भाग - 3
कालांतराने अमित आणि सुमितने आपले जोडीदार निवडले, दोघांनी पुण्यातचं लग्न व्हावे असा हट्ट धरलं, सारिका लग्नासाठी मुलांच्या फ्लॅटवर जाऊन थोडे दिवस राहिली, पण तीच तिथे मन रमेना, लग्न झाल्यावर पुन्हा दापोलीत आली.
दोन वर्षांनी सुमितला मुलगी झाली, मुलीचं बारसं इथे करूया असं सारिकाने म्हंटल्यावर तो म्हणाला नाही हा आई मी पुण्यात चांगल्या मोठ्या हॉलमध्ये बारसं करणार आहे, तू यायचं आहेसं...
सारिकाला समजत होते मुलं पैसे पाठवतात पण आईबद्दल त्यांच्या मनात आपुलकी राहिली नाही आहे.
काही दिवसांनी खूप विचारांती सारिकाने गावात लहान मुलांसाठी. एक 'घरटं शिक्षण केंद्र' सुरू केलं – तिने जुन्या खोलीत एक लायब्ररी उघडली, अंगणात बालवर्ग घेतला. गावकऱ्यांनी साथ दिली.
हळूहळू घरात पुन्हा हसणं, पावलांचा आवाज, गोड गोंधळ येऊ लागला.
सारिका आता एकटी नव्हती – तिचं घरटं नव्याने फुलत होतं. ती खूप आनंदात होती.
सारिका झोपाळ्यावर बसून नवीन मुलांना गोष्टी सांगत होती. अंगणात पुन्हा तुळशीला पाणी घातलं जात होतं. फुलांची वेणी पुन्हा देव्हाऱ्यात झुलत होती. आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान होते.
चार वर्षांनी अमितला मुलगा झाला, पुण्यातचं बारसं झालं, सारिका ह्यावेळी गेली नाही, अमितला फोन करून म्हणाली तू बाळाला घेऊन ये, माझ्या घरट्यातली मुलं बाळाला बघून आनंदाने नाचतील, त्यांना उत्साह वाटेल...
एका उन्हाळी सुट्टीत सुमितची मुलगी तनिशा तीच्या आईला खूप हट्टाने म्हणाली....
"आपण गावाला जाऊया ना…माझ्या सगळ्या मैत्रिणी सुट्टीत गावी जातात. तिच्या हट्टापुढे दोघंही नमले...
सुमित तनिशाला घेऊन गावी आला, सगळ्यां मुलांमध्ये तनिशा आनंदाने बागडली, खेळली, खूप खुश झाली..
आता दरवर्षी सुट्टीमध्ये तनिशामुळे सुमितचं कुटुंब गावी येऊ लागलं...घरात पुन्हा ‘माणसं’ होती – पंखांनी उडून गेलेले पक्षी आता परत आले होते. पण आता ते जास्त समजूतदार होते.
सारिकाच्या नव्या डायरीत शेवटची ओळ होती:
"घर म्हणजे चार भिंती नव्हे. घर म्हणजे जिथं आठवणी फुलतात, माणसं जपली जातात आणि घरटं... नात्यांच्या धाग्यांनी पुन्हा विणलं जातं."
शब्द हसून म्हटले गेले… पण हृदयाच्या खोलवर भिडले.
ही कथा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील घरट्याच्या जागी आहे – जी कधी भरते, कधी ओसाड होते, पण तिचं खरं सौंदर्य हे माणसांमध्ये असतं.
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा