घरकोन भाग 5

नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या प्रेमअल्लड रेवाची सुंदर प्रेमकहाणी... घरकोन जरूर वाचा

घरकोन 5
®©राधिका कुलकर्णी

जेवणा नंतरची किचनची आवरा आवर करता करता रेवा पून्हा भूतकाळात पोहोचली.
काय जादू आहे ना या अडीच अक्षरात.आज सुशनी आय लव्ह यू म्हणले तरी 
हेच शब्द सुश मला स्वत:हून कधी बोलेल ह्याची मी कॉलेजची अख्खी वर्ष वाट पहिली होती.
पण हा कधीच काही व्यक्त होत नसे.

त्याच्या अडल्या नडल्या हर प्रसंगात तो म्हणेल ती मदत रेवा करत असे.त्यावेळी सुशांत कडे होस्टेल हून कँम्पस जाण्यासाठी एक जूनी सायकल होती.
कधी कधी अचानक सायकल बिघडली की मग पर्याय म्हणून मीच आठवायचे त्याला कारण माझ्याकडे स्कुटी होती.
कधी पैशांची नड,कधी काय तर कधी काय.पण रेवाच मदतीला हक्काने धावून जायची.
पण पहिला आय लव्ह यू हा शब्द ऐकायलाही तसेच कारण घडले.

इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षातली पहिली सेमिस्टर परीक्षा सुरू झाली तसे सगळेच अभ्यासात पार गुरफटून गेले.
त्यामूळे रेवाही लेक्चर्स नंतर सुशांत बरोबर जास्त वेळ न घालवता म्हणण्या पेक्षा, तोच तीला भेटण्यात आणि गप्पांत वायफळ वेळ खर्च करण्यात इंनटरेस्टेड नसल्याने ती सरळ रूमवर जायची.
तीलाही मार्क्स दर खेपेला छानच मिळायचे पण सुशांत दरवर्षीच कॉलेजमधे टॉप करायचा त्यामुळे तुलनेत त्याच्या कमी म्हणून सुशांत तीला टोमणेही मारायचा कधी कधी.
कधी जर रेवा म्हणाली की
"एऽऽऽ चल ना रे थोडवेळ एक ब्रेक घेवूया ना."
"मस्त कॉफी पिवून येवूया,चलतोस का?"
"सारखा अभ्यास करून तूला कंटाळा नाही येत का रे,चल की?"
त्यावर सुशांतचे ठरलेले वाक्य असायचे.
"तुमच्या सारख्या बडे बाप की आैलाद को" काय फरक पडतोय मार्क कमी आले काय अन जास्त आले काय,पण आमचे तसे नाहीये बाई.
मी जर काही चांगले भविष्य घडवले तर मला माझ्या आईला सुखात ठेवता येईल.
तूला काय कळणार?
तू जा मला अभ्यास करू दे.

रेवाला असे बडे बाप की बेटी म्हणून हिणवलेले अजिबात आवडायचे नाही.
मग ती तशीच निमूट तिथून रूमवर परतायची.
त्यामुळे आता तर सुशांत तीला भेटतच नव्हता.
रात्रीचे साधारण 10/11 वाजले असावेत.
रेवाही उद्याच्या पेपरचे प्रीपरेशन्स करत बसलेली.
तीच्या रूमवर अजून दोन रूममेट्स पण रूम शेअर करून रहात होत्या.त्याही दुसऱ्या महाविद्यालयीन परीक्षांच्या तयारी करत बसल्या होत्या.
अचानक रेवाला खिडकीत एक लहानसा दगड फेकून आत पडल्याचा आवाज आला.खिडकीशी जावून बघते तर खाली गेटवर कोणीतरी सायकलची बेल वाजवतेय असा भास झाला.
तीने खिडकीतून वाकून बघीतले.
नीटसे कळत नव्हते पण कुणीतरी वर रूमकडे बघून गेट उघडण्याची विनंतीवजा हातवारे करतेय असे तीला वाटले.
घरमालकांकडे कोणीतरी आले की काय?
त्यांचे घरमालक म्हणजे वयस्कर काका-काकी आणि त्यांची म्हातारी आई असे तिघेच.
त्यांची रात्र म्हणजे  9 वाजताच चिडीचूप व्हायचे सगळे.
11/12 म्हणजे तर त्यांची मध्यरात्र,साखर झोपेची वेळ त्यामूळे त्यांना काही कळणे किंवा ऐकू जाणे शक्यच नव्हते.
मग धीर करून रेवाच जिना उतरून खाली आली.

अंधारात कोण आहे असे विचारतच तीने बॅटरीचा प्रकाश गेटवरच्या चेहऱ्यावर मारला आणि ती दचकलीच कारण तीकडे दुसरे तिसरे कोणी नाही तर सुशांतच ऊभा दिसत होता.
चेहरा खूप अस्वस्थ,सैरभैर विस्कटलेला अवतार पाहून रेवा खूपच घाबरली.
गेटच्या जवळ जावून दबक्या आवाजातच तीने विचारले,"काय रे,एवढ्या रात्रीचा इकडे कसा तू?सगळे ठिक आहे ना?
"तू गेट तर उघड.मला आत यायचेय."
तीने हळूच आवाज न होईल अशा बेताने गेट उघडले.
तो तरातरा जिना चढून वर आला.
रेवाही पाठोपाठ गेली.
हा असा का वागतोय तेच तीला उमगत नव्हते.
एवढ्या रात्री एक परका पुरूष रूमवर पाहून रूममेट्स पण जरा संकोचल्या.
त्यांच्या नजरेत रेवाला त्यांचे प्रश्न स्वच्छ दिसत होते पण हे काय घडतेय ते तीलाच आकलन होत नव्हते तर ती त्या मुलींना तरी काय सांगणार होती.
तीने सुशांतची औपचारिक ओळख करून दिली.
आपापल्या अंथरूणावर त्या अभ्यास करत होत्या.त्यांना दोघांना बोलायला स्पेस द्यावी म्हणून त्या मुलीही समजूतीने काही न बोलता आतल्या खोलीत गेल्या.
ते दोघेच बैठकीत आहेत बघीतल्यावर तीने हलकेच विचारले
काय झालेय?
तूझा अवतार असा का दिसतोय?
तब्येत बरी नाही वाटतआहे का तूझी?
रेवा तूझी गाडी बाहेर काढतेस.मला इकडे नाही बोलायचेय.बाहेर जावून बोलूयात का?
आता तर रेवाची बोबडी वळायचीच बाकी होती.
कॉलेजच्या इतक्या वर्षात तीला सुशांत असे काही बोलावे असे कित्येकदा वाटूनही तिची ती ईच्छा कधीही पूर्ण झाली नाही आणि आता ऐन परीक्षेच्या काळात जिकडे दूर दूर पर्यंत ही अशी गोष्ट घडण्याची तीने कल्पनाही केली नाही ते वाक्य सुशांत स्वत: बोलताना ऐकून तीचा तीच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
"झालेय कायऽऽऽ!!!" "सुशांत,घड्याळात वेळ बघतोएस ना किती वाजलेत?"
"इतक्या रात्री कुठे जायचेय?"
"तू प्लिज येणारेस का?"
"जास्त प्रश्न न विचारता येत असलीस तर चल नाहीतर मी जातो परत हॉस्टेलवर."
त्याचा तो कठोर चिडका सूर ऐकून रेवाला जाणवले नक्कीच गाडं बिनसलय. काहीतरी सिरीयस आहे हे नक्की.
तीने दोन मिनीट विचार केला.
आत गेली. 
रूममेट्सना सांगीतले आणि बाहेर आली.
सुशांत तू एक काम कर.
खाली जावून हळूच आवाज न करता माझी स्कुटी गेटबाहेर काढ तोपर्यंत मी चेंज करून आलेच.
गाडीची चावी सुशांतला देत ती पलटली.
दोन मि.त कपडे करून पर्समधे थोडेफार पैसे कोंबून ती बाहेर पडली.
"कुठे जायचेय?तूच गाडी चालव."इति रेवा.
"मी नको,तूच चालव,मी मागे बसतो."
"आपण त्या कँम्पस जवळच्या मंदिराकडे जावू."
तिने काही न बोलता गाडी मंदिराकडे घेतली.
मंदिराच्या पायऱ्यांजवळ गाडी ऊभी करून दोघेही वर गेले.
देवाचे दरवाजे बंद होते पण वर कट्ट्यावर बसायला जागा होती.
बंद दरवाज्याकडे नकळत सुशांतचे हात जोडले गेले.
खूपवेळ फक्त डोळे मिटून तसाच ऊभा होता.
शेवटी रेवानेच हलकासा स्पर्श करून त्याला बसायची खूण केली.
तो बसला जवळ पण चेहऱ्यावर चींता काळजी साफ दिसत होती.
डोळे भरून आलेले.
रेवाने त्याला आजवर कितीतरी अडचणी आल्या तरी इतके कोलमडलेले,हतबल झालेले कधीच बघितले नव्हते.
त्यामुळे तीलाही आता चिंता वाटत होती की नेमके झालेय तरी काय??
"सुशांत,काय झालेय.?"
बोल ना रे,मला काळजी वाटतीय तूझी,बोल ना पटकन प्लिज."
सुशांत आता हमसून हमसून रडायला लागला.
इतक्या वेळ आवरेलेले रडू रेवाच्या खांद्यावर वहायला लागले होते.
काय झाले?
तू रडतोएस का असा?
कोणी काही बोलले का तूला.?
काकांचा फोन आला का?
काही पैशांची अडचण आहे का?
काहीतरी बोल रे सुश.
"काकांचा फोन आला होता."
सूशांत आता बोलता झाला होता.
काय म्हणले काका?
सगळे बरे आहेत ना घरी?
नाहीएत बरे.
काकांचा फोन होता की आईची तब्येत अचानक बिघडली.तिला हॉस्पीटलमधे अॅडमिट केलेय.
तिची अचानक शुद्ध हरपली म्हणून हॉस्पीटलला नेले तर डॉक्टरने सांगीतले की तिला माईल्ड अॅटॅक येवून गेलाय.त्यामूळे आय.सी.यू. मधे शिफ्ट केलेय.
सांगता सांगता पून्हा सुशांत रडायला लागला.
त्याला कसे सावरावे हेच रेवाला समजत नव्हते.
OMG!
हे काय अघटीत घडले रे.?
आता कशी आहे आई?
आता काय ठरवलेस तू.
उद्या जाणारेस का गावी?
परीक्षेचे काय मग?
नाही गं.
काका म्हणलाय की आई असेही आय.सी.यू.मधे आहे. त्यामुळे तिच्या जवळ कोणाला भेटायला,थांबायला परवानगी नाहीये मग तू परीक्षा बुडवून इकडे येवून तरी काय करणार त्यापेक्षा परीक्षा संपल्यावरच ये.
तीला आता ऑब्झरव्हेशन मधेच ठेवणार आहेत 48 अवर्स तरी.
त्यानंतर इम्प्रुव्हमेंट बघून ठरवणार की काय करायचे.
हो ना?
मग तू शांत हो पाहू आधी.
काकू सेफ हँड्स मधे आहेत.काकाही उपचार नीट करताएत.
मग तू आता रडू नकोस बघू.
आधी शांत हो.
तू जेवलास का?

मेसवर जेवायलाच जात होतो तोच काऊंटरवरून मेसेज, आला की घरून कॉल आहे.
आई परीक्षेत विश करायला फोन करते कधी कधी तसा केला असेल म्हणून गेलो तर हिच बातमी कळली.
जेवणाची इच्छाच उरली नाही.
असे वाटले सगळे सोडावे आणि पळत आईकडे पोहोचावे.
पण बघ देवाने ही कशी वेळ आणली इच्छा असून मी आईला भेटायला जाऊ शकत नाही.
परीक्षाही आत्ताच यायला हवी होती का गं?
देव नाहीचे जगामधे आणि असलाच तर आमच्या सारख्यांसाठी तरी नाहीच आहे.
हे बघ सुश,तू शांत हो जरा.
मला तुझी मन:स्थिती समजतीय पण तूच जर असा धीर सोडलास तर मग आईला कोण धीर देणार?आणि काकू लवकर बऱ्या होतील.
तू मुळीच मनात भलते सलते विचार आणू नकोस.आणि तू इथे इतके कष्ट घेवून जो अभ्यास करतोएस तो कुणासाठी.काकूंना तूला खूप आनंदात बघायचेय ना मग आता सगळे वाईट विचार ईकडेच सोड देवाच्या चरणी आणि प्रार्थना करूया आपण देवाकडे.त्या लवकर बऱ्या होतील.फक्त एक आठवडाच तर परीक्षा राहीलीय मग तू जा काकूंना भेटायला.
चल आता खूप उशीर झालाय आपण घरी जाऊया.

रेवा एक बोलू का ग?
बोल ना.
आज मला होस्टेलवर जायची मुळीच इच्छा नाहीये गं,
मी तूझ्याघरी येवू का?
मला खूप एकएकटे वाटतेय आत्ता.
आय नीड युवर कंपनी नाऊ.

रेवाला मोठ्ठाच प्रश्न पडला.
त्याची अवस्था बघता त्याला नाही म्हणणे ही योग्य नव्हते आणि रूमवर ही नेणे संयुक्तिक नव्हते त्यात चुकून जरी मालकांना कळले तर तो प्रॉब्लेम वेगळाच होणार.
काय करावे हेच कळत नव्हते.
तीने देवाला हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली.
काहीतरी निग्रहाने ठरवत ती म्हणाली,
"सुशांत चल माझ्या रूमवर जावू.
त्याआधी काही खायला मिळतेय का बघू कारण आमचा डबा तर संपला. वाटेत काही पॅक मिळाले तर घेवू तूझ्यासाठी नाहीतर अॅसिडीटीमूळे एेन परीक्षेत तब्येत बिघडायची तूझी.
जाता जाता वाटेत मोबाईल फूड व्हॅन दिसली.
तीने पराठे आणि फ्राईड राईस पॅक घेतले.
हलकेच वर जायची सुचना करत गाडी हळूच बाहेरूनच बंद करून ढकलत पार्क केली.
हळूवार आवाज न करता गेट बंद करून ती वर आली.
मैत्रिणींना थोडक्यात घटनेची कल्पना देत तो आज इकडे राहण्यासाठी कंन्विन्स केले.
मुलीही समजदारीने घेत आपले बिछाने किचनमधे शिफ्ट करत बैठक मोकळी केली.
तीने पटकन सुशांतला एका ताटात अन्न वाढले आणि बळजबरीनेच जेवायला घातले.
"तू झोपणारेस की अभ्यास करणारेस?"
"रेवा एक तासभर झोपून मग अभ्यास करतो.मला एक वाजता उठवशील का?नाहीतर मग घड्याळ माझ्या डोक्याजवळ ठेव मी उठेन स्वत:च."इति सुशांत.
अरे मी अभ्यास करत जागणारच आहे.तू झोप.
मी उठवेन तूला.
तिने एका चटईवर ब्लँकेट टाकून त्याची झोपायची व्यवस्था केली आणि किचनच्या खोलीत अभ्यास करत बसली.मधेच लक्ष सुशांतकडे ही जात होते.
बरोबर एक वाजता सुशांत उठला.
तीने त्याला विचारून अर्धाकप चहा केला.मग दोघेही पून्हा एकत्रच अभ्यास करायला बसले.
चार वाजले तसे रेवा हळूच सुशांतच्या जवळ येवून कुजबूजली
"सुशांत चार वाजलेत.आमचे घरमालक सकाळी साडेचार पाचलाच उठतात.
त्यांना कळण्या आधी तूला निघायला हवे नाहीतर आमची रूमवरून गच्छंती निश्चित समज."
"खूप कडक आहेत रे घरमालक."
"यस,डिअर,आय कॅन अंडरस्टँड."
"नो वरी,मी निघतो लगेच."
पटकन उठून तोंडावर पाणी मारून तो जायला निघाला.
बाय करून चप्पल पायात सरकवून निघाणरच इतक्यात काय झाले की तो परत माघारी फिरला.
रेवाच्या पुढ्यात येवून ऊभा थांबला दन क्षण काय झाले कोणालाच कळले नाही आणि त्याने अचानक रेवाला मिठी मारली.
आता रेवा आश्चर्यमिश्रित धक्क्यात होती.
दोन्ही हातात पुस्तके तशीच लटकत ती पुतळा होवून  त्याच्या मिठीत बद्ध होती.
"थँक्स फॉर एव्हरीथिंग रेवा."
"आज माझ्या सगळ्यात दु:खद क्षणात तू मला जी साथ दिलीस ती मी कधीही विसरणार नाही.तू नसतीस तर मी कसे स्वत:ला सावरले असते देवच जाणे."
"अॅम रिअली प्राऊड अँड ब्लेस्ड टू हॅव यू इन माय लाईफ."

हळूच कानात येवून लव्ह यू रेवा म्हणत झरकन निघून गेला.
रेवा निशब्द,स्तिमित नजरेने उघड्या दरवाज्यातून जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त बघत राहीली.
आपण काय एेकले आत्ता.?खरेय की स्वप्न आहे!!
आत्ता हे सुशांतच बोलला ना की हा माझाच कल्पनाविलास आहे??
आनंद,आश्चर्य आणि थोडीशी भीती अशा सर्व भावना एकवटून डोक्यात थैमान घालू लागल्या पण दुसऱ्याच क्षणी ती स्वत:लाच समजावू लागली.
जास्त हुरळून जावू नका रेवा मॅडम.
ही एक टी.इ.डी.एस.स्टेट आहे."Temporary emotional disorder syndrome" स्टेट आहे.
उद्या त्या दगडाला ह्यातले काहीही लक्षात नसणार आहे.
तेव्हा तूम्ही तुमच्या नॉर्मल मोडवरच रहा.
उद्या परीक्षा आहे.लक्ष केंद्रीत करा रेवा बाई अभ्यासावर.
बाकी विचार कचऱ्याच्या टोपलीत टाका.

स्वत:च स्वत:ला असे वठणीवर आणत त्याच चटईवर तीने अंग टाकले.
#####################
(क्रमश: 5)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथा आवडतेय की नाही? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all