भाग -7
पाच वर्षात रियाच्या आयुष्यात बरंच काही बदलेलं असतं.
आणि त्यात तिला अमित सरपोतदार भेटतो.. आणि त्याच्याशी रियाचे अनैतिक संबंध चालू होतात. रियाला जेव्हा गरज होती तेव्हा अमित शी तिचे संबंध आले. पण मात्र अमित ने तिला आता ब्लॅकमेल करायचं ठरवलं. पण आता रियाला मात्र अमित हा नकोसा होता.
अमितचा कॉल येतो, " फ्री आहेस ना आज ? मी रूम बुक केला आहे. " अमित ला रियाशी संबंध हवे होते आज.
रिया अमित च्या बोलण्याने खूप अपसेट असते, " हे बघ अमित मला नाही जमणार आज. माझा मुड ही नाही आहे. आणि काम सुद्धा जास्त आहे. प्लीज...!"
अमित रियाच बोलणं ऐकून खूप चिडतो, "तुला माहित आहे ना, मला नाही ऐकायला आवडत नाही ? सो तुझी नाटक बंद कर..!"
रिया ही त्याच्यावर चिडते, "हॅल्लो तू माझ्यावर जबरदस्ती करू नाही शकत समजलं..!"
अमित, " अच्छा आवाज वाढलेला दिसतो आहे.!"
रिया, " हो वाढवणार आवाज, तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही.!"
अमित हसतो, " पोकळ धमकी नाही आहे, सत्यात सुद्धा उतरू शकते ही पोकळ धमकी..!"
रिया त्याचं बोलणं ऐकून कॉल कट करते. रात्रीचे बारा वाजलेले असतात. पुन्हा रियाला अमित चा कॉल येतो.
ती कॉल कट करते. पुन्हा तो तिला कॉल करतो. पुन्हा ती तसंच कॉल कट करते.
मग अमित तिला मॅसेज टाकतो, " तू जर आज नाही आलीस तरं मी उद्या सकाळी तुझ्या हॉस्टेल वर पोहचेल.!"
नाईलाजाने रिया शिफ्ट मधून काही तसा भराची लिव घेऊन निघते. ती ऑफिस खाली येते. अमित ची कार तिच्या ऑफिस खालीच असते. अमित ला पाहून तिचा राग अनावर होतो.
रिया, " हे काय तू ऑफिस खालीच होतास ? "
ती त्याला भडकून विचारते.
तो कार चा दरवाजा उघडतो. तिला गाडीत बसायला सांगतो.
अमित, " हो, कारण मला माहित होतं तू मॅसेज पाहून नक्की येणार... " आणि तिच्या गालाला स्पर्श करतो.
रिया त्याचा हात झटकत बोलते , " चूक झाली तुला भेटली ते..!"
अमित गाणं गुणगुणत गाडी चालू करतो, " तू प्रेमाने वागलीस तरं मीही प्रेमाने वागेन.. माय डार्लिंग...!"
रिया, " शी.. प्लीज तू माझा पाठलाग सोड.. हात जोडते.. "
अमित ची गाडी काही वेळाने एका बंगल्याजवळ येऊन थांबते..अमित गाडीचा दरवाजा उघडून बाहेर येतो. तो रियासाठी गाडीचा दरवाजा उघडतो.
अमित, " बाहेर ये..!" तरी रिया बाहेर यायला तयार नसते.
अमित पुन्हा बोलतो, " बाहेर ये, मला ओरडायला लावु नकोस..!"
रिया बाहेर येते., " हे काय कुठे आणलं आहेस मला ?"
आजूबाजूचा काळोख आणि घनदाट जंगल पाहून रिया त्याला विचारते.
अमित, " माझ्या बंगल्यात ! " अमित तिला हाताला धरून आत घेऊन जातो. रिया हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करते.
अमित तिला खेचत खेचत बंगल्यात घेऊन जातो. बंगला हा आतून आवाढव्य मोठा असतो. बंगल्यात निव्वळ शांततेशिवाय काही नसतं. तो बंगल्याचा दरवाजा लावतो. दरवाजातून किर किर आवाजा शिवाय कसलाचं आवाज नसतो..
तो तिला पाठून गच्च मिठी मारतो. तिच्या कमरेला कसून धरतो..
रिया पटकन पाठी वळते, " हात लावु नकोसं मला..!"
अमित तिचं काही एक ऐकत नसतो. ती त्याच्या पासून लांब पळत असते. तो तिच्या तितकंच जवळ जात असतो.
रिया स्वतःला त्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी वरच्या रूमला पळते. तिला एक बंद खोली दिसते ती दरवाजा खोलून आत पळते. आणि दरवाजा लावून घेणार इतक्यात अमित त्याच्या ताकदीने दरवाजा जोरात ढकलतो.
रिया धक्का लागून बेडवर पडते. ती स्वतःला वाचवण्यासाठी धडपडते तेव्हा अमित तिचा एक पाय घट्ट धरतो, " मला वाटलेलंच तू सहजासहजी ऐकणार नाही. "
रिया रडत रडत म्हणते, " प्लीज मला सोड, मला जाऊदे..!"
अमित, " नाही देणार जाऊ, तुला असंच नाही सोडणार.. "
रिया जोर जोरात ओरडते, " वाचावा मला वाचावा प्लीज.. " ती मदतीसाठी आवाज देते.. पण आजूबाजूला इतक्या रात्री कोणी ही नव्हतं आणि येणार ही नव्हतं.
अमित तिच्या अंगावर अनेक स्पर्श करतो, तिचे लचके तोडतो.. रिया त्याला ढकलते आणि दरवाजा खोलायला धावते.. अमित तिला जोरात खेचतो.. ती अतिशय धडपडत असते. तिचा झाटापटीत ड्रेस ही फाटतो. ती बाजूला पडलेल्या मोठ्या रॉड ने त्याच्या डोक्यात वार करते. अमित जमिनीवर पडतो. रिया त्याच्या जवळ जाते. तो बेशुद्ध पडतो. त्याच्या डोक्यातून हळू हळू रक्ताची धार वाहते...
ती अतिशय घाबरलेली असते, ती तिथून कशीबशी बंगल्याच्या बाहेर येते. रात्रीचे तीन वाजलेले असतात.
ती कशीबशी हॉस्टेल जवळ पोहचते. तिच्या लक्षात येत की अमित मेला तरं नसेल ना..?
ती खूप घाबरते, हॉस्टेल चा दरवाजा वाजवते. हॉस्टेल चा वॉटचमन दरवाजा उघडतो.
वॉटचमन तिला पाहून जरा घाबरतोच, " रिया ताई काय झालं, इतक्या घाबरल्या का आहात ? " तिला पाहून तो विचारतो.
रिया, " काही नाही दादा ते.." असं बोलून रिया निघून जाते.
रिया रूमजवळ पोहचते. तिच्या कडच्या बॅगेत असलेल्या किल्लीने ती हळूच दार उघडते. आणि आत जाते. घड्याळात पाहते तरं पहाटेचे चार वाजलेले असतात.
ती तींघीवर एक लक्ष घालते. तिघी पण गाढ झोपेत असतात. ती हळूच वॉशरूम मध्ये जाते फ्रेश होऊन ती बेडवर झोपते. तिला कळतं नसतं की पुढे काय ? अमित जिवंत असेल की मेला..?
.... क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा