Login

गर्ल्स हॉस्टेल.... भाग -15

अमित चा खून झालेला कळतो

भाग -15



तितक्यात अनामिकाला रियाच्या किंचाळण्याचा आवाज येतो.

अनामिका त्या आवाजाच्या दिशेने जाते.


अनामिका रियाला आवाज देत, " रिया... कुठे आहेस तू... "


तितक्यात हॉस्टेल च्या एका बंद रूम मधून आवाज येतो.

अनामिका रूमच्या बाहेरून रियाला आवाज देत, " रिया.. तू आत आहेस का... रिया.. " तितक्यात रिया धावत बाहेर येते.


रिया, " मी बोलली होती ना.. तो आहे तो माझा पाठलाग करतोय... "


अनामिका, " कोण तो ? तू शांत हो आधी...!"


अनामिका मोबाईल च्या टॉर्च ने त्या आत रूममध्ये जाते. तितक्यात तिला पायाखाली कोणीतरी असल्याचं जाणवत.. ती त्या टॉर्च चा उजेड खाली जमिनीवर मारते. तरं खाली एका पुरषाची डेडबॉडी सापडते...


अनामिका, " आई गं... सोनिया... सोनाली..." ती जोरजोरात आवाज देते. अनामिका डेडबॉडी पाहून घाबरते.


रिया, " मी म्हटलेलं ना तो आलाय ? तो नाही सोडणार मला ? " आणि रिया रडू लागते.


अनामिका तिला शांत करते, " रिया,, रिया,, भानावर ये..तू नको घाबरूस आम्ही आहोत ना ? "


रिया, " मी मारलं त्याला,, मी मारलं,, आता काही खरं नाही सगळ्यांना कळणार... " आणि रिया स्वतःच्या कांशिलात मारून घेते.


तितक्यात सोनिया आणि सोनाली पाठून येतात.

सोनाली डेडबॉडी पाहून जोरात किंचाळते. अनामिका तिला शांत व्हायला सांगते.


सोनिया, " यार काय ओरडतेस, काय झालं ? "


सोनाली तिला जमिनीकडे बोट करून दाखवते आणि डोळे घट्ट मिठून घेते.


सोनिया, " अनु यार हे काय आहे, आणि कोण आहे हा ? " तिला ते सर्व पाहून शोक बसतो. तिला विश्वासच बसत नाही. 


अनामिका, " मी ही आत्ताच पाहिली, मला ही काहीच कळतं नाही आहे..? "


रिया, " मी मारलं ह्याला... मी मारलं... " आणि वेड्या सारखी हसू लागते.

सोनियाला रियाच वागणं सौंशयस्पद वाटतं.


सोनाली, " काय बोलते आहे ही...? मी मारलं म्हणजे..?"


अनामिका, " ती भानावर नाही आहे.. मी आल्यापासून ती असंच काहीसं वागत आहे. "


सोनिया, " हा खून केला आहे, पण कोणी ? " ती अनामिका आणि रिया कडे पाहते..


अनामिका, " तू आमच्याकडे का अशी बघते ? आम्हाला सुद्धा आता चं कळालं आहे. "

सोनिया आणि अनामिका मध्ये थोडे फार वादावाद होतात.


रिया, " मी मारलं त्याला मी मारलं.. " रिया पुन्हा वेड्यासारखं बरळते...


अनामिका, " रिया,, रिया,, शांत हो.. भानावर ये बरं.. "

अनामिका रियाला समजावत बोलते.


सोनाली, " आधी इथून चला, मला ही डेडबॉडी पाहून खूप भीती वाटतेय..!"


त्या चौघी ही रूम मध्ये जातात. रात्रीचे आठ वाजलेले असतात. काही वेळ त्या चौघी शांतच बसलेले असतात.

मग सोनिया बोलते, " हा कोण ? आणि कुठून आला तेही आपल्या हॉस्टेलमध्ये ? "


सोनाली, " हॉस्टेल मध्ये यायला तरं मुलांना बंदी आहे ना ? मग कसं शक्य आहे ? "


सोनिया, " आज हॉस्टेल वर फक्त रिया होती, मग रिया ने मारलं का त्याला ? " ती रियाकडे पाहून बोलते.


अनामिका, " कशावरून रियानेच मारलं असेल त्याला ?"


सोनिया, " का शक्य नाही. आज फक्त आणि फक्त रियाच हॉस्टेलवर होती आणि ती सारखं एकच बोलते आहे. मी मारलं... मी मारलं...!"

सोनिया चिडून बोलते.


सोनाली, " थांब रिया अशी नाही बोलणार, मीच तिला बोलत करते. " असं बोलून सोनाली रिया जवळ जाते.


रिया, " तो कधीच मेला आहे, मीच मारलं त्याला.. " आणि रिया जोर जोरात हसू लागते.


सोनाली रिया च्या एक कानाखाली देते, आणि तिला शुद्धीवर आणते. भानावर आणते.

" कोणी मारलं सांग, तूच केला आहे ना हा खून,, बोल रिया. नाही तरं तुझ्यामुळे आम्ही तिघी सुद्धा प्रॉब्लेममध्ये येऊ... कळतंय का तुला ? " सोनाली जिवाच्या आकांताने तिच्याशी बोलत होती.


अनामिका, " मी केला आहे खून, मी मारलं त्याला.. " अनामिका मध्येच बोलते.


सोनिया, सोनाली आणि रिया तिच्याकडे पाहतात.

सोनिया, " काही ही काय बोलतेस ? तू का बरं हे करशील ? " सोनिया ला शोक लागतो ऐकून.


सोनाली, " रियाच ने केलेल्या खुणाच खापर तू स्वतःवर का घेते आहेस ? "


सोनिया, " आम्हाला विश्वास नाही..!" सोनिया तिच्यावर विश्वास ठेवायला नकार देते.


रिया तिच्या जवळ जाते, तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलते, " माझ्या हातुन झाला आहे खून तुझ्या नाही..!"


अनामिका, " तो हॉस्टेलवर आला होता.. आणि तुला जी गाडी खाली दिसली तेही तितकंच खरं आहे. "

रियाला त्याचं बोलणं ऐकून शोक लागतो.


सोनिया, " नक्की काय चाललं आहे तुम्हां दोघींचं..? "


रिया, " सांगते... माझ्यावर बलात्कार झाला ही गोष्ट तुम्हा तिघींना ही माहित होती ना ? "


सोनाली, " हो,, आणि म्हणून आम्ही ही गोष्ट डिनला सुद्धा सांगितली नाही. "


रिया हात जोडून बोलते, " त्यासाठी खरचं थँक्स.. ज्याची डेडबॉडी तुम्हाला दिसली आता ती अमित सरपोतदार ची आहे. "


सोनिया, " अमित म्हणजे तो गाडीवाला... "


रिया, " हो तोच, त्याची नि माझी भेट ही आमच्या ऑफिस जवळची, काहीच महिन्यांची. त्यानंतर एकदा भावनेच्या भरात माझं नि त्याचं रिलेशन झालं.. त्या नंतर अनेकदा तो मला ब्लॅकमेल करू लागला. आणि ?"


सोनाली, " आणि काय...? "


रिया, " आणि मग रात्री तो मला एका बंगल्यावर घेऊन गेला आणि माझ्यावर कुत्र्यासारखा तुटून पडला.. आणि मग मी जेव्हा स्वतःला वाचवण्याची धडपड करत असताना चुकून माझ्याकडून तो मारला गेला.. हातात जे सापडलं ते मी त्याच्या डोक्यात घातल.. आणि तिथून पळाली... "


सोनिया, " मग हा जिवंत कसा होता ? "सोनिया शांतपणे रियाला विचारते.


रिया," माहित नाही, मी जेव्हा त्याला मारलं तेव्हा माझ्या डोक्यात हाच विचार होता की तो मेला आहे.. पण नंतर हा इथे कसा आला आणि आता कशी त्याची डेडबॉडी सापडली हेच नाही कळतं मला ? "


अनामिका, " खेळ इथेच संपला नव्हता, तो जिवंत होता आणि त्यानंतर तो रियाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून हॅरेस करत होता... "


रिया, " तुला कसं कळालं हे...? " रिया ला शोक बसतो.


सोनिया आणि सोनाली, " हो... यार... "


सोनिया, " बरोबर बोलते आहे रिया.. तुला हे कसं कळालं..? "



क्रमश....

0

🎭 Series Post

View all