घरोघरी मातीच्या Culi असतात भाग 5

Matichya Culi
घरोघरी मातीच्या चुली
भाग 5

"थांब ग काकू किती पळापळ तुझी, किती दिवसांनी मोकळा वेळ मिळाला आहे आपल्याला ,मग अर्पिता ताई ,सुम्या आले तर मज्जाच मजा.." विधी

" बघ दोघी थांब म्हणत आहेत ग ,त्यात माझा आग्रह म्हणजे तुला नक्कीच थांबाव लागणार वृंदा ,ती तुझ्या हातची दाल बट्टी होऊन जाऊ दे." मोठी जाऊ हात धरून तिला खाली बसवत

वृंदा, "काय ताई, तुम्हाला तर माझ्या हातची बट्टी आवडत नाही ना ,तरी गम्मत करत आहात का माझी..?"

"तुला खूप दिवसांपासून काही सांगायचे म्हणत आहोत आम्ही ,पण तुझ्या दादाने आणि भाऊजी यांनी माझ्यावर एक कठीण जबाबदारी सोपवली आहे वृंदा...मन घट्ट करशील जरा " मोठ्या जाऊबाई तिला धरून जवळ बसवत म्हणाल्या


वातावरण जरा शांत आणि गूढ झाले होते ,जाऊबाई अश्या का म्हणत आहेत हे वृंदाला कळेना....त्यात दोघी जणी विधी आणि निराली आई कडे खूप साशंक नजरेने पाहत होत्या...काय झाले कोणाला काही कळले नाही..पण आता त्या तिघी त्यांच्याकडे बघत होत्या...काय झाले असे इशाऱ्याने विचारत होत्या..

संपदा, "थांब जरा दादा येत आहे अर्पिताला घेऊन घरीच तेव्हा खुलासा करते माझ्या बोलण्याचा.."

तोपर्यंत कोणाला ही धीर होत नव्हता ,इकडे अर्पिता का येते अचानक हे समजल्यावर वृंदाला छातीत धडधडत होते,आता अजून काय नवीन तक्रार, ह्यांना काही समजले तर नसेल ना अर्पिताच्या बाबत...आता माझ्या घरातील बाब चोहट्यावर येणार ,सगळी इज्जत मातीत जाणार..मी लोकांच्या घरचे वाद जाणून घ्यायला आले आणि इथे माझ्याच घरचे प्रकार उघडकीस येणार आहे बहुतेक...ह्या अर्पिताचे मिहिरला न राहून सगळे सांगितले असणार.

वृंदा चलबिचल करत आत बाहेर करत होती दर झटकत होती...कोणाकडे ही बघत नव्हती..तिला घाम फुटला होता..तोंडात काही तरी बडबडत होती... बोटे मोडत होती..अशांत होती नजर..बाहेर डोकावत होती

इकडे विधी आणि निराली काकू असे का वागत आहे ,काय बिघडले आहे बघत होत्या...त्यांना अजून ही काही कळत नव्हते..निरालीने लगेच मिहिरला फोन लावला.

"हॅलो, कुठे आहात तुम्ही घरी कधी येणार आहात ,आम्ही सगळ्या तुमची वाट बघत आहोत..आणि अर्पिता ताई ही आहेत ना ? "

इकडे अर्पिता नाव ऐकताच काकू निरालीकडे गेली आणि म्हणाली ,"कुठे आलेत हे दोघे ,तू विचारलेस का कुठे आहेत ते ??'"


निरालीने काकुला शांत बसायला सांगितले आणि म्हणाली,"मी ह्यांना फोन केला आहे आणि ते जवळच आहेत, येतील इतक्यात, तुम्ही स्वस्थ बसा ,दगदग नको काकू.."

"तू अजून नवीन आहेस बाई ,तिला संसारातील अडचणी नाही ग माहीत ,काय काय भोग भोगावे लागतात आई वडिलांना मुलं सुखी नसल्यावर.." काकू डोक्याला हात लावून रडत म्हणाली

इकडे संपदा आणि विधी ही जवळ आल्या आणि तिला समजावू लागल्या, धीर देत संपदा म्हणाली, "आता काही काळजी करायचे कारण नाही, फक्त तू धीर धर अर्पिता आल्यावर बोलू आपण तिच्याशी... फक्त तिच्यावर रागवू नकोस...तिला आपली गरज आहे, आपल्या स्पोर्ट ची गरज आहे.."

वृंदा पटकन फिरून संपदाकडे बघते ,त्या नजरेत खरे उघडकीस आले आहे आणि ते जाऊबाईला ही कळले आहे ,पण कसे कळाले हा भाव दिसून येतो..ती आलेल्या संकटाला घाबरलेली नसते ती घाबरते ते फक्त आपली दुखरी बाजू लोकांना कशी कळली म्हणून...शेवटी हे भाऊबंदच आहेत ,ह्यांना आपले दुःख ऐकल्यावर आंनदच होणार...आम्ही कसे अडचणीत सापडलो ह्याचे सुख मिळणार आता..

"ताई तुम्हाला काय म्हणायचे आहे..?" वृंदा

"ये दे दोघांना मग कळेन तुला मी काय सांगते ते ,मी त्या दोघांची वाट बघत आहे.." संपदा

"मला माहीत आहे ,पण तुम्ही काय केले ते सांगा ताई " वृंदा अधीर होऊन विचारते

"काही नाही मी जे केले ते तू आधीच करायला हवे होतेस बरं वृंदा ,तुझा स्वभाव नडला ह्या गोष्टी ला , नाहीतर प्रकरण हाता बाहेर गेले नसते ,कळतंय का तुला.." संपदा आता वृंदाला ओरडून बोलत होती..ती संतापली होती वृंदावर..


"काय काय केले हो मी असे ,की तुम्ही मला दोष देत आहात मयझ्यावर ओरडत आहात अश्या..मी सहन केले तुम्हाला खूप आता नाही, हे आमचे मॅटर आहे ते आम्ही बघून घेऊ जाऊबाई.." आता वृंदा ही संतापली आणि रागवली.


क्रमशः???

🎭 Series Post

View all