...... भाग -10..
अनामिका, " थँक्स डॉक्टर.. " अनामिकाला डॉक्टर चं उत्तरं ऐकून जरा समाधान वाटतं.
डॉक्टर, " बरं, ठीक आहे. उद्या नाही बरं वाटलं तरं कळवा. "
आणि डॉक्टर तिथून निघून जातात.
डिन मॅडम त्या तिघींकडे रागाने पाहतात.
अनामिका, " थँक्स मॅडम..!"
डिन मॅडम तिथून निघून जातात. अनामिका रूमचा दरवाजा बंद करते. सोनाली, सोनिया दोघी पण रडायला लागतात.
अनामिका जरा शांत बसते. तिला कळतं नसतं की असं कसं होऊ शकत ?
अनामिका, " नक्की काय समजायचं ? कोणी, कसा, कधी आणि कुठे ? बरेच प्रश्न मनात आहे. पण उत्तरं काय ? "
सायली, " मला तरी असं वाटतं की हिच्या कामाच्या ठिकाणी तरं नाही ना ? " सायली ला खूप मोठा प्रश्न पडतो.
काही वेळ रूम मध्ये शांतता पसरलेली असते.
अनामिका, " एक मिनिट तो कारवाला तरं नसेल ना ? "
सायली आणि सोनिया अनामिका कडे पाहतात.
सोनिया, " हो यार हे आपल्या लक्षातच आलं नाही. पण कशावरून ? "
सायली, " कारण ती काल त्या कार मधल्या माणसासोबत गेली होती ? आणि ऑफिस ठिकाणी थोडी असं कोण करेल ? सी सी टीव्ही कॅमेरा आज काल सर्व ठिकाणी असतात. मग कसं शक्य आहे ? "
अनामिका, " आपण तर्क वितर्क काढण्यापेक्षा, आपण रियाला चं विचारू ना नक्की काय आहे ते ? "
काही वेळाने रिया दचकून जागी होते. तिला खूप घाम फुटलेला असतो.
अनामिका, " रिया, बरं वाटतंय का तुला ? " अनामिका रियाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलते.
रिया आजूबाजूला पाहत, काहीतरी शोधल्यासारखं करत बोलते, " मी मी,, इथे कशी ? काय झालेलं मला ?"
सोनिया, " अगं काही नाही, जरा ताप आलेला तुला.. आणि काही नाही.. तू झोप जरा बरं वाटेल तुला !"
रिता, " नाही मला,, मला काही तरी झालं आहे..? "
रिया वेड लागल्यासारखं बोलू लागते वागु लागते.
अनामिका, " तू झोप बरं शांत.. आम्ही आहोत इथेच.!"
रियाला शांत करत अनामिका बोलते.
रिया, " मला खूप भीती वाटतेय.. तू इथेच थांब जाऊ नकोस !" रिया अनामिकाचा हात घट्ट धरून ठेवते.
अनामिका तिची समजूतकाढत तिच्या शेजारीच बसून असते.
सायली रागात बोलते, " मला एकदा कळु दे रियावर कोणी बलात्कार केला ते. मग बघच त्याची हालत कशी करते ती. "
सोनिया, " तिघींनी मिळून त्याला शिक्षा द्यायची. "
अनामिका, " यार मला तरं तिच्या मुलीची काळ्जी वाटते आहे. उद्या ही ठीक नाही झाली तरं हिच्या मुलीच कसं होईल ? ह्याची. "
सोनिया, " डोन्ट वरी ती होईल ठीक.. " अनामिका समजावत सोनिया बोलते.
रियाच्या काळजीने रात्रभर ह्या तिघी झोपलेल्या नसतात. सकाळचा दिवस उजाडतो.
रिया उठून बसलेली असते. ती सतत अमितच्या मरणाचा विचार करत असते.
तितक्यात सोनियाला जाग येते. ती घड्याळात पाहते सकाळचे सात वाजलेले असतात.
सोनिया, " रिया.. कसं वाटतं आहे आता तुला..? तू ठीक आहेस ना ? " सोनिया तिच्या जवळ जाते. तिच्या डोक्याला हात लावून बघते. ताप बऱ्यापैकी उतरलेला असतो.
" नशीब ताप उतरला..!" सोनिया बोलते.
अनामिका, " रिया.. यार उतरला का ताप..? " रिया तिच्या जवळ जाते. तिचा हात हातात घेते.
सोनिया, " हो उतरला आहे.. नशीब बरं वाटतंय हिला.!"
अनामिका, " यार तू किती घाबरवलेलंस आम्हाला.. "
रियाला बोलते.
सायली, " चला बरं वाटतंय ना ? मग आता रिया तू सांग...? " तितक्यात अनामिका आणि सोनिया तिला काही बोलायच्या आधी थांबवतात.
रिया उठून बसलेली असते. पण सतत ती एकटक जमिनीकडे पाहत असते. ती जिवंत आहे पण, मेल्याहून मेल्यासारखी दिसतं आहे. डोळ्यांच्या पापण्या स्तब्ध रोखून ठेवल्या आहेत. डोळ्यांतून सतत पाणी येत होतं.
सोनिया तिचे डोळे पुसते, " बरं तुला मी चहा आणून देते गरम गरम.. तू तो पी बरं वाटेल तुला !" असं बोलून ती चहा बनवायला किचन मध्ये जाते.
सोनिया सायलीला आतून आवाज देते, सायली आत येते. " सायली तुला माहित आहे तिच्या सोबत काय झालं आहे ते ? त्यामुळे सध्या आपण तरी हा विषय तिच्या पुढ्यात सध्या तरी नको काढूया !" सोनिया सायलीला समजावत बोलते.
सायली, " अगं मी पाहत होती तिच्या काही लक्षात आहे की नाही ते ? "
सोनिया, " तिला आपण इतक्यात काही विचारायचं नाही, ती सध्या डिप्रेस मध्ये आहे. प्लीज..!"
सोनिया तिला समजावून सांगते.
तितक्यात सोनिया चहा घेऊन रिया जवळ जाते., " ह्म्म्म रिया मॅडम चहा घ्या, मस्त वाटेल तुम्हाला.. " असं बोलून सोनिया तिला चहा थंड करून पाजावते.
अनामिका, " यार मस्त वास येतो आहे चहा चा ? काही स्पेशल आहे का त्यात..? " आणि अनामिका खोटं का असेना हसायला लागते. निदान तिचं हसणं ऐकून रिया काही तरी रिऍक्ट करेल.
पण नाही. रिया डिप्रेशन मध्ये गेलेली असते. तितक्यात रूमचा फोन वाजतो. अनामिका फोन उचलते. समोरून डिन मॅडम चा कॉल असतो.
अनामिका फोनवर बोलते, " हॅल्लो, मॅडम अनामिका बोलते आहे. "
डिन मॅडम बोलतात, " आता रिया कशी आहे ? ताप उतरला का ? "
अनामिका रिया कडे पाहत बोलते, " हो मॅडम उतरला आहे पण..? "
डिन मॅडम, " पण काय ? "
अनामिका, " ते... काही नाही.. आहे उठून बसली आहे... "
डिन मॅडम, " बरं बरं... "
..... क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा