Login

गर्ल्स हॉस्टेल.. भाग - पाचवा..

अमित रियाच्या हॉस्टेल खाली येऊन उभा राहतो...

भाग -5


सोनिया ऑफिस ला निघून जाते. रिया बाल्कनीतच कानात हेडफोन लावून गाणी ऐकत असते.


अनामिका उठते., " हेय गुडमॉर्निंग, सोनिया गेली का.? "


रिया, " हो गेली.. झाली का झोप..? "

रिया तिची मस्करी करत बोलते.


अनामिका, " हो यार, मस्त झाली ना पार्टी.? "


रिया, " हो तरं...खूप दिवसांनी असं एन्जॉय केलं.. "


अनामिका, " चला आता मी जाते कॉलेजला. एकतर काल सुट्टी घेतलेली सो आज पुन्हा नको... "

असं बोलून अनामिका फ्रेश व्हायला निघून जाते.


काही वेळातच सायली ही उठते.

सगळ्याचं जणी फ्रेश होऊन आपापल्या कामाला लागतात.


रिया मात्र रात्रीची ड्युटी असल्यामुळे रूममध्येच असते.

रियाला एक मॅसेज येतो, " हाय हॉस्टेलवर आहेस का..? आज आपण कॉफी शॉप वर भेटूया. ठीक दोन वाजता दुपारी तुझ्या हॉस्टेल जवळच्या... "


रिया तो मॅसेज पाहून थोडी घाबरते. ती त्या मॅसेज ला रिप्लाय करते., " मी ऑफिस येईन तेव्हा बोलू आपण. "


पुन्हा तिला मॅसेज येतो, " नाही नको, मी सांगितलं आहे तसंच कर. नाही तरं मला हॉस्टेलवर यावं लागेल. "


रिया नाईलाजाने त्याला रिप्लाय करते, " नाही नको, मी भेटेते कॉफी शॉप ला. "


रियाच लक्ष सारखं घड्याळाच्या काट्यावर असतं.

दोन वाजतात रिया कॉफी शॉप वर सांगितल्या प्रमाणे जाते. ती आत जाते समोर कॉफी टेबल असतो त्यावर जाऊन ती बसते.


काही मिनिटातच तिच्या समोर उंच धीप्पाड, रंगाने सावळा, अंग काठी मध्यम आणि चेहऱ्यावर दाढी वाढवून चेक्स चं शर्ट घातलेला व्यक्ती येऊन बसतो.

त्याच्या चेहऱ्यावरील हास्य खूप विचित्र असतं. किळसवाण असतं. अमित सरपोतदार तिची आणि त्याची ओळख काही दिवसांचीच होती. कॉलसेंटर मध्ये झालेली.


अमित सरपोतदार तिच्यावर चिडत बोलतो, " काल हॉस्टेल वर मला येण्यास नकार का दिलास ? "


रिया त्याला बोलते, " तुला माहित आहे हॉस्टेल वर अलाऊड नाही आहे ते, कारण ते गर्ल्स हॉस्टेल आहे. "


अमित, " म्हणून काय झालं.. मला कोणी थांबवू शकत नाही. "


रिया, " हे बघ तू असं मला सारखं हॉस्टेल जवळ भेटायला येत जाऊ नकोस. आमच्या डिन ला ते चालणार नाही. "


अमित, "मला ते काही माहित नाही. आणि काल तू ऑफिसला ही नव्हती. कुठे अजून दुसरीकडे....?"

अमितच ते बोलणं खूप किळसवान असतं.


रिया त्याच्यावर चिडते, " शी.. तुझी हिम्मत कशी झाली मला हे विचारायची..? "


अमित, " त्यात काय झालं. " असं बोलून तो तिच्या हाताला स्पर्श करतो.


रिया हात झटकते. तो तिच्यावर अजून भडकतो.

" मी जेव्हा जेव्हा बोलवेन तेव्हा तेव्हा तुला यावं लागेल. " आणि गालात हसून दाखवतो.


रिया त्या कॉफीशॉप मधून निघून जाते. कशीबशी ती हॉस्टेल वर पोहचते. दार उघडते आणि रूमच दार ती आतून कडी लावून लोक करते. तिला कळतं नसतं की पुढे काय करायचं. तितक्यात रूमचा दार जोरात कोणीतरी ठोठावत. रिया खूप घाबरते, ती घाबरून आवाज देते.


रिया, " कोण आहे..? "

घाबरत घाबरत बोलते.


समोरून काहीचं उत्तरं येत नाही, पुन्हा दरवाजा ठोठावला जातो.


रिया पुन्हा बोलते, " कोण आहे...? " शेवटी ती घाबरत घाबरत दरवाजा उघडते.. तरं समोर दारात अनामिका असते. 


रियाला खूप घाम फुटलेला असतो.

अनामिका तिला पाहून विचारते, " काय झालं इतकी घाबरली का आहेस..? आणि किती दरवाजा ठोकला..!"


रिया चेहऱ्यावरचा घाम फुसत बोलते, " अगं ते मी... काही नाही.. तू बस मी आली वॉशरूम ला जाऊन.. "

असं बोलून रिया वॉशरूम ला फ्रेश व्हायला जाते.


अनामिका ला रियावर सौंशय येतो. की काहीतरी प्रॉब्लेम आहे.. पण काय ते रिया सांगायला तयार नाही.


तितक्यात रिया फ्रेश होऊन बाहेर येते.

रिया अनामिका ला विचारते, " हे काय, आज कॉलेज नाही का..? म्हणजे तू लवकर आलीस म्हणून विचारलं..!"


अनामिका, " अगं जाऊन आली कॉलेज, थोड्या वेळाने जाईन पुन्हा आज फ्रेंड्स सोबत जरा शॉपिंग ला जायचं विचार आहे माझा..!"


रिया, " ओके ओके... "


अनामिका, " हे काय सायली वगरे सगळे गेले का...? "


रिया, " हो गं.. बरं तू जेवलीस का..? "


अनामिका, " नाही, चल जाऊ हॉस्टेल च्या कॅन्टींग ला जेऊन जरा आराम करू...!"


अनामिका आणि रिया कॅन्टींग मध्ये जातात.

संध्याकाळचे सात वाजलेले असतात. रिया ऑफिसला जायची तयारी करते.

तितक्यात पुन्हा रियाचा फोन वाजतो.


रिया मोबाईलच्या रिंग ने दचकते... तितक्यात सायली बोलते., "काय गं इतकं दचकायला काय झालं..?"


रिया बोलते, " अगं काही नाही ते जरा थोडं विचारात होती ना सो त्यामुळे..!"


सायली तिच्या कडे पाहत बोलते, " बरं बरं...!"


रिया तिच्या ऑफिससाठी निघते. रस्त्यात अमितची कार उभी असते. तो तिला कार च्या आरशातून पाहतो. आणि कारचा दरवाजा उघडतो..रिया अमितची कार पाहून थांबते..


अमित तिला बोलतो, " मुकाट्याने गाडीत बस..!"


रिया त्याच्याशी काहीही वाद न घालता गाडीत बसते, " तू हे असं गाडी घेऊन माझ्या हॉस्टेल च्या जवळ काय करतोयस ? "


अमित, " काय करतो म्हणजे ? तुझी वाट पाहतोय. अजून काय करणार!"


रिया, " मी तुला आधीच सांगितलेलं. तू असं येत जाऊ नकोस. कोणी पाहिलं तरं..? "


अमित हसतो, " इतकं काय त्यात पाहिलं तरं पाहिलं..!"

असं बोलून अमित गाडी चालू करतो.


...... क्रमश....


0

🎭 Series Post

View all