Login

गर्ल्स हॉस्टेल... भाग -13

अनामिका चं वागणं सोनियाला सौंशयास्पद वाटतं...

भाग -13.



सोनाली आजूबाजूला पाहते, पूर्ण हॉस्टेल ची लाईट गेली होती.

सोनाली, " यार,, आज हॉस्टेल ची लाईट कशी गेली ? "


अनामिका, "अगं एक काम करते मी खाली डिन मॅडम ला भेटून येते, कशी लाईट गेली ते पाहते. कदाचित फ्युज उडाला असेल ?"


सोनिया, " ओके तू जा, जाऊन बघ. " सोनिया अनामिका ला बोलते.


अनामिका खाली जाते. काही वेळ गेल्या नंतर लाईट येते.

सोनाली, " हुश्श,,, आली बाबा. नाहीतर गर्मीत झोपावं लागलं असतं. "


बराच वेळ झाला लाईट येऊन, पण अनामिकाचा काही पत्ता नव्हता.

सोनाली, " यार ही लाईट बघायला गेली की लाईट आणायला गेली काही कळतं नाही ? "


सोनिया, " मी पाहून येते ही कुठे गेली ते. " असं बोलून सोनिया खाली तिला पहायला जाते. बराच वेळ होतो सोनिया पुन्हा रूममध्ये येते.


सोनाली सोनिया ला पाहून विचारते, " काय गं हे काय अनामिका ला आणायला गेलेलीस ना ? मग अशी एकटी आलीस ती ? "


सोनिया बेडवर बसते आणि जोराचा लांब श्वास घेते, " काय ही अनामिका, नक्की गेली कुठे ? आणि पूर्ण हॉस्टेल पालथ घातलं कुठेच सापडली नाही ही पोरगी. "


तितक्यात अनामिका येते. तिच्या हाताला धूळ लागलेली असते. सोनिया आणि सायली तिच्या कडे निरखून पाहतात. त्यांना अनामिकाचं वागणं जरा विचित्र वाटतं.


सोनिया, " अनु, तू नक्की गेलेलीस कुठे ? "


तितक्यात सोनाली मध्येच बोलते, " हो यार किती शोधलं तुला, गेलेलीस कधी आणि आता तू येतेस? "


सोनिया तिच्या जवळ जाते.तिचा हात हातात घेते, " हे काय, ही धूळ कशी हाताला? नक्की लाईटचं काम करायला गेलेलीस की...? "


अनामिका, " अगं येडू असं कसं विसरलीस की काय ? मी लाईट चं काम बघायला गेलेली."


सोनियाला अनामिका वर एक वेगळाच सौंशय येतो. पण नक्की काय असेल ह्याचा अर्थच लागत नव्हता.


सोनाली, " सोनिया आणि अनु रात्रीचे अकरा वाजले आहेत. आता झोपा तरी. "


अनामिका वॉशरूम ला जाते. सोनिया सोनालीला प्रश्न करते, " सोनाली तुला अनामिकाचं वागणं विचित्र दिसतं नाही आहे का ? "


सोनाली, " नाही का गं ? काय वाटतं तुला ? "


सोनिया, " तेच काही कळायला मार्ग नाही ना ? "


सोनाली, " रियाचं असं झाल्यापासून तू खूप विचार करायला लागली आहेस ? "


तितक्यात अनामिका फ्रेश होऊन बाहेर येते. ती सोनिया आणि सोनालीच बोलणं ऐकते., " काय कोण कसला विचार करतोय ? "


सोनाली, " अगं ही आपली मॅडम सोनिया, तिला सगळ्यांची काळ्जी पडलेली असते."


अनामिका सोनियाच्या जवळ येते. तिच्या खांद्यावर हात ठेवते, " आपल्या सर्वांची दुसरी आई आहे ही. " आणि अनामिका जोर जोरात हसू लागते.


सोनाली, " ओह्ह वेडाबाई झोपा आता. उशीर झाला आहे . "


सोनाली, सोनिया आणि अनामिका झोपून जातात. रूममध्ये थोडा फार काळोख असतो. मध्येच रियाला जाग येते. ती दचकून जागी होते. तिला रूमच्या बाल्कनीतून पळत गेल्याचा भास होतो.


