....... भाग -6
वरतून रूमच्या गॅलरी मधून अनामिका पाहते, " हे काय रिया कोणाच्या कार मधून गेली ? " अनामिका स्वतःशीच बोलते.
तितक्यात सायली येते, " काय गं काय झालं..? अशी एकटीच काय बडबडते."
अनामिका, " अगं बघ ना. ही रिया कोणाच्या तरी कार मधून गेली..!"
सायली, " खरचं, आपल्याला बोलली नाही ते कधी...? "
अनामिका, " तेच ना.. मला ही आश्चर्य वाटलं ह्या गोष्टीच.. आणि सहज पाहिलं म्हणून..!"
सायली, " ह्म्म्म, "
तितक्यात सोनिया घरी येते, " हे काय आज बाल्कनीत पार्टी आहे का..? "
सायली, " नाही गं,, आम्ही ते रियाला पाहत होतो..!"
सोनिया, " रिया ला.. का गं..? समजलं नाही मला. "
अनामिका, " अरे ती आता कोणाच्या तरी कार मधून गेली..!"
सोनिया, " अगं ऑफिस ची असेल, तिला पिकअप साठी आली असेल..!"
सायली, " तुझं पण बरोबर आहे.. तसं काही असतं तरं ती आपल्याला बोलली असती.. "
तरी अनामिकाला सोनिया आणि सायलीच म्हणणं पटत नव्हतं. तिच्या मनात एक वेगळाच विचार येत होता. कदाचित तिचं अफेर असेल किंवा अजून काही. पण तसं काही असतं तरं तिने हे आमच्या पासून लपवलं का ? आणि तिच्या वागण्यातून ते स्पष्ट जाणवलं ही असतं.
तितक्यात रूमच्या फोनची बेल वाजते. सायली फोन उचलते. समोरून डिन मॅडम असतात.
डिन मॅडम, " कोण बोलतंय ? सायली का ? "
समोरून सायलीचा आवाज ऐकून डिन मॅडम बोलतात.
सायली, " हो मॅडम, सायलीचं बोलत आहे..! बोला ना. "
डिन मॅडम चा आवाज जरा चढलेला होता.
डिन मॅडम, " तुमच्या तिघींपैकी एकीने खाली माझ्या ऑफिस ला या.. लगेच.. "
सायली, " ओके " बोलून कॉल ठेवते.
सोनिया, " काय गं काय झालं ? हिटलर काही बोलली का ? "
सायली, " नाही यार, लोचा झाला. तिने ऑफिस ला बोलावलं आहे. कदाचित कालच्या पार्टीचं कळालं तरं नाही ना तिला ? " सायली डिन च्या कॉल ने जरा घाबरलेली असते.
अनामिका, " यार जाऊन तरं बघ त्याशिवाय कळणार कसं आपल्याला. "
सायली, " बरोबर बोललीस तू..!"
सायली डिनच्या कॅबिन मध्ये जाते.
सायली, " आत येऊ मॅडम ? "
डिन, " हो येस प्लीज कम सायली..!" सायली आत जाते.
डिन मॅडम ला कळतं की सायली घाबरली आहे ते.
सायली, " काय झालं मॅडम ? तुम्ही बोलावलं होतं ना ?"
डिन, " मी सक्त ताकीद देऊन सुद्धा तुम्ही तुमचे पर्सनल मॅटर हॉस्टेल पर्यँत आणतात. "
डिन मॅडम जरा हटकूनच बोलली.
सायली, " कोणाचे पर्सनल मॅटर, मी समजली नाही. आणि मी माझा कोणताच मॅटर हॉस्टेल पर्यँत आणला नाही मॅडम. " सायलीचा मॅडम च्या प्रश्नाने गोंधळ उडतो.
डिन, " मी आज रिया ला पाहिलं..? बरोबर आहे का..? "
डिन मॅडम चा आवाज चढतो..
सायली, " मला नाही माहित मॅडम, आता तुम्ही बोलत आहात तेव्हा कळालं मला. "
डिन, " तुम्ही मुली एकत्र राहता आणि तुला काही माहित नाही ? "
डिन मॅडम चा पारा चढतो.
सायली, " मी रिया ला समजावून सांगते, पुन्हा असं नाही होणार. " आणि सायली तिथून निघून जाते..
सायली रूम मध्ये पोहचते.
अनामिका तिला विचारते, " काय झालं ? काय बोलली हिटलर ? "
सोनिया आणि अनामिका तिच्या तोंडाकडे पाहतात.
सायली शांतपणे येऊन बेडवर बसते.
सोनिया, " यार सायली बोल तरी काय बोलली हिटलर ?"
सायली शांतपणे बोलते, " यार हिटलर ला रिया बद्दल कळालं आहे.!"
सोनिया, " म्हणजे नक्की काय ? "
सायली, " हेच की तिला हिटलर ने पण पाहिलं त्या कार मधल्या माणसासोबत.. "
अनामिका, " अरे यार... " ती डोक्याला हात लावते.
सोनिया, " आता काय करायचं ? ती रिया ला काढून तरं नाही ना टाकणार ? "
सायली, " ती काय काढेल... नाही ना त्या हिटलर ला बरोबर केली तरं नाव नाही लावणार... "
अनामिका, " हे बघा आपण आधी रियाशी बोलू मग ठरवू... "
अनामिका शांतपणे बोलते.
रिया ऑफिस ला पोहचते.. पण तिचं ऑफिस ला मन लागत नसतं.
अमितचा तिला कॉल वर कॉल असतात. रिया कॉलसेन्टर ला कामाला असते . बाहेर गावाच्या कॉल सेंटर शी तिचं काम चालू असतं. जास्त करून तिच्या नाईट शिफ्ट असतात. आणि रात्रीच्या वेळेस तिला पगार ही चांगला होता. त्यामुळे तिला तिच्या मुलीचा खर्च सहजतेने निघतो.
रिया चा डिवोर्स होऊन पाच वर्ष उलटलेली असतात.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा