........ भाग -11
आणि डिन मॅडम कॉल ठेवतात...
रिया चं असं डिप्रेशन मध्ये जान खूप काळ्जी करण्यासारखं असतं. पण अनामिका, सोनिया आणि सायली मिळून तिला ह्या डिप्रेशन मधून काढण्याचा दिवसेंदिवस अतोनात प्रयत्न करत असतात. पण देव त्यांच्या प्रयत्नांना यश देत नाही असं नसतं काही. हळू हळू रिया डिप्रेशनमधून बाहेर येत होती. तिला त्या तिघी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला, कधी पार्टीला तरं कधी मूवीला घेऊन जात असतं.
तिच्या सोबत सतत तिघीं पैकी कोणी एक थांबायचे.
रिया वर बलात्कार होऊन पंधरा दिवस उलटलेली असतात. आज रूमवर रिया ही एकटीच असते. रूमचा दरवाजा कोणीतरी ठोठावतो रिया दरवाजा उघडते. दारात कोणी ही नसतं दरवाजाच्या कडीला एक चिट्टी लावलेली असते.
रिया चिट्टी घेते आणि खोलते, " हे काय रिकामी चिट्टी ? आणि अशी कोणी लावली ? आणि दरवाजा कोणी ठोकला ? " ती स्वतःशीच बोलते. ती जरा दरवाजाच्या बाहेर येते आजूबाजूला पाहते.
पण कोणीच नव्हतं.
ती घाबरते, ती आत येते. रूमचा दरवाजा लावते. तिला अतिशय घाम फुटलेला असतो. तितक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजते.
ती घाबरत घाबरत मोबाईल घेते आणि कॉल उचलते, " हॅल्लो,, हॅल्लो,, हॅल्लो,, कोण बोलतंय.." ती जोर जोरात बोलते. समोरून कॉलवर कोणीच बोलत नाही.
तितक्यात रूमचा फोन वाजतो. ती घाबरत घाबरत फोन घेते.पण फोनवर कोणी नसतं. ती पुन्हा फोनवर " हॅल्लो,,, हॅल्लो बोलते..!"
तेवढ्यात रूमचा दरवाजा ठोठावतो. ती वेडीपीशी होते, तिला कळतं नसतं नक्की काय होतय. पुन्हा दरवाजा वाजतो, ती घाबरत घाबरत जाऊन दरवाजा हळूच खोलते. दरवाजात सायली असते. ती सायली ला घट्ट मिठी मारते आणि जोरजोरात रडू लागते.
सायली रियाला विचारते, " काय झालं ? तू अशी घाबरली का आहेस ? आणि दरवाजा खोलायला इतका वेळ का लागला ? "
रिया रडत रडत बोलते, " मी मी.. खूप घाबरली होती. मला वेड लागेल. कोणी तरी मला घाबरवत आहे. "
सायली, " कोण पण ? कोण घाबरवत आहे ? तू बस आधी मी पाणी आणते तुला !"
सायली रियाला पाणी आणून देते. रिया थरथरत्या हाताने पाणी पिते.
रिया, " तो तो.. " आणि ती वेडीपीशी होते. ती गरगर डोळे फिरवते.
सायली, " कोण तो ? आणि कोणाबद्दल बोलते आहे तू ? मला कळेल असं बोल ना ? "
रियाला शांत करत सायली बोलते.
रिया, " मी खोटं नाही बोलत आहे !" ती वेड्यासारखी रियाच्या पाया पडते.
सायली, " तू शांत हो आधी आणि मी आहे ना तू आराम कर." ती कसंबस रियाला शांत करते. रात्रीचे आठ वाजलेले असतात. सोनिया ऑफिसमधून येते.
सोनिया सायलीला बोलते, " झोपली आहे का रिया, ठीक आहे ना सर्व ? "
सायली, " नाही..!"
सायलीच्या चेहऱ्यावरची काळ्जी सोनियाला दिसते. म्हणून ती सोनियाला विचारते.
सायली, " तू फ्रेश होऊन ये, मग सांगते सगळं. तुही थकली असशील ना ? "
सोनिया, " हो, आज जरा खूप काम होतं. आणि शेवटी रियाच टेन्शन लागून राहील होतं. आपण ऑफिस नि कामात असतो. ही एकटी असते. "
सायली, " बरोबर आहे तुझं..!"
सोनिया फ्रेश होऊन बाहेर येते, चहाचा कप घेऊन ती आणि सायली बाल्कनीत उभे असतात.
सायली, " मी आज ऑफिस ला होती, आणि त्यात आपण कोणीच नाही. रिया एकटी होती. "
सोनिया, " हो, माहित आहे मला. "
सायली, " त्यात मी रूमवर आली दरवाजा बराच वेळ ठोकला, पण रिया बराच वेळ दरवाजा उघडत नव्हती. आणि जेव्हा उघडला तेव्हा... "
सोनिया, " तेव्हा काय ..? "
सायली, " तेव्हा रिया खूप घाबरलेली होती. खूप विचित्र वेड्या सारखी करत होती. विचित्र बडबडत होती. तो तो,, घाबरवत आहे ? असं काहीस. "
सोनिया, " नक्की काय झालंय, काहीच कळायला मार्ग नाही.. तिला विचारलं तरं कळण अशक्य आहे. कारण अजून ती आधी सारखी झाली नाही. "
सायली, " अजून जास्त तिला प्रेशर येईल, त्यापेक्षा नको. "
सोनिया, " बरं, मी जाते आणि आपल्या तिघींसाठी कॅन्टींग मधून जेवण घेऊन येते."
असं बोलून सोनिया कॅन्टींग मध्ये जाते. तिघीं साठी ती जेवण घेऊन रूम मध्ये येते.
सायली रियाला उठवत, " रिया चल थोडं जेऊन घे, गोळ्या घेयच्या आहेत ना तुला..? " रियाला थोडी जाग येते.
ती जरा उठून बसते. सोनिया तिला जेवण भरवते. बराच वेळ सोनिया आणि सायली तिच्याशी गप्पा गोष्टी करतात.
सोनिया घड्याळात पाहते रात्रीचे दहा वाजलेले असतात. सोनिया सायलीला विचारते., " अगं अनामिकाचा काही कॉल आलेला का तुला ? "
सायली, " नाही का गं ? काय झालं ? "
सोनिया, " अगं दहा वाजले तरी अजून आली नाही ती..? "
सायली, " हो, येईल ती. कदाचित पार्टीमध्ये असले ती. मित्रांसोबत पब मध्ये.. "
सोनिया, " हो, बरोबर. म्हणजे मॅडम आज ही बाहेरूम जेऊन येणार वाटतं. "
सायली, " ह्म्म्म, " ती रियाला गोळ्या देते खायला..
..... क्रमश....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा