पाठचे दिवस डोळ्यासमोर आले.
"खबरदार त्या पोरीशी लग्न करण्याचा विचार जरी पुन्हा केला तर गाठ माझ्याशी आहे." त्याचे वडील चंद्रकांत कडक आवाजात म्हणाले.
म्हणाले कसले निर्णय सांगून मोकळे झाले. घरात जे निर्णय घ्यायचे तेच घ्यायचे. त्यांच्यापुढे बोलायची हिंमत कोणाचीच होत नव्हती. सर्वेशचीही हिंमत व्हायची नाही; पण त्याने खरं प्रेम केलं होतं. त्या प्रेमानेच त्याला बोलायची हिंमत दिली होती. हिंमत तर केली मात्र वडीलांकडून सरळ नकार आला. तो फार दुखावला. डोळ्यातून अश्रू कधी ओघळू लागले हे देखील कळले नाही.

त्याची आई निर्मला देखील तिथेच उभी होती. चंद्रकांत समोर बोलायची तिचीही हिंमत होत होती. ती जर काही बोलली तर चंद्रकांत तिलाही काहीतरी नक्कीच बोलणार हे तिला माहीत होतं.
सर्वेश रडू लागला तसे वडील म्हणाले,
"बायकांसारखा काय रडतोय. पुरे कर ही नाटकं. " त्याच्या आवाजात करारीपणा होता.
आई पदराने डोळे पुसत होती.

"तुम्हीच लाडावून ठेवलंय,म्हणूनच हिंमत झाली ह्याची. मनाने पोरगी पसंत करून तिच्याशी लग्न करायचे सांगायला आला आहे. ह्याची अशी हिंमत झालीच कशी? नीट समजवा तुमच्या लेकाला, उद्या माझ्या मित्राची मुलगी बघायला जायचं आहे. चांगली पोरगी आहे देखणी, घरकामात तरबेज. आता प्रेमाचं भूत डोक्यातून काढ म्हणावं."
असं म्हणत चंद्रकांत निघून गेला.
असं म्हणत चंद्रकांत निघून गेला.
वडिलांचा स्वभाव आईला माहीत होता.
तो आईकडे केविलवाण्या नजरेने पहात होता. त्याला अजूनही आशा होती आई बाबांना सांगेल. तसं झालं नाही.
उलट ती म्हणाली,
"बाळा, तुझे बाबा कसे आहेत हे तुला चांगलं माहीत आहे. ते नाही ऐकणार. एखादी गोष्ट त्यांनी ठरवली की, जग इकडचं तिकडं होऊ देत पण ते निर्णय बदलणार नाही. ते म्हणतील तीच पूर्व दिशा. तू त्या मुलीला विसरून जा."

आई जे बोलली त्यामुळे त्याची उरलीसुरली आशा निराशेत बदलली.
त्याने मनावर दगड ठेवून, कसंबसं आशाला पत्र लिहिलं.
प्रिया आशा,
तुझ्यावर खूप प्रेम केलं,पुढेही करणार तुझ्यासोबत संसाराची किती स्वप्न पाहिली होती. एकमेकांच्या हातात हात गुंफून किती शपथा घेतल्या होत्या. काहीही झाले तरी एकमेकांची साथ सोडणार नाही ठरवलं होतं. तुझ्या प्रेमात पडल्यावर मी स्वतःला विसरलो. प्रेम सुंदर भावना जगलो. किती सुंदर क्षण होते तुझ्यासोबत. कधी तू माझ्या ह्रदयात स्थान मिळवलं कळलंच नाही. माझ्या विचारात नेहमी तूच असायची. तुझ्याशी लग्न करायचं आणि सुखाने संसार थाटायचा हे गोड स्वप्न रोज पहात होतो. बाबा माझ्या लग्नासाठी मुलगी बघत आहे हे समजल्यावर मी कसाबसा धीर एकवटला बाबांशी बोललो. आशा, बाबा काही केल्या आपल्या नात्याला संमती देत नाहीयेत. बाबांसमोर रडलो, अगदी हात जोडले तरी बाबा तयार झाले नाही. माफ कर आशा, माझ्या मनात ईच्छा असतांना देखील मी तुझ्याशी लग्न करू शकत नाहीये. मी तुझा गुन्हेगार आहे. अर्ध्यावर साथ सोडून चाललो आहे. ह्रदयाचा कप्प्यात तुझं स्थान कायम राहील. तू देखील तुझ्या आयुष्यात पुढे जा. लग्न कर,खुश राहा. काळजी घे.
तुझाच सर्वेश.
तुझाच सर्वेश.
काही केल्या वडील लग्नाला तयार होत नाहीये. प्रत्येक शब्दागणिक त्याचे अश्रू ओघळत होते.
ते अश्रू सांगत होते, त्याने आशावर किती प्रेम केलं होतं. मनापासून प्रेम केलं होतं. मनापासुन प्रेम करणाऱ्या जीवांना नेहमीच परीक्षा द्यावी लागते. ती परीक्षा सर्वेश आणि आशा देत होते. आशाला पत्र मिळाले. ते तिने वाचले. शब्द नी शब्द मन लावून वाचला. खूप त्रास झाला,वाईट वाटलं. ती खूप रडली. काही केल्या सर्वेश आणि ती लग्न करू शकत नव्हते. त्या दिवशी प्रेम हरलं होतं, आई वडिलांच्या विरोधात बंड करू शकला नव्हता; पण आजही तो आशाला विसरू शकला नव्हता.

भूतकाळातील खपली निघाली होती, कटू आठवणींनी मनाला अस्वस्थ करत होत्या. कशी असेल ती? कुठं असेल? ते शेवटचं पत्र आणि शेवटचा संवाद ठरला होता.
झोपेच्या अधीन झालेल्या सीमाचा चेहरा त्याने पाहिला.
'इतकं सहजपणे विसरता येतं का सीमा? तुला कधी बोललो नाही आणि बोलणार देखील नाही,कारण तू दुखावशील. सत्य हेच आहे की आजही आशाला विसरू शकलो नाही. पहिलं प्रेम विसरता येत नाही सीमा. मनात विचारही येतो मी त्यावेळेस बाबांना ठामपणे बोलायला पाहिजे होतं. नाहीच बोलू शकलो. जेव्हा अमेयने आपल्याला सांगितले की, तो प्रितीवर प्रेम करतो आणि लग्नही तिच्याशीच करणार, तेव्हा खरंच त्याचे कौतुक वाटले. ते धाडस मी करू शकलो नाही. अमेयच्या विरोधात मी कधीच नव्हतो, त्याची अवस्था मी जाणत होतो कारण मीही त्यातून गेलो होतो.
आपण ज्या व्यक्तीवर मनापासुन प्रेम करतो, जेव्हा त्या व्यक्तीशी लग्न करता येत नाही तेव्हा कश्या वेदना होतात ते तू मला विचारून बघ. लग्न झालं,मूल झालं, खूप पुढे आलो तरी ती सल सोबत आहेच. तिची आठवण काढणं एकप्रकारे तुझ्याशी प्रतारणा करण्यासारखे आहे,म्हणून तर सारं मागे सोडलं होतं; पण आज तू पुन्हा आठवण करून दिलीस.'

त्याने अश्रू पुसले.
अनेक जुन्या आठवणी त्याला रडवत होत्या.
अनेक जुन्या आठवणी त्याला रडवत होत्या.
(क्रमशः)
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा