Login

घरटं - भाग -2

Ghart
घरटं - भाग - 2


काळ पुढे सरकत होता, अशोकराव शेती करत असतं, देवाच्या कृपेने शेतीतून चांगले उत्पन्न येत होतें. अशोकराव आणि सारिका त्यात आपला संसार सुखाने करत होते.


मुलं नोकरीचं कारण सांगून आताशा गावाला यायचं टाळतं असतं. पूजा अधून- मधून नवऱ्याला घेऊन चार दिवसांसाठी राहायला येत असे. तेवढंच त्या दोघांना घर भरलेलं वाटत असे.


अमित- सुमित फक्त आता सणाला येत असतं, दोन- तीन दिवस राहून जातं असतं. अशोकराव त्यांना बोलत असतं तुमचं लग्नाचं वय होतं आलं आहे मी मुली बघू कां, तर दोघेही अजून चोवीस, पंचवीसचे आहोत आम्ही, त्यामुळे लग्नाला वेळ आहे असं बोलून तो विषय टाळतं असतं.


त्यांना आता शहराची हवा लागली होती, त्यांना गावी राहणं आता जास्त आवडत नसे. त्यांना वाटत असे आपले बाबा गावची मुलगी बघतीलं त्यापेक्षा नकोच... लग्नाचा विषय मागे पडत असे..


एकदा अशोकराव आजारी पडले. वय, थकवा, आणि एकटेपणा यांनी शरीरात थोडा थकवा आणला. हॉस्पिटलमध्ये भरती करताना सारिका एकटी धावपळ करत होती.


   अमित - सुमित आले – पण चेहऱ्यावर नोकरीची गडबड, थोडी घाई.

"आम्ही गडबडीत होतो ना आई, मिटींग्स चालू आहेत अजून. पण तू कळवल्यावर पटकन आलो." दोघेही आल्यावर बोलले.

दोन दिवसात अशोकरावांची त्यबेत अजूनच बिघडली.

डॉक्टर म्हणाले – "ते शेवटचं बोलू इच्छित आहेत."

अशोकराव मुलांकडे बघून हसले... डोळ्यांत खूप काही बोलायचं होतं... पण ओठ थरथरले.

"हे घर... फक्त ठेवा नको... ते जपा... कारण घर म्हणजे हक्क नाही – जबाबदारी आहे... घरटं आहे..."

हे त्यांचे शेवटचे शब्द होते.

अशोकराव वारले..

सारिका आता एकटी पडली. अमित - सुमित दोघं पुन्हा आपल्या कामांमध्ये व्यस्त. कॉल्स, व्हॉट्सॲप्स, फोन पेमेंट्स – पण आईशी जास्त बोलणं नाही, मिळून एक कप चहाही एकत्र घेणं नाही, कि तिची विचारपूस करणं नाही,


शेवटी घरात अशोकराव नव्हते, आणि त्यांच्या जाण्याने जे काही वळण घेतलं, त्याने घर अधिकच सुन्न केलं.


सुनंदाने एका रात्री डायरी लिहायला घेतली..

"मी कोणाच्या डोळ्यांत राहिले नाही आता. मी फक्त ह्या घरट्याची सावली झाले आहे. पण मी ठरवलंय – हे घर मी जपणार. कारण हे केवळ भूतकाळ नव्हे, तर भविष्याचं बीज आहे."

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
0

🎭 Series Post

View all