साहिलच्या वाढदिवसाचे घरामध्ये जोरात सेलिब्रेशनची तयारी चालू होती. साहिल आठवल्यांच्या घरातला नवसाचा दिवा. दामोदर आणि लक्ष्मीच्या लग्नाला पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर साहिलचा जन्म झाला होता. त्याच्या पहिल्या वाढदिवसाची दणदणीत तयारी सुरु झाली होती.
" मीना काय झाले ग तुला. अशी काय एकटी बसली आहे. आणि डोळ्यात पाणी का आहे तुझ्या."
" काही नाही ओ आत्याबाई. घरात थोड काम करुन थकायला झाल आहे."
" मीना काय करते ग. जरा ऐवढे लाडू बांधून ठेव. मी बाजारातून जरा भाजीपाला आणि किराणा मालाचे सामान घेवून येते."
" चालेल सासूबाई. एवढ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या की लाडू वळायला घेते."
" मी पण येते की मदतीला मला तरी काय काम आहे."
" आत्या तुम्हांला तरी घरातल्या कामातून कुठे सुटका असते. माहेरी आला आहात,आराम करा."
" अग काम नसल की नको ते विचार डोक्यात शिरकाव घालत असतात. त्यापेक्षा कामात मन गुंतून घ्यायच."
" आत्या काय झाल ओ. आज एकदम विचारात असल्यासारख बोलत आहात. मी आल्यापासून तुम्हांला एक गोष्ट विचारेल म्हणते. घरी सगळे ठिक आहे ना."
" माझ काय बोलणं एवढ मनाला नको लावून घेवू. माझ आता वय झाल. कधी काय बोलेलं आणि काय नाही मलाच आठवत नाही बघ. घरी सगळेजण मजेत आहे."
" शशिकांत दादा तुम्हांला इथे सोडून गेले. पण जास्तवेळ थांबले नाहीत. विचारलेल्या प्रश्नांची हो , नाही अशीच उत्तरे देवून निघून गेले. तेव्हाच माझ्या मनात विचार सुरु झाला."
" आपण एवढे लाडू वळून घेवूया. नंतर काम झाल की बोलूया सावकाश. नाहीतर तुझी सासू म्हणेल. आत्याबाई बरोबर गप्पाच मारत बसली का? "
" आत्या काही पण तुमच आपले. आई कशाला बोलतील मला."
" घरात कार्यक्रमाची तयारी सुरु आहे ना. काम उरकायला हवी."
" शशिकांत दादा, कामिनी, कौस्तुभ तसेच निलकंठ, यशस्विनी, निनाद सगळेच येतील साहिलच्या वाढदिवसाला. आत्या तुम्हीच लगेच त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह करु नका."
" मला जायला हव. नंतर परत येईलच की मी. आता एवढी चार दिवस झाले की येवून मला."
" बर मग आज रात्री आपण जेवण, घरातले काम आवरले की टेरेसवर शतपावली करत गप्पा मारुया."
" चालेल ना."
" भाज्या किती महाग झाल्या ग. मेथी गड्डी ४० रुपये, बटाटे आणि कांदा ५० रुपये किलोला भिडला. टोमॅटो चे पण भाव वाढले. सर्व सामान्यांनी भाज्या खायच्या की नाही."
" आई पाणी घ्या. महागाई वाढतच जाणार आहे. म्हणून काय आपण खाण बंद करतो का? शेवटी जे कमावतात ते पोटाला खायला मिळावे म्हणूनच की"
" गावाकड ताजा-ताजा भाजीपाला पहायला आणि खायला मिळतो. आम्हांला कोणाला पैसा खर्च करुन काही विकत घ्याव लागतच नाही. कोणाच्या शेतात आलं, मेथी, मिरच्या तर कोणी शेपू, पालक, कांटे, बटाटे लावतात. आपल्या शेतात पिकणारं त्यांना द्यायचे आणि त्या बदल्यात ते आपल्याला देतात."
