Login

घटस्फोट;सुरवात प्रेमाची-13

Ght



रश्मी- मी तिची क्लासमेट, गेल्या तीन-चार वर्षांपासून आमची भेइकडे, लालू दुसऱ्या दुकानावर जातो, तो एक दारूअडडा होता..
लालू तिथे थांबून..तिथल्या लोकांकडून चौकशी करत होता...
लालू-" भैय्या, उस दिन लाश मिली तब आप उस समय थे क्या ?

तो दारुडा- हो.. मी त्या दिवशी तिथेच होतो.. या डोळ्याने बघितलं.. ती लाश पाण्यावर तरंगत
होती....
लालू-"म्हणजे, तुम्ही त्या माणसाला बी पाहिलं असेलच?
तो दारुडा- नाय... नाय मी तिथे सगळीकडे बघत होतो, पण लाश अचानक वर आली..मी घाबरून पळून गेलो...कशाला पोलिसाची झंझट घ्यायची..

लालू-" भैय्या लाश घेऊन येताना त्या माणसाला बघितलं का ?
तो दारुडा- अरे भाई, कितीदा सांगल.. मी तिथेच होतो.. कोणीच माझ्यासमोरून काय बी घेऊन आला नाही... लाश आपोआप वरती तरंगत आली.

कावेरी आणि लालू  होईल तेवढे बेसिक माहिती जमा करत होते.

इन्स्पेक्टर रश्मी गीता बासू जिथे राहायची त्या अपार्टमेंट मध्ये आली.

ती तिथल्या वॉचमन समोरी येत, "गीता बासू इथेच राहतात का?

वॉचमन- "आपण कोण मॅडम?"

ट झाली नाही...दुसऱ्या मैत्रिणीकडून कळालं का, ती इथेच राहते.. त्यामुळे आज तिला स्पेशल भेटण्यासाठी आले.

वॉचमन- मॅम, पण सहा महिन्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
रश्मी- काय...सहा महिन्यापूर्वी..  पण मला याबद्दल काहीच माहित नव्हतं...

वचमान- मॅम, त्यांच्या मृत्यूने  तर आम्हालाही धक्का बसला...कारण गीता मॅम कोणाच्या आधे-मध्ये नव्हत्या.

रश्मी तिरप्या नजरेने,"मला वाटतं तिचे कॅरेक्टर..
वॉचमन तिला लगेच आडवत म, इकडे तिकडे बघतो, "मॅडम मलाही थोडासा संशय येतो, कारण त्यांचा मृत्यूपूर्वी, त्या एकाच टॅक्सी मधून येत जात असे...
तो टॅक्सी ड्रायव्हर ही मला थोडासा विचित्रच वाटत होता.

रश्मी- हो ना, मला वाटतच होतं...

वॉचमन- तो ड्रायव्हर मॅम च्या इतक्या मागेपुढे करायचा.. मॅमला नेमकं बाहेर जायचं तो दारात थांबलेला असायचा..
एकदा मॅमचे मिस्टर आले होते, मॅम आणि त्यांचा.. सगळ्यांसमोर वाद होत होता..तर त्या ड्रायव्हरने त्यांच्या मिस्टरांच्या कानाखाली लगावली..

रश्मी अजून बेसिक माहिती घेते, त्यानंतर ती ऑफिसच्या दिशेने रवाना होते.

अय्यर गीता बासू च्या हॉस्पिटल मध्ये येतो.
ते एक मल्टिस्पेशालीस्ट  हॉस्पिटल होतं.
अय्यर तिथल्या एका कंपाउंडरला पकडतो,
अय्यर-"सर, डॉक्टर गीता बासू यांच केबिन कुठे आहे.. त्यांच्यासाठी एक पार्सल आलं...

कंपाउंडर- पार्सल...आणि ते ही गीता मॅडमच?"
सॉरी, तुम्ही त्यांना हे पार्सल नाही देऊ शकत.

अय्यर- का मी त्यांना हे पार्सल का नाही देऊ शकत...हे पार्सल त्यांना देणे खूप आवश्यक आहे.

कंपाऊंडर- “साहेब, गीता मॅडमला जाऊन सहा महिने झाले.
अय्यर- अय्यो...खर की काय.. पण काय झालं होतं... म्हणजे तब्येत वगैरे तर चांगली होती ना?"
कंपाउंडर- तब्येत चांगली होती, पण त्यांचा अचानक खून झाला.

अय्यर- काय सांगता... मॅडमचा खुन झाला.. पण त्या बिचार्‍या तर कोणाच्या आध्यात न मध्यात....त्यांचा खून कसा झाला?
कंपाउंडर- अहो पहिल्या नवऱ्याने त्यांना मारून टाकल असेल... त्याला प्रॉपर्टीत हिस्सा द्यायचा होता ना आणि गीता मॅडमचं त्यांच्या नवऱ्याचा याच्यावरून खूप वाद व्हायचं त्याच्यामुळे त्यांनी तिचा काटा काढला असेल...
अय्यर- खरं की काय, पण त्यांच्या नवऱ्याचं नाव काय...ते दिल्लीतच राहतात का?

अय्यर हुशारीने त्या वॉचमंकडून गीताच्या नवऱ्याच घरच आणि ऑफिसच.. ऍड्रेस घेतो आणि तो त्या दिशेने जातो.

इकडे नीर, जेनेफरच्या घरी जातो, तो तिच्या आई-वडिलांसोबत संवाद साधत,
नीर- "मॅडम जेनिफर मॅडमला बोलवतात का, कारण मी एक अर्जंट डॉक्युमेंट आणला आहे, त्यामुळे त्यांनी मला प्रॉमिस केलं का ही डॉक्युमेंटरी पूर्ण झाल्यावरती घेऊन या, त्या त्याच न्यूज बनवणार आहेत...
हे ऐकून जेनेफरची आई लगेच रडत..तीची डेथ झाली वो.."

जेनेफरचे बाबा तिथे येत," हे बघा अगोदरच माझ्या मेसेजची तब्येत ठीक नाही, तुम्ही तिचा विषय काढून, माझ्या मिसेसला त्रास देऊ नका कारण जेनिफर मुळे आम्ही अगोदरच डिस्टर्ब झालो आहेत...

नीर- काय, जेनिफर मॅडमचा मृत्यू अस कस शक्य आहे..
एवढ्यात मागून जेनिफरची आई बोलत होती, "तरी तिला सांगल होतं, नको करू त्याच्या सोबत लग्न.. शेवटी तिने त्याचा सोबतच लग्न करून.. स्वतःच्या मृत्यूला कवटाळल..
नीरला जेनिफर च्या लग्नाबद्दल काहीच माहित नव्हतं, तरी तो हिमतीने म्हणाला.." मी सुद्धा मॅडमला बोललो होतो, तुम्ही त्याच्याशी लग्न करता तो एक नंबरचा सायकिक माणूस आहे.

एवढ्यात जेनिफरचे वडील त्याला थांबवत, "काय... काय म्हणाला...तू.. आत मध्ये ये आम्हाला सांग.
नीर, आत मध्ये आला..
नीर-" पण जिनेफर मॅडमनी असं गुपचूप लग्न का केलं ?
जेनिफरचे वडील, आम्हाला तिच्या या लग्नाचा विरोध होता... पण तीच म्हणणं होतं, त्या मुलाचा स्वभाव चांगला आहे...मी तिला किती समजवायचो का, आपल्या धर्मातील लोकांसोबतच लग्न कर....पण नाही शेवटी तीच्या लग्न केलं एक महिना हे पटलं नाही आणि लगेच डिवोर्स.

नीर- पण डिवोर्स नंतर, तो जेनिफर मॅडमला त्रास द्यायचा का ?
जेनिफरची आई- डिवोर्स नंतर त्याचा तसं काही फोन आला नाही, पण तिच्या मर्डरच्या आठ डिवोर्स अगोदर माझी जेनी खूप परेशान होती.. असं म्हणून आई, परत रडू लागली.
जेनिफर ची वडील तिला गप्प करत," शांत हो, ती गेली आता... अजून तिच्या अठवणी काढून आपल्याला दुसऱ्या लेकरांचं वाईट करायचं नाही.

