Login

घरकुल अंतिम भाग ४

मीना आत्याबाईंचे दु:ख दूर करुन त्यांना सुखी कुटूंब मिळवून देते.
" उगाच तुला टेन्शन दिले मी."

" आता तुम्ही काळजी करु नका. आणि जोपर्यंत तुमची मुल तुम्हांला घ्यायला येत नाही तोपर्यंत तुम्ही इथून कुठेच जायचे नाही असे वचन द्या मला."

" आता तू म्हणशील तसेच करेल मी."

साहिलचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. सर्व नातेवाईक, लहान मुले वाढदिवसा करता जमले होते. आत्याबाईंची मुले मात्र आलीच नव्हती. आत्याबाईंना याचे खूप वाईट वाटत होते. त्यांना धीर देत मीना त्यांच्यावर हसू निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. लहान मुलांना आत्या आजी आणि साहिलच्या हातून रिटर्न गिफ्टचे वाटप करण्यात आले होते.

दोन दिवसांनंतर मीना कामानिमित्त आत्याबाईंच्या गावी निघून गेली होती.

" मला जरा तुमच्या दोघांशी बोलयचे म्हणून मी तुम्हांला इथे हाॅटेलमध्ये बोलावले आहे."

" गैरसमज आणि डोळ्यांना जे काही दिसते ते सगळे खर असते असे नसते. तोडल्याने नाती तुटतात ती कधीच जोडली जात नाही."

" हे आम्हांला काय शिकवते तू."

" मी काल दिवसभर जी माहिती मिळवली त्यावरुनच मी बोलत आहे. तुमच्यातली एकी तुमच्याच त्या गावक-यांना तोडायची होती आणि त्याकरता त्यांनी एक बेट लावली होती. जो हरला त्याने मला तसा व्हिडीओ देखील दाखवला तोच मी इथे तुम्हांला दाखवणार आहे."

व्हिडीओ पाहून दोघे हबकतात. उगाच लोकांमुळे झालेला वाद, त्यातून आईला होणारा मन:स्ताप, बायकांमधली भांडणे पाहून हळवे झालेले दोघे भाऊ एकमेकांना घट्ट मिठी मारुन रडायला लागले होते.

" आमच्या हातून अशी चूक पुन्हा होणार नाही. आम्हांला माफ कर. तू लहान असून आमचे डोळे उघडले. आम्ही उद्याच आईला घ्यायला घरी येतो."

" चालेल या."

आपल्या बायकांना घडलेला प्रकार सांगून दोघेजण पुन्हा आपले घर सजवून आईला आणण्याकरता निघतात.

" अरे तुम्ही या ना घरात. वाढदिवसाला का नाही आले."

" शेतीच काम सुरु होते. आईला घ्यायला आलो आम्ही."

" आत्या कोण आले पाहिले का? "

" आई घरी चल आपल्या आम्ही घ्यायला आलो."

आत्याबाई आनंदाने आपली बॅग भरत मुलांबरोबर गावी निघून जाते.

घरी गेल्यावर घराचे पलटलेल रुप पाहून मुलांकडून मीनानेच सर्वांना एकत्र आणल्याचे समजले होते.

मुलांकडून फोन लावून घेत.

" मीना तुझ्यामुळे माझ्या घराचे गोकुळ झाले आहे. तुझे हे उपकार मी कसे फेडू."

" आत्या उपकार नाही ओ. तुम्ही खूष तर मी खूष."

" आता सगळे जण आमच्या गावाला राहायला या. इकडे शेती पाहायला या."

" हो नक्की येवू."

मीनाच्या हुशारीमुळे आत्याबाईच्या घराच घरपण टिकून राहिले.

गैरसमज होतात, क्षणात परक्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपल्या माणसांशी शत्रूत्व देखील घेतले जाते. पण योग्य कारण समजताच त्यावेळी भुललेल्या क्षणाविषयी वाईट देखील तितकेच वाटते. शेवटी गैरसमज होवून देखील आपल्या नात्यातल्या विश्वासाची पकड भक्कम ठेवणे आपल्याच हातात असते. यातूनच सुखी कुटूंबाचा पाया रचला जातो.

🎭 Series Post

View all