मागील भागात,
'ते सगळं नंतर पाहुया. हा इथे असेपर्यंत तर ही बया विश तर पिणार नाही. बघुया तरी ह्याला हसायला काय झालं. एवढी सुंदर गोरी गोमटी पोर माझी ! ज्योकर वाटतेय ह्या मेल्याला. ह्याला तर नंतर बघतेच मी !'
पल्लवी मात्र त्या मुलाला हसताना पाहून जाम चिडली, आणि त्याला बोट दाखवत ती म्हणाली,
"हे यू ! ..हसायला काय झाल? काही कॉमेडी चालली आहे का ?"
"हो !कॉमेडीच...तुझ्यासारख्या बिनडोक मुलीची कॉमेडीच. कॉमेडी कशी ते ते ऐकायला वेळ आहे ? का मरायची घाई आहे ?"
"म्हणजे ?" पल्लवीने न कळून विचारलं.
आता पुढे..
"हो !कॉमेडीच...तुझ्यासारख्या बिनडोक मुलीची कॉमेडी. लोकांना काही कामधंदा नाही आहे का, नुसतं सोशल मिडीयावर साईशच्या पाठी पडायचं सोडून ? समज एकवेळ ते पाठी पडले तरी तुला कसं समजणार की त्याला किती त्रास होतोय ते. तू तर मेलेली असणार. मग जर त्याला त्रास देण्याचा उद्देशच सफल नाही झाला तर तुला तुझ्या मरणाचा काय फायदा, हा विचार करून हसू आलं मला."
हे ऐकून पल्लवी जरा वरमली. तिने बोट खाली घेतलं आणि विचार करू लागली हे पाहून रमा भुतिणीला जरा बरं वाटलं. त्या मुलाने किमान पल्लवीला आतमहत्या न करण्याचं ज्ञानामृत तरी दिलं होतं, पण पल्लवी तर आजच्या जमान्याची मुलगी होती. समोरच्याने नीट सांगितलं तरी ती थोडी पटकन ऐकणार होती. पल्लवीने काही क्षणानंतर मनात आत्महत्या करायचीच असा विचार करून एकदम टशनमध्ये मान वरती करून विचारलं,
"हे यू ! मला शहाणपण शिकवणारा आहे तरी तू कोण ?ही माझी प्रॉपर्टी आहे. तू इकडे कशाला आला आहेस ?चोरी करायला ना ? थांब ! मी मरणारचं, पण त्या आधी पोलिसांना तुला पकडून देणार आहे. थांब तू !"
असं म्हणून पल्लवीने त्याचा फोटो काढला आणि स्थानिक पोलिसांचा फोन नंबर फिरवायला लागली. हे पाहून रमा आणि तो अनोळखी मुलगा दोन्ही घाबरले.
त्या मुलाने मग पटकन तिचा फोन खेचला आणि तो बेडरूमच्या दिशेने धावला. पल्लवी आपला फोन घेण्यासाठी त्याच्या पाठी पळाली आणि रमा भुतिणीही त्या दोघांच्या पाठी पळाली. बेडरूममध्ये येताच तो मुलगा गायब झालेला रमाला भुतिणाला दिसला ते पाहून रमा भुतिण बुचकळ्यात पडली. हा मुलगा असा कसा गायब झाला हा विचार करताना तिला धप्प असा आवाज आला.
तिने पाहिलं बेडरूमच्या चोकटीत खिळ्यात पल्लवीचा ड्रेस अडकला गेला होता आणि ती धप्पकन जमिनीवर तोंडघाशी आपटली गेली होती. पल्लवी उठेल अशी रमाने वाट पाहीली, पण पल्लवीने तर हूं की चूं केल नाही.
पल्लवीला असं बेशुद्ध पाहून रमाभुतीणीला खुप टेन्शन आलं. तिने पल्लवीला पालथं केलं आणि बघितलं तर पल्लवीच्या कपाळाला खोक पडलेली होती. इतक्यात तो मुलगा रमा भुतिणी जवळ आला आणि म्हणाला,
"रमा ही गचकली की काय ?"
त्या मुलाचा आवाज ऐकून रमा पटकन दचकली. त्याच्याकडे घाबरलेल्या नजरेने पहात त्याला दटावत विचारलं,
" नक्की कोण आहेस तू ?भूत का समधं? माझ्या घरातून निघ आताच्या आता ! मला लेचीपेची भनतिण समजू नकोस हा ! तुझे खेळ माझ्याबरोबर चालणार नाही. थांब तुला चांगल्या खऱ्याट्यानेच नीट करते."
हे ऐकून त्या मुलांच रूपांतर माधव भुतात झालं. ते पाहून रमा हरकली.
"माधव तू इकडे ? ..म्हणते तो..? तो?" रमा भुतिणिला गोधंळल्यामुळे काही बोलताच येईना.रमाची गोंधळलेली परिस्थिती पाहून माधव रमाच्या डोक्यावरून हात ठेवत म्हणाला,
"रमा तो माणूस, मनुष्यचं आहे. एवढं टेंशन घेऊ नकोस."
रमाला माधवच्या बोलण्यावरती काय बोलवं हेच सुचेना. रमा भुतिणला आता स्वत:च्या झिंज्या उपटाव्याश्या वाटत होत्या. एक भूत आणि तो भूत बनण्यासाठी टपलेली माणसं तिच्या घरात आज नाचत होती. एकाला झाकावं तर दुसरं उघडं पडतयं असं काहीस झालं होतं रमाचं . आधी तो मुलगा आणि आता ही पल्लवी दोघांनाही बेशुद्ध पडायचं होतं आणि हा खोडी करणारा माधव त्याच काय करावं .त्याला राहू द्याव का इकडे का घालवून द्यावं इसा प्रश्न आता रमाला पडला होता . रमाला काळजीत हरवलेलं पाहून माधव म्हणाला,
"सगळं सांगतो ! आधी हीची मलमपट्टी करूया .ऱक्त येतयं."
"हो ! थांब हिच्या बापाने काही फस्ट एडच सामान ठेवलयं . ते आणते मी. तिथपर्यंत हीची काळजी घे. "
माधवने रमाला होकार दिला आणि रमा बेडरूममध्ये निघून गेली. माधवने मग पल्लवीला हळूच उचलून सोफ्यावर ठेवलं. त्याला समजेना एवढुश्या जखमेने ही पोरगी बेशुद्ध कशी झाली.तिने पल्लवी जवळ जाऊन पाहिलं तर जखम खोल नव्हती. मग पल्लवीच्या जवळ जाऊन तिच्या नाकाचा वास घेतला तर त्याला दारूचा भपकारा जाणवला.
" पोरीने मरणासाठी हिम्मत यावी म्हणून दारू ढोसली असावी आणि तीच चढली म्हणुन ती बेशुद्ध झाली असावी " असा अंदाज माधव भूताने काढला.
रमा भूतिणीने पाहिलं आत जाऊन पाहीलं तर तो मुलगा अजूनही बेशुद्ध होता. हे पाहून कुठेतरी तिच्या जीवात जीव आला की माधवनेच त्या मुलाचं रूप घेतलं होतं.
रमाला आठवलं,काही दिवसांपुर्वी तिच्या वहिनीने यशोदाने जुन्या घरात कधी काही अंगावर पडलं झडलं तर लावायला जवळ असावं म्हणून फस्ट एड बॉक्स ठेवला होता. नशिबाने त्यातील बँन्डेज आणि बॅटाडीन हे एक्सापायर नव्हतं. ती तो बॉक्स घेऊन बाहेर उडत आली. पाहिलं तर माधव पल्लवीच्या जवळ तरंगत होता.
ती माधवला गोड आवाजात म्हणाली,
"थँक्यू माधव. किमान तू पल्लवीला काही वेळ रोखलं .मला तर काय करावं हेच सुचत नव्हतं. "
"आयला ! रमे तुला गोड बोलता येतं. तेही चक्क माझ्याशी ."
माधव पल्लवीला बेटाडिन लावता लावता रमाला म्हणाला,
"माधव मस्ती नको करू ! काही दशकापूर्वी जेव्हा आपण जीवंत होतो , तेव्हा तर म्हणायचास रमे तुझं बोलणं मनात अगदी फुलपाखरू उडवतात. कीती हसायचास तेव्हा आणि कधी कधी.."
रमा आता पल्लवीच्या कपाळाला बँन्डेज करत असताना माधवच्या डोळ्यात हरवली.
"मग बोलताना भिरभिराणाऱ्या पापण्या ,ह्या मधाळ बोलक्या डोळंयातून ओसंडणारे प्रेम भाव मला वेडं करायचे. मग मी माझा असा राहयचोच नाही. तुझ्या ओठातील साखर मला तुला आवेगात घ्यायला खुणावायची."
हे ऐकून रमाने शेवटी आपल्या मनात असलेली सल बाहेर काढत माधववर वाग:बाण चालवला.
"जर माझा एवढाच ओढा होता तर..का माधव मला सोडून गेलास. तुझ्या जाण्याने मी एवढी खचली की मी आत्महत्या केली. "
हे ऐकून माधवही वरमला .आज पहिल्यांदाच पल्लवी व त्या मुलामुळे रमा वीस वर्षानी त्याच्यासमोर उभी राहून शांतपणे बोलत होती.
"रमा मला माफ कर . खरतर लग्नात हुंडा ही गोष्ट आपल्यावेळी एवढी सामान्य होती की आई बाबांनी जेव्हा मागितला तेव्हा मला काहीच वाटलं नव्हतं..पण भर मांडवात त्यांनी जेव्हा तुम्हाला लुटायचा प्रयत्न केला तेव्हा मी विरोध करायचा प्रयत्न केला रमा पण..मला सगळ्या नातेवाईकांनी गप्प बसवलं."
" शब्दाला शब्द वाढला आणि लग्न मोडलं. रमा मी भ्याड होतो गं. मला ती हिमंतच झाली नाही की त्यांना झिडकारून तुझा हात धरावा. लहानपणापासून आई वडिलांच्या धाकात वावरलेल्या मला हे करणं सुचलचं नाही आणि मला ते जेव्हा मांडवातून खेचून नेत होते ना रमा तेव्हा खरं सांगतो..मी सुन्न झालो होतो.आपलं लग्न मोडतयं ह्यावर विश्वासच नव्हता."
"रमा मला माफ करशील का आतातरी ?" माधव भुताने डबलेल्या डोळ्यांनी रमाचा हात पकडत विचारलं, इतक्यात रमाला बेडरूमच्या आतून कपाट उघाडायचा आवाज आला.
क्रमश:
करेल का रमा माधवला माफ ?
काय होणार आता पुढे त्या बेशुद्ध माणसा बरोबर आता पल्लवीचही.
हे जाणून घेण्यासाठी तसेच जुने प्रश्न आहेतच.
माधव भुताने का खोडी केली ?
काय होणार आता पुढे त्या बेशुद्ध माणसा बरोबर आता पल्लवीचही.
हे जाणून घेण्यासाठी तसेच जुने प्रश्न आहेतच.
माधव भुताने का खोडी केली ?
खरच कथा आवडत असेल तर कमेंट करा. पुढचा भाग तीन दिवसांनी येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा