घरकोन भाग 13

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड, प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन..

घरकोन-13
®©राधिका कुलकर्णी.

माझे सगळे विचार चुकीचे होते हे पुढल्या पाच मि.तच समजले कारण सगळी गर्दी कमी होऊन बऱ्यापैकी शांतता झाली तसा हा आला.
"काय रे किती उशीर? कुठे होतास इतक्यावेळ?"
होतो इकडेच पण सगळ्यांच्या जाण्याची वाट पहात होतो.तूझ्याशी बोलायला थोडी शांतता हवी होती.
"चल कुठेतरी बाहेर कॉफी प्यायला जाऊया?"
"अरे काय बोलतोएस,आत्ता कुठे जाणार??"
हा माझ्यासाठी दुसरा धक्का होता.कारण ह्या आधी परीक्षेच्या काळात तो जास्त भेटायचा नाही म्हणुन थोडा वेळ त्याच्या सोबत जास्त घालवता यावा ह्या हेतुने असा काही कॉफी किंवा चहाचा प्रस्ताव दिला की हा साफ नाकारायचा आणि वर मलाच दोन अकलेचे डोस पाजायचा की आपला वेळ किमती आहे तो असा वाया नसतो घालवायचा.
जा थोडा अभ्यास कर घरी जाऊन.
मार्क चांगले मिळाल्यावर कॉफीचे असे प्रसंग खूप येतील इ.इ."
त्याचे ते लेक्चर ऐकण्यापेक्षा त्याला काही न बोलणेच बरे म्हणुन असे कितीदा वाटलेले प्रसंग मी मनातल्या मनातच टाळले होते.
आणि आज हा भर दूपारी ऐन परीक्षा चालू असताना मला कॉफी ऑफर करतोय हे म्हणजे मला जगातले आठवे आश्चर्यच वाटत होते.
चेहऱ्यावर शक्य तितके सहज भाव ठेवतच मी बोलले," नको रे.किती ऊन आहे."
"कॉफी/चहा काही नको.तू बोल पटकन."
"मला आज खूप थकल्यासारखे वाटतेय."
"कधी एकदा घरी जाऊन मस्त झोप काढतीय असे झालेय."
"अॅक्च्युअली इट्स बॅडलीऽऽ नीडेड,राईट?"
"बर ठिक आहे."
"जरा तिकडे शेडमधे बोलूया का?"
न बोलताच दोघेही शेडमधे पोहोचलो.
थो़डावेळ शांततेत गेला.
कोणीच काही बोलत नव्हते.
अचानक त्याने विचारले, "रेवा पेपर कसा गेला आजचा?"
हा तिसरा धक्का होता.
कारण हाच प्रश्न मी विचारला की हा बोलायचा ,"हा काय प्रश्न आहे?.अभ्यास नीट केलेला असेल तर पेपर्स चांगलेच जातात रेवा बाई.
जे परीक्षा ऐन तोंडावर आली की अभ्यासासाठी रात्र रात्र जागतात त्यांना असले फालतू प्रश्न पडतात."

त्यामुळे आज हा असे सगळे वागून काय बोलण्याची मोर्चेबांधणी करतोय हेच समजत नव्हते.
पण मी द्यायचे म्हणून ऊत्तर दिले "हो ,ठिक होता."
"तूला?"
"मलाही छान गेला."
"बर बोल ना पटकन,काय बोलायचेय एवढे?"

थोडा गळा साफ करतच तो बोलायला लागला.
"रेवा काल मी खूपच मुर्खा सारखे वागलो ना?"
"म्हणजे?"
मला समजत नव्हते नेमके सुशांत कशाबद्दल बोलत होता कारण काल त्याने बऱ्याच त्याच्या तब्येतीला न मानवणाऱ्या कृती केल्या होत्या.
रात्री खूप उशीरा कुणाला  न सांगता थेट माझ्या रूमवर य़ेणे,रात्री उशीरा माझ्या गाडीवरून बाहेर जाणे,रात्री माझ्याच रूमवर मुक्काम करणे आणि सगळ्यावर कळस म्हणजे चक्क निघताना मला मिठी मारून कानात तो शब्द बोलणे ज्यामुळे आज अख्खा दिवस मी ढगांवर तरंगत होते आणि हा म्हणत होता की मी काल मुर्खपणा केला.
आता ह्यातला  कोणता मुर्खपणा ह्याला खरा मुर्खपणा वाटत होता देवच जाणे.
माझ्या मनातल्या विचारांना मी मनातच आवरत त्याचे ऐकण्यासाठी कान एकवटले.
"हं,बोलऽऽ मी ऐकतीय."
"तूला काल निघताना मी काहीतरी बोललो होतो ते तूला आठवतेय ना?"
हो आठवतेय की..मी मदत केली नसती तर वगैरे वगैरे तेच ना?मी मुद्दाम वेड घेऊन पेडगावला जात अत्यंत निरागसपणाचा आव आणत बोलत होते कारण तो स्वत:हून काय बोलतोय हे ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले होते.
हो ते तर आहेच गऽऽ,पण ह्या व्यतिरीक्तही मी काहीतरी बोललो होतो ते तुझ्या लक्षात नाही का?
काय बोलला होतास तू?
 मला तर नाही आठवत बुवा.
मी उगीचच न आठवण्याची अॅक्टींग करत तो काही बोलतोय का हे पहात होते.
पण इकडेच मी माती खाल्ली होती.
अती विसरण्याच्या अॅक्टींगपायी किती दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पहात होते तो क्षण मी आज गमावला होता.
मला आठवत नाही हे कळताच तो जो काही हुश्श झाला नाऽऽ तो त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता.
तूला खरच का काहीच आठवत नाहीये रेवा??
हुश्शऽऽ!
मग बरेच झाले.
चल जा घरी.खूप ऊन आहे आणि तूला झोपेची गरजही आहेच,जा लवकर.आपण बोलू नंतर..
तसे म्हणतच त्याने सायकलवर टांग मारून दिसेनासाही झाला.
मी मात्र त्याच्याकडे विस्फारल्या डोळ्यांनी त्यालाच बघत बसले.
पाच मि.पूर्वी जो मला बोलण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधत होता तोच आता दुसऱ्या मिनीटाला भर उन्हात मला एकटीला सोडून सरळ निघून गेला होता.
मला माझ्या स्वत:वरच चडफडाट होत होता.
कधी नव्हे ते ह्या दगडाला काहीतरी बोलावेसे वाटले होते तर मीच माझ्या हातानीच सोन्याचा घास तोंडापाशी येता येता दूर सारला होता.
आता न जाणो तो सोनियाचा दिनू पून्हा कधी उगवतोय माझ्या नशिबात.
स्वत:वरच राग राग करत चरफडतच मी गाडी स्टार्ट करत रूमकडे प्रस्थान केले.
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:-13)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथा आवडतेय की नाही?
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all