म्हणाल्या.
"आत्या, घर दोघांचं आहे, मग घरकाम फक्त बायकोनेच का करायचं? आता जुने विचार मनातून काढून टाकायला हवेत. जग पुढे चाललंय, आपणही तसंच जाऊ या," कार्तिक म्हणाला.
नेहाच्या डोळ्यांत पाणी आलं. "तू माझा नवरा नाही, तू माझा खरा साथी आहेस," ती मनात म्हणाली तसे
आत्यालाही समजलं.
"हो रे कार्तिक, बायका आता नोकरी करतात. तुझे विचार खूप चांगले आहेत. नेहा, वाईट वाटून घेऊ नकोस. आम्ही आमच्या काळात मुलांना घरात काम करताना पाहिलं नव्हतं म्हणून मी बोलले. पण आता मी माझ्या मुलांनाही घरात काम शिकवेन" आत्या आनंदाने म्हणाल्या.
आत्यालाही समजलं.
"हो रे कार्तिक, बायका आता नोकरी करतात. तुझे विचार खूप चांगले आहेत. नेहा, वाईट वाटून घेऊ नकोस. आम्ही आमच्या काळात मुलांना घरात काम करताना पाहिलं नव्हतं म्हणून मी बोलले. पण आता मी माझ्या मुलांनाही घरात काम शिकवेन" आत्या आनंदाने म्हणाल्या.
"आत्या, घरकाम म्हणजे फक्त बायकोचं नसतं. आपण तिला मदत करायला हवी" कार्तिक म्हणाला.
"हो, आता मला समजलं" आत्या हसून म्हणाल्या.
आत्या आनंदाने परत गेल्या.
आत्या आनंदाने परत गेल्या.