घरकोन भाग 8

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड,प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन जरूर वाचा.

घरकोन-8
®©राधिका कुलकर्णी.

सुशांत घाईघाईतच केबिनमधे शिरला.
 लगेच आपल्या प्रोजेक्ट टिमची मिटींग ठरवली.
कॉन्फरन्स कॉल वरून प्रत्येकाला अर्ध्या तासात कॉन्फरन्स रूम मधे यायची सुचना देवून तो आपल्या क्लाएंट्स मीट च्या डेटा कलेक्शन च्या कामात गुंतला.

अचानक दारावर टक् टक् झाली.
यस प्लिजऽऽ कम इन.
लक्ष कामावर केंद्रीत करतच तो बोलला त्यामुळे कोण आहे हे त्याने बघितलेच नव्हते.
गुड मॉर्निंग मि.सुशांत!
मे अाय स्पेअर युवर सम टाईम टू टॉक विथ यू?

आता त्याने मान वर करून बघितले.
तो घाईनेच खुर्चीवरून उठला.
समोर गावंडे उभा होता.
ह्याला काय बोलायचे असेल आता आपल्याशी असा विचार करतच त्याने गावंडे सोबत हस्तांदोलनाची औपचारिकता पार पाडली.
फोन वरून लगेच दोन कॉफीची ऑर्डर देत शक्य तितक्या अदबीने त्याने बोलायला सुरवात केली.
गुड मॉर्निंग सर..!!
सॉरीऽऽऽ सर मी बघितलेच नाही कामाच्या घाईत.
फर्स्ट आॅफ आॅल
कॉन्ग्रॅच्युलेशन्स सर.!!!
बोला,काय मदत करू शकतो मी आपली!?
मि.सुशांत असे बोलून लाजवताय तूम्ही मला.
नो.,नो.खरच बोलतोय.

गावंडेला मेल्याहून मेल्या सारखे होत होते.त्याच्या अपेक्षे विरहीत सुशांत अतिशय अदबीने वागत होता आणि हेच त्याला जास्त टोचत होते.
बरं, सगळ्या फॉर्मलिटीज झाल्या असतील तर मला तुमच्याशी थोडं बोलायच होत,बोलू का?इति गावंडे.

तेवढ्यात कॉफी आली.
कॉफी संपे पर्यंत केबिनमध्ये सन्नाटा होता तरी दोघांच्याही मनात मात्र प्रचंड गलबलाट चालला होता.
सुशांत आडाखे बांधत होता की हा नक्की काय बोलायला आला असेल.
पण काहीही झाले तरी सुशांतचा निर्णय झालेला होता.
आपण हा विषय शांततेनेच हाताळायचा हे त्याने मनाशी पक्के ठरवले होते.

कॉफी संपली तसे गावंडेने बोलायला सुरवात केली.
मि.सुशांत गेली पाच वर्षे आपण ह्या एकाच कंपनीत काम करत आहोत पण इतकी मोठी जवाबदारी मी आजवर कधी हँडल केली नाहीये.काल के.के.सरांनी तो डिसीझन अनाऊंस केला आणि मी ही गोंधळून गेलो पार.
खरच शप्पथ घेवून सांगतो‌,मी ह्या बाबतीत सरांशी काहीच बोललो नव्हतो.तुम्हाला कदाचित माझे बोलणे खरे वाटणार नाही आणि तो विश्वास तुम्ही ठेवावा असा आग्रह ही मी धरणार नाही.
मी जरा वेगळेच बोलायला आलोय.बोलू का?
यस प्लिजऽऽ.गो अहेड सर.मी ऐकतोय.
थँक्यु मि.सुशांत.

तर मी आता डायरेक्ट मुद्द्यावरच येतो.
के.के.सरांनी प्रोजेक्ट हेड करून मला जी जवाबदारी सोपवलीय त्यासाठी तुम्ही सहा महिने झाले मेहनत घेताय ह्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मला त्यातले शुन्य नॉलेज आहे हे ही मी खेदानेच मान्य करतो.
म्हणुनच मला तुमची मदत हवी आहे.
तूम्ही मला प्रेझेंटेशन साठी मदत कराल का मि. सुशांत?
गावंडे बोलून शांत झाला होता आणि प्रत्युत्तरासाठी माझ्याकडे पहात होता.

