©️®️शिल्पा सुतार
.........
.........
सुरेखा प्रदीप एक छान जोडपं, दोघ नौकरी करायचे, एक मुलगी होती त्यांना नेहा, घरी प्रदीपचे आई बाबा असायचे, नेहा पाचवीत होती, शाळेतून आल्यावर आई बाबा घरी असायचे, ते एक बर होत, नेहाच्या सांभाळण्याचा प्रश्न सुटला होता, एक जनरेशन गॅप होता घरामध्ये, सासुबाई अजून घरात खूप लक्ष द्यायच्या, हे झालं नाही ते झाल नाही अस सतत सुरू असायच त्यांच, अताशा सुरेखाला हे सहन होत नव्हत, पूर्वी वाटायचं तिला होईल थोडे दिवसांनी हे सगळ बंद, उलट परिस्थिती अजून बिकट होत चालली होती, ऑफिसचे टार्गेट वाढत होते घरात शांती नाही, प्रदीप चांगला होता खुप तीच एक काय जमेची बाजू होती.
सुरेखाच आज जरा लवकर आवरलं होतं, नेहाची सकाळची शाळा, नेहा शाळेत गेली, आता चहा घेवून निघू ऑफिसला म्हणुन ती आरामात बसून पेपर वाचत चहा घेत होती, नवरा प्रदीप हि त्याचा चहाचा कप घेऊन तिला जॉईन झाला,
"अरे वा आज लवकर आवरलेल दिसत आहे मॅडम",..... प्रदीप
"हो चहा घेतला की निघते मी ऑफिसला, तुझा काय प्रोग्राम आहे दिवसभर",...... सुरेखा
" मीही माझ आवरून निघतोच",..... प्रदीप
" संध्याकाळी येशील का माझ्या ऑफिसमधे , मला थोडी खरेदी करायची आहे, मग सोबत येऊ घरी",...... सुरेखा
" हो चालेल, तसं तू मला चार वाजता रिमाइंडर दे",..... प्रदीप
दोघं नवरा-बायको आरामशीर गप्पा मारत आहेत, हेच खटकलं सासूबाईंना, दोघांच्या समोरून त्या किचनमध्ये गेल्या तरी त्या दोघांचं लक्ष नव्हतं, मस्त गप्पांमध्ये गुंग होते ते,
"सुरेखा....... सुरेखा आधी इकडे ये, ओटा गॅस तू नीट पुसत नाहीस, तो आधी पुसून घे बरं, आणि कालची भाजी किती खारट झाली होती, कसली धावपळ असते ग तुला? , साधा स्वयंपाक नीट बनवत नाहीस, आता ही नुसती बसून आहेस सकाळच्या वेळी, त्यापेक्षा जरा काम आवरून जायच, माझी किती धावपळ होते दिवसभर",.. सासुबाई नेहमीच अशी चीड चीड करायच्या.
" आई माझ आवरलं आहे आता, मी जाते आहे ऑफिसला, आणि हा गॅस मी नाही पुसला, तो आपल्या मदतनीस आशाने पुसला आहे, आणि भाजीच म्हणाल तर ऑफिसमध्ये सगळ्यांना खूप आवडली माझी भाजी",.. सुरेखा कंटाळली होती आता रोजच्याच कट कटीला, किती वर्ष तेच तेच.
सासूबाईंना खूप राग आला., " एवढंच काय ते सकाळी लुटूपुटू आवरायचं, आणि पळायचं ऑफिसला, नंतर आहेच दिवसभर आम्ही सगळे काम उपसायला",
" आई तुम्ही असं का बोलत आहात आणि प्लीज तुम्ही सकाळी सकाळी हा सूर लावत नका जाऊ, दिवसभर मला खूप काम असतं, सकाळीच मुड जातो हे सगळं ऐकलं की, किती शुल्लक गोष्टी आहेत या, कोणीही करू शकत हे काम नाही का? पण तुम्हाला ना मला सगळं बोलायचं असतं, इतकी वर्षे झाली तरी स्वयंपाक येत नाही का मला, नसेल पटत तर तुम्ही करून घ्या तुमच तुमच, पण या पुढे डोक्याला ताप नको आहे मला ",...... सुरेखा आपली पर्स घेऊन डबा न घेताच ऑफिसला जायला निघाली,
" सुरेखा अग डब्बा तर घे", ..... प्रदीप
" काही नको डब्बा मला, फक्त शांती हवी, मिळेल का या घरात",.... सुरेखा रागाने ऑफिसला निघून गेली .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा