Login

गर्ल्स हॉस्टेल... भाग - आठवा..

रियाला भरपूर ताप भरलेला असतो.

...... भाग -8



सकाळ होते, सोनिया नेहमीप्रमाणे लवकर उठते. तिचं लक्ष रियाकडे जात.


सोनिया, " रिया आज इतक्या लवकर ? आणि ही आली कधी ? झोपली आहे, म्हणजे कितीला आली ही ? " सोनिया ला अनेक प्रश्न पडतात रियाला पाहून.

ती घड्याळात पाहते सकाळचे सात वाजलेले असतात.

ती रियाला उठवत नाही.

काही वेळा नंतर रिया उठते. उठताच तिचा तोल जातो. सायली पटकन तिला पकडते..


सायली रियाला बोलते, " अगं रिया, तुला ताप भरला आहे ? " तिचं अंग सायली ला गरम लागत. तिला भरपूर ताप भरलेला असतो.


सायलीचा आवाज ऐकून सोनिया वॉशरूम मधून बाहेर येते.

सोनिया, " काय ? अगं मी पाहिलं तिला झोपलेल पण मी उठवलं नाही. पण इतका ताप कसा भरला ? "


सायली, " काय माहित ? मी जरा जागीच होती. ती उठली आणि तिचा तोल गेला तसं पकडलं. आणि तेव्हा कळलं की हिला ताप आलाय..!"


सोनिया, " रिया,, अगं रिया,,!" रियाला शुद्धचं नसते. सोनिया तिच्या डोक्याला हात लावून पुन्हा पाहते.


सायली, " खूप आहे का गं ? " काळजीने सायली सोनिया ला विचारते.


सोनिया, " हो गं, मला वाटतं आपण हिला डॉक्टर कडे घेऊन जाऊया का ? " काळजीने सोनिया विचारते.


सायली, " तू थांब मी अनामिका ला उठवते..!" असं बोलून सायली अनामिकाला उठवायला जाते.


सायली अनामिकाला उठवते, " यार अनु, उठ की.."


अनामिका झोपेत असते तिला आजूबाजूला काय घडतंय हे माहीतच नसतं, " यार झोपूदे की ! "


सायली, " यार अनु, रियाला खूप ताप भरलाय. आणि तिला चक्कर ही आली आहे ? " सायली अनामिका ला उठवत बोलते.


अनामिका सायलीच बोलणं ऐकून ताडकन जागी होते.

, " काय ? कसा काय.. आणि ही इतक्या लवकर आली ? "


सायली, " हो, आम्हाला ही मगाशीच कळालं ते.!"


अनामिका रियाच्या जवळ जाते तिच्या डोक्याला हात लावून पाहते, " अरे यार खूप आहे ताप हिला ? बरं ही आली कधी ? "


सोनिया, " आम्हाला ही माहित नाही ती कधी आली. सकाळी सात वाजता मी उठले तेव्हा ही मला बेड वर दिसली. "


सायली , " एक काम करते, मिठाच्या पाण्याच्या थंड घड्या ठेवूया, आणि माझ्या कडे गोळी आहे ते देऊया.. "


अनामिका, " गुड आयडिया, जा पटकन.. "


सायली पटकन जाऊन थंडमिठाचं पाणी आणि कपडा, गोळी घेऊन येते. सायली कपडा भिजवून तिच्या कपाळावर घड्या ठेवते. काही वेळा नंतर रियाला सायली उठवून बसवते. अनामिका तिला गरम गरम कॉफी करून देते. आणि गोळी खायला देते. पण रियाचा ताप उतरायचा काही नाव घेत नाही.


तिला खूप थंडी लागत असते. रियाच्या काळजीने आज कोणीच कुठेच जात नाही.


सोनिया, " यार हिटलर ला सांगूया का ? रियाच्या तब्येती बद्दल ? "


अनामिका, " नको इतक्यात नको.. आधी बघूया नाहीच उतरला तरं सांगूया.. काय बोलतात ? "


सायली, " ठीक आहे.. "


अनामिका सायली ला गोळी देते, तिला गरम गरम चहा देतात. सायली तिच्या डोक्यावर बराच वेळ घड्या ठेवत असते.


काही वेळा नंतर रिया दचकून उठते., " प्लीज मला जाऊद्या.. " आणि जोरजोरात रडू लागते.


तिघीपण घाबरतात रियाच्या अशा बोलण्याने.


अनामिका, " अगं रिया रिया शांत हो.. आम्ही आहोत सगळे.!" अनामिका तिला शांत करत बोलते.


सोनाली सोनियाला बोलते, " नक्की काय झालं आहे..? ही अशी का बोलते आहे ? " सोनाली खूप घाबरलेली असते.


अनामिका सोनाली आणि सोनिया ला बोलते, " काहीच कळतं नाही आहे, तिच्या अशा वागण्याचा काय अर्थ घ्यावा काहीच समजत नाही आहे. "


सोनिया, " आणि आज ही लवकर आली, नि कोणत्या तरी संकटात आहे असं वाटतं आहे ? "


सोनाली, " पण नक्की काय ? "


अनामिका, " मला असं वाटतं की आपण हिटलर ला सांगूया, रिस्क नको घ्यायला. "


सोनाली आणि सोनिया बोलतात, " बरोबर आहे. "


सोनिया, " मी हिटलर ला बोलावून आणते. "

असं बोलून सोनिया हिटलर ला बोलवायला तिच्या ऑफिस ला जाते.


काही वेळातच हिटलर ला घेऊन सोनिया रूम मध्ये येते.


डिन मॅडम रिया ला पाहून त्या तिघींच्याही तोंडाकडे पाहतात. तिच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न असतात.


डिन मॅडम, " काय झालं हिला ? "


अनामिका घाबरत घाबरत डिनला बोलते, " माहित नाही मॅडम, ती कधी आली हे ही कळालं नाही. ती आली तेव्हा तिला चक्कर आली आणि तेव्हाच कळालं तिला ताप आहे ते. "


डिन मॅडम, " तुमची रूम मेट कधी येते हे तुम्हाला कळतं नाही ? म्हणजे नक्की काय समजायचं मी ..? "


सोनाली, अनामिका आणि सोनिया, " सॉरी मॅडम.. "


डिन मॅडम रियाच्या अंगाला हात लावतात, " ताप बऱ्यापैकी आहे.. "


सोनाली, " हो मॅडम, तसं गोळी दिली मी तिला आणि थंडपाण्याची घडी ही ठेवली.. "


तितक्यात रिया पुन्हा घाबरून किंचाळत उठते, " मला जाऊद्या प्लीज,, सोडा मला..!"


अनामिका, " रिया यार शांत हो गं.. आम्ही आहोत.. "


डिन मॅडम रियाच असं वागणं पाहून आमच्याकडे सौंशयाच्या नजरेने पाहतात.

" नक्की काय झालं आहे ? आणि ही अशी का ओरडत आहे...? मला कळेल का नक्की काय झालं आहे ते ? "


अनामिका, " खरचं नाही माहित आम्हाला मॅडम..!"


डिन मॅडम, " तुम्ही मुली माझ्यापासून काहीतरी लपवत आहात असं मला वाटतं आहे.!"




..क्रमश...

0

🎭 Series Post

View all