सर्वेशने विचार केला थोडा वेळ गेला की, सीमाचं मन बदलेल,तसं झालं नाही. उलट दिवसेंदिवस प्रितीवर ती अजूनच चिडायला लागली.
सुरवातीला जी प्रीती खुश राहायची ती आता नाराज राहू लागली. माहेरीही तसंच आणि इथेही सतत टोमणे. ती स्ट्रेसमध्ये राहू लागली.
परिस्थिती हाताबाहेर चालली होती हे अमेयलाही दिसत होतं. आधी ऑफसवरून घरी कधी जातो असं व्हायचे त्याला, आता मात्र घरी जाऊच वाटत नव्हतं. घरी गेला की सीमा काही ना काही प्रीतीला बोलून मोकळी होत. सीमाला समजवायला गेलं तर बायको कान भरते असं बोलायची. रोज हेच चालू होतं.
परिस्थिती हाताबाहेर चालली होती हे अमेयलाही दिसत होतं. आधी ऑफसवरून घरी कधी जातो असं व्हायचे त्याला, आता मात्र घरी जाऊच वाटत नव्हतं. घरी गेला की सीमा काही ना काही प्रीतीला बोलून मोकळी होत. सीमाला समजवायला गेलं तर बायको कान भरते असं बोलायची. रोज हेच चालू होतं.
एक दिवस अमेय घरी होता. सीमा बाहेर कुठंतरी गेली होती. प्रीती देखील मार्केटमध्ये सामान आणायला गेली होती.
अमेय त्याच्या विचारात बसला होता.
"अमेय, काय झालं?" सर्वेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.
"काही नाही बाबा."
"काही नाही? मग तोंड पाडून काय बसला आहेस? चार पावसाळे मी जास्तच पाहिले आहे. तुझ्या मनात काय चालू आहे हे मी चांगलं जाणतो."
"काहीच समजत नाहीये बाबा. काय करू मी? तुम्ही बघताय ना आई कशी वागतेय प्रीतीशी. प्रीती फार बदलली आहे. आता ती माझ्याशीदेखील जास्त बोलत नाही. शांतच असते. ती देखील विचारातच असते. आईला समजवायला गेलो तर भडकते. बाबा, मला प्रीती मनापासून आवडली, म्हणून मी लग्न केलं. सर्वांचा विरोध होता; पण जेव्हा सगळे तयार झाले तेव्हा लग्न केलं. मला वाटलं होतं थोडा काळ लोटला की, आई प्रीतीला स्वीकारेल; पण तसं झालं नाही. दिवसेंदिवस तुम्ही बघताय ना आई कशी वागतेय? माझं डोकं काम करत नाहीये. आता असं वाटतंय जीव द्यावा." तो डोक्याला हात लावून बसला.
"अमेय! काय बोलतोय." सर्वेश रागात म्हणाला.
भावनेच्या भरात अमेय बोलून गेला, नंतर त्याच्या लक्षात आलं.
"सॉरी बाबा मी असं बोलायला नव्हतं पाहिजे. खरंच सॉरी. माझं चुकलं."
त्याला त्याची चूक समजली.
त्याला त्याची चूक समजली.
"अमेय, तू मनातलं बोलला. तुझी होणारी घुसमट हे एकमेव कारण आहे, ज्यामुळे तू हे बोलून गेला. आयुष्य इतकं स्वस्त नाही बाळा. पुन्हा असं चुकून सुद्धा बोलू नको."
"नाही बाबा पुन्हा असं कधीच बोलणार नाही. प्रॉमिस." तो गळ्याला हात लावत म्हणाला.
" बरं आता यातून मार्ग काढायचा माझ्याकडे एक उपाय आहे; पण मी जे सांगतोय ते तुला करावं लागणार."
"काय उपाय बाबा?"
"सांगतो, जेव्हा सीमा, प्रीती येईल तेव्हा आपण दोघं खोटं खोटं भांडायचे."
" भांडायचे?"
"होय आपण दोघं भांडायचे आणि जेही मी बोलेल ते तुला मान्य करायचं आहे."
" बाबा, तुम्ही काय बोलणार आहात?"
" ते तुला कळेलच; पण तुला हो ला हो करायचं आहे हे लक्षात असू दे ."
अमेयला बाबांवर पूर्ण विश्वास होता. जेही करतील ते विचारपूर्वक करतील हे त्याला चांगलेच माहित होतं, त्यामुळे त्याने जास्त प्रश्न विचारले नाही आणि तयार झाला.
बेल वाजली. अमेयने दार उघडलं. सीमा आली होती. दहा मिनिटानंतर प्रीती देखील आली. प्रीती किचनमध्ये जाऊन जेवण बनवू लागली. सर्वेशने अमेयला बेडरूममध्ये बोलावलं. थोड्यावेळाने दोघांचा जोर जोरात आवाज येऊ लागला. प्रीती आणि सीमा दोघीही गेल्या पाहतात तर काय? सर्वेश प्रचंड चिडला होता आणि अमेयदेखील देखील चिडला होता. सीमा दोघांना समजावत होती; पण दोघेही ऐकायला तयार नव्हते. नक्की भांडण कशामुळे झालं होतं हे कळण्यास मार्ग नव्हता.
तितक्यात सर्वेश म्हणाला,
"आत्ताच्या आत्ता चालता हो माझ्या घरातून."
"आत्ताच्या आत्ता चालता हो माझ्या घरातून."
अमेयने चमकून पाहिले," बाबा, तुम्ही काय बोलताय."
"बरोबर बोलतोय. तू आणि प्रीती दोघेही वेगळे राहा."
सीमालाही काही कळेना. ती सर्वेशला म्हणाली,
"अहो काय बोलताय? आपला अमेय आहे. आपला मुलगा."
"अहो काय बोलताय? आपला अमेय आहे. आपला मुलगा."
सर्वेश प्रचंड चिडला आणि म्हणाला, "तू मध्ये बोलू नको. मी जो निर्णय घेतला आहे तो बदलणार नाही. ह्याने त्याचा संसार बघावा. हे माझं घर आहे. माझ्या घरात कोण रहाणार हा निर्णय मी घेणार."
आता मात्र सीमा रडू लागली. प्रीती तिचे डोळे पुसू लागली.
" आई तुम्ही शांत व्हा बरं."
प्रीती म्हणाली, "बाबा, असं का बोलताय वादविवाद झाले असतील ; पण असं वेगळं रहायचा टोकाचा निर्णय नका घेऊ?"
"माझा निर्णय झाला आहे." असं बोलून तो पटकन बाहेर निघून गेला.
सीमा सर्वेशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून अजून जोरजोरात रडायला लागली.
अमेयसाठी हा धक्का होता.
अमेयसाठी हा धक्का होता.
"अमेय, तू बाबांचं बोलणं मनावर घेऊ नको. आता असं बोलत आहेत नंतर ते विसरून जातील. किती जीव लावतात तुला. तुझीच काळजी असते त्यांना."
तिच्यातील आई आता मात्र विनवणी करत होती.
तिच्यातील आई आता मात्र विनवणी करत होती.
"आई, मला माहितीये बाबांचा किती जीव आहे माझ्यावर."
त्याचा कंठ दाटून आला.
त्याचा कंठ दाटून आला.
एका बाजूला प्रीती होती आणि एका बाजूला सीमा दोघीही त्याचे अश्रू पुसत होत्या.
नेहमीच समजदारीने वागणारा सर्वेश आज असा का वागला?
बाबा असं बोलतील हे अमेयला वाटलं देखील नव्हतं. त्याच्यासाठी तो मोठा धक्काच होता.
वाचा पुढच्या भागात.
बाबा असं बोलतील हे अमेयला वाटलं देखील नव्हतं. त्याच्यासाठी तो मोठा धक्काच होता.
वाचा पुढच्या भागात.
(क्रमशः)
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा