Login

घरकुल भाग ३

आत्याबाईंच्या मनातले सत्य अखेर मीनाला समजते.
मागील भागात आपण पाहिले मीनाला आत्याकडून लक्ष्मीच्या तुटक वागण्याविषयी समजले. परंतु नंतर अशी काय जादू घडली की लक्ष्मी ते सारे विसरुन पहिल्यासारखी वागू लागली ते आपण आता पाहणार आहोत.

" आत्याबाई चला नाश्ता करायला. बाबा, आकाश भावजी,अहो. चला लवकर. "

" वहिनी आज काय स्पेशल आहे वो. एकदम आरोळी देताय नाश्ताला बोलवण्याकरता."

" मी सांगते आज ताईंनी मेदू वड्याचा बेत आखला आहे."

" मेदू वडा आणि तो पण वहिनीच्या हातचा म्हणजे दुग्धशर्करायुक्त योगच आहे आज. "

" भावजी आधी खावून बघा मग कौतुक करा."

" गरमा गरम सांबराच्या वासाने मला कधी खाते असे झाले आहे मोठी आई. " छोटीशी अनु बोलत होती.

" आज सर्वांना खेळीमेळीन डायनिंग टेबलवर बसलेल पाहून घरात आनंदाचे वारे पसरले आहे."

" आत्या अग तू पाहत काय बसलीस. ये मेदू वडे खायला खूप भारी झाले."

" खरच ग लक्ष्मी खूप छान झाले आहे. मेदू वडे, सांबर आणि चटणी अगदी झणझणीत बेत झालाय बघ. "

" अनु आवरल असेल तर लवकर ये ग इकडे. शाळेत जायला उशीर होईल. तुझ्या केसांची वेणी आणि रिबीन लावून देते."

" अग आई हो. अजून अर्धा तास आहे शाळेत जायला."

" माझा डबा भरला आहेस का ग. आज लवकर जायचे आहे आॅफिसला. महत्वाची मिटिंग आहे आज एक. साहेब येणार आहेत आमचे मुंबई वरुन."

" अहो आज ताईंनी मसाले भात, छोले, गाजर हलवा बेत केला आहे. तुमच्या करता चपाती. आणि आम्हांला भटूरेच पीठ मळले आहे."

" असे असेल तर मी दुपारच्या जेवणाच्या वेळी घरीच येतो जेवायला तेव्हा छोले-भटूरेवर ताव मारतो."

" खरच का, मग तुमचा डबा भरु कि नको."

" अग खरच येईल मी लवकर घरी. तसेही आपल्याला बाहेर पण जायचे आहे ना. मी येतो दुपारीच हाफ डे घेतो."

" हो चालेल मग. दादा हा घ्या तुमचा डबा."

" आज मी सोडतो अनुला शाळेत. आकाश लवकर चालला आहे ना. आज मी थोड उशीरा जाणार आहे. अनुला शाळेत सोडून जाईल मी कामावर."

" आलो मी, मीना येवू दे गरमा गरम छोले-भटूरे."

" हातपाय जरी धुवा. मी ताट करायला घेते."

" वा.... वा वहिनी एकच नंबर. आजचा दिवस काही भन्नाट झालाय."

" अग तू आवरायला घे. माझ जेवण झाले की आपण निघूया बाहेर जायला."

" घरातलं आवरलय माझ काम. तयार होवून येते मी खाली."

" साहिलला हा जॅकेटचा ड्रेस शोभून दिसेल ना? "

" हो आणि हि टोपी."

" घेऊयात छान आहे एकदम."

" ऐका ना लहान मुलांना रिटर्न गिफ्ट म्हणून कलर बुक आणि कलर असलेल हे किट घेवूया."

" अग आपण अनु करता हा परीचा फ्राॅक घ्यायचा का? "

" मोठी बहिण आहे ती. नटायचा तिचा पण दिवस आहे बघ. "

" हो घेवू ना. म्हणजे कोणाचा वाढदिवस आहे कोणाला कळणारच नाही."

" अहो चार तास झाले. कसे गेले कळालेच नाही. अजून आपल्याला डेकोरेशनचे सामान घ्यायचे आहे. त्याच बरोबर रांगोळी काढायला काही रंग देखील घ्यायचे आहे."

" तुला एक सरप्राईज आहे."

" काय ओ. "

" अग आपण साहिलचा वाढदिवस घरी नाही तर हाॅल बुक केला आहे मी. तिथे सगळे डेकोरेशन आणि रांगोळी काढून देणार आहेत. हि गोष्ट दादाला माहित आहे."

" मग मला का नाही सांगितले. बायको पासून अशी गोष्ट लपवतात का कोणी."

" तू गेली आठवडाभर कामात स्वत:ला गुंतून घेतले आहेस. साहिलला बरे नसल्याने वहिनींना देखील कामात मदत करता येत नव्हती. आई पण आता थकली आहे. तिला जमेल तेवढी ती मदत करते. पण तुला आराम मिळावा याकरता माझ्या डोक्यात हि कल्पना आली आणि मी आपल्या घरा जवळचाच हाॅल बुक केला आहे."

" घरातल काम मी करणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही तरी असे विचारु नये. आपली अनु पोटात असताना लक्ष्मी ताईंनी माझी सर्व हौस पूर्ण केली होती. घरातल्या कोणत्याच कामला हात लावून दिला नव्हता. इतकच नाहीतर अनु लहानाची मोठी झाली हे मला कळले सुध्दा नाही. रात्री-अपरात्री अनु कधी उठली तर तिला कुशीत घेवून झोपी लावत असायच्या."

" अग सगळे माहित आहे मला. मी सहजच बोललो. तू तरी अगदी आख्खी पिक्चरची स्टोरी सांगावी तसे मला सांगत आहे. तुला असे प्रश्न विचारुन चूकच झाली बघ माझी."

" अस नाही. हाच प्रश्न आत्याबाईंना पडला तर नवल नाही. कारण त्यांना अनुच्या वेळची परीस्थिती माहित नव्हती. तुम्ही देखील सेम प्रश्न विचारल्यामुळे मला जरा वेगळे वाटले."

" काय झाले आत्याला? काय विचारले तिने? "

" काही नाही चला घरी लवकर.उद्याची तयारी करायची आहे."

" अहो थांबा एक आठवल मला. इथे एक साडीच दुकान दिसते. पटकन जावून मी सासूबाई, आत्या, ताईं साठी साडी घेवून येते. तुम्ही इथेच थांबा."

जवळच्याच दुकानात जावून दादासाठी आणि स्वत:करता आकाश कुर्ता घेतो आणि आहे त्या जागेवर गाडी घेवून उभा राहतो.

" छान साडी मिळाली. डिस्काउंट दिले त्याने तीन साड्या घेतल्या म्हणून."

" एखादी तुला पण घ्यायची ना."

" घेवूया परत कधीतरी. आता खरच घरी चला लवकर."

" आता गाडीवर बसते की नाही. का इथे थांबूनच तू घरी पोहचणार आहेस का."

साहिलचा वाढदिवसाच्या गमती-जमती आणि आत्याबाईंचा घरातून तिच्या घरी जाण्यासाठी पाय निघेल का? पाहूया या अंतिम भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all