घन ओथंबून येती
आयुष्याच्या निवांत क्षणी आजवर अनुभवलेले अनेक भावभावनांचे कंगोरे डोळ्यांसमोर एका ओथंबलेल्या, झुकलेल्या ढगातून टपोरे थेंब बरसावेत तसे वाहत आहेत. जीव म्हटलं की जसा देहाचा नाश होऊन धरणी मातेत विलीनता प्राप्त होते तसेच हे ओथंबलेले घन आपल्यात सामावलेल्या अनेक थेंबांचे ओझे रिते करत धरणी मातेत विलीन होण्यासाठी जणू काही शर्यतीतच आहेत.
शर्यत? हो शर्यतच आहे त्यांच्यात! आजवर अनेक जणांची ओझी स्वतःच्या कवेत घेताना कधीतरी हा मनरूपी घन थकणार होताच! म्हणूनच सीतेसारखं धरणी मातेच्या मिलनासाठी तो गडगडाटाचा कांगावा करत आहे.
पण हे ओझे होते कसले? ते होते सुख, दुःख,भक्ती, प्रेम,त्याग,समर्पण,आत्मविश्वास अशा भावनाप्रधान टपोऱ्या थेंबांचे! स्वतःचे अस्तित्व जपण्याचा या मनरूपी घनाचा आटोकाट प्रयत्न अखेरीस क्षीण होत चालला आहे;याचीच जाणीव म्हणून की काय,ते ओथंबलेले,झुकलेले आहे.
कुणापुढे? तर या सबंध जीवसृष्टीचा निर्माता असलेल्या विधात्यापुढे!आजवर केलेल्या अनेक कर्मांचा लेखाजोखा त्याच्यासमोर मांडून पुन्हा एकदा नवीन जीवात समाविष्ट होण्यासाठी, पुनर्जीवन मिळण्यासाठी त्याचा आटापिटा चालला नाहीच आहे मुळी! त्याला फक्त एकाच गोष्टीची आस आहे, ते म्हणजे अमरत्व!
हो,अमरत्व! ६४००० योनींतून प्रवास करता करता या घनाची होणारी दमछाक अखेरीस विधाताही जेव्हा जवळून पाहतो आहे तेव्हा त्यालाही दया येते आहे व या मनरूपी घनाचा अमरत्व प्राप्त होण्याचा कयास जसा काही सुफळ संपूर्ण साध्य होताना दिसत आहे.
हो,अमरत्व! ६४००० योनींतून प्रवास करता करता या घनाची होणारी दमछाक अखेरीस विधाताही जेव्हा जवळून पाहतो आहे तेव्हा त्यालाही दया येते आहे व या मनरूपी घनाचा अमरत्व प्राप्त होण्याचा कयास जसा काही सुफळ संपूर्ण साध्य होताना दिसत आहे.
घनातील प्रत्येक थेंबांना जवळून पाहताना त्या विधात्यालाही अश्रू अनावर होत आहेत कारण ते प्रत्येक थेंब भावनांचा सज्जड आवेग सोसून स्वतः खंबीरपणे उभे आहेत. शेवटी थोरत्वाची हीच तर महती असते! त्यांनी अनुभवलेल्या भावभावनांच्या विश्वातील व्रण विधाता चांगलेच जाणून आहे.
विधाताही त्या थेंबांना आपणच रचलेल्या धरणीमातेत विलीनिकरण करण्यासाठी एक एक करून तिच्या ओंजळीत भरतो आहे;कारण म्हणतात ना जशी करणी तशी भरणी! ‘पुण्य कर्म हेच नित्य कर्म’ हेच या मनरूपी घनाने अस्तित्वात आल्यापासून अंगीकारले होते.
काहीही झाले तरी प्रत्येक थेंबामध्ये आपल्या भावना अनेकदा आक्रंदन करत असताना त्यांना सावरण्याचे काम घनानेच केले होते.
काहीही झाले तरी प्रत्येक थेंबामध्ये आपल्या भावना अनेकदा आक्रंदन करत असताना त्यांना सावरण्याचे काम घनानेच केले होते.
घनातील काही थेंब कधी भक्तीच्या आहारी जाऊन फसले होते तर कधी सुखावले देखील होते; काही थेंब प्रेमाच्या जाळ्यात अडकून व्यथीत झाले होते तर कधी सावरले देखील होते. मनरूपी घन, आपल्यातील अनेक थेंब सांभाळत, जोपासत व गोंजारत असताना त्याग व समर्पण आपोआप शिकले होते. तसेच हा सर्व खटाटोप करताना अनेकदा सुखदुःखाचा लपंडाव ते यशस्वीपणे जिंकले देखील होते. म्हणूनच तर ते आजही ओथंबलेले असूनही आपल्यातील आत्मविश्वास जपत हळुवारपणे ताठ मानेने विधात्याकडे पाहत उभे आहे.
बाळाला जशी आईची ओढ क्षणोक्षणी व्याकुळ करते तसेच हा घन आता वृद्धाच्या पाशात अडकल्यामुळे असाहाय्य झाला आहे म्हणूनच तो ओथंबून आपल्या धरणी मातेच्या कवेत कायमचे जाण्यासाठी निग्रह करतो आहे.
असे हे ओथंबलेले घन, आजवरच्या अनेक जाणीवांनी संपन्न होत, तृप्त होत,आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा जराही उन्मत्तपणा न बाळगता हळूहळू आपल्यातील थेंब रिते करत आहेत, हसतमुख राहून आपल्याला अमरत्व मिळेल या आशेने पुन्हा एकदा सर्वांच्या परमोच्च आनंदासाठी बरसत आहेत.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा