घरकोन भाग 24

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन जरूर वाचा..

घरकोन -24
©राधिका कुलकर्णी.

उन्मेश रात्रभर विचार करत होता पण कोणताही म्हणावा तसा सोइस्कर मार्ग अजुन तरी त्याला सापडला नव्हता.सुशांत तयार असला तरी रेवा कोणत्याही परीस्थितीत सुशांतला भेटण्यास मुळीच तयार होणार नव्हती आणि जर असा काही केलेला आततायी प्रयत्न फसलाच तर सुशांत सोबत त्याची रेवा बरोबरची असलेली सुंदर मैत्रीही तो गमावुन बसेल ही भीती त्याला जास्त डाचत होती.
 हे तर होइलच पण त्याहुन जास्त वाईट कदाचित हे घडेल की ती  यापुढे कोणावरच मैत्रीत विश्वास ठेऊ शकणार नाही आणि म्हणुनच असे काहीही न होऊ देणे उन्मेशला जास्च महत्त्वाचे वाटत होते.
विचार करता करताच कधीतरी त्याचा डोळा लागला.
दुसरा दिवस उजाडला.कॉलेजची नेहमीचीच गडबड.त्यात आता फक्त सहा महिनेच राहीले होते कॉलेज संपायला.
प्रोजेक्ट सबमिशनला फक्त एखाद महिना आसपास वेळ बाकी होता.मधल्या काळात सुशांत नसल्याने कोणीच तिकडे फारसे लक्ष दिले नव्हते.
त्यामुळे तेही काम आता ऐरणीवर येऊन पोहोचले होते.
बेस्ट प्रोजेक्टला कॉलेज कडून इंटरनॅशनल लेव्हलवर सबमिशन साठी पाठवण्याची संधी मिळणार होती आणि जर त्यात जर सलेक्शन झाले तर प्रोजेक्टच्या पुढील रिसर्च करता परदेशात कंपनी खर्चाने जाण्यासाठी संधी मिळणार होती.
ही इतकी मोठी संधी कोणालाही सोडायची नव्हती त्यासाठीच आता प्रोजेक्टच्या इतर असाइनमेंट्स वर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे होते.
त्यात हा नविन पेच निर्माण झाल्याने नाही म्हणले तरी जरा अडथळा निर्माण झाला होता.
कसेही करून ह्यांच्यातला तिढा जितक्या लवकर सुटेल तितके प्रोजेक्टच्या कामाला एकत्रीत गती प्राप्त होणार होती ह्यात शंकाच नव्हती.
सगळ्या विचारातच पटापट आवरून दोघेही कॉलेजमधे पोहोचले.
रेवाही आलेली होती.
उन्मेश धावतच तिच्याजवळ पोहोचला.
"रेवा,एक काम होते?"
"बोलऽऽ"
"काही नाही,लंचमधे मला भेटशील जरा बोलायचे होते?"
"कशा संदर्भात?"
कालच उऩ्मेशला सगळे सांगीतलेले असल्याने हा कदाचित त्याच संदर्भात काही बोलणार असा प्राथमिक अंदाज काढुन रेवाने प्रश्न केेला.
"हे बघ,आधीच सांगते उन्मेश,
तू जर आमच्यात पॅचअप करण्यासाठी काही डोकं लढवत असशील तर कृपया तसले काही करू नकोस."
"मला आता ह्या बाबतीत काहीच बोलायची इच्छा नाहीये."
"उगीच आपली चांगली मैत्री ह्या कारणाने तुटू देऊ नकोस."
"अगऽऽ माझे ऐकुन तर घे."
"स्वत:च कनक्लुजन्सवर नको येऊस."
"सुशांतच्या मधल्या काळात नसल्यामुळे आपले प्रोजेक्ट बाकी टिम्सच्या तुलनेत खूपच मागे पडलेय,तर आता आपल्याला हे प्रोजेक्ट लवकर कमप्लीट करून सबमीट करावे लागणार आहे.त्याबद्दल थोडे बोलायचे आहे.वेळ देशील का मातेऽऽ?"
उन्मेशच्या माते ह्या संबोधनाने तिला जाम हसायले आले.
तो तिच्या बोलण्याने वैतागला होता हे जाणवत होते.
"कावीळ झालेल्या माणसाला जसे सगळे जग पिवळेच दिसते तसे तर आपले झालेले नाहीये ना?"
"कोणीही बोलला की फक्त त्या एकाच विषयावर बोलतोय असे आपल्याला का वाटते?"
"म्हणजे मी म्हणतेय खरी की मला ह्या विषयावर काहीच बोलायचे नाहीये पण मनात मात्र सदोदीत मी हाच विचार तर करत नाहीये ना?"
"खरच का मी अजून त्याच विचारात जगतीय?"
नाही नाही, माझे चुकलेच जरा.मी इतक्या फटकन असे बोलायला नको होते उन्मेशला."
"सॉरी उन्मेश!अॅम रिअली सॉरी."
"तुझी बाजू न ऐकताच मी तुझ्याबद्दल मत बनवून मोकळे झाले,चुकलेच माझे.खरच सॉरीऽ."
रेवा हात जोडून माफी मागत होती उन्मेश समोर.
"अग ठिक आहे."
"सोड तो विषय आता."
"फक्त तू आत्ता एक वाक्य बोललीस ना त्यावर जरा पुन्हा विचार करावास असे मला वाटते."
"कोणते वाक्य!!"
रेवाने आश्चर्यानेच विचारले.
"तू आत्ता म्हणालीस नाऽऽ की तू माझी बाजू ऐकुन न घेताच माझ्याबद्दल मत बनवून टाकलेस हेच सुशांतला पण लागू पडते."
"मी असे नाही म्हणत की तो बरोबर आहे किंवा तु चुकतीएस."
"मी ह्यातले काहीच म्हणणार नाही,फक्त तो तूला जर सतत म्हणतोय की एकदा त्याला बोलायची संधी दे तर तू ती त्याला द्यायला हवीस."
"सध्या तू फक्त तुझ्याच नजरेने त्याला बघतिएस,कदाचित त्याची बाजू तुला नाण्याची दुसरी बाजूही दाखवेल."
"ऑफकोर्स जर तूला त्याची बाजू जेन्युन वाटली तरच तू विचार कर की त्याला माफ करायचे की नाही पण त्याला त्याची बाजू मांडायची एक संधी तर दे."
"जर तू आपल्याच मतांना योग्य समजून चाललीस तर भविष्यातल्या एका चांगल्या नात्याला गमावशील.आणि पुढे कधीतरी जेव्हा सत्य कळेल ना तेव्हा पश्चा:त्ताप करण्याशिवाय हाती काहीच उरणार नाही."
बघ माझ्या बोलण्यावर विचार कर."
"मी हे बोलणार नव्हतो तूला,किंवा हे बोलायला मी आलोही नव्हतो पण तुझ्याच वाक्याने मला हे बोलायला भाग पाडलेस तू म्हणुन बोललो."
"जर काही चुकले असेल तर माफ कर मला." 
"मित्रत्वाच्या नात्याने एवढा हक्क समजून बोललो."
"लंचमधे भेट,प्रोजेक्ट बद्दल बोलू.चल क्लासची वेळ होतीय."
"रेवा सुन्न झाली होती."
"उन्मेशचे बोलणे नकळत तिला अंतर्मुख करून गेले होते."
खरच का माझा गैरसमज झालाय सुशांतला समजण्यात?
खरच का त्याच्याकडे त्याच्या वागणुकीचे समर्थन करणारे काही सांगण्यासारखे असेल??"
रेवाच्या मनात उन्मेशच्या बोलण्याने वैचारिक मंथन सुरू झाले.
क्लासमधे पोहोचल्यावर मनातले विचार बाजूला करून तिने अभ्याकडे मन वळवले.
###################
दुपार झाली.लंच उरकुन ती स्वत:च उन्मेशला भेटायला गेली.उन्मेश क्लासमधेच भेटला.
अजुन लंच ब्रेक संपायला अवधी होता त्यामुळे त्यांना बोलायला वेळ होता अजुन.
मग तिनेच सुरवात केली.
"हायऽऽ उन्मेश.लंच झाले का तुझे?"
"हो. तुझे??"
"हो."
"बर सांग आता काय प्लॅन आहे प्रोजेक्टचा." 
"अॅम रेडी टु गिव्ह टाईम."
"हे बघ,आपल्याला फक्त वेळ नाही तर त्यासोबत टिमवर्कची गरज आहे."
"सुशांतशी तू बोलत नाहीस,तो समोर आला की तू तिकडे थांबत नाहीस,पण असे करून कसे चालेल.?"
"बाकी टिम मेंबर्स एकत्रीत बसुन काम करताएत."
"कोणी प्रॅक्टीकल साईड तर कोणी डेटा सर्च करतेय."
"काही जण नोट्स रेडी करतेय,पण आपण बघ आता किती मागे पडलोय त्यांच्यापेक्षा फक्त तुमच्यातल्या अबोल्यामुळे."
"आता ह्यावर तूलाच काहीतरी सोल्युशन फाईंड आऊट करावे लागेल.
"तू सांग,तू काय करू शकतेस?" रेवाने बोलायला सुरवात केली.
"मला मान्य आहे की माझ्यामुळे प्रॉब्लेम होतोय."
"तु म्हणत असशील तर मी ह्या टिम मधुन बाहेर पडायला तयार आहे उन्मेश.
तुम्ही दोघे मिळुन प्रोजेक्ट छान हँडल करू शकताल मला खात्री आहे."
"आर यु मॅड रेवाऽऽऽ?"
"तू ठरवलेच आहेस का की आपलीच मनमानी करायची?"
"मग ठिक आहे,तूझा निर्णय जाऊन सांग सरांना."
उन्मेश पहिल्यांदाच खूप चिडला होता.
रेवाही गप्प झाली.
"बर सॉरी!!"
"मग तूच सांग मी काय करू?"
"मी खूप प्रयत्न करते रे,पण कसे सांगू ,सुशांतला समोर बघितले की मला ते सगळे प्रसंग पुन्हा आठवतात आणि खूप अस्वस्थ व्हायला होते."
"मी ठरवुनही नाही सावरू शकत स्वत:ला."
" त्याला बघितले की माझे मस्तक भडकते."
"मी काहीतरी चुकीचे वागेन की काय ह्या भीतीनेच तसे काही घडण्याआधीच मी स्वत:ला त्याच्या नजरेसमोरून दूर करते."
"तू प्लिज समजून घे ना माझी बाजू पण."
रेवा खूप रडवेल्या सुरात बोलत होती.
उन्मेशला तिची अवस्था कळत होती पण ह्यातुन मार्ग तर काढायलाच हवा होता तोही लवकरात लवकर.
मग उन्मेशनेच बोलायला सुरवात केली,
"हे बघ रेवा,मी कितीही समजून घेतले तरी ह्यातुन मार्ग तर काढावाच लागेल आणि तू क्वीट करून प्रश्न संपणार नाहीये."
"आपल्याला आता उलट जास्त वेगाने एकत्रीत प्लॅनिंग करून प्रोजेक्ट कमप्लिशनवर लक्ष द्यावे लागेल."
"तुझी ही कारणे नाही चालणार."
"सो बी स्ट्राँग अँड कॉनसनट्रेट आॅन अवर प्रोजेक्ट."
"बाकी विचार बाजूला ठेव तुर्तास."
"करशील ना एवढे?"
रेवाने न बोलताच होकारार्थी मान डोलावली.
"चल गुड !!"
"तू एक काम कर,संध्याकाळी रूमवर भेट आमच्या."
"आपण तिकडेच डिस्कस करू तिघे मिळुन."
"रूमवर???"रेवा थोडी नाराजीनेच आवाज वाढवून बोलली.
"तिकडे नको नाऽऽ,आपण लायब्ररीत बसू ना,नाहीतर मग कँटीन मधे??
"बेस्ट आहे कँटीन मधेच बसू."
रेवाला रूमवर जाणे नको वाटत होते कारण तिकडे सुशांत सोबतच्या कितीतरी आठवणी तिला पुन्हा बेचैन,अस्वस्थ करणार होत्या.
त्यात सुशांतही समोर असणार होता.
जर त्याच्यासमोर आपण आपल्या भावनांवर कंट्रोल नाही करू शकलो तर?
म्हणुन ती दुसरे पर्याय सुचवत होती.
पण उन्मेशला ते पटले नाहीत.
"अगऽऽ कँटीनमधे किती गर्दी आणि गोंधळ असतो,तिकडे कसे शक्य आहे?"
"आणि लायब्ररीत बोलता येणार नाही, इतरांना डिस्टर्बन्स नाही का होणार?"
"ते काही नाही,आपण आमच्या रूमवरच भेटू संध्याकाळी."
"आणि मी सोडायला येईन परवा सारखा."
"सो डोण्ट वरी!ओके डिअर!"
रेवाने कोणताही पर्याय शिल्लकच नसल्याने काहीश्या अनिच्छेनेच होकारार्थी मान हलवली.
लंच अवर संपुन क्लासेस  सुरू झाले होते.

संध्याकाळ होण्याची उन्मेश फार आतुरतेने वाट पहात होता.
हिच एकमेव संधी होती त्यांना एकत्र आणण्याची.
काहीतरी करून ह्यांच्यात आजच संवाद
कसा होईल ह्याचाच विचार तो मनातल्या मनात करत होता.
त्याने मुद्दामहून ह्या प्लॅन बद्दल सुशांतला काहीच कल्पना द्यायची नाही असेच ठरवले होते कारण कधी कधी ठरवलेले प्लॅन्स फसतात पण नकळत खूप काही घडून जाते. 

बघुया संध्याकाळी देव ह्यांना एकमेकांशी बोलते करण्यात कशी साथ देतो!!
उन्मेशने मनोमन देवाची प्रार्थना करतच लेक्चरवर लक्ष केंद्रीत करायचा प्रयत्न केला.

येणारी संध्याकाळ रेवा-सुशांतच्या नात्याला सोनेरी रंगांची किनार जोडून उजळून काढतेय की येणाऱ्या निशेच्या काळ्या रंगाने झाकोळुन टाकतेय हेच पहाणे बाकी होते......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन -24
©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतोय की नाही?
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all