Login

घटस्फोट;सुरवात प्रेमाची-8

Gh

नीर सकाळीच ऑफिसला प्रेझेंट राहण्यासाठी तयार होऊन निघाला.
तो खाली आला, तेव्हा श्रावणी समोर येत त्याच्या हातात काळा धागा बांधत होती....
नीर- जीपीएस लावतेस का?"
श्रावणी- "काही काय दादा, मी हा धागा स्पेशल तुझ्यासाठी मंत्रून आणलाय....यामुळे तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे...
नीर- बघू... बरं थँक्यू फॉर दीज... बर आईला सांग मी निघालो.
तेवढ्यात नीरची आई तिथे येते.
दामिनी-" हे काय नीर....आज दिल्लीतल्या ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, माझ्या आशीर्वादाशिवाय निघणार....

नीर- नाहीतरी तुझा आशीर्वाद माझ्या मागे असतोच ना....
बरं मला उशीर होतोय, मी निघतो.  असं म्हणून नीर समोर निघून जातो.
दामिनी- बघितलं श्रावणी...याचा डिवोर्स झाल्यापासून ह्याने पाया पडूण आशिर्वाद घेण ही सोडलं.
श्रावणी- कदाचीत, तुझ्या कृपेमुळे तो एवढा सुखी आहे का, त्याला आता या औपचारिकतेची गरजही वाटत नसेल..

दामिनी रागाने बरळत तिथून निघून जाते.

नीर, त्याच्या बुलेटवर बसतो, ऑफिसला जाताना....
नीर-" चला, परत रटाळ आयुष्याला सुरुवात... काय माहिती, मिशन किती दिवसाच असेल, देवा लवकर या मिशन मधून सुटका भेटू दे..म्हणजे लगेच दुसरीकडे ट्रान्सफर भेटू.

इकडे
ऐसीपी विश्वास-" इन्स्पेक्टर, सगळे ऑफिसर  हजर आहेत का?

इन्स्पेक्टर- ऐस सर! पण दहापैकी नऊ ऑफिसर हजर आहे.. एक ऑफिसर अजून उपस्थित नाही.

एसीपी विश्वास- ओके! पाच मिनिटात मी मीटिंग जॉईन करणार आहे...तोपर्यंत तो ऑफिसर आला तर ठीक...नाही तर ऑन द स्पॉट फायर करा....दॅट्स माय ऑर्डर.

पाच मिनिटानंतर एसीपी विश्वास मीटिंग हॉलमध्ये येतात...
समोर बसलेल्या ऑफिसर्सला ते स्वतःच इंट्रोडक्शन देत..
" हॅलो, यंग पिपोल....मी एसीपी विश्वास. फ्रॉम ओरीसा... आपल्या या मिशनचा हेड आहे... सो आपण हे मिशन स्टार्ट करण्यापूर्वी आपण या मिशनच्या ऑल मेंबर्सचे इंट्रोडक्शन करू या... आणि मी सगळ्या ऑफीसरना विनंति करतो, का हे इंट्रोडक्शन काळजीपूर्वक ऐकावं, कारण तुमच्या दहा जणांना एक टीम बनून हे मिशन सक्सेस करायचं आहे... टीम बनायचं म्हणजे सगळ्यांना एक फॅमिली बनवून राहायचं आणि आपल्यासमोर आलेले ध्येय गाठायचं...
तर सिनियरिटी पासून इंट्रोडक्शन सूरू करूया सो, लेस्ट स्टार्ट.

तिथे असलेली वयस्कर महिला हवालदार उठत "जयहिंद सर! मे सुपरलक्ष्मी."
ती तीचं नाव सांगताच सगळे हसतात.
एसीपी विश्वास- कंट्रोल.

हवालदार लक्ष्मी-" ऍक्च्युली माझं नाव सुब्बालक्ष्मी आहे. पण मी माझ्या एरियात लय शिस्त ठेवते... त्याच्यामुळेच सगळं मला सुपर लक्ष्मी अम्मा म्हणतात...मी वीस दरोडेखोराला एकटीनं पकडलं.
सगळे उल्हासाने टाळ्यांचा गजर करतात.

त्यानंतर इन्स्पेक्टर बद्री उठतात,
"नमस्ते सर! हमरा नाम इन्स्पेक्टर बद्रीनाथ पांडे है..हम जिला पाटणा से है! और हमारी खासियत है का हम मारते कम और घसीटते जादा है।

एसीपी विश्वास- म्हणजे सलमान खान प्रमाणे, पण त्या मुव्ही प्रमाणे जनतेकडून हप्ता पण घेतात का?

परत एकदा ऑफीसरची खसखस पिकते.

त्यानंतर सीनियर इन्स्पेक्टर कावेरी उठत,.
" गुड मॉर्निंग, मी कावेरी शर्मा, फ्रॉम मध्य प्रदेश माझा वैशिष्ट्य जाणायच असेल तर एकदा माझ्या हद्दीत मध्ये फोन करून माझ्याबद्दल विचारा, तुम्हाला माहिती पडेल...

एसीपी विश्वास,"आय एम इम्प्रेस..."
त्यानंतर जुनियर इन्स्पेक्टर उठत,"माझा नाव रश्मी.. रश्मी रानडे फ्रॉम सोलापूर. मी स्वतःची तारीफ काय करू, कारण चेहऱ्यावरूनच मी शार्प नि स्मार्ट दिसते..
पण तिच्या चेहऱ्यावरूनच दिसत होता का ती खूप मासूम आहे.
रश्मी- मी माझ्या स्केचच्या आर्टने भल्या भल्या गुन्हेगारांना शोधण्यास मदत केली आहे..

त्यानंतर खबरी उठतो," हॅलो दोस्त..मी काही इन्स्पेक्टर नाही.. का कोणत्या सरकारी मुजुमदार नाही.. मी एक खबरी आहे.. माझं नाव लालू आहे.
इन्स्पेक्टर बद्री- अरे तुम तो हमरे, बिहार से हो का?
लालू- नाही बबुवा हम तो यूपी से हो.."

त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर अय्यर उठतो "गुड मॉर्निंग सर अँड ऑल ऑफ यु... माय नेम इज, अय्यर..आय एम फ्रॉम चेन्नई तामिळनाडू.

दुसऱ्या इन्स्पेक्टर उठत,'सर मेरा नाम शियॉंग हो..आय ॲम फ्रॉम मेघालय!

त्यानंतर शेवटी नीर औपचारिकता मुळे अनिच्छेने उठत..
"गुड मॉर्निंग सर अँड ऑल ऑफ यु! माय नेम इज डीएसपी नीर...फ्रॉम दिल्ली..
माझे प्रताप काय सांगू..ते काम करताना आपोआप समोर येईल..

एसीपी विश्वास- आणि मी तुमचा नववा साथीदार एसीपी विश्वास... या आपल्या या टीमचा एक एम्प्लॉयी...पूर्वी आपली टीम दहा मेंबरची होती, पण दुर्भाग्यवष आता ती नऊ मेंबरचीच राहणार आहे... तुम्हाला जास्त ऐफॉर्ट द्याव लागणार आहे..

तेवढ्यात बाहेर  शिपायाचा आवाज येत होता..
"मॅडम, रुक जायी ऐ..ऐसीपी सरने आपको अंदर आने से मना कर दिया है... ये उनका ऑर्डर हैऽ

तरी ही सॅंडलचा खटखट आवाज येत होता... एसीपी विश्वास दाराकडे बघतात.
समोर एक लेडी ऑफिसर होती...

एसीपी विश्वास त्यांना थांबवत..
" ऑफीसर, मीटिंग स्टार्ट होऊन इंट्रोडक्शन ही झालं...
असले लेटलतीफ ऑफिसर मला माझ्या टीम मध्ये नको.

ती ऑफिसर,
" एस्क्युज मी सर! तुम्ही मला लेटलतीफ कसं ठरवू शकता... ऍक्च्युली मी दिलेल्या वेळेच्या दोन मिनिट अगोदर इथे आले...
नीरला तो आवाज ओळखीचा वाटला; पण या सात-आठ वर्षात त्याचे बरेच ट्रान्सफर झाल्यामुळे त्याला मागे वळून बघायची इच्छा सुद्धा झाली नाही...

एसीपी विश्वास- पण मॅम मीटिंग तर वीस मिनिटांपूर्वी सुरु झाली.

ती ऑफिसर- सॉरी सर! ऍक्च्युली वेळेबाबत अनपँक्चूअल तुम्ही आहात, मी नव्हे...
सगळे ऑफिसर आता तीला बघत होते, कारण पहिल्याच दिवशी सिनिअर ऑफीसरला एवढ्या रोखठोकपणे बोलणार आतापर्यंत कोणीच बघितलं नव्हतं..
नीर कुस्तीत हसत,"नक्कीच न्यू जॉइनिंग असेल.. त्यामुळे सत्याच्या मार्गावर आहे, पण बेटा हळूहळू वेळेसोबत तुझ्यातल्या सत्याची हवा जाईल.
ती ऑफिसर, सर मला जो मेल मिळाला त्यानुसार मीटिंग ऐक्झॅट 11 एएम ला होती. आता जास्ट 10: 58 एऐम झाले..
सो मी अगदी वेळेवर इथे पोहोचले, त्यामुळे तुम्ही माझ्यावर लेटलतीफ हा शिक्का देत मला इथून फायर करू शकत नाही....

एसीपी विश्वास- तुझा हा निर्भीडपणा मला आवडला.. तू आता येऊ शकते...
पण तुझ्यासाठी हा इंट्रोडक्शन प्रोग्राम परत घ्यावा लागेल.
लेडी ऑफिसर," त्याची गरज नाही सर, मी, माझ्या मिशन मधले सगळ्या कलीगचे इंट्रोडक्शन अगोदरच माहिती करून घेते...
ती एक एका ऑफिस समोर येत, तुम्ही सुपर लक्ष्मी...राईट.
त्यानंतर रश्मी,कावेरी, इन्स्पेक्टर बद्रीनाथ या सगळ्यांसमोर येते...
शेवटी ती ऑफिसर नीर समोर आली..."तुम्ही डीएसपी नीर राईट!
नीर खाली मान घालून फक्त हो करत मान हलवतो...

ती लेडी ऑफिसर सगळ्यांच्या मधोमध येत,
"गुड मॉर्निंग एसीपी सर अँड ऑल ऑफ यु, माझं नाव एस पी शीखी.. आय एम फ्रॉम  इंडिया...
तिच्या इंडिया या इंट्रोडक्शनला सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात.
शीखी नाव ऐकताच नीर आनंदाने लगेच वरती बघतो.. नेमकी त्याच वेळी त्याची आणि शिखीची नजरा नजर होते...

नीरला तर धक्कास बसतो... तीन वर्षानंतर शीखी परत एकदा त्याचा समोर आली.
तो जेव्हा तिला बघतो तो आश्चर्यचकित होतो, कारण ज्या शीखीला वेगवेगळे फॅन्सी ड्रेस,सतत मेकअप मध्ये राहण्यास आवडायचं, आज ती साधा युनिफॉर्म आणि केसांची नुसती बट पाडलेली होती..
चेहऱ्यावर ना पावडरचा निशान दिसत होतं, ना कोणत कृत्रिम सौंदर्य...
तिचं असलं नैसर्गिक रूप त्यात बोलण्यात आलेला कॉन्फिडन्स, दरारपणा हे बघून नीर उभा राहून टाळ्या वाजवत होता...

शीखी- डीएसपी सर, अजून कौतुक करण्यासारखं कोणत अचिवमेंटही केलं नाही.
तिच्या बोलण्याने नीर भानेवर येतो. आजूबाजूला असलेले त्याचा कलीग ला बघून तो शांततेत खाली बसतो.

एसीपी विश्वास- तर आपल्या सगळ्यांना एकमेकांचे इंट्रोडक्शन मिळाले.... सो आता आपण आपल्या मिशन संदर्भात बोलू