घरोघरी मातीच्याच चुली असतात भाग 3

Matichya Culi
घरोघरी मातीच्या चुली असतात
भाग 3


काकूने लगेच सूनमुख म्हणून तिला पाच हजार रुपये दिले आणि तिच्यावरून बोटे फिरवून मोडले ,अगदी सगळ्याच बोटांच्या मोडण्याचा आवाज झाला..

विधी, "मग काय काकू माझी वहिनी तुझी सून भरली ना मनात तुझ्या ही ,मी म्हंटल होत ना निराली वहिनी निराली आहे म्हणून.."

काकू, "खूप निराली आणि गुणाची ग खऱ्या अर्थाने.."

विधी, "वहिनी तू आणि काकू अगदी सारख्याच आहात बरं ,म्हणजे बघ काकुला मन वाचता येते ,आणि पटकन कोणाशी ही जुळून घेता येते..तुझ्यासारखे.."

निराली, " ताई इतके पण नाही हो सारखे,मी काकुपेक्षा एक पाऊल मागेच बरी ,त्या किती मोठ्या आहेत मानाने आणि मनाने त्यांनी लगेच मला आपले से केले, पण मला असे सहज जमत नाही.."

निधी,"तू नेहमी का कमी समजतेस स्वतःला निराली,मी आहे तुझ्या सोबत...ह्यात मी मदत करेन तुझे मन ह्या घरात रमायला..."

काकू,"अग ताई का म्हणतेस ,तुम्ही मैत्रिणी आहात ना !!! "

काकू असे म्हणतात निराली गप्प झाली ,विधी स्मित करून काकूच्या हातात हात घेऊन डोळ्यांच्या इशाऱ्याने सांगून गेली ,तरी काकुला काही समजेना...मग विधी म्हणाली..

विधी,"काकू मी सांगते तुला तो किस्सा मोठा आहे..निवांत बोलू ह्यावर"

विधी आणि निराली शांत झाल्या ,काकुला वाटले अजून काही नवीन ऐकायला मिळेल ,सुनेबद्दल तशी जास्त माहिती काढायला आले होते गोड बोलून ती तर मिळाली नाही..पण ठीक आहे विधी शेवटी आपल्या वहिनीची बाजू चांगली घेत असली तरी कधी तरी भोभटा ऐकू येईलच...नात्यात काही तरी चुकले आहे हे सिद्ध होईल..

काकूच्या चेहऱ्यावर आंनद दिसत नव्हता ,ती बाहेरून किती ही चांगली असल्याचा आव आणत असली तरी मनातून दुष्ट नियतीची होती, घरात हे सगळ्यांना माहीत होतेच,निधीला ही अवगत होते काकूचा मूळ स्वभाव...पण तिने ते सहज दाखवले नाही ना जाणवू दिले..

विधी आपल्या घरातील कोणतीच बाब बाहेर जाऊ द्यायची नाही म्हणून काकुला प्रेमाने समजून सांगत होती..पण तिला काकुला ही तडक दुखवायचे नव्हते म्हणजे ती घरातील गोष्टी बाहेर वाढून चाढून सांगणार नाही..

इकडे काकुला वाटले आपल्या हेतूची शंका नको यायला म्हणून लगेच काकू निरालीकडे कडे बघत राहिली आणि म्हणाली,"अश्या सुना नशिबानेच मिळतात, मुली सासरी जातात आणि ह्या लेकीची कमी भरून काढतात.."

विधी, "मी म्हणत असतेच सगळ्यांना बाकी कोणी भरभरून कौतुक करू किंवा नको करू पण वृंदा काकू नक्कीच निरालीच्या प्रेमात पडतील ,आणि पहा अगदी तसेच झाले.."

निराली ही खूप खुश झाली की काकू किती चांगल्या आहेत ,आपण किती निशीबवान आहोत की आपल्याला ह्या घरात अशी इतकी चांगली माणसे मिळाली आहेत..