मी समजत होतो तितका तो वाईट नव्हता.
जे आहे ते त्याने  प्रमाणिकपणे माझ्या समोर मांडले होते त्यामुळे मनोमन मी त्याची मदत करायचे पक्के केले.
 इट्स माय प्लेजर सर!!!
असे का विचारताय.मी नक्की मदत करेन.
यु प्लिज डोन्ट वरी.
फक्त मी आत्ताच एक मिटींग बोलावलीय ती अटेंड करतो आणि मग तुम्हाला भेटतो,चालेल का?
यस.शुअरऽ.अँड अगेन 
थँक्स मि.सुशांत.
पून्हा शेकहँड्स करून गावंडे तिकडून गेला.
सुशांतने प्रोजेक्ट्ची फाईल प्यिऊनला गांवडेच्या केबिनमधे पोहचवायला सांगितली.
गावंडेला फोन करून तशी कल्पना दिली.
"हॅलो सर,सुशांत हिअर."
"मी प्रोजेक्ट ची फाईल पाठवलीय तुमच्याकडे."
"तुम्ही ती एकदा तुमच्या नजरे खालून घाला आणि मग तुमच्या ज्या काही क्विरीज किंवा डाउट्स असतील त्यावर अापण सविस्तर चर्चा करू,थँक्यू सर."

सुशांतचे सर्व टिम मेंबर्स वाटच बघत होते त्याची
"हाय गाइज् गुड मॉर्निंग!!"
"आर यु ऑल रेडी फॉर टुमॉरोज्  प्रेझेंटेशन?"
काही डाउट्स काेणतेही प्रश्न असतील तर लगेच क्लिअर करूया म्हणून ही अर्जंट मिटींग बोलावलीय.

सर तसा तर प्रोजेक्ट रेडीच आहे आपला.
पण मुख्य अडचण वेगळीच आहे,बोलू का? 
यस प्लिज.
बोला,काय प्रॉब्लेम आहे?
सर कानावर आले ते खरेय का?
काय आलेय कानावर?
हेच की प्रोजेक्ट हेड गावंडे सरांना केलेय तुम्हाला काढून?
हो खरेय हे.
पण मग सर ही मिटींग तूम्ही कशी बोलावलीय.?
वी आर कनफ्युज्ड अँड व्हेरी सॅड.
सर गावंडेंची अडचण तूम्हाला माहितीच असेल त्यांना इंग्रजी नीट येत नाही.उद्याच्या फॉरेन डेलिगेट्स समोर ते कसे प्रेझेंटेशन देतील?
आणि जे काम 6 महिने आपण करतोय ते त्यांना एका दिवसात कसे जमणार आहे सर?
त्यांना आम्ही लिडर मानत नाही.
आम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट नाही करायचेय असे ठरवलेय सर.
सगळी मेहनत तुम्ही घेतलीत आणि हा आला आयते क्रेडीट घ्यायला.
सर आम्ही एकमताने ठरवलेय आम्हाला प्रमोशन नाही मिळाले तरी चालेल पण गावंडेलाही हे सक्सेस मिळू देणार नाही आम्ही.
प्रोजेक्ट फेल गेले तर जावू दे."टीम मेंबर्स पोटतिडकीने तावातावाने बोलत होते.त्यांना समजावण्याची जी भूमिका रेवाने माझ्या बाबतीत पार पाडली तिच मला त्यांचा बॉस म्हणून पार पाडायची होती.

