घरकोन भाग 22

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड, प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन जरूर वाचा.

घरकोन -22
®©राधिका कुलकर्णी.

सुशांत रात्रभर तळमळत होता.त्याला बेचैन वाटत होते.सकाळ कधी होते आणि कधी मी रेवाला भेटतो असे त्याला झाले होते.
गेल्या तिन वर्षात तो तिला कितीदा वाट्टेल तसे बोलला असेल तरीही तिने कधीच त्याचा राग मनात बाळगून अशा पद्धतीने ती कधीही वागल्याचे त्याला आठवत नव्हते त्यामुळे तिचे आपल्याला टाळणे हे त्याच्या मुळीच पचनी पडत नव्हते.

त्याने मनाशीच काहीतरी निश्चय करत सकाळ कधी होते ह्याची वाट पहातच अख्खी रात्र घालवली.
सकाळ होताच तो लवकर रूमच्या बाहेर पडला.
आज रेवाला मेन गेटवरच गाठायचा विचार करून तिच्या येण्याच्या वेळे आधीच मुख्य प्रवेश द्वारापाशी जाऊन पोहोचला.
रेवा नेहमी प्रमाणे स्कुटीवरून येताना दुरूनच सुशांतने बघितले.
हात अडवून तिला रोकण्याचा प्रयत्न केला पण ती न थांबता पूढे गेली.
सुशांत तिला ऐकू जाईल इतपत आवाज वाढवून तिला एक वाक्य बोलला जे एेकून रेवाने करकचून ब्रेक मारला आणि गाडी थांबवली.
सुशांत - "रेवा माझे नुकतेच ऑपरेशन झालेय मी पेशंट आहे तरीही फक्त तूला भेटण्यासाठी  जवळपास एक किलोमीटर अंतर चालून आलोय, प्लिज थांब."
ते वाक्य एेकुनच ती थांबली की आपण रागाच्या भरात हे कसे विसरलो की तो अजुनही पुर्ण बरा झालेला नाहीये.
तिला तिच्या स्वत:वरच चीड येत होती.
माणुसकी सुद्धा विसरले मी माझ्या रागापायी.
तिच्या मनातील संवाद चालले होते तेवढ्यात सुशांत पळतच तिच्या पर्यंत पोहोचला.
क्लासची वेळ होत आली होती त्यामुळे त्याच्याशी बोलण्यात तिला वेळ घालवायचा नव्हता पण तरीही त्याला आत्ता टाळणेही बरे नव्हते म्हणुन तिने त्याचे बोलणे एेकायचे ठरवले.
"रेवाऽऽ प्लिज मला माहितीय क्लासची वेळ झालीय आत्ता बोलायची वेळ नाहीये.फक्त एक मदत करशील?"
"काय?"
रेवाने निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे न बघताच विचारले.
"मला डॉक्टरांनी सायकलींग करायला मनाई केलीय आणि पायी क्लास पर्यंच पोहचे पर्यंत मला खूप उशीर होईल तर तू मला क्लास कॉरीडॉरच्या जवळ ड्रॉप करतेस का प्लिज?"
"बस मागे ,फक्त मला कुठेही स्पर्श न करता बैस."
रेवाने फक्त माणुसकी म्हणुन त्याला सोडायला होकार दिला होता.
साईड मिरर मधुन रेवाच्या चेहऱ्याला बघण्याचा खूप प्रयत्न करूनही रेवा त्याच्याकडे ढुंकुनही न पाहता गाडी चालवत होती.
पार्कींग स्टँडमधे पोहोचताच तिने गाडी थांबवली आणि त्याच्या उतरायची वाट बघीतली.
गाडीवरून उतरताना सुशांत पून्हा तिला म्हणाला 
"रेवा प्लिऽऽज कॉलेज संपल्यावर मला इकडेच भेटशील?"
" मला तुझ्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे."
"पण मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाहीये सुशांत."तू आजारी आहेस म्हणुन फक्त तूला लिफ्ट दिली बाकी त्याचे कोणतेही अर्थ काढू नकोस."
एवढे बोलून ती घाईघाईने गाडी स्टँडला लाऊन क्लासमधे गेली.
सुशांत हताश मनाने हळुहळू मंद गतीने वर्गात गेला.
ह्या आधी रेवाला इतके तिरस्काराने वागताना त्याने कधीच बघीतले नव्हते त्यामुळे हा त्याच्यासाठी खूप मोठ्ठा धक्का होता.
वर्गात त्याचे लक्षच लागत नव्हते.काय करू म्हणजे रेवा माझ्याशी पुन्हा पहिल्यासारखी वागेल ह्याचा तो विचार करत होता.
तो तिच्या सोबत जे काही वागला ते का वागला ह्याचे कारणही सांगायची संधी रेवा त्याला देत नव्हती.
संध्याकाळी तो पुन्हा स्टँड मधे ती गाडी काढायला येईल ह्याची वाट पहात थांबला पण आज तिने दुसऱ्याच मैत्रिणीला पार्कींग स्टँडमधुन तिची गाडी काढायला सांगीतली.त्याला कळलेच नाही आणि आजही ती न भेटताच निघुन गेली.सुशांत खूप रडवेला झाला होता.रेवाची कशी समजूत काढावी हेच त्याला समजत नव्हते.
हताश होऊन तो आपल्या रूमवर गेला.
एरवी फक्त अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या सुशांतला गेले दोन दिवस काहीच करावेसे वाटत नव्हते.अभ्यासातही लक्ष लागत नव्हते.
रेवालाही त्याला टाळुन असे रूडली वागणे फार प्रयत्न करूनही जमेल असे वाटत नव्हते.
आतून तिलाही खूप वेदना होत होत्या.
सुशांतची तब्येत उतरलेली वाटत होती.
नेहमीची रेवा असतीतर त्याची काळजी केली असती पण आता तीने मुद्दामहून मनातल्या सर्व भावनांना आवर घालून त्याच्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.
जवऴपास रोजच सुशांत वेगवेगळ्या मार्गांनी तिच्याशी संवाद साधण्याचा हर प्रयत्न करत होता पण त्याला रेवाला बोलतं करण्यात यश येत नव्हते.
आज चौथा दिवस होता की रेवा त्याच्याशी आल्यापासुन एक अक्षरही बोललेली नव्हती इतकेच काय ती त्याच्याकडे वळुनही पहात नव्हती.
हे मी काय करून बसलो?असा कसा मी तिच्याशी इतक्या क्रुरपणे हीन पातळीवर येऊन वागलो?ह्याचाच त्याला पश्चात्ताप होत होता.पण त्यालाही माहीत नव्हते की रेवा त्याला परत पुन्हा पहील्या सारखी कधी भेटेल?
भेटेल पण की नाही?

आज पहिल्यांदा त्याला रेवाची आपल्या आयुष्यात काय जागा आहे ह्याची जाणीव झाली होती.
आजवर तिला जे काही बोललो ते तिने प्रेमाने सहन केले म्हणून आपण सतत तिला गृहीत धरत गेलो पण ह्यावेळी मात्र मी काहीतरी फार मोठ्ठा गुन्हा केलाय म्हणुनच रेवाने माझ्याशी कायमचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय.
मला हिच शिक्षा असेल तर ठिक आहे पण एकदा किमान शिक्षा सुनावण्याआधी माझी बाजू मांडायची एक संधी तरी द्यावी तिने.
काही न एेकुन घेताच सजा सुनावणे किती अन्याय्य आहे.
कोर्ट सुद्धा फाशी देण्यापूर्वी आरोपीला त्याची शेवटची इच्छा विचारते,त्याला त्याची  बाजू मांडायची संधी देते पण इकडे तर डायरेक्ट सजा सुनावलीय मला.
नाही ...नाही,असे हातपाय गाळुन चालणार नाही.
आता मला काहीतरी वेगळाच मार्ग,युक्ती करावी लागेल.
पण काय करू?
सुशांतचे विचारचक्र काही केल्या थांबत नव्हते.
चालता चालता सवयीनेच रूमवर कधी पोहोचला त्याचे त्यालाच कळले नाही.
उदास चेहऱ्याने छताकडे बघतच तो स्टडी चेअरवर बसुन राहीला.
उन्मेश काहीतरी गुणगुणतच रूममधे आला.सुशांतच्या पाठीवर हात मारत सहजच विचारला,"काय रे कसल्या एवढ्या विचारात गढलाएस?"
सुशांत काही बोलण्या एेवजी त्याचे डोळे पाणावले.आपले डोळे हलकेच टिपत त्याने मानेनेच काही नाही असे सांगीतले पण उन्मेश त्याचा चार वर्षापासून रूम पार्टनर होता.त्याला लगेच जाणवले की सुशांतचे काहीतरी बिनसलेय पण लपवतोय काहीतरी.
सध्यातरी शांतच बसू नंतर बोलू म्हणुन त्याने तो विषय तिकडेच ड्रॉप केला आणि दुसऱ्याच गप्पा मारून त्याचा मुड बदलायचा प्रयत्न केला.
सुशांतही त्याला कळु नये म्हणुन उगीचच त्याला हसून दुजोरा देत होता.
जेवण झाले की दोघेही बऱ्याचवेळा हॉस्टेलच्या आवारात चक्कर मारायचे तसेच केले उन्मेशनी.
"चल जरा एक चक्कर मारूया खाली बघ किती थंड वारे सुटलेय.जरा मस्त फ्रेश वाटेल चलऽऽ"
असे म्हणतच उन्मेशने बळजबरीनेच सुशांतला बाहेर काढले.
दोघेही चालत होते पण सुशांत खूप शांत शांत होता.
न राहवून मग उन्मेशनेच विचारले,"काय रे काही त्रास होतोय का?"
"बोलत का नाहीस?"
त्यावर सुशांतने फक्त नकारार्थी मान डोलावली पण डोळे काहीतरी वेगळेच सांगत होते.
चालता चालता एका कॉर्नरवर मधोमध असलेल्या सर्कलच्या कट्ट्यावर दोघेही टेकले जरावेळ.मग उन्मेशनेच विषय काढला,"काय रे आजकाल रेवा कॉलेजमधे दिसतच नाही कुठेच."
"आजकाल भेटतही नाही फारशी."
"तूला भेटली क?"
तुझी काय बाबा बेस्ट फ्रेंड आहे ती.तुझ्याशी तरी बोलली असेलच की.."
काय बोलावे सुशांतला काहीच कळत नव्हते.उन्मेशच्या प्रश्नाला टाळायचे म्हणुन तो बोलला,"चल जाऊ परत रूमवर मला खूप अस्वस्थ वाटतेय."
पण उन्मेशने ओळखले होते की दोघांत नक्की काहीतरी झालेय म्हणुनच हा विषय बोलायचे टाळतोय."थांब रेऽऽ,जाऊ की काय घाई आहे."
"बर बोल ना काय म्हणाली मग रेवा?"
आता मात्र सुशांतचा संयम गळुन पडला आणि थोडा वैतागुनच तो उन्मेशवर चिडून बोलला.
"काय ऐकायचेय तूला?"
हो तुझी शंका बरोबर आहे,आमचे भांडण झाले आहे आणि रेवा नाही बोलत आहे माझ्याशी.,आता कळले ना,झालास खुष?"
"आता चल वरती आणि पून्हा ह्या विषयावर काही बोलू नकोस प्लिजऽऽ."

उन्मेशला त्याच्या वैतागण्या मागचे कारण तर कळले होते पण ती का बोलत नाही हे समजले नव्हते.
पण सुशांत आत्ता बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीये हे जाणवून उन्मेशने पुढचे सगळे प्रश्न टाळले आणि मुकपणे मैत्रीची साथ निभावत त्याच्यासोबत चालत राहीला.
परंतु उन्मेश गप्प बसणाऱ्यातला नव्हताच.
काहीही करून ह्यांच्या भांडणाचे कारण जाणुनच घ्यायचे हे मनोमन ठरवतच तो सुशांत बरोबर रूमवर आला.
############
दुसरा दिवस.कॉलेज सुरू झाले.आज उन्मेश मुद्दामहून सुशांत ऐवजी रेवाच्या डेस्कवर बसला.
रेवाने उन्मेशला आपल्या डेस्कवर बसलेले बघुन थोडे आश्चर्यच वाटले तरीही तसेकाही न दाखवता तिने त्याला हसुन विश केले.
"हायऽऽ!!आज मी इकडे बसलो तर चालेल ना?"
उन्मेशने हसतच रेवाला विचारले.
रेवाही हसुनच बोलली,"माझी हरकत नाहीए पण तुझ्या मित्राला चालणार का विचार बाबा."
तिचा उपरोधिक स्वर उन्मेशला लगेच जाणवला आणि लक्षात आले की नक्की काहीतरी मेजर घोटाळा झालेला आहे दोघांचा.
पण सांगणार कोण की नेमके दोंघांमधे बिनसलेय तरी कुठे आणि काय?
तरीही खडा मारून पहायचा म्हणुन त्याने सहजच विचारले," का ग?सुशांतला काय प्रॉब्लेम असणार आहे?तू पण माझी मैत्रिण आहेस.
तो कोण सांगणार मला मी कुणाशी मैत्री करायची आणि कोणाची नाही?"
"पण तू का आज अशी इतके कडवट बोलतीएस?"
"तुमचे काही भांडण झालेय का?"
"उन्मेश प्लिज हा विषय आत्ता नको.सर येतच असतील,आपण नंतर बोलुयात का?"
"चालेल."
"माझी हरकत नाहीये."
"संध्याकाळी कॉफीसाठी कँटीनला भेटुयात?"
"बघुया.नक्की नाही सांगु शकत."
"एऽऽ किती भाव खातेस यार."
"दहा मिनीट बोलू फक्त."
"हवेतर मी सोडतो तूला घरी मग तर झाले."
"बर ठिक आहे.फक्त तू म्हणतोएस म्हणुन हं,पण तू एकटाच ये.दुसऱ्या कोणाला सोबत आणु नकोस,नाहीतर मग बघ मी काय करेन."
"ओकेऽऽ बाबा, नाही आणत कुणाला.एकटाच येतो.फक्त यु मी अँड कॉफीओकेऽऽ डिअर!!."
उन्मेश मुद्दाम तिचा मुड खेळकर करण्यासाठी खोडसाळ डायलॉग मारला.
त्यावर तिनेही त्याची मस्करी खेळकरपणे घेत मोकळेपणाने हसली.

लंचमध्ये उन्मेश मुद्दामहून सुशांतला सर्व कल्पना देऊन ठेवली आणि कोणत्याही परीस्थितीत संध्याकाळी तिचा पाठलाग करत आमच्यामागे कँटीनला येऊ नकोस हे ही बजावले.
सुशांतचा नाईलाज होता कारण रेवा त्याला बघताच पाठ फिरवत होती अशा परीस्थितीत निदान उन्मेशला तरी ती काही बोलली तर आपल्यालाही कळेल की तिला नेमके कशाचे एवढे दु:ख झालेय?"
म्हणुनच त्याने नाईलाजानेच उन्मेशचे म्हणणे मान्य केले.
संध्याकाळ झाली तशी रेवा आणि उन्मेश कँटीनमधे पोहोचले.
कॉफीची ऑर्डर देऊन तो प्रश्नार्थक नजरेनेच रेवाकडे बघत राहीला.
रेवाला त्याची नजर कळत होती पण कशी सुरवात करावी अन् काय बोलावे हे सुचत नव्हते.
तिची अंतस्थ चाललेली घालमेल जाणुन उन्मेशनेच सुरवात केली आणि विषयाला हात घातला.
बर सांगणारेस का आता तरी?
 काय झालेय,का नाराज आहेस सुशांतवर?
त्यावर रेवाचे डोळे भरून आले.
काय सांगावे हेच सुचेनासे झाले होते कारण सुशांत रेवा मधली जवळीक कितपत आहे हे ते दोघे सोडता अजून कुणाला फारशी माहीत नव्हती.दोघे एकमेकांचे खूप चांगले जीवश्च़  कंठश्च मित्र आणि रेवा सुशांतला वेळोवेळी मदत करते मैत्रीच्या नात्याने ह्या पलिकडे रेवाच्या सुशांतबद्दलच्या फिलिंग्ज अजुन तिने सुशांतलाच सांगीतल्या नव्हत्या तर बाकीच्यांचा प्रश्नच नव्हता.
मग अशा पार्श्वभुमीवर उन्मेशला नेमके काय अन् कसे सांगावे हेच रेवाला समजत नव्हते.
शांततेचा भंग करत पुन्हा उन्मेशनेच सुरवात केली.
"हे बघ रेवाऽऽ, तू माझ्यावर विश्वास ठेव,तू मला जे काही बोलशील ते फक्त आपल्यातच राहील. फक्त जे सांगशील ते नीट प्रामाणिकपणे कोणतीही लपवाछपवी न करता सांग,जर तूला माझ्यावर विश्वास असेल तर,नाहीतर नको सांगुस."
आतामात्र रेवा थोडी सावरली घटनांची सर्व क्रमवारी जोडत तिने उन्मेशला हॉस्पीटल ते घर इथपर्यंतचे सर्व किस्से सांगीतले.
सुशांतने कसे दुसऱ्या कुणासमोर तरी तिला अपमानीत केले हे सांगताना तिला रडू कोसळले.
उन्मेशला समजत नव्हते की तिला कसे सावरावे.
"प्लिज शांत हो रेवा,कँटीनमधे सगळे बघताएत आपल्याकडे."
पण त्याला हे ही जाणवत होते की कुठेतरी रेवा इनसेक्युअर फिल करतीय सुशांतबद्दल म्हणुन ती जास्त हर्ट झालीय.
कालपासुन सुशांत आणि रेवा दोघांचीही अवस्था बघता त्याला जाणवत होते की वेडे दोघेही सांगत नाहीएत पण मनोमन एकमेकांवर जीवापाड प्रेम करताएत.
आता ह्यांची भेट घडवायचीच असा मनाचा निश्चय मनोमन करतच उन्मेश कँटीन बाहेर पडला.
उशीर झाला होता म्हणुन तो रेवाला तिच्या घरापर्यंत सोबत करत सोडायला गेला.
रेवाची बाजू एेकली होती आता सुशांतचीही बाजू ऐकायची होती.
घाईघाईनेच सायकल दामटत उन्मेश हॉस्टेलवर पोहोचला.
त्याला दोघांवरही हसायला येत होते.
दोघेही किती वेडे होते.त्यांचे प्रेमही त्यांना कसे व्यक्त करावे समजत नव्हते.
आता सुशांत-रेवा भेट मिशन सक्सेसफुल करायचेच हे डोक्यात फिट करतच त्याने पुढचे प्लॅन करायला सुरवात केली.
~~~~~~~~~~~~~~~~
घरकोन -22
®©राधिका कुलकर्णी
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतेय की नाही? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all