Login

घरकुल भाग २

गैरसमज झाले तरी आपल्या माणसांवरचा विश्वास समजूतीने अंतर मिटवण्यास कारणभूत करते.
मागच्या भागात आपण पाहिले की, साहिलचा वाढदिवस साजरा करायला आत्याबाई गावावरुन आल्या आहेत. त्यांची द्विधा मन:स्थिती तसेच घरातल्या वादामुळे पोळून निघालेल्या त्या मनातल्या मनात आपल्या भावना आवरत भावाच्या घरी आनंदाने चार दिवस राहायला आल्या आहेत. तिथे घडणारा समजूतीचा बदल पाहून आश्चर्याने त्यांना प्रश्न पडत आहेत. पण ह्या प्रश्नांनी आत्याबाईंची भावजय आणि आणि सूनांमधे काय गोष्टी घडून येतील ते आपण पाहूया.

" ताई द्या इकडे मी पाणी देते त्याला."

" हो हे घे. पण थांब अग तू स्वयंपाकाचे बघ अग. पुन्हा उशीर झाला तर मामंजी चिडतील. तसही खूप कामाचा ताण पडतोय तुझ्यावर. याला बर वाटत चालल आता. येईलच मी दोन-तीन दिवसात काम करायला."

" ताई, काही नाही. काम होतात अशी. तुम्ही साहिलला वेळ द्या."

" हो."

लक्ष्मीच्या बोलण्यात नाराजीचा सूर मीनाला दिसला होता. मीना किचनमधे विचारांचा गुंता घेवून चालत होती.

" अग जरा खाली बघून चालायच. पातेल्याला धक्का लागल ठिक आहे. पण तू पडली असतीस आत्ता."

" हो ना आई. ते जरा मी... "

" कसला ऐवढा विचार चालला आहे एवढा रमय्या." अस बोलून आत्याबाई हसत होत्या.

" आई मी जेवायला वाढते सगळ्यांना. साहिलला औषध देवून झोपवले आहे आताच. तोपर्यंत आपले जेवण आणि बाकीची कामे देखील होतील."

" आम्ही बघतो ताई इथले. तुम्ही त्याच्याजवळ थांबा."

लक्ष्मी मीनाकडे दुर्लक्ष करत भांडी घेवून बाहेर डायनिंग टेबलवर जावून ठेवत होती.

जेवणानंतरची भांडी देखील लक्ष्मीने स्वच्छ करुन झाडून काढले होते.

" लक्ष्मी काय ग. साहिलला बर वाटतय ना. त्याचा एकतर परवा वाढदिवस आहे. तो बरा होतोय हे ऐकून बर वाटतय."

" हो आई बर वाटतय त्याला आता."

" ताई चला ना आता आपले काम आवरल तर टेरेसवर जावूया आपण शतपावली करुया. आई, आत्या चांदणी रात्रीत गप्पा मारत बसूया."

" मला आता साहिल जवळ थांबायला हव. तो आता उठला असेल. औषध घ्यायची त्याची आता वेळ झाली आहे. येईल नंतर मी कधीतरी पुन्हा."

काहीतरी ताईंच बिनसलय हि गोष्ट मीनाच्या लक्षात आली होती.

" काय ग साहिल कधी पासून आजारी आहे. मी आले तेव्हा तर तो आजारी नव्हता वाटत."

" काय सांगायचं आत्या गेला आठवडाभर तो आजारी आहे. वरुन दिसत नसला तरी कणकण आहे आतून. त्याचा अशक्तपणा वाढत चालला होता. म्हणून सतत कोणी ना कोणी त्याच्याजवळ थांबवच लागते. औषधामुळे त्याला सतत ग्लानी येते. गेला आठवडाभर घर खूप डिस्टर्ब आहे. म्हणूनच आनंदाचे क्षण वेचण्यासाठी आकाशनेच साहिलच्या वाडदिवसाचा थाट करायचा ठरवले. त्याने मला सांगितले आणि मी सासूबाई आणि सास-यांना सांगितले. लक्ष्मी ताई आणि मिलिंद दादा तयार नव्हते होत वाढदिवस साजरा करायला. पण आम्ही खूप मनावले शेवटी ते तयार झालेच."

" असे घडले का सगळे. खरतर आपण किती गैरसमज करुन घेतो ना. आपल्याला दिसत असते ऐक आणि प्रत्यक्षात घडले असते मात्र दुसरेच. आपण मात्र वेगळाच अंदाज लावत बसत असतो."

" तुम्हांला तरी कुठे माहित होत आधी. विषय निघाला म्हणून तुम्हांला कळल आत्या."

" अग आज तुझी सासूबाई आणि लक्ष्मी आपल्या बरोबर शतपावली करायला आल्या नाही. त्यांना वाईट वाटले असेल का माझ्या बोलण्याचे."

" काही घडले आहे का आत्या. मला लक्ष्मी ताईंच्या वागण्यात बदल वाटत आहे. त्या कधी इतक्या तुटक बोलत नाही. काही झाले कळायला मार्ग दिसत नाहीये."

" तिने जेव्हा तुला हाक मारली होती ना. तेव्हा मी शीला बरोबर बोलत होते. मीनाला एकटीला खूप काम पडत घरातल. लक्ष्मी काही हातभार लावत नाही का कामाला. असा विषय चालला होता. तेवढ्यात ती गरम पाणी करायला किचनमधे आली होती. तिन आमच बोलण ऐकल असेल का ग? मला हि परीस्थिती माहित नव्हती. माझ्यामुळे लक्ष्मी दुखावली गेली असेल का?"

" आत्या नका ऐवढा विचार करु. नसेल ऐकल ताईंनी काही. साहिलच्या टेन्शन मुळे त्या अश्या वागत असतील. त्यांची मन:स्थिती आपणच समजून घ्यायला हवी."

" बरोबर बोलते तू. पण माझ्या हातून अजून एक चूक घडली आहे असे वाटते मला ग."

" मी जेव्हा शीलाला सांगितले की सगळ काम मीनाच्या अंगावर पडत असते. लक्ष्मी मदत करत नाही का? यावर शीला मला बोलली की मीना काही बोलली का कामावरुन तुम्हांला."

" रडू नका आत्या. तुम्हांला जे दिसले तसे बोलला तुम्ही. यात तुमची काही चूक नाही."

" मी जरा माझे मन रमवायला आले होते. आनंद उपभोगायला आले होते. पण माझ्या येण्याने तुमच्यात गैरसमज आणि भांडणच लावत आहे असे वाटते मला."

" आत्या काही नाही तसे. उगाच मनात काही विचार आणू नका.ते जावू दे आता. तुम्ही मला काहीतरी सांगणार होता ना."

" मीना अग खाली या आता. बराच वेळ झाला आता. गार वार देखील सुटल असेल. आत्याबाई थंडीने आजारी नको पडायला."

" आले आई मी."

" आपण बोलू ग निवांत अजून वेळ आहे आपल्याकडे दोन दिवस."

" आत्या अजून आठवडाभर राहिल्या शिवाय मी तुम्हांला कुठेही जावू देणार नाही."

दुस-या दिवशी लवकर उठून लक्ष्मीने भाजी आणि चपाती बनवून नाश्ताची देखील तयारी केली होती.

" लवकर उठल्या का ताई तुम्ही. मला उठवायच ना. मी पण आले असते मदतीला."

" आत्याबाईंना माझ्यापण हातची चव चाखू दे की." लक्ष्मी हसून बोलत होती.

कालच्या पेक्षा आज लक्ष्मीच्या वागण्यात बदल झालेला दिसत होता.

" मीना अग तू खोब-याची चटणी वाट, मी सांबर आणि मेदू वडे तळायला घेते."

आपल्या सूना एकत्र हसून किचनमधे बोलतात हे पाहून शीला सुखावली होती.

" काय झाल ग शीला स्वत:शीच हसते का?"

" इकडे या आणि तुम्हीच बघा काय ते."

लक्ष्मी आणि मीनाला संभाषणातून गोड हसत-खेळत बागडाताना पाहून आत्याबाईंच्या डोळ्यात पाणी आले. पदराने आपले अश्रू पुसत आत्याबाई तिथून निघून गेल्या.

" ताई, तुम्ही कधी एवढी तयारी केली. आणि भाजीपण तयार आहे. तुमच्या हातचे मेदू वडे म्हणजे स्वर्ग सुखच की."

" अग हो पुरे आता, किती कौतुक करशील माझे."

" अग रात्री पुन्हा पाणी गरम करायला आले होते. त्यामुळे साहिल आता बरा झाला आहे. जीवात जीव आला बघा माझ्या. आता सगळ आनंदाने करायला मोकळी मी. तेव्हाच रात्री उडदाची डाळ भिजत घातली होती मी."

आत्याबाई आपली मन:स्थिती मीनाला सांगू शकतील का? मीना यातून आत्याबाईला सावरु शकेल का?

क्रमशः

अष्टपैलू लेखक स्पर्धा

🎭 Series Post

View all