"झाले सर्वांचे बोलून की अजून काही बाकी आहे?"
"आता मी बोलूऽऽ?"
यस सर..
मिनीटभर सर्व शांत होते.मला ऐकण्यासाठी.
तर फ्रेंडस मलाही काल असाच राग आला होता.
पण शांत डोक्याने विचार केल्यावर मला जे समजले तेच तुम्हालाही सांगतोय.जर योग्य वाटले तर ऐका नाहीतर तुम्हाला जे करायचे आहे ते करायला तुम्ही स्वतंत्र आहात.
मला एक सांगा आपण सगळे कोणासाठी काम करतो.?
ह्या कंपनी साठी...राईट?
राव काय,गावंडे काय,मी काय किंवा तुम्ही सर्वजण.
आपण सर्वच ह्या कंपनीचे एमप्लॉईज आहोत.

जर कंपनीचा फायदा झाला तर त्याच्या यशाचे भागीदार आपण सर्वचजण आहोत.
त्यामुळे माझ्या जागी कोण आलेय हा विचार न करता कंपनीच्या भविष्यातील प्रगतीचा विचार करा.
आपल्या वैयक्तिक मतमतांतरा मूळे कंपनीचे नुकसान होऊ नये एवढेच मला वाटते.
आणि टिम हेड फक्त बदललाय.
बाकी सगळे अॅज इट इज तसेच राहणार आहे.
त्यामुळे उद्याचे डिल जर फायनल झाले तर तुम्हाला सर्वांना प्रमोशन मिळणार आहे.
तेव्हा सगळ्यांनी मनातून हा चूकीचा विचार काढून टाका आणि मि.गावंडेंना हवी ती सर्व हेल्प करा.
मनापासून करा.मी ही आहेच तुमच्या सोबत.
"पण सर तुमच्या प्रमोशनचे काय?"
हलकेसे स्मित करत सुशांत बोलला,"आज माझी वेळ नसेल आली कदाचित पण पुढल्यावेळी संधी मिळेलच की."
"बी पॉझिटीव्ह गाईज्."
"ऑल द बेस्ट !"
"अँड थँक्स फॉर युवर सपोर्ट.!!"
सुशांत ह्यावेळी थोडा भावूक झाला होता.तरीही कौशल्याने ते लपवत त्याने पून्हा टीमला धीर दिला.
आजचा डेमो पण चांगलाच व्हायला पाहिजे.
डिसबर्स अँड गेट बॅक टू युवर वर्क.."
एव्हाना लंच टाईम झाला होता.

रेवाने दिलेला डबा खाता खाताच त्याला ह्या क्षणी तिची खूप आठवण येत होती.सकाळी तिच्याशी बोलून बाहेर पडल्या पासून एक वेगळीच मन:शांती लाभल्याची अनुभूती त्याला येत होती.
नाहीतर काल पर्यंत गावंडेवर राग-राग करणारा मी आज किती संयमाने बोलत होतो.
खरच म्हणतात ना की मनुष्याने रागावर संयम ठेवला तर प्रेमाने जग जिंकता येते.

आज त्याला ती रेवा आठवत होती जी कॉलेजमधे अतिशय अॅटीट्युड असलेली,
श्रीमंतीचा तोरा मिरवणारी थोडी मग्रुर कॅटॅगिरीतली आहे असे सुशांतला वाटायचे.
पहिल्याच भेटीत झालेल्या वादामुळे दोघांचीही परस्परांबद्दल हिच मते ठाम झाली होती.
पण जसजसे दिवस पूढे गेले तसे दोघांनाही एकमेकांच्या हुशारीची जाणीव झाली.
शाळेमधे पहिल्या नंबरने पास होणारी रेवा नेहमीच वर्ग मॉनिटर म्हणून काम पहायची.
त्यामुळे थोडा अरेरावीपणा तसाही तिच्यात होताच.
काही दिवसातच कॉलेजच्या युवा लिडर च्या निवडणूकीत ती सर्व संम्मतीने निवडून आली.
तिच्या ह्याच गुणांवर सुशांत मनोमन भुलला होता.
तसे बोलून दाखवत नसला तरी पूर्वी इतकी अढीही आता उरली नव्हती.
इकडे रेवालाही सतत पहिल्या दिवशी वाट्टेल तसे आरोप करून त्याला बोलल्याचे शल्य टोचत होते.
कित्येकदा तिच्या मनात आले की सरळ जावून एकदा माफी मागावी पण पून्हा तो जास्त अॅटीट्युड दाखवून खिल्ली उडवला तर ह्या भितीने ती आणि तो एकमेकांशी बोलणे टाळतच असत.
पण त्या दिवशी मी कॉलेजला निघालो आणि एेन कँम्पसच्या कॉर्नर वरच माझी सायकल पंक्चर झाली.
दूरदूर पर्यंत पंक्चरचे दूकान नव्हते.
काय करावे हा विचार करत बसलो होतो इतक्यात बाजूला एक सावली दिसली.
वर पाहीले तर समोर रेवा.
आता ही नक्की आपली चेष्टा करणार अन् टोमणे देणार..
देवा तूला हिच भेटली का माझी इज्जत काढायला असे मनातले संवाद चालले असतानाच रेवाने विचारले,काय झालेय?
काही मदत हवीय का?
तीचा इतका मृदू आवाज मला विस्मयात पाडत होता.
आज शेरनी मेमना कैसे बन गयी?
तरीही धीर करून म्हणालो," नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये."
मला तर सायकलची हवा गेलेली साफ दिसतीय.
काय झालेय प्लिज सांग.ईति.रेवा

"काही नाही सायकल पंक्चर झालीय आणि दूकान ही नाहीये जवळपास."
पायी जायला ना दूकान जवळ ना कॉलेज.
म्हणजे आजचे लेक्चर बुडणार हे नक्की.काय करावे समजत नाहीये."
रेवाने लगेच सोल्युशन दिले.
हातिच्या,एवढेच ना.
तूला डबलसीट चालवता येते का?
अजूनही रेवा माझे नाव घेवून बोलणे टाळत होती पण तिची मदत करण्याची इच्छा मनापासून आहे हे ही दिसत होते.
मग मी ही हो म्हणालो.

त्याबरोबर तीने सांगितल्या प्रमाणे सायकल तिकडेच लॉक करून मी तीच्या सायकलवरून तिला डबलसीट घेवून कॉलेजला पोहचलो.
उतरल्यावर तिला काहीतरी बोलायचे म्हणून म्हणालो.
आज तु मदत केलीस म्हणून मी कॉलेजला वेळेत पोहोचू शकलो.
ह्या बदल्यात तूलाही मदत लागली की सांग मी जरूर करेन.
त्यावर रेवा जे बोलली ते मला आजही लक्षात आहे.
ती म्हणाली," मी जे मागेन ते देशील?

थोडा मनातून घाबरतच मी हो म्हणालो.
कारण ती पोरगी काय मागेल ह्याचा काहीच नेम नव्हता.
पण तीने जे मागीतले तिथेच माझे मन जिंकले होते.
ती म्हणाली माझ्या मैत्रीचा स्वीकार करशील?
"मला आनंद होईल तुझ्या सारखा हुशार मित्र मिळाला तर."
"बघ विचार करून उत्तर दे कारण तूला मी आवडत नाही हे मला माहितीय."
आणि हो ही सायकल तूला ठेव तुझी दुरूस्त होई पर्यंत."
"चल क्लासला उशीर होतोय."

त्या दिवशी रेवाचा खरा स्वभाव मला कळला होता.
एखाद्या वाईट प्रसंगामूळे व्यक्ती पूर्णत: वाईट असे जे आपण ठोकताळे लावतो ते किती चुकीचे असतात हे आज गावंडेच्या ही बोलण्यातून नव्याने सिद्ध झाले..
################
फोनची घंटी वाजली आणि सुशांतची तंद्री भंग पावली.
त्याने गडबडीतच फोन उचलला.
के. के.सर केबिन मधे बोलवत होते.
सुशांतने मनोमन रेवाला धन्यवाद देत के.के.च्या केबिनकडे निघाला..
~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:8)
®©राधिका कुलकर्णी.

-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथा आवडतेय की नाही??
कमेंटद्वारे जरूर कळवा मला.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all