"अमच्याकडे असं चालत नाही. हे तुझ्या माहेरी चालत असेल, इथे नाही चालणार." सीमा प्रीतीला जमेल तितक्या रागातच म्हणाली.
हे नेहमीचंच झालं होतं.
तो सीमाचा डायलॉग फिक्स होता. प्रीती आणि अमेय दोघांनी मनाने लग्न केलं होतं. प्रीती आणि अमेय दोघांच्याही घरात लग्नाला कडाडून विरोध होता. त्या विरोधापेक्षाही एकमेकांवर असलेलं प्रेम खरं होतं, शेवटी मनात नसतांना दोघांच्याही घरच्यांनी संमती दिली. प्रीतीचे आई बाबा तिच्यावर खूप नाराज होते.
अमेय समोर ती रडायची. तो तिला समजावत एकदा मूल झालं की, आई बाबा आधीसारखे बोलतील. प्रीती माहेरी गेली की, तिलाही मान नव्हता आणि अमेयला देखील, तरी रक्ताची नाती सहजासहजी सुटत नाही हेच खरं. तिला वाटायचे कधी ना कधी आई बाबा ह्या नात्याचा खुल्या मनाने स्वीकार करतील.
ज्या सासरला सर्वस्व मानून ती आली होती तिथे सीमा तिला आपलंस करण्यात कमी पडत होती.

प्रीतीला जणू डोळ्यावरच धरलं होतं. अमेय झाला तेव्हापासून सीमाने एकच स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे अमेयचं लग्न तिच्या भावाच्या मुलीसोबत करायचे. अरुणा. अरुणा देखणी होती शिवाय उच्चशिक्षित होती. अरुणाचा जन्म झाला आणि सीमाने जणू मनातल्या मनात तिला सून देखील मानलं. सीमाला नेहमी वाटायचे, अमेयला काय दिसलं त्या प्रीतीमध्ये? दिसायलाही इतकी खास नव्हती.
अमेय आणि प्रीती दोघांचे लग्न होऊन एक वर्ष उलटून गेले तरी देखील तिच्या मनातून राग जाता जाईना. टोचून बोलणे तर नेहमीचेच झाले होते.
प्रीतीचा सासरा सर्वेश हा मात्र तिला जीव लावायचा. तिच्या आवडीनिवडी जपायचा. स्वतःच्या मुलीला जीव लावतात अगदी तसाच जीव तो प्रीतीला लावत होता. सीमाला ते पटायचे नाही.
तिला वाटायचे की, सर्वेशने देखील तिला विचारू नये. तिला किंमत देऊ नये. तिच्या वागण्याबोलण्यात सहज जाणवायचे.
सीमाची चिडचिड दिवसेंदिवस वाढत होती. त्याला त्याचा त्रास होऊ लागला.
प्रीती आणि अमेय ऑफिसला गेले होते.
सीमा पेपर वाचत बसली होती.
न राहून एक दिवस तो म्हणाला,
"सीमा, प्रीती आपल्या घरातली सून आहे. तुला हे चांगलं माहीत आहे ती माहेरापासून देखील दूरावली आहे. आपणच तिला ह्या घरात आपलंसं करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तिला सतत टोमणे मारले तर कसं होईल? अमेयच्या मनाचा विचार कर. त्यालाही वाटतच असेल प्रीतीला तू स्वीकारावं. त्याचा किती जीव आहे तुझ्यावर. तू सतत तोंड पाडून बसली तर कसं होणार? घरातलं वातावरण गढूळ होतंय. आधी कशी रहात होती? आणि आता तुझ्यात किती बदल झाला आहे? असं नको वागू. तू अशी नाहीये. प्रीती त्याला आवडली, प्रीतीला तो आवडला. दोघे एकमेकांची काळजी घेतात. अजून काय हवं सांग. किती दिवस स्वतःला असाच त्रास करून घेणार आहेस. आपल्या अमेयसाठी हा राग सोड."

हे सारं ऐकून तिला खूप राग आला. मुळात प्रीतीच्या बाजूने बोललेलं तिला खटकत होतं. सर्वेश काहीच चुकीचं बोलत नव्हता. समजदारीने तो हॅन्डल करण्याचा प्रयत्न करत होता.
सीमाचं बदलेलं वागणं त्याला खटकत होतं. त्याचेही मन लागत नव्हतं. असं किती दिवस हे चालणार?
सर्वेशला वाटलं समजवल्यावर ती विचार बदलेल. तसं न होता झालं भलतच.
ती त्याच्यावर प्रचंड चिडली.
"आजवर अमेयसाठी सर्वच करत आले आहे. त्याच्या आनंदासाठी मी काय काय केलं आहे हे मला चांगलं माहीत आहे. माझी ईच्छा काय होती, त्याला पाहिल्यापासून माहीत होतं. मग हे असं मनाने मुलगी पसंत करून त्याने तिच्याशी लग्न केलं कसं? मला राग येणार नाही का? काय कमी होती माझ्या अरुणामध्ये? संस्कारी होती, शिक्षित होती. सर्वांचा आदर करणारी होती. काय ह्या पोरीमध्ये पाहिले देव जाणे."
"प्रेमात माणूस पडतो तेव्हा बाकीच्या गोष्टी नाही सुचत. त्याचेही तसेच झाले."
"तुम्ही पण तर पडला होता प्रेमात; पण घरच्यासाठी माझ्याशी लग्न केलं ना?आपण करतोय ना सुखाचा संसार? मग ह्याने केलं असतं अरुणाशी लग्न तर काय बिघडलं असतं? मला नाहीच पटलं."
ती तोंड फुगवत म्हणाली.
ती तोंड फुगवत म्हणाली.
"सीमा, मी जे केलं तेच अमेयने करणं अपेक्षित होतं का तुला? आपला काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. आई वडील म्हणतील तो अंतिम निर्णय मानून तसं वागणारी आपली पिढी होती. बघ आता जे झालं ते झालं. प्रीतीला मोठ्या मनाने स्वीकार."
"बघू." ती दुसरीकडे नजर फिरवत ती म्हणाली.
तो समजून गेला. सीमाचं मन तयार नाही.
तिला वेळ द्यावा लागेल.
रात्र झाली. सीमा झोपून गेली. सर्वेश मात्र आज जुनी प्रेमाची खपली निघाल्याने भावुक झाला होता. किती वर्षानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
पाठचे दिवस डोळ्यासमोर आले.
(क्रमशः)
अश्विनी ओगले.
कथेचा पहिला भाग कसा वाटला? कंमेंटमध्ये जरूर सांगा.
मला फॉलो करायला विसरू नका.