निराली लगेच पुन्हा काकूच्या पाया पडली आणि काकूने तिला उठवून गळाशी लावले.. तिला सुखाने नंदा म्हणून आशीर्वाद दिला...

सगळ्या गप्पा करून झाल्या होत्या ,तर विधीची आई आली ,त्यांना बघताच छोटी जाव वृंदा काकू चपापलीच...आणि सावध झाली...तिला माहीत होते की मोठ्या जावेला आपला स्वभाव माहीत आहे...आपण नक्की कश्यासाठी आलो आहोत घरी हा हेतू समजला असेल...

लगेच छोटी जाऊ नेहमीप्रमाणे आपल्या हेतूची शंका येऊ नाही म्हणून लगेच मोठ्या जावेच्या पाया पडते...अगदी पदर बिदर घेऊन..वाकून बिकून ,हसून जणू काही खास नाही सहज घरी येणे केले असे भासवायचा प्रयत्न होता..

संपदा म्हणजे विधीची आई ,निरालीची सासूबाई आणि वृंदाची मोठी जाऊबाई होत्या... त्यांचा घरात खूप दरारा होता जेव्हा वृंदा लग्न करून घरात आली होती, आणि त्याच घर चालवत आणि संभाळत ही होत्या...त्याचा निर्णय म्हणजे अंतिम आणि सगळ्यांना मान्य असणारा...मग त्यांच्या पुढे कोणाची बोलायची ही हिम्मत होत नसत... मोठ्या दिरामुळे घर चालत आणि मोठ्या जावे मुळे घर एकत्र टिकून होते..


जेव्हा वृंदा लग्न करून ह्या घरात आली होती तेव्हा तिला घरकाम ,स्वयंपाक ,नाती जपणे, संवाद साधणे मान देणे हे काहीच कळत नव्हते, फक्त उलट बोलणे वाद घालणे, भांडण लावणे..एकाचे दोन करणे हा तिचा सवयीचा भाग होता माहेरी तो तसाच सवयीने सासरी ही आला होता..तिच्या आई वडिलांना वाटायचे मोठया कुटुंबात लेक दिली म्हणजे समजदार होईल..पण तसे जमता जमेना...मग काय मोठ्या जाऊ बाईने तिला वळण लावयचे ठरवलेच...तशी तशी ती कामात भाग घेऊ लागली...उद्धट पणा कमी होऊ लागला.. आणि थोडी हुशारीने वागायला लागली...पण भांडण लावणे किंवा एकाचे दोन करणे कमी होईना...त्यात मग शेवटी वेगळे होण्याची वेळ आली..पण दिराला वेगळा संसार झेपेना म्हणून तो पुन्हा मोठ्या भावासोबत रहायला आला...वेगळे होते तेव्हा वृंदा सुखी होती ,कोणाची लुडबुड नव्हती..कटकट नव्हती..पण तिच्या नवऱ्याला घर खर्च परवडत नसल्याने तो भावासोबत जाण्याचा निर्णय घेऊन बसला....वहिनीला ही पुन्हा वृंदाचा ताप होऊ लागला पण एकत्र रहाण्याशिवाय पर्याय नव्हता..त्यांची मुले मोठी झाली...वृंदाच्या मुलांना मोठी काकू सांभाळू लागली...त्यांना ही काकू हवी हवी वाटू लागली...आणि मोठ्या जावेचा मुलगा मिहीर छोट्या काकूंसोबत रमू लागला..मग काय पुन्हा वेगळे होण्याचा विचार मागे पडत गेला... सगळ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च मोठा भाऊ करू लागला.. मग जरा ही वाद होत नसे..मोठ्या जावेची कटकट वाटत नसे..उलट घरात त्यांची मदत करण्यासाठी वृंदा हात भार लावत...मिळून घेत...आपले हित कश्यात आहे हे समजल्यावर तिला एकत्र राहून आपला हेतू साध्य करण्याची किंमत कळली..