घरोघरी मातीच्या चुली असतात भाग 6

Matichya Culi
घरोघरी मातीच्या चुली असतात भाग 6


"काकू काय करतेस तू हे असे ,आईवर का ओरडतेस अशी ,तुम्ही दोघी समजदारी ने घ्या ,काय हा प्रकार आहे कळू द्या.." विधी


तितक्यात सुमित ही येतो आणि तो ही पटकन येऊन त्याच्या आईकडे जाऊन तिला ओरडतो

"किती वेळ तुला शोधायचे ग ,मला सांगून आलीस की तू आज मामाकडे जाणार आहेस आणि वेळ लागणार आहे..आणि तू इथे आलीस..खोटं का बोललीस ,मी ही आलो असतो ना ह्या घरी ,भेटलो असतो विधी दिदीला आणि वहिनीला...मग हे खोटं का सांगून आलीस. आणि त्या सारंग काकू वहिनी बद्दल बोलत होत्या ते ऐकल्यार तू इकडे असशील हे वाटलेच होते मला...?"


आता वृंदाचे खोटे पकडले गेले होते...तिला इथे का यायचे होते त्याचे कारण फक्त घरातील नवीन सुनेच्या बाबतीत काही वाही ऐकले ते खरे आहे का जाणून घ्यायचे होते..

वृंदा अजून चपापली ,आपला हेतू जाहीरपणे सगळ्यांना समजला ,पण तरी आपले प्रकरण कळाले म्हणजे अजून नाचक्की होईल..मुलगी आगाऊ सांगून बसली असेल तिला झालेल्या त्रासाचे किस्से ह्या लोकांकडे..

"विधी आणि निराली जा तुम्ही जाऊन सगळ्यांसाठी चहा ठेवा ,आणि हो सुमितला ही काही करून खाऊ घाला त्याला भूक लागली असेन ,त्याला भूक सहन होत नाही ,मग तो चीड चीड करतो..." संपदा


सुमित लगेच काकूच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो ,"काकू तुला माझ्या सगळ्या सवयी माहीत आहेत ग अजून ही ,किती वेगळी आहेस ग तू किती काळजी आहे ग तुला अजून ही आमची.."


इकडे अर्पिता आणि मिहीर घरात येतात...अर्पिताला पाहून वृंदा एकदम तटस्थ उभी राहते.. तिला जरा ही तिची कदर नाही असे तिच्या देहबोलीवरून समजते..

मिहीर अर्पिताची बॅग खाली ठेवतो आणि तिला घरात धरून आणतो..तिची अवस्था खूप नाजूक झालेली असते ,रडून रडून डोळे लाल झालेले असतात, डोळ्या खाली काळे डाग असतात ,जरा सूज ही असते...केस कसे तरी विस्कटलेले अशी जणू किती दिवस फनी फिरवली नाही की स्वतःकडे लक्ष दिले नाही. ती जणू मानसिक दबावाखाली वावरत होती असे जानवत होते ..


बॅग खाली ठेवतात वृंदाचे लक्ष त्या बॅग कडे गेले ,अरे ही तर अर्पिताची बॅग आहे ,ती कोपऱ्यात जरा शिवलेली होती ,त्यावर तशीच धूळ होती...हे तिला कळले ,मागच्या वेळी मीच तिची ही बॅग शिवली होती...म्हणजे याचा अर्थ अर्पिता घर सोडून आली ,कपडे सगळे भरलेले दिसत होते ,एक दिवासाठी येऊ का म्हणत होती काल आणि आज ही इतकी मोठी वजनदार बॅग घेऊन आली जणू इथे महिनाभर राहणार आहे..


वृंदाने लगेच तिच्याकडे वळली आणि तिचा हात कचकन धरला आणि रागाने तिच्या कडे नजर टाकली, जणू नजरेत आग होती...तिला विचारत होती तू इकडे अशी कशी निघून आलीस...तिकडे रहा सांगून ही सासर सोडून आलीस कशी...


वृंदाने हात धरतात अर्पिता धायमोकलून रडू लागली ,तिला आईच्या रागाची कल्पना होतीच ,आता ती आपल्याला पुन्हा सासरी जा म्हणणार ,तिथेच रहा म्हणणार...कसे ही असो तू तिथे नांदयचे ,इकडे तक्रार घेऊन यायचे नाही...माघारी येत नसतात लग्न करून दिलेल्या मुली, सासरी काही त्रास असला तरी सतत तो माहेरी सांगायचा नाही, नवरा म्हणणे तसे करायचे..भांडण चार चौघात येऊ द्यायचे नाही हे तिला सांगितले होते आईने पण अति मार खाऊन सन्मान गमावून तिला सासरी रहाणे मुश्किल झाले होते , मग कोणाला सांगितले तर बघ ही ताकीद दिली होती...पण आज मिहिरचा अश्यात फोन आला आणि आपल्या भावाला काही सांगायचे नाही ठरवून ही त्याने तिच्या आवाजावरून ओळखले आणि तिला खरी परिस्थिती सांगण्यास भाग पडले...


महिरला हे प्रकरण आधीच माहीत होते ,त्याच्या मित्राने संगीतले होते..म्हणून पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय काही पाऊल उचलायचे नाही हे ठरवले ,मग आपण आपल्या छोटीला सरळ विचारू म्हणून फोन केला..


मिहीर जवळपास सहा महिन्यांपासून ह्या प्रकरणाचा शोध लावत होता...त्याला आपली बहीण खरंच सुखात आहे की ती काही लपवते हे कळत नव्हते ,मग त्याने मित्राला शोध घ्यायला लावला...आणि तेव्हा कळले जे चालले आहे ते ठीक नाही..

इकडे एका मित्राने सुचवले की, तुला एक स्थळ आहे ,तू लग्न करशील तर बरेच प्रश्न सुटतील, तुझी बहीण सुखी होईल आणि सासरचे त्रास ही देणार नाहीत हे नाते केल्यावर..

मिहीरला मित्राच्या बोलण्यात तथ्य वाटले ,ती मुलगी म्हणजे बहिणींची नणंद होती ,तिला लग्न करून आणले तर मला त्या घरात जावई म्हणून जोडता येईल मग माझी बहिण तिला कोणी त्रास देण्याचा विचार ही करणार नाही...

पण झाले भलतेच ,त्याला घरातून बाबांच्या मित्राच्या मुलीचे स्थळ आले...खूप समजावून सांगितले पण कोणी ऐकले नाही...मग निराली सोबत लग्न जुळले...ती चांगली मुलगी आहे हे पटत होते पण बहिणीला सुखात बघण्यासाठी तिच्या नंदे सोबत लग्न करणे ही जास्त गरजेचे होते...

इकडे मिहीर हळूहळू गुंतत चालला होता निराली मध्ये ,पण मग अचानक पुन्हा आपली बहीण सुखात नाही हे कळल्यावर जरा त्यावर लक्ष देण्यासाठी तो बाहेर पडत होता... इकडे निराली नव वधू ,तिला नवऱ्याचा वेळ हवा तसा मिळत नव्हता...तिला ह्यात काही तरी शंका येत होती..आपण नाते टिकवू शकत नाही की त्यांना हे नाते मुळात आवडले नाही म्हणून दुर रहात आहे हे कळत नव्हते...त्यात मिहीर ने ही तिला काही कळवले नव्हते...

क्रमशः????

🎭 Series Post

View all