घरकोन भाग 49

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी...

घरकोन-49
©राधिका कुलकर्णी.

नेहमी प्रमाणे दिवस उजाडला पण आजची सकाळ रेवाच्या आयुष्याची सगळ्यात उदास सकाळ होती.एकतर ती उठली तेच उशीरा,म्हणजे रोजच्या वेळी जागच आली नाही.उठल्यावर घरात भयाण शांतता.
"बापरेऽऽ म्हणजे सुश पण उठला नाही की काय अजुन?"
धावतच रेवा खोलीत गेली.
तिकडे कोणीच नव्हते.
"म्हणजे सुश ऑफीसला गेला पणऽऽ?तेही मला न सांगताच?"
"हे कसे शक्य आहे.तो माझ्यावर असा अबोला धरून कधीही रूसलेला नाहीये मग आजच एवढा का चिडलाय?"

मनातल्या मनात प्रश्नांची कालवाकालव सुरू झाली.
तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला.
तशी ती पटकन किचनकडे वळली.
तो येऊन काही बोलतोय का ह्याचा अंदाज घेत ती तिकडेच उभी राहिली.
पण सुश बाहेर आला तेच ऑफीसच्या तयारीने.हातात ब्रिफकेस घेऊन घराबाहेर निघाला देखिल.
आतामात्र रेवाचा धीर सुटत चालला होता.
तिने धावत पाठोपाठ जात सुशला आवाज दिला.
"सुशऽऽऽ अरे तु ब्रेकफास्ट नाही केलास,डबाही नाही घेतलास, तसाच कुठे चाललास इतक्या घाईने?"
"अजुन वेळ आहे,थोडा ब्रेकफास्ट तरी करून जा."
पण तो एक नाही नी दोन नाही.आपल्याच तंद्रीत पायऱ्या उतरतच घाईने निघाला.
त्याच्या मागे अक्षरश: त्याचा पाठलाग करतच रेवा बोलत बोलत पायऱ्या उतरत होती.
सुशने मात्र साधे मागे वळुनही  पाहिले नाही.
कोणतेही उत्तर न देता गाडी बाहेर काढत रेवाला बघुन न बघितल्यासारखे करत सरळ निघुन  देखिल गेला.
रेवाचा चेहरा रडवेला झाला होता आता.
ह्या आधी ही त्यांच्यात वाद झाले नव्हते का?कितीतरी वेळा.पण आजच्या सारखा सुश कधीही अबोला धरून वागला नव्हता त्यामुळे रेवाची सगळी सहनशक्ती संपतेय की काय असे झाले तिला.
काय करायला गेलो अन् हे काय भलतेच होऊन बसले असे वाटायला लागले.
डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या.तिला रडु आवरेचना.

बर एरवी त्यांच्यात काही झाले की व्यक्त करायला सुशची आई असायची पण आजचा विषय ती त्यांनाही सांगु शकत नव्हती.
तिला लगेच उन्मेशची आठवण झाली.पटापट वरती जात तिने आधी उन्मेशला फोन लावला.रींग वाजत होती.
"हॅलोऽऽऽ!!"
"उन्मेशऽऽ,मी रेवा बोलतीय."
रडवेल्या सुरातच ती बोलली.
"हाय डिअर, कशी आहेस?"
"अॅम नॉट गुड."
"का गऽ? काय झाले."
"काय झाले नाही ते विचार."
"तु आधी शांत हो.पाणी पी आणि मग नीट सांग मला."
रेवा आता थोडी सावरली आणि पुन्हा बोलायला लागली.
"अरे उन्मेशऽ काल तु सांगीतल्या प्रमाणे मी  सगळे केले पण हे काहीतरी भलतेच होऊन बसलेय रे."
"म्हणजे?नेमके काय झालेय?"
"नीट सविस्तर सांग."
अरे म्हणजे काल मी त्याच्याशी ठरल्याप्रमाणे बरोबर भांडण केले आणि विषय काकांवर आणुन त्यांना पैसे न देण्याबद्दल बोलले.
मुद्दाम काकांना अगदी थेरडा वगैरे ही बोलले.
तर हा जाम खवळला ना.
कधी नव्हे ते त्याने माझ्यावर हात उचलला.
गाल अजुन दुखतोय माहितीय.
त्या मारण्याचेही काही वाटले नसते रे पण आज तर तो माझ्याशी अवाक्षरही न बोलता उपाशी पोटी ऑफीसला निघुन गेला.
मला खरच काही सुचत नाहीये,काय करू म्हणजे सुश पुन्हा नॉर्मलला येईल!!."
"करायला गेलो एक अन् झाले भलतेच रे."
"यसऽ,यसऽऽऽ!!"उन्मेश आनंदाने चित्कारला.
"यस यस  करतोस उन्म्या,इकडे माझा संसार मोडायची वेळ आली आणि तु खुष काय होतोएस?"
रेवा काकुळतीने बोलत होती.
"अग वेडे,सुश तुझ्यावर इतका का चिडला ह्याचा विचार केलास का?"
"माझी तर विचारशक्तीच खुंटलीय जेव्हापासुन तो बोलणे बंद केलाय.
सुचेनासे झालेय काय करावे."
"अग ह्याचा सरळ अर्थ हा आहे की तो कितीही म्हणत असला ना तरी त्याला काकाबद्दल,आईंबद्दल मनात प्रेम आहे म्हणुन तु काकांना वापरलेला अपशब्द त्याला सहन झाला नाही आणि त्याने तुझ्यावर हात उचलला.
मला हेच बघायचे होते की तो काय रिअॅक्ट होतो.आणि तो एक्झॅक्टली तसेच रिअॅक्ट झाला जसे मी प्रेडीक्ट करत होतो.म्हणजे आता पुढची पावले मी जशी योजली तशीच टाकलीस तर सुश आणि काकु नक्की एकत्र येणार."
"म्हणजे तो माझ्यावर हात उचलेल हे तुला माहित होते?"
"हो म्हणजे असे व्हायची शक्यता नाकारता येणार नव्हती असे वाटत होते."
"पण मग गधड्या हे तु मला आधी का नाही सांगीतलेस?"
"अग माझी राणी,हे जर आधीच सांगीतले असते तर तु अशी वागली असतीस का त्याच्याशी?"
"योग्य परीणाम साधायचा असेल तर उपाय पण जालिम नको का असायला?"
"बर पण आता पुढे काय?"
"पुढे काही नाही,आता तु बॅग भरायची आणि न सांगता नगरला जायचे."
"अरे एऽऽऽ.तुला काही लाज आहे का?"
ह्यातले एक अक्षरही मी आईंजवळ बोललेली नाहीये,तिकडे अशी अचानक का आलीस विचारले तर काय सांगु मी काकुंना?"
"तु ना आमचा संसार मोडणार दिसतोय बहुतेक."
कुठुन बुद्धी सुचली आणि तुझी मदत घेतली असे झालेय मला."
"रेवा रेवाऽऽ रेवाऽऽ,शांत हो डिअर.मी सांगतोय तसे वागलीस तर खरच तो काकुंशी बोलायला लागेल हे माझे शब्द आहेत तुला."
"कसला शब्द?"
"काकुंशी बोलेलही तो कदाचित पण माझ्याशी कायमचे संबंध तोडेल त्याचे काय?"
"मला ही रिस्क नाही घ्यायचीय."
"मी आत्ता त्याला सगळे सांगुन माफी मागुन मोकळी होते."
"आय कांट लिव्ह विदाऊट माय लव्ह यार."
रेवा पुन्हा रडायला लागली.सुशचा दुरावा ती इमॅजिनच करू शकत नव्हती.
"रेवाऽऽ तु आधी शांत हो.तुला काकु आणि सुशा एकत्र यायला हवेत की नकोत,हे मला सांग?"
"होऽऽ,हवेत,पण नॉट अॅट द कॉस्ट ऑफ माय लाईफ,आय मिन सुश."
