घरकोन भाग 1

अल्लड,प्रेमळ पण प्रगल्भ विचारांची रेवा आपली नाती जोडण्यासाठी जी धडपड करते आणि नात्यांचे कोन स?

घरकोन-भाग1
®©राधिका कुलकर्णी.

सुशांत घरी आला तोच तणतणत..रेवाने खास त्याच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज आणि स्ट्राँग कॉफी बनवून ठेवली होती त्याला आवडते म्हणून.
घरी आल्यावर मनासारखे खायला मिळाले की सुशांत खूप खूष असायचा.
आणि त्यात रेवालाही आज त्याच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे होते.म्हणून त्याचा मूड प्रसन्न करण्यासाठी त्याच्या पोटातून प्रवेश करण्याचा तीचा प्लॅन होता.ती खूप उत्साहात सगळी तयारी करून त्याची वाट पहात होती.
पण सुशांत काही न बोलताच बेडरूम मधे शिरला. बॅग एका दिशेला फेकून त्याने स्वत:ला बेडवर झोकून दिले होते.
रेवा किचन मधून घाईघाईने बेडरूम मधे गेली.त्याला असे चिडलेले तीने कधी फारसे पाहीले नव्हते म्हणून तीला जास्त काळजी वाटत होती..
सूश,काय झाले?
बरे वाटत नाहीये का बाबू?

"रेवा ,please leave me alone." 
"तू बाहेर जा बघू."
त्याच इतक कठोर तुटक बोलणे ऐकून तर तीची खात्रीच पटली की नक्कीच काहीतरी बिनसलेय स्वारीचे.
तीने हलकेच त्याच्या कपाळावर हात फिरवला आणि धीर करून पून्हा बोलली..
"सूश,मी तुझ्या आवडीचे फ्रेंचफ्राइज आणि मस्त तूला आवडते तशीच स्ट्राँग कॉफी बनवलीय डियर.
ये ना लवकर फ्रेश होवून,बघ कॉफी घेतलीस की तूला बरे वाटेल..
मग मला सांग काय झालय..
चल ऊठ बघू.."

पण सूशांत आता मात्र जास्तच वैतागला.
"तूला कळत नाहीये का एकदा सांगून की मला एकटे राहायचेय आत्ता."
"का उगीच किटकिट करतीएस डोक्याला.."
आणि काय ग ,फक्त आवडीचे पदार्थ खावून माणसांचे त्रास कमी  होतात असे वाटते का तूला?
घरात राहून तूला काय कळणार म्हणा.तसे झाले असते तर सगळ्यांनी तेच केले असते.
तूझी काय चूक.मीच मूर्ख तूझ्याकडून समजूतीची अपेक्षा करतोय."
"तू तुझे काम कर.मी काय करायचे हे तू मला शिकवू नकोस."
"आता जा आणि मला डिस्टर्ब करायला येवू नकोस पून्हा.मला बर वाटले की मी स्वत:च बाहेर येईन,
तू जा"

इतके घालून पाडून सुशांत ह्या आधी कधीच बोलला नव्हता.
त्यामूळेच की काय रेवाला आज खूपच वाईट वाटत होत.

पण काहीही न बोलता शांत राहण्यातच शहाणपण हे ओळखून ती डोळ्यातल्या पाण्याला तिथेच अडवत निमूटपणे रूम बाहेर गेली.जाताना दार बंद करायला विसरली नाही..

संध्याकाळचा संधीप्रकाश संपून आता काळोख पडायला सुरवात होत होती.तीने आपला कॉफीचा मग घेवून गॅलरीत उभी राहीली.
समोर झाडांच्या सावल्याही अाता गर्द आणि काळ्या व्हायला लागल्या होता.
तिच्या मनाची घुसमट काळ्या डोहात विलीन होत होत्या.
    .............................
क्रमश-1
®©राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी. तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवी कोरी कथा घरकोन..पहिला भाग पोस्ट केलाय.कसा वाटला हे वाचुन नक्की सांगा.
तुमच्या प्रतिक्रीया कमेंटद्वारे नक्की कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहित कथा शेअर करायला माझी मुळीच हरकत नाही.)

🎭 Series Post

View all