रिया, " कोण आहे.. कोण आहे... " ती हळूच उठते. आणि दबक्या पावलाने ती बाल्कनीत वाकून पाहते. तिला अमित सारखी सावली दिसल्याचा भास होतो.


ती पटकन जाऊन बेडवर बसते, " हे कसं शक्य आहे. मला नक्कीच भास होतो आहे. अमित कसा दिसेल मला, तो तरं मेला आहे ना. "


तेवढ्यात अनामिकाला जाग येते. तिला रियाच हे असं वागणं बघवत नसतं. पण नाईलाज असतो. रियाला समजावण्याशिवाय बाकी आपण काहीच करू शकत नाही ह्याची खंत अनामिकाच्या मनात असते.


सकाळ होते...सकाळी सकाळी डिन मॅडम चा फोन येतो... सोनिया फोन घेते.


सोनिया फोन वर, " हॅल्लो मॅडम गुडमॉर्निंग...!"


डिन मॅडम, " कोण सोनिया का..? गुडमॉर्निंग.. तुम्ही आज चौघी पण पिकनिक ला येणार नाही आहे का...? "


सोनिया फोन वर, " नाही मॅडम शक्य नाही, कारण रियाची तब्येत ठीक नाही आणि त्या मुळे कोणालाच यायला जमणार नाही. माझं ही ऑफिस आहे. "


डिन मॅडम, " बरं बरं, तुम्ही चौघी हॉस्टेल वर आहात काही गोंधळ घालून ठेवू नका.. आम्ही आज जाऊन उद्या परत येऊ. "


सोनिया फोन वर, " ठीक आहे मॅडम... " आणि सोनिया फोन ठेवते. आणि फ्रेश व्हायला ती वॉशरूम मध्ये जाते.


काही वेळात ती फ्रेश होऊन बाहेर येते. अनामिका बाल्कनीत चहा चा घोट घेत उभी असते.


सोनिया अनामिकाला लवकर उठलेलं पाहून, " गुडमॉर्निंग डिअर, आज लवकर उठलीस ? "


अनामिका, " हो थोडी फार कामे शिल्लक आहे म्हटलं करून घेऊया...!"


सोनिया, " आजचा काय प्लॅन..? पिकनिक जाते आहे दुपारी, माहित आहे ना ? "


अनामिका च्या डोक्यात कसला तरी भलताच विचार चालू होता, "हो माहित आहे ना विसरेन कशी..!"


सोनिया, " बरं चल मी जाते ऑफिस, लवकरच येईन... "


अनामिका, " बरं ठीक आहे."

रियाला जाग येते. रिया उठून बसते तिच्या डोक्यात कालचाच विचार चालू होता. अमित बद्दल.


सोनिया रियाला उठलेलं पाहून, " हेय गुडमॉर्निंग, कसं वाटतं आहे तुला ? "


रिया, " ठीक, ऐक ना मला कॉफी भेटेल का गरम ? डोकं जरा जड वाटतं आहे. " डोक्याला हात लावत बोलते.


सोनिया, " हो त्यात काय, मी अनामिका ला सांगते. ती देईल करून तू पड ना तो पर्यंत.. "


रिया, " नाही नको.. "

सोनिया अनामिका ला कॉफी बनवायला सांगते.


अनामिका कॉफी आणून देते रियाला.रिया कॉफी पिते, ती सारखी शून्यात पाहत असते. अनामिका मुद्दामच तिच्या पुढ्यात विषय काढायचा ठरवते.


अनामिका, " रिया.. कसं वाटतं आहे तुला ? "


रिया, " ठीक.. " रियाच उत्तरं समाधान कारक नसतं.

तिच्या उत्तरातसुद्धा भीती लपलेली होती. रियावर बलात्कार होऊन एक महिना झाला होता.


अनामिका, " बरं, आज आपल्या हॉस्टेलची पिकनिक जाते आहे. "


रिया, " म्हणजे तुम्ही तिघी ही जाणार आहात का ? "


अनामिका, " नाही गं, हॉस्टेल च्या आपण चौघी सोडल्या तरं बाकी सगळ्या जणी जात आहेत. "


रियाला अनामिकाच उत्तरं ऐकून जीवात जीव येतो.



.. क्रमश....

























0

🎭 Series Post

View all