घरकोन भाग 9

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन जरूर वाचा.

घरकोन-9
®©राधिका कुलकर्णी.

सुशांत के.के.च्या केबिन कडे पोहोचला.
"मे आय कम इन सर?"
यस,मि.सुशांत,प्लिज कम ."
"हॅव अ सिट."सुशांतच्या बाजुच्या खुर्चीवर गावंडेही आधी पासूनच बसलेला होता.
सुशांत के.के.आता काय नविन सांगतोय ह्याचीच वाट पहात होता.
मि.सुशांत दोन गोष्टी सांगायच्या होत्या म्हणून बोलावलेय.
यस सर.प्लिजऽऽऽ!
सुशांत रावच्या पुढच्या बोलण्याची वाट पहात होता.
"क्लाएंट मिटींगची तयारी झाली का?"
सर,त्याचेच फायनल वर्क करत होतो.
"डेटा ईज ऑलमोस्ट रेडी, जस्ट टू कंपाईल इट इज रिमेन्ड.ते होउन जाइल.
अॅम रेडी फॉर द मिट सर."
"यु नो मि.गावंडे, धिस सुशांत व्हेरी इफीशियंट बॉय." राव खोटे हसतच खवचटपणे सुशांतची तारीफ करत होता हे सुशांतला जाणवत होते तरीही शांत राहणे हीच त्या वेळेची गरज होती म्हणुन तो शांत होता. 
"मि.सुशांत देअर इज वन गुड न्युज फॉर यू."
अॅज देअर इज अॅन इम्पॉरटंट मिटींग विथ फॉरेन गेस्ट्स टुमॉरो,आय हॅव पोस्टपोन्ड अवर क्लाएंट मिटींग ऑन डे आफ्टर टुमॉरो,आर यु हॅप्पी मि.सुशांत?"
"नो प्रॉब्लेम सर,अॅम रेडी एनी टाईम."
आणखीन एक गोष्ट,आजचे डेमो प्रेझेंटेशन तूम्ही देवू शकाल का?
अॅज अ टिम हेड,खरे तर हा डेमो मि.गावंडेंनीच द्यायला पाहिजे पण त्यांचेच मत आहे की आजचे डेमो बघून ते उद्याची तयारी करतील.
तूम्हीही त्यांना हेल्प करणारच आहात राईट!!! 

सुशांतचा आनंद गगनात मावत नव्हता.देवाने फूल ना फूलाची पाकळी का होईना त्याच्या पदरात ह्या संधीच्या निमित्ताने घातली होती.
आपला आनंद मनातच ठेवत त्याने शक्य तितक्या संयमाने होकारार्थी मान हलवली.
"माय प्लेजर सर.थँक्यु!"

के.के.चे आभार मानतच तो केबिन मधे आला.
त्याला काहीच सुचत नव्हते.
हा एक चमत्कारच होता कारण राव नी स्वत:हून ही संधी त्याला कधीच दिली नसती.
पण गावंडेमूळेच ही संधी त्याला मिळाली होती.त्या वेळे पुरता तरी गावंडेच त्याच्यासाठी देवाच्या रूपात धावून आला होता हेच खरे होते.
निदान आपल्या कंपनी हेड्स समोर तरी हा डेमो स्वत: प्रेझेंट करण्याची संधी मिळाली हेही नसे थोडके.

घटाघटा बाटलीतले पाणी पिऊन स्वत:ला थोडे बॅलन्स करत तो काहीतरी ठरवायला लागला.
आता घाईने पून्हा सगळ्या टीमशी बोलायला हवे.
त्याने लगेच फोन लावून सर्व टीमला ताबडतोब आपल्या केबिनमधे बोलवून घेतले.
गाईज,आजचा डेमो रावनी मला प्रेझेंट करायला सांगितलेय.
सो इजंट इट अ न्युज!!!
"काँग्रॅट्स सर!"
यस थँक्स गाईज्.!!
लेट्स रेडी फॉर धिस नाऊ.
निदान कंपनीच्या हेड्स समोर तरी आपली मेहनत पोहोचली तरी पुष्कळ आहे.
त्यांना हे तरी कळेलच की ह्या प्रोजेक्टवरचे सगळे काम आपण मिळून केलेय.
चला तासाभरातच कॉन्फरन्स रूम मधे मिटींग आहे.
कुठेही काहीही मिसिंग नकोय मला.
वुई ऑल विल मेक इट अ ग्रेट सक्सेस..
आॅल द बेस्ट टिम..
सुशांत खूप उत्साहात सर्वांशी बोलत होता.
जयदीप,सर्व प्रोजेक्ट स्लाईड्स रेडी आहेत ना,चेक कर.
सुहाना,सगळ्या डेटानूसार प्रोजेक्ट स्लाईड्स सिक्वेन्सनी ठेवल्याएत ना चेक करा.
चला सगळे आपापल्या दिलेल्या कामानूसार प्लॅन चेक करा.
अर्ध्या तासात मला सगळे  कॉन्फरन्स हॉलमधे भेटताय. 
गेट बॅक टू वर्क अँड मिट मी इन द कॉन्फरन्स..
सगळ्यांना हव्या त्या जरूरी सुचना देवून तो स्वत:ही आपल्या डेमोची रिहर्स मनातल्या मनात करत होता.

बरोबर अर्ध्या तासात सगळी टिम कॉन्फरन्स रूम मधे जमली.सगळे सेटअप चेक करून पून्हा पून्हा कुठे काही राहून तर नाही गेले ना हे चेक करत होता.
नकळत थोडा नर्व्हस होतोय असेही त्याला जाणवत होते.
थोडी एक्साइटमेंट पण होतीच.
अखेर सर्व कंपनी हेड्स समोर प्रोजेक्ट डेमो सुरू झाला.
सुशांतने अॅज युज्वल त्याच्या टॅलेंटची चमक दाखवत अतिशय कॉन्फीडंटली पूर्ण प्रोजेक्टचा डेमो दिला.
ह्या प्रोजेक्टला जर यु.एस.टीमनी अप्रुव्ह केले तर त्यांना कसा ह्यात दुपटीने फायदा होईल हेही कनक्लुडींग स्पिच मधे तो सांगायला विसरला नाही.
"वेलडन मि.सुशांत.,डेमो इज परफेक्टली एक्सलंट."
"ग्रेट जॉब मि.सुशांत."
सगळ्यांनीच सुशांतचे खूप कौतुक केले.
सुंशातला कधी एकदा घरी जातोय असे झाले होते.
सगळ्यांचे अभिनंदन स्विकारत सुशांत केबिन मधे आला.
घरी निघायची तयारीच करत होता तेवढ्यात गावंडे केबिनमधे आला.
कॉनग्रॅच्यलेशन्स मि.सुशांत.!मस्त झाला आजचा डेमो.
हाऊ आर यु फिलिंग नाऊ!
यु मस्ट बी हॅप्पी राईट?
हसतच गावंडेने विचारले.
यस,थँक्यू सर..
बर तुम्ही सगळ्या फाईल्सचे डिटेल्स चेक केलेत का सर?
हो आजचे प्रेझेंटेशन मी रेकॉर्ड केलेय.त्याची मला मदतच होईल.
"पण तुमच्या इतके जमेल की नाही ह्याचेच टेंशन आलेय."
सर उद्या संध्याकाळी आहे मिटींग.अजून खूप वेळ आहे.तुम्ही नक्की छान कराल मला विश्वास आहे.उद्या आपण जरा लवकर येऊ मग छान तयारी करू,चालेल ना?
ऑल द बेस्ट सर..
"मि.सुशांत एक बोलायचे होते वेळ आहे का?"
हं,निघायची घाई असलेला सुशांत भांबावल्यागत विचारला.
मि.सुशांत मला माहितीय राव सर मला फेव्हर करण्याच्या नादात तुमच्यावर खूप अन्याय करत आहेत.खरे तर आजचा डेमो पाहून तर माझी खात्री पटलीय की तुम्हीच डिझर्व्ह करता हे प्रमोशन पण तरीही तुम्ही मला इतके बुस्टअप करताय.खरच वयाने जरी मी मोठा असलो तरी आज तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून मला खूप खुजे केलेत.
हे बोललो नसतो तर मला आज झोप लागली नसती म्हणून थोडे मन मोकळे केले तुमच्या समोर.गावंडेने माझे हात त्याच्या हातात घेवून त्याच्या खरेपणाची साक्ष स्पर्शातून देत होता.
गावंडे खूप भावूक झाला होता.
सुशांत फक्त निशब्द होवून त्याच्या समोर ऊभा होता..
~~~~~~~~~~~~~~~क्रमश: घरकोन -9
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथा आवडतेय की नाही?
कमेंटद्वारे मला जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all