Login

ग्रीष्मातला गारवा (५)

तिचा स्वतःवर असलेला विश्वास पूर्णपणे नाहीसा झालेला. ती पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवेल का? जाणून घेण्यासाठी वाचा" ग्रीष्मातला गारवा "
दीर्घकथा लेखन स्पर्धा

दोघी बोलत असताना अचानक बाहेरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. तर इथे फुलदाणी खाली पडली म्हणून भाग्यश्री घाबरलेली.

बाहेरचा आवाज ऐकून मेघा आणि वसुंधरा ताई दचकल्या. बाहेर कसला आवाज आला हे बघण्यासाठी वसुंधरा ताई खोलीच्या दरवाजाजवळ आल्या. तर इथे दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकून भाग्यश्री आणखी घाबरली.

शेवटी वसुंधरा ताईंनी दरवाजा उघडला बघतात तर त्यांची मांजर स्विटी गुपचुप एका बाजूला बसून होती आणि तिच्या समोर फुलदाणीचे तुकडे पडलेले. समोरच दृश्य बघून त्यांना खूपच राग आला. त्यांना वाटल हे सगळ भाग्यश्रीने केलं आहे. पण तिथे भाग्यश्री नव्हती. नंतर त्यांच लक्ष स्विटीकडे गेलं तर त्यांना समजल की सर्व हिनेच केलं म्हणून त्या रागातच त्या मांजरीला ओरडत होत्या.

वसुंधरा ताई " काय केलं हे सर्व. तुला माहिती फुलदाणी किती महाग आहे. थांब तेजला येऊदे तुम्हा दोघांना सोडणार आहे. ( स्विटीकडे बघत ) बघावं तेव्हा तोडफोड करत राहतेस. वैताग आलाय नुसता. "

हो. स्विटी म्हणजेच मांजर वसुंधरा ताईचा मुलगा तेजची होती. तेजला मांजरीचा खूपच लळा होता. म्हणून त्याने एक लहान मांजर दुकानातून विकत घेतली आणि तिचं नाव त्याने स्विटी ठेवलं. पण वसुंधरा ताईंना या मांजरीचा खूप वैताग यायचा. नेहमी  घरात काही ना काही तोडफोड व्हायची म्हणून त्यांना खूपच राग यायचा. तेज एकुलता एक म्हणून त्या त्याला जास्त काही बोलत नाही. कारण  त्याने  रागाच्या भरात काही करू नये.

जमिनीवर विखुरलेले तुकडे बघून वसुंधरा ताई स्वतःशीच " आता हे मलाच साफ करायला लागेल. भाग्यश्री असती तर तिच्यावर दोष टाकून हे सर्व करून घेतलं असत. नशीब फुटक आहे माझं. " बोलून त्या जाडू आणायला गेल्या.


इथे भाग्यश्री धावतच एक बागेत आलेली आणि एक बाकडा बघून त्यावर बसली. जेव्हा स्विटीने फुलदाणी पाडली तेव्हा ती खूप घाबरलेली. तिला हेही समजल होतं की जर वसुंधरा ताईंनी आपल्याला बघितलं तर त्या आपल्यालाच दोष देऊन ते काम करून घेतलं असत. म्हणून तिने वेळ न घालवता घाबरतच घराच्या बाहेर पडली आणि लिफ्ट न घेता पायऱ्याने धावतच खाली आली. खाली न थांबताच पटपट पावले टाकत बागेत येऊन बसली.

स्वतःला शांत केल्यावर तिने जवळ असलेल्या पिशवीतून जेवणाचे डबे काढले आणि जेवायला सुरवात केली. जेवत असताना तिला वसुंधरा ताई आपला कसा उपयोग करतेय ते आठवलं. तिला आधीच माहिती होत की त्या आपला फायदा घेत आहे पण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकल्यावर तिला वाईट वाटलं त्यात तिला रडूही येत होतं.

भाग्यश्री मनातच " कदाचित.. कदाचित.. मला तो मला आवडत नसता तर मी त्याची कंपनीत काम केलं नसतं आणि आता मी इथे नसती. " आपल्या चुकीला कोसत ती एक एक घास खात होती. जेवत असताना तिचं लक्ष एका कुटुंबाकडे गेलं. ते कुटुंब मज्जा ,  मस्ती करत गप्पा मारत होते. त्या कुटुंबाला हसताना बघून भाग्यश्रीच्याही चेहऱ्यावर हास्य पसरले. अचानक तिला काहीतरी आठवलं आणि चेहऱ्यावरचे हसू नाहीसे झाले. नंतर आलेले विचार झटकून तिने खाण्यावर लक्ष दिलं कारण तिला दुसरीकडे कामाला जायचं होतं.

जेवण झाल्यावर हात वैगरे धुवून तिने डब्बे तसेच पिशवीत ठेवले आणि ती तिथून जाणार तर तिला समोरून एक मुलगी येताना दिसली. त्या मुलीला बघून भाग्यश्रीचा चेहरा गोरामोरा झालेला. ती सुन्नपणे तिथेच उभी होती.

भाग्यश्री मनातच " ही इथे काय करत आहे. जर हिने मला इथे बघितलं तर त्याला समजेल. नाही , मला त्याला अजिबात कळू द्यायचं नाही. त्याला समजल तर माझ्यावर हसेल.. नाही.. नाही.. नाही.. मला इथून निघायला हवं.. मला इथून निघायला हवं.. "

भाग्यश्री त्या नजरेत आपण सापडू नये म्हणून ती तिथून निघण्याचा प्रयत्न करते. भाग्यश्री पोहोचतेच की ती मुलगी तिच्या समोर येऊन उभी राहते.

ती मुलगी " अगं भाग्यश्री किती आवाज दिले मी. लक्ष कुठे होतं तुझं ? "

त्या मुलीला बघून भाग्यश्रीच्या कपाळावर घाम जमा झाले. ती आतून खूप घाबरलेली.

क्रमशः
©भाग्यश्री परब

माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.

0

🎭 Series Post

View all