घरोघरी मातीच्या चुली असतात

Ghroghri Matichya Culi Astat
घरोघरी मातीच्या चुली
भाग एक

"विधी तुझी वहिनी सतत तर हसत असते मग आज का इतकी रडते ,सगळे तर मनासारखे झाले तिच्या आणि तिच्या आई वडिलांच्या तरी ही आज भरल्या घरात रडते..? "काकू

विधी, "काकू दादाचा लग्नाच्या आधीपासूनच निराली वहिनीला नकार होता, त्याला ती आवडत नव्हतीच तरी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला समजवले,पण तरी तो तयार नव्हता ह्या लग्नाला..."

काकू, "मग काय झाले ,कसा तयार झाला हा हिच्यासोबत लग्नाला...आणि काय कमी होती तुझ्या वहिनीमध्ये जो हा नकार देत होता.."

विधी," त्याने नकार देण्याचे काही कारणच नाही सांगितले ,पण मला लग्न करायचे नाही ह्यावर ठाम होता..मग बाबा आडून होते की निराली हीच ह्या घरची सून होईल तुला हिच्यासोबतच लग्न करावे लागणार आहे.."

काकू,"मग बाबा ने त्याला दम देऊन निराली सोबत लग्नाला तयार केलेच तर, बाबा कडक आहे पण मुलाचे ही ऐकायला हवे होते...कोणी आहे का त्याच्या आयुष्यात हे जाणून घ्यायला हवे होते...आजकाल हे सगळेच पालक करतात असे नाही पण समंजस पालक नक्कीच करतात ग ह्यात दोन जीवन सुखी होतात ,आणि नाही ऐकले की दोघे ही दुःखात एकमेकांसोबत अक्खे आयुष्य मन मारून काढतात ,चेहरे हसरे असतात पण मन मात्र दुःखी.."

विधी, "हो खरंय काकू ,बाबा अति स्ट्रिक्टली वागले पण आता त्यांना खूप पछतावा आहे ह्या गोष्टीचा निराली त्यांच्या मित्राची मुलगी आहे ,म्हणून मित्रासाठी त्यांनी हे नाते स्वीकारले दादाला ही भरीस पाडले... तशी निराली माझी ही मैत्रीण आहे ,तिची ही वेगळी कहाणी आहे..न राहून तिच्या वडिलांनी ही बाबांच्या म्हणण्यानुसार तिचे लग्न दादासोबत लावून दिले...तिने वडिलांची इच्छा म्हणून ऍडजस्ट केले पण कुठे तरी दादा साथ देत नाही हे पाहून ती दुःखी आहे...हा निर्णय हा हट्ट खूप चुकला आहे..ह्यात इतक्या लांब आल्यावर माघारी ही फिरता येत नाही...आणि दोघांचे दुःख ही बघवत नाही..."

काकू, "आता आपण एक शिकवण घेऊ शकतो की मुलांच्या मर्जीप्रमाणे नाते जुळले पाहिजे नाहीतर हतबलता येते नशिबी ती ही अशी...त्यात आपण ही सुखी होत नाही मग फक्त मनावर ओझे म्हणून नाते निभवायचे ह्याला अर्थ देत बसायचा आणि साजरे करायचे अडलेले सोहळे...मी तर प्रदीपला सांगितले आहे तू म्हणशील त्या मुलीसोबत लग्न कर आम्ही तुझ्या निर्णयात तुझ्या सोबत आहोत.."

विधी, "बरोबर आहे तुझे म्हणणे "


विधी काकुला सांगत होती की आपल्या दादाचे लग्न हे त्याच्या मनाविरुद्ध झाले आहे आणि त्याला बाबांच्या नसता दबावाखाली ह्या लग्नाला होकार द्यावा लागला...त्यात दोघे ही भरडले गेले...दादा ही भरडला गेला आणि तशीच वहिनी ही, म्हणजे दादा मन मारून जगत आहे तशीच निराली वहिनी ही मन मारून जगत आहे..


निराली मोठ्या घरातील थोरली मुलगी ,शिक्षण झाले तसे तिला स्थळ बघणे सुरू केले आणि त्यांच्या घरातील संस्कारी मुलगी आपल्या घरात लग्न होऊन आली तर मग घरात आंनदी आंनद असेल ,देव पूजा ,पूजा विधी ,बाकी संस्कार आपोआपच सुरू होतील..

काकुला ही बरेच दिवसांपासून मनाला जे खटकले ते बोलायचे होते...पण मोठ्या दिराकडे आणि जाउबाई कडे हा विषय काढणे म्हणजे विषयाची परीक्षा घेणे ..आधीच तर ह्या लग्नामुळे कोणी ही खुश नव्हते त्यात आपण जाऊन हा विषय काढणे म्हणजे जणू उगाच जखमेवर मीठ चोळणे असेच..

काकूने मग तिची लाडकी पुतणी विधी कडे सहज विषय काढला, तेव्हा विधीने सांगितले ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटले...कुठे आपला पुतण्या मिहीर हसता खेळता ,मन मोकळा...आणि आता कुठे लग्न झाल्यानंतर बदललेला मिहीर...जो घरात एक क्षण ही थांबत नाही...कोणाशी आधीसारखे बोलत ही नाही...नवरा बायको मध्ये नवरा बायको सारखे नाते नाही...सगळे जणू मन हेलावून टाकणारे...

एक कुटुंबाची कथा ,ज्यात सगळ्या कुटुंबात असतात तसे जिव्हाळ्याचे नाते आहेत ,दोन चुली झाल्या आहेत तर अजून ही धरून आहेत..जुळून आहेत..ते फक्त प्रेमामुळे..पण त्यात ही काही असतात जे नात्याला नाते म्हणत नाहीत..आपले समजत नाही ,पाहू कोण आहे ते...

पुढे पाहू काय वाढून ठेवले आहे कथेत

क्रमशः???

🎭 Series Post

View all