" छान वाटत ना गावाकडे अजूनही एकता आणि आपलेपणा टिकून आहे. माझ्या मामाच्या गावात देखील असेच आहे."
" आता सगळं बदललय पोरी. कोणाच कोणाला काही पडल नाही बघ. माझच खर अश्या हव्यासा पोटी घरोघरी भांडणाचे सूर ऐकायला मिळतात. अस बोलता बोलता आत्याबाई थांबल्या."
' बर झाल थांबले मी. नाहीतर खर काय घडलय घरी बोलून गेले असते.'
" काय ओ वन्स असे मधेच काय थांबल्या बोला की. घरी तिकडे कोणाची भांडण झाली का? घरी सगळे ठिकठाक आहे ना?"
" अवो आई आत्या आजकाल घडणा-या कलयुगा विषयी बोलत आहेत. आजकाल लहान पोरं पण बोलतात की मला हे आत्ताच्या आत्ताच हव. नाही दिलतर आख्ख घर डोक्यावर घेतात. आपली अनूच बघा की. मग मोठ्या माणसांच काय घेवून बसता. आमच्या लहानपणी आईने मोठे डोळे करुन पाहिले तरी बोबडी वळायची. बाबा समोर असताना तोंडातून आवाज देखील निघत नसायचा. अजूनही बोलायचे झाले तर विचार करूनच बोलावे लागते."
" खर आहे तुझं. अनुला पाहिजे तसे वागले नाहीतर अबोला धरुन राहते. चार-पाच दिवस तर बोलतच नाही. तिला मनवायला काय काय करावे लागते माझे मलाच माहित."
" तुम्ही तिला लाडावून ठेवले आहे. असच जर राहिले तर मुलांना घरच्यांचा काही धाकच उरणार नाही. तरी बर आहे तिच्या बाबांना तरी घाबरुन आहे ते जरा."
" वागावं तरी कस खरच कळेनासे झाले नाही का? या जगात. समजुतीच्या गोष्टी सांगायला गेलो तर., आली मोठी शहाणी बोलत असतील. आम्हांला काय आमच कळत नाही का? "
" असच झालय आता आत्या सगळीकडे."
" मीना अग इकडे ये ना जरा."
" आले ताई. आई एवढी भाजी शिजायला टाकली आहे. ताई काय बोलतात ते पाहून आलेच मी, तोपर्यंत तुम्ही भाजीकडे बघाल ना."
" जा की तू. पहाते मी."
" सगळी काम रमाच करते की. लक्ष्मीन जरातरी आता किचनमधे काम करायला हव. तिचा पण जीव आहे अग. ती पण थकत असणार एवढे काम करुन."
" मीना काही बोलली का तुम्हांला."
" ती कशाला काय बोलेल. मी आल्यापासून पाहते आहे. सारखी किचन मधे उभी असते. आणि साहिलच्या वाढदिवसाकरता तिचा उत्साह पाहून जणुकाही अनुचाच वाढदिवस आहे असा जल्लोष दाखवत आहे."
दरवाज्यात उभ राहून हि गोष्ट नेमकी लक्ष्मीच्या कानावर पडली होती. ती किचनमधे प्रवेश करताच आत्याबाईने बोलण थांबवले.
" अग तू इकडे. मीना आली होती ना तुझ्याकडे."
" साहिलला थोड गरम पाणी करुन न्यायच आहे. मीनाला मी त्याच्याजवळ बसवले आहे."
" अग मग मला आवाज द्यायचा मी आले असते गरम पाणी घेवून."
गरम पाणी घेवून लक्ष्मी तिथून निघून जाते.
लक्ष्मीच्या मनात आत्याबाई विषयी कोणते ठाम मत तयार होईल. सासूबाईच्या मनात मीना विषयी गैरसमज होईल का? पाहूया पुढच्या भागात.
क्रमश:
अष्टपैलू लेखक स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा