Login

गर्ल्स हॉस्टेल... भाग - चौथा

रिया अनोळखी नंबर ने कॉल आल्यामुळे खूप घाबरते...

भाग -4 


अनामिका, " हो आणि त्यात ही रूमची लाईट जर हिटलर ला चालू दिसली, तरं काय आपलं खरं नाही... "

शामपेन चा पॅक घेत अनामिका बोलते..


रिया, " नाही तरं काय, चौघीना उभं करेल आणि गोळ्या घालेल...!"


अनामिका, " मी काय बोलते.. जर हिला कोणी किडन्याप केलं तरं हॉस्टेल सुखी होईल आपलं... "


सोनिया, " ह्या हिडंबेला कोण किडन्याप करेल ? ही जर कोणावर बसली तरं त्या बिचाऱ्याचा जीव जाईल गं... " आणि त्या चौघी जोर जोरात हसू लागतात...


सायली, " शु... ऐकेल ती... "

सगळ्यांना शांत करत बोलते...


तितक्यात रूमचा दरवाजा कोणीतरी जोरात थोठावत..

चौघी सुद्धा घड्याळात पाहतात. रात्रीचे एक वाजलेला असतो... अनामिका दरवाजा खोलायला उठते.. तितक्यात रिया तिला अडवते...


रिया, " थांब अनु, कशाला उघडते... आता ह्या वेळेला कोण असेल काय माहित ? "


अनामिका, " अगं हिटलर असेल, अजून कोण असणार आहे..? " अनामिका तिला समजावत बोलते.


सोनिया ला रियाच्या बोलण्याचं आश्चर्य वाटतं.

अनामिका " तू थांब मी उघडते दार.. " असं बोलून अनामिका दार उघडते.. पण दारात कोणीच नसतं. ती बाहेर वाकून पाहते पण दूर दूर पर्यँत कोणीच दिसतं नसत.


सोनिया, " काय गं कोण आहे...? "

सोनिया अनामिका ला विचारते..


अनामिका, " अगं कोणी नाही दिसतं, कदाचित मांजर असेल.. "

असं बोलून अनामिका दरवाजा लावते..


रिया, " कोण होतं ? "

रिया घाबरत घाबरत अनामिका ला विचारते.


अनामिका, " डोन्ट वरी कोणी नाही... "


रिया, " ओके..."

ती चेहऱ्यावरील घाम फुसते, आणि वॉशरूम मध्ये जाते.


अनामिका सोनाली ला बोलते, " हिला काय झालं, घाबरायला ? "


सोनाली, " माहित नाही, पण...!"


सायली, " अरे तुम्ही पाहिलं नाही का.. एक कॉल आला नि ती घाबरली ते..!"


अनामिका ला तिचं म्हणणं पटत. त्या विचारात पडतात. नक्की काय झालं असेल ह्याचं.


सोनाली बोलते, " मी विचारू का तिला..? "

ती काळजीने बोलते...


अनामिका, " विचारलं तरी ती सांगणार नाही, आपण काही सध्या विचारायला नको. ती स्वतः सांगेल आपल्याला. "


सोनिया, " बरोबर बोलते आहे अनु..मला तरी असंच वाटतं आहे. "


तितक्यात रिया वॉशरूम मधून फ्रेश होऊन बाहेर येते.

त्या तिघी सुद्धा रियाच्या तोंडाकडे पाहत असतात. तिचे डोळे कदाचित रडुन रडुन लाल झाले असावे. म्हणून ते सुजलेले दिसतं होते.


सोनाली तिला काळजीने विचारते, " तू ठीक आहेस ना..? काही टेन्शन तरं नाही ना..? "


रिया तिची आणि मनाची समजूत घालत बोलते, " हो गं, सगळं ठीक आहे. ते जरा ओव्हर झाली असेल म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटतं असेल.!"


अनामिका तिच्या कडे पाहत बोलते, " ओके ओके.. चला आता झोपायला चला. एक वाजून गेला."


रात्रभर रिया आलेल्या कॉल बद्दल विचार करत असते.


सकाळ होते... कालच्या पार्टी मुळे जी ती लेट उठते.

तितक्यात सोनिया ला जाग येते.


सोनिया गडबडून उठते, " अरे यार... वाजले किती ? शीट sss नऊ वाजले... ओह्ह्ह नो...!"

सोनिया स्वतःशीच बडबडते...


अनामिका ला जाग येते सोनिया च्या गडबडीमुळे, "यार सोनिया नको ना, आदळाआपट करुस.. झोपू दे ना...!"

ती झोपेतच बडबडते...


सोनिया, " सॉरी सॉरी... यार लेट झाला आहे खूप...!"


अनामिका झोपेतच बोलते, " असुदे झोप परत आराम कर.. "


सोनिया, " काहीही... " ती आवरायला घेते आणि बॉस ला मॅसेज करते... उशीर होईल याचा...


तितक्यात सोनियाच लक्ष जातं रिया तिच्या बेडवर नसते.

सोनिया स्वतःशीच बोलते, " यार सकाळी सकाळी ही गेली कुठे ?"

ती रिया ला कॉल ट्राय करते. पण मोबाईल बंद लागतो.


सोनिया सायली ला उठवते, " सायली यार उठ की, रिया तिच्या बेडवर नाही आहे ? उठ की.. "


सायली झोपेतच बोलते, " यार ती असेल इथेच कुठे, झोपू दे ना... "


सोनिया पुन्हा तिला उठवते, " नाही तू उठ.. " पण सायली काही उठेना..


सोनिया रूमच्या बाल्कनीतून बाहेर वाकून पाहते. तरं रिया खाली गार्डन मध्ये बसलेली असते. रिया ला पाहून सोनियाचा जीवात जीव येतो.


सोनिया, " नशीब, एकतर काल ती खरचं कोणत्या तरी टेन्शन मध्ये असावी... काय ते नीट कळालं नाही. " सोनिया स्वतःशीच मनातल्या मनात बोलते.


सोनिया फ्रेश होऊन बाहेर येते, तितक्यात रिया रूमच्या आत येते.

रिया, " हेय गुडमॉर्निंग.. " रिया तिला हसत हसत विष करते.

सोनियाला आश्चर्यचं वाटतं रियाकडे पाहून.


सोनिया, " गुडमॉर्निंग, तुला किती शोधल मी. दिसली नाही म्हणून ? "


रिया, " सकाळी सकाळी मुड झाला सो म्हटलं वोक ला जाऊ, आणि तुम्ही झोपलेलात. मला वाटलं तू आज ऑफिस नाही जाणार..? "


सोनिया, " जावं लागेल काम भरपूर बाकी आहे त्यामुळे.. " ती चहा बनवायला जाते.


चहा बनवून ती बाहेर बाल्कनीत येते. रिया नि सोनिया चहाचा घोट मारत बाल्कनीत उभे असतात.


रिया, " कालची पार्टी मस्त झाली ना ? "


सोनिया, " हो तरं... बट नंतर तुझा मुड का गेला..? "

सोनिया चा प्रश्न ऐकून रिया हसते...


रिया, " अगं ते जरा मला लागली होती ना..!"


सोनिया, " लागली होती तरं ठीक आहे बाकी काही नाही ना ? "


रिया, " बाकी काय असणार..? आणि ते माझ्या मुलीची आठवण आली ना म्हणून... "


सोनिया, " ओके ओके.. बरं चल मला ऑफिस जायचंय बोलू नंतर... "


रिया तिला पटकन मिठी मारते. रियाच्या डोळ्यांतून पाणी येत..



क्रमश....


0

🎭 Series Post

View all