"अग डार्लिंग तसे काही होणार नाहीये,विश्वास ठेव माझ्यावर."
"तुझा नेमका प्लॅन काय आहे ते तर सांग."
ओकेऽ,ऐक तर मग.ऽऽ..."
उन्मेशने थोडक्यात रेवाला स्वत:च्या मनातल्या प्लॅनची कल्पना सांगितली.
"उन्म्या प्लॅन तर भन्नाटच वाटतोय पण खरच तु म्हणतोस तसेच होईल ना?"
"नाहीतर सुश मला समजवायला आलाच नाही तर मी गेले बाराच्या भावात."
"अग वेडाबाई सुशचे तुझ्यावर किती प्रेम आहे हे विसरलीस का तु?"
"मागचे दिवस आठव ना कसा तु बोलत नव्हती तर वेडापिसा होऊन तुझ्या मागे फिरायचा अख्ख्या कॉलेजभर."
"अरे ते दिवस संपले डिअर,आता आमचे लग्न झालेय.त्याला हवे ते मिळालेय.आणि मी जाऊन जाऊन कुठे जाणार?माहेर तर मला नाहीच आहे.तो हे सगळे जाणुन आहे.
जर तो माझी समजुत घालायला आलाच नाही तर?"
"रेवा तुला एक सांगु,जोवर व्यक्ती जवळ असते ना त्याची किंमत नसते पण जेव्हा ती दूर जाते तेव्हा आपल्याला त्याच्या असण्याची किंमत कळते.
सुशाचे सुद्धा काहीसे असेच झालेय.तु जवळ असतेस,सदोदीत त्याची काळजी घेतेस म्हणुन तो तुला गृहित धरतोय.
पण तु जर समोर नसलीस तर काय होईल त्याचे?"
"तो जगु नाही शकणार एकटा."
आणि दुसरी आणखीन एक बाजु जी तु बघु शकत नाहिएस ती तुला सांगतो.
तुला काय वाटते रेवाऽ,खरच का सुशा काकुंशी न बोलता इतके दिवस राहु शकला असता?
पण त्याने ते केले,काऽ?"
"कारण काकु नसल्या तरी त्यांची कमी तुझ्या असण्याने पुरी होत होती.तु त्याला भावनिक आधार देत होतीस पण आता जर तुही नसशील तर मग तो कुणाकडे जाईल सांग?"
"यस यु हॅव पॉईंट."
"अॅक्च्युअली मी हा असा विचार कधी केलाच नाही."
"मग खरच का रे मी सुशला सोडुन जाऊ?"
मी नाही रे राहु शकणार त्याला सोडुन असे न बोलता.
"त्याला न सांगता जाणे हे तर त्याहुन त्रासदायक आहे माझ्यासाठी."
"मी अस करू का?एक चिठ्ठी लिहुन जाऊ का?"
म्हणजे तो आल्या आल्या मला न बघुन पॅनिक नाही होणार."
"छे छे..हे तर मुळीच नाही करायचे."
"न सांगता गेलीस म्हणजे त्याला त्याच्या कृतीची जाणीव होईल,मग तो तुझा शोध सुरू करेल.कळतेय का?"
"हो पण मी आता कशी निघु?"
"मी तुझे प्लेनचे टिकीट बुक करतो.तु जा.."
"मुंबईला सायली मदत करेल तुला इफ यु नीड."
"नको मी जाईन."
"थँक्स उन्मेश‍.आणखी एक रिक्वेस्ट आहे."
"बोल." 
"प्लिज ह्यातले काहीच सायलीला नको कळु देऊस."
"ओके डिअर,अॅज यु विश."
आणि एक,रात्री सुशला फोन कर आणि बोल त्याच्याशी.हि विल फिल बेटर इफ यु आर देअर अॅज अ सपोर्ट."
"आेके डार्लिंग,डोंट वरी यार."
"मी घेईन काळजी सुशाची.तु निश्चिंतपणे जा आणि काकुंना तेवढेच सांग जितके आपल्या प्लॅन प्रमाणे ठरलेय."
"लक्षात राहील ना की बरळशील सगळे काकुंपुढे रडायच्या नादात."
होऽ रेऽऽ.मला कळतेय.उगीच अक्कल नको काढुस माझी."
चल आवरते मी आता.बॅग भरायला घेते बायऽ."
"बायऽऽ टेक केअर."

एकमेकांचा निरोप घेत फोन संपला आणि रेवा नव्या उत्साहात नगरला जायच्या तयारीला लागली.
कित्येक वर्षांनी आज पुन्हा तिला माहेरपण अनुभवायला मिळणार ह्या कल्पनेनेही ती आजच्या इतक्या विचित्र घडामोडींनंतरही मनोमन सुखावली होती.
काकुंच्या मायेची पखरण तिच्यावर होणार ह्या कल्पनेनेच आईच्या प्रेमाला आसुसलेले रेवाचे मन फुलपाखरागत तरंगायला लागले.
~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-49
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
(नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतोय की नाही हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all