नीर अजून काही बोलणार इतक्यात जेनिफरचे वडील त्याला तिथून हाकलून देतात.

नीर समोरच्या डेली नीडवर येतो, तिथे बऱ्यापैकी सामान घेतो...त्या दुकानात चौकशी करती..,
नीर-"जेनीफरचा मर्डर झाल्याच खूपच वाईट झालं ना हो ?
डेलीनीड्स वाला त्याला खालून वर बघतो, "तुम्ही त्यांचे पाहुणे का?"

नीर- नाही ...पाहुणे नाही, आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकायचो. नंतर मी अमेरिकेला गेलो... गेल्या महिन्यातच इथे राहायला आलो तेव्हा तिच्या मर्डरच कळालं... ऐकून फार वाईट वाटलं.

डेलीनीड्स वाला- तिने पळून जाऊन लग्न केलेलं तिच्या वडिलाना आवडलं नाही, कारण तो मुलगा दुसऱ्या धर्मातला होता ना... त्यानी जेनीवर प्रेशर आणून त्या मुलासोबत डिवोर्स घ्यायला लावला.

नीर- आश्चर्यचकितपणे," हो काकाचा स्वभाव पहिले पासूनच रागीट आहे.

डेलीनीड्स वाला- हो आम्हाला तर वाटतं का बहूतेक, तिचा खून यांनीच करायला लावला असेल, कारण जेनिफरला, लहान बहिण भाऊ आहे ना त्यांचे लग्न कसे होणार...
नीर परिसरात जेनिफेअरच्या मृत्यू विषयी अजून सखोल माहिती घ्यायचा प्रयत्न करत होता.

इकडे सुपर लक्ष्मी कोर्टात आली. ती सोफिया खान बद्दल दुसऱ्या वकिलाला विचारते, "सर सोफिया मॅडम कुठे आहेत, आज आमची केस होती.

तो वकील-" चार महिन्यापूर्वी सोफीया मॅडमचा खून झाला.
सुपर लक्ष्मी- आश्चर्यचकित होत, असा कस खून झाला... ही दिल्ली ना अजिबात सुरक्षित राहिली नाही... मला वाटतं, त्या त्याच्या विरोधात लढल्या...त्यानेच एखाद्या वेळेस सोफिया मॅडमला संपवले असेल.

तो वकील- विरोधकांनी नाही तर हल्ली सोफिया मॅडम एका वेगळ्याच केस मध्ये कामात होत्या...
बहुतेक ज्याने ती केस लढवण्यास दिली, त्याने सोफिया मॅडमचा काम तमाम केलं.

सुपर लक्ष्मी- असं कसं, पण त्या तर सरकारी वकील आहेत ना, त्यांना प्रोटेक्शनही भेटलं पाहिजे.
तो वकील- आजकालच्या पोलीस लोकांची कर्तबगारी माहित नाही का तुम्हाला...
कोणाच कोणाकडे लक्ष नाही.. त्यामुळे तर सोफीयाचा खुन झाला.
सुपर लक्ष्मी- इझी मर्डर झाला....
तो वकील-" ऍक्च्युली, सोफीया मॅडमचा स्वभावच विचित्र होता.. त्यांच कोणाशीच पटत नसे... दोन दिवसापासून त्या मिसिंग होत्या तरीही त्यांच्या घरच्यांनी दखल घेतली नाही. आणि हल्ली त्यांनी ज्या माणसाची केस घेतली होती तो ड्रग्सचा केस मध्ये अंडर होता.. नेमका प्रॉब्लेम काय झाला काय माहिती, पण ती केस घेतल्यानंतर अवघ्या आठ दिवसातच सोफिया मॅडमचा खून झाला.

सुपर लक्ष्मी अजून सखोल माहिती घेते ..

तर इन्स्पेक्टर बद्री प्रीती कौरच्या अपार्टमेंटकडे वळाला होता.


🎭 Series Post

View all