घरकोन भाग 11

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड, प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकथा घरकोन जरूर वाचा.

घरकोन-11
®©राधिका कुलकर्णी.

आजची सकाळ खूपच महत्त्वाची होती.
आज कंपनीसाठी फार मोठ्ठा दिवस होता.
सुशांतला हिच चिंता होती की सगळे व्यवस्थित होईल ना?
ऐनवेळी काही अडचण,प्रश्न तर नाही ना उभे राहणार?
मन चिंती ते वैरी न चिंती असे काहीसे सुशांतचे झाले होते.
आज नेहमीपेक्षा लवकरच  निघणार होता त्यामुळे सगळे आवरून तो घाईनेच ऑफीसला पोहोचला.
ठरल्या प्रमाणे गावंडेही त्याचीच वाट पहात होता.
दोघांनीही अगोदर चहा घेतला.
लागणाऱ्या फाईल्स स्लाईड्स सह दोघे कॉन्फरन्सरूम मधे पोहोचले.
गावंडेनेही रात्रभर बहुतेक बऱ्या पैकी तयारी केली असावी कारण आज तो परवा पेक्षा जास्त तयारीत दिसत होता.
त्याच्या बॉडी लँगवेज मधुन त्याचा कॉन्फीडन्स दिसत होता.
ते पाहून सुशांतला खूप हायसे वाटले.कारण त्याला आता गावंडेवर तेवढी मेहनत घ्यावी लागणार नव्हती जेवढी त्याला इथे येण्यापूर्वी वाटत होती.त्याने मनातल्या मनात सुटकेचा नि:श्वास सोडला.
आता कॉन्फरन्स रूम मधे दोघेच होते.
गावंडेनी अगदी शाळकरी मुले भाषण पाठ करावीत तसे सगळे स्पीच पाठ करून आला होता.
अगोदर फक्त स्पीच छान बोलता येतेय का ही प्रॅक्टीस घेऊन झाली.
ते सगळे छानच जमले होते.

आता हिच माहिती योग्य त्या स्लाईड्स समोर प्रोजेक्टरवर सरकवून त्याबद्दल नेमकेपणाने कसे बोलायचे ह्याचा सराव झाला.
पण ह्यावेळी मात्र गावंडेची गल्लत होत होती.कारण स्पीच नुसतेच पाठ केल्याने विशिष्ट माहितीची स्लाईड प्रोजेक्टर वरून डिस्प्ले होण्याअगोदरच त्या संदर्भातली माहिती तो बोलून टाकलेला असायचा.
त्याला मधेच थांबून प्रोजेक्ट स्लाईडवरची माहिती देताना विसरायला होत होते.

सुशांतने मग स्वत: पुन्हा प्रात्यक्षिक करून दाखवले की स्लाईड प्रोजेक्टर वर येईपर्यंत कसा पॉझ घ्यायचा.
गावंडेला पून्हा तेच ते करायचा कंटाळा येत होता आणि चीडचीडही होत होती.
पण दुसरा काही पर्यायही नव्हता.
सुशांतला एखाद्या लहान मुलाकडून भाषण तयार करून घेतानाचा फिल येत होता.
बर बाकी सगळे जमले तरी त्याचे इंग्रजी उच्चारण इतके विचित्र होते की ते अॅक्सेंट्स सुधारण्यात सुशांतचा कस लागत होता.
स्वत: शब्दांचे उच्चार करून शिकवताना त्यालाही लाज वाटत होती.
कितीही झाले तरी हुद्द्याने समान असले तरी वयाने गावंडे मोठा होता.कंपनीत त्याला दोन वर्ष सिनियर पण होता.
आपल्याहून मोठ्या व्यक्तिला असे शिकवणे,त्याच्या चूका काढणे हे सुशांतला जडच जात होते.
आजचे प्रेझेंटेशन कसे होणार ह्याची जसजसा वेळ पूढे सरकत होता तशी त्याला काळजी वाटत होती.

मग अचानक काय मनात आले की त्याने मधेच गावंडेला थांबवले.
"सर,एक मिनीट." 
"मी काय म्हणतो,आपण दहा मिनीट ब्रेक घेऊया का?."
"तूम्ही फ्रेश व्हा आणि मग नेक्स्ट सेशनला आपण रावसर आणि आपल्या प्रोजेक्ट टिमला समोर बसवू म्हणजे तुम्हाला चार लोकांसमोर बोलण्याचे दडपण येतेय का हेही बघता येईल.एकदा त्यांच्या समोर जर तूम्ही न अडखळता प्रेझेंट करू शकलात तर मग तयारी ओकेच समजायची.
कशी वाटते कल्पना?"
ओके मि.सुशांत,तुम्ही म्हणताय तर तसेच करू.पण का कुणास ठाऊक अजुनही मला पुर्ण तयारी झालीय असे वाटत नाहीये."
"डोन्ट वरी सर,एव्हरीथिंग विल बी फाईन."
त्याला सांत्वन देत होता पण मनातून सुशांतला ही दडपण आले होते.
कारण प्रेझेंटेशनला आता काहीच तास बाकी होते.
त्याने एक दिर्घ श्वास घेतला आणि दोघांसाठी कडक कॉफी ऑर्डर केली.
गावंडे फ्रेश व्हायला बाहेर गेला हे पाहून त्याने रेवाला  कॉल केला.
रींग जात होती.
हॅलोऽऽऽ,रेवाने रिसीव्हर उचलला.
"अग् मी बोलतोय."
काय रे,सगळे ठिक ना?ह्यावेळी कसा फोन केलास?"
हो,ग.जरा टेंशन आलेय.काहीच सुचत नाहीये.अजून दोन तासांनी गेस्ट्स आमच्या गेस्ट हाऊसवर पोहोचतील.
त्यानंतर तासाभरात प्रेझेंटेशन आहे."
 "रात्र थोडी अन् सोंग फार अशी गत झालीय."
त्यात गावंडेला अजुनही म्हणावा तसा कॉन्फीडन्स येत नाहीये.काय करावे कळत नाहीये.
थोडा ब्रेक घेतलाय.तो बाहेर आहे म्हणून तूला कॉल केला.
तेवढेच बोलून मन शांत बाकी काही नाही."
"हम्मऽऽऽऽ.
"बेडकाचा कितीही बैल करायचा म्हणले तरी जमते का तसेय हे."
"जावुदे सुश.तू टेंशन घेऊ नकोस.तू तुझे काम चोखपणे करतोएस ना.बाकीचे देवावर सोड आणि शांत बैस."
"इतक्या इलेव्हन्थ आवर्स मधे नाहीतरी कोणता चमत्कार तू अपेक्षित करतोएस?"
"हो गं,खरय तूझेही.
बर चल ठेवतो फोन तो येतच असेल,बायऽऽ."

बाय करतच सुशांतने फोन ठेवला.
पाचच मिनिटात सगळी प्रोजेक्ट टीम तिथे उपस्थित झाली.
रावसर,मि.गावंडें बरोबर येताना बघुन सगळेच अदबीने उठुन ऊभे राहीले.
सगळ्यांना हातानेेच बसण्याचा इशारा करत रावही एका सर्वात समोरच्या चेअर वर स्थानापन्न झाला.
आत्ता पर्यंत बऱ्यापैकी कॉन्फीडण्ट वाटणारा गावंडे आता थोडा नर्व्हस वाटत होता.
समोर उभे राहून प्राथमिक स्वागताची चार वाक्ये बोलला आणि नकळत त्याच्या हातापायाला कंप सुटतोय असे त्याला जाणवायला लागले.
त्याने जवळच असलेली पाण्याची बाटली घेत पाणी पिण्याचा अविर्भाव करत स्वत:ला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला.
मि.सुशांत तुम्हीही जरा इकडेच माझ्या बाजूला उभे रहाल का प्लिज?
त्याच्या ह्या अवस्थेकडे पाहून मि. राव थोडा चिडला पण तसे न दाखवता तो जरा चढ्या आवाजातच बोलला.
नो नीड ऑफ मि.सुशांत."
"यु कॅन परफॉर्म व्हेरी वेल गावंडे."
जस्ट डू इट,इजन्ट इट मि. सुशांत?
राव अाता सुशांतला उद्देशून बोलत होता.
इनडायरेक्टली त्याला ह्या प्रेझेंटेशनचे कुठलेही क्रेडीट सुशांतला मिळू द्यायचे नव्हते म्हणून तो गावंडेला सुशांतची मदत घेण्या पासून रोखत होता.
रावनेच तंबी दिल्यामुळे गावंडेचा नाईलाज झाला.
त्याने कसेबसे चुकत धडपडत प्रेझेंटेशन संपवले.

प्रेझेंटेशन संपवून तो मिनीटभर प्रतिक्रीयेची  वाट पहात तिथेच ऊभा राहीला पण कुणाला कळलेच नाही की प्रेझेंटेशन संपलेय.
मग रावनेच विचारले," ईज प्रेझेंटेशन ओव्हर मि. गावंडे?"
"यस सर." मान खाली घालुनच गावंडेने उत्तर दिले.
नॉट बॅड मि.गावंडे.
स्टील टाईम ईज देअर.
जस्ट डू सम मोअर प्रॅक्टीस,यु विल बी परफेक्ट टिल प्रेझेंटेशन टाईम."
"आय हॅव्ह फेथ ईन यू.व्हॉट से मि.सुशांत?

त्याने पुन्हा सुशांतला मुद्दाम संभाषणात ओढून चतुराईने गावंडेला दुजोरा द्यायला सर्व टिमला भाग पाडले.
तेवढ्यात प्यिऊनने राव सरांचा फोन आहे अशी वर्दी दिली.
पटापट सगळे निघून गेले आणि गावंडे मटकन खुर्चीत बसला.त्याच्या सर्वांगाला ए.सी.चेंबर मधेही घाम फुटला होता.
मी त्याच्या नॉर्मल होण्याची वाट पहात तिथेच बसून राहीलो.
तेवढ्यात रावने आम्हाला दोघांनाही त्यांच्या केबिन मधे बोलवून घेतले.
दोघेही केबीनमधे पोहोचलो.
राव थोडा चिंतेत वाटत होता.
आम्हाला समोर बघताच त्याने बोलायला सुरवात केली.
आत्ताच गेस्ट हाऊस वरून फोन आलाय.
गेस्ट्स आर ऑलरेडी रिच्ड टू आवर गेस्टहाऊस अँड दे वाँट द मिटींग टू बी हेल्ड अर्ली दॅन द स्केड्युल्ड टाईम.
व्हॉट शुड आय आन्सर टू देम?
"आर यु रेडी मि.गावंडे,
जस्ट टेल मी?"

गावंडे त्यांच्या समोर न बोलता शांत राहीला.
त्याला काय बोलावे हेच समजत नव्हते.
पण रावने त्याच्या न बोलण्याला मुक संम्मती
समजून लगेच गेस्टहाऊसला आमच्या समोरच फोन करून अर्धातास आधी म्हणजे चार वाजताच येण्याचे आमंत्रण दिले.
"मि.सुशांत,यु प्लिज लुक आफ्टर द गेस्ट्स अँड रिसिव्ह देम."
"डु ईट फास्ट."
आता तर गावंडेला आभाळ फाटल्यागत झाले.जो काय थोडाफार आधार सुशांतच्या असण्याचा होता तोही आता नव्हता.
त्याची त्याला काय तयारी करावी,काय चुकतेय, काय बरोबर काहीच कळेनासे झाले होते.

तो शांतपणे आपल्या केबिनमधे जाऊन बसला.
ईकडे सुशांत कंपनी गेस्ट हाऊसवर जावून सगळ्यांना कंपनीच्या वतीने स्वागत करून हस्तांदोलन करत आपला परीचय दिला.गेस्ट्सच्या ब्रेकफास्ट,चहा/कॉफी इ.सोय करून त्यांना कंपनीच्या मेन बिल्डींगकडे घेऊन जाण्यासाठी प्रतिक्षा करत हॉलमधे बसला.
सगळ्ंयाचे सगळे आटोपले तसे त्याने मि.रावला ते निघण्यासाठी तयार असल्याची सुचना फोनवरून दिली.
लगेचच सगळी टिम बिल्डींगमधे पोहोचली.

साधारण साडेतीन वाजले होते.अजून दहा पंधरा मिनीट होते.तेवढ्या वेळात गेस्ट्स पैकीचे जे मेन बॉस होते ते सुशांतला कंपनी संदर्भात जुजबी प्रश्न विचारत होते.
सुशांतने त्यांना त्याची सखोल माहिती देवून बऱ्यापैकी इम्प्रेस केले असावे कारण मि.राव आणि त्यांची भेट होता क्षणीच त्यांनी रावला एक वाक्य सुशांतला ऐकु जाईल असे बोलले.
"यु आर व्हेरी लक्की मि.राव."
रावला समजत नव्हते बॉस असे का बोलताएत. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह गेस्ट्सनी अचूक हेरले आणि त्यांनी लगेच मि.रावला त्याची पुष्टी दिली.
"आेह,नोऽऽ नोऽऽ मि.राव,डोन्ट गेट कनफ्युज्ड,आय अॅम रीअली प्रेझिंग यु." 
"यु हॅव्ह सच अ ब्रिलीयंट स्टाफ विथ यू."
"मि.सुशांत इज व्हेरी टॅलेंटेड.." सुशांतचे कौतुक ऐकुन रावचे तोंडच आंबट झाले पण बाहेरच्या पाहुण्यांसमोर तसे न दाखवता तोही त्यांच्या बोलण्यात हसून सामिल झाला.
"लेट्स प्रोसिड सर."
"कॉनफर्न्स रूम ईज रेडी फॉर द प्रेझेंटेशन."रावच्या सांगण्यावरून
सगळेच हॉलकडे जायला निघाले.
राव पुढली जवाबदारी घेत गेस्ट्सना हॉलपर्यंत नेतो आहे हे पाहून हळूच सुशांतने तिथुन काढता पाय घेतला आणि घाईघाईने गावंडेची केबिन गाठली.
गावंडे खुर्चीवर डोळे मिटून शांत बसलाय बघून त्याने दारावर वाजवत आत गेला.
सॉरी सर,राव सरांनी अचानक गेस्ट्सला आणायची जवाबदारी मला सांगीतल्याने मी तुमची मदत करू शकलो नाही.सॉरीऽऽऽ.
सुशांत काहीसा मदत न करू शकल्याचे शल्य घेऊन मान खाली घालून ऊभा राहीला. 
"नो मि.सुशांत,डोन्ट बी सॉरी."
"बर सर,तूम्ही रेडी आहात  ना प्रेझेंटेशनला!!
राव सर गेस्ट्सना घेऊन नुकतेच कॉन्फरन्स रूमवर पोहोचलेत.
आपल्यालाही निघायला लागेल लगेच,"आर यु रेडी सर?"
सुशांत विचारलेल्या प्रश्नाचे ऊत्तर न देता गावंडे खुर्चीतुन उठला. थोडासा केसांवरून हात फिरवून नीट करत,थोडा चेहरा ठिकठाक करत तो सुशांतला चला निघु असे म्हणत दोघेही कॉन्फरन्स रूमकडे निघाले.

सुशांतने प्रेझेंटेशनसाठी शुभेच्छा दिल्या पण गावंडे मात्र निर्विकार होता.
काय होतेय हे सुशांतला समजत नव्हते पण गावंडेच्या मनात काहीतरी चाललेय हे मात्र साफ दिसत होते.

सर्वजण कॉन्फरन्स रूम मधे आपापल्या जागी स्थानापन्न झाले होते.
कंपनीचे एमडी,सगळे पार्टनर्स,लीगल गेस्ट्स आणि प्रोजेक्ट-टिम असे मिळून एक दहा बाराजण तरी तिथे उपस्थित होते.

रावने पाहुण्यांची
औपचारिक आेळख स्टाफला करून देऊन गावंडेला प्रेझेंटेशन देण्यासाठी समोर येण्यास सांगीतले.

गावंडे समोर आला.
सुरवातीचे गेस्टच्या स्वागतपर चार वाक्ये  बोलल्यानंतर तो थोडावेळ शांत ऊभा राहीला.

शांततेचा भंग करत त्याने पुन्हा बोलायला सुरवात केली.
पण ह्यावेळी तो जे बोलला ते एेकुन राव सहीत सर्वचजण चकीत झाले.
त्याने त्याच्या बोलण्यात जे सांगीतले ते असे की माझी तब्येत मला आत्ता ठिक वाटत नसल्याने मी हे प्रेझेंटेशन देण्यासाठी असमर्थ आहे तरी मी हे प्रेझेंटेशन देण्यासाठी आमच्या कंपनीचे सर्वात हुशार आणि कामाला अतिशय चोख असलेले माझे सहचारी आणि मित्र मि.सुशांत ह्यांना इकडे येण्याची विनंती करतो.

गावंडे एकदम असे काहीतरी बोलेले ह्याची रावला सुतराम कल्पना नव्हती.
तो जाम खवळला होता हे त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.
ऐनवेळी सगळ्यांसमोर गावंडे असे बोलल्याने रावची पुरती गोची झाली होती.पण त्याला त्यावेळी
 तिकडे काहीच बोलता येत नव्हते.
त्याची मनातल्या मनात खूप चरफड होत होती पण वरवर तसे न दाखवता त्याने सुशांतला डायसवर येण्याची खूण केली.
सगळ्या टिम मेंबर्समधे अचानक आनंदाची एक लहर दौडली.

सुशांतलाही हा सुखद धक्का पचवणे थोडे अवघड गेले.
पण शेवटी देवाच्या दरबारी उशीरा का होईना न्याय असतोच ह्याची प्रचिती घेत सुशांतने सर्व गेस्ट्सना परवा पेक्षाही सुंदर प्रेझेंटेशन दिले.
सर्व गेस्ट टीम प्रेझेंटेशन वर खूपच खुष झाली.
हे डिल ह्या कंपनी सोबत फायनल होणार ह्याची खात्रीच झाली होती.
फक्त पेपर्सची आैपचारिकता बाकी होती.

सुशांत मात्र अनिमिष नेत्रांनी गावंडे कडेच बघत होता.
कधी एकदा गेस्ट जातात आणि मी गावंडेशी बोलतोय असे सुशांतला झाले होते.
गावंडेच्या चेहऱ्यावर एक समाधानाची झाक दिसत असली तरी त्याच्या ह्या वागण्या मागचे गुढ मात्र सुशांतला जाणून घेण्यात जास्त औत्सुक्य होते.

सगळ्यांच्या शाबासकीची थाप आणि कौतुका पेक्षाही किती तरी कोस लांब एका कोपऱ्यातल्या मिणमिणत्या समाधानानी तेवणाऱ्या दिव्यावर सुशांतची नजर खिळली होती.
~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:11)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथा आवडतेय की नाही हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all