भाग -3
सायली ही गावातून आलेली. आई वडील आणि एक मोठा भाऊ अशी तिची फॅमिली होती. गरीब कुटुंब वडिलांची शेतीवाडी होती. आणि शिक्षण उरकून मग जॉब करायचा म्हणून ती इथे मुंबईत आलेली. शिक्षण सध्या चालू आहे. मुंबईची हवा तिला चांगलीच लागली होती.
सायली , " यार ती हॉस्टेलची हिटलर आहे म्हणून सहन करावं लागत.. "
रिया, " बरोबर आहे. नाही तरं हिला खपून घेतली नसती.. "
सायली बोलते, " जाऊदे, हिच्या मुळे आपला मुड कशाला खराब करायचा.. पार्टीची तयारी करूया. "
... रात्र होते मस्त चौघी मिळून पार्टीच्या तयारीत लागतात.
अनामिका ने मस्त पैकी फूडस, कोल्डड्रिंग, आणि शामपेन आणली होती.
अनामिका ला पार्टी म्हटलं की एकदम भारी वाटायचं.
सोनिया, " अनामिका तुला पार्टी बद्दल काही सांगायलाच नको...!"
अनामिका, " म्हणजे...? "
अनामिकाला सोनियाचा प्रश्न ऐकून गोंधळायला होतं.
सायली, " नक्की काय बोलायचं आहे तुला...? "
सोनिया, " म्हणजे तयारी इतकी चांगली केली आहे की विचारायलाचं नको...!"
सायली, " ओह्ह्ह्ह असं बोलना..!"
अनामिका, " कसं आहे ना पार्टी म्हटलं की तयारी ही चांगलीच झाली पाहिजे... नाही तरं त्या पार्टीची मजा काय येणार... "
रिया, " बरं अनामिका, तुला इतकं सगळं सामान घेऊन येताना हिटलर ने पाहिलं नाही ना ? "
सोनिया, " अरे हो की... नाही तिच्या नाकात वास गेला असणार.. "
अनामिका, " जस्ट चिल बेबी... नाही गेला मी आणलंच तसं... आता कसं आणलं हे नका विचारू... "
रिया, " ओके,,, "
अनामिका चौघींचे चार पॅक तयार करते. आणि ते सगळ्यांच्या हातात देते.
सोनिया पॅक चा ग्लास घेण्यास नकार देते., " यार अनु मला नको, मी नाही घेत माहित आहे ना...!"
अनामिका, " डिअर मला माहित आहे,, पण आजच्या दिवशी ट्राय तरं कर... "
रिया, " अरे हो सोनिया,, शेवटचं घे.. नाही टेस्ट बरी वाटली तरं नको घेऊस... "
सोनिया, " यार मला नाही जमणार... प्लीज... " आणि ती हातातला ग्लास खाली ठेवते...
सायली, " अरे यार सोड नाही बोलते ना ती मग नको, तुझ्यासाठी थंडा मागवू का..? "
अनामिका, " ओह्ह्ह मॅडम, त्याची काही गरज नाही.. मी आणला आहे. मला माहित आहे ती नाहीच घेणार. "
अनामिका फ्रिज मधून थंडा काढते आणि सोनियाच्या ग्लासात ओतते..
अनामिका, " घ्या मॅडम, आता तारो चिअर्स करा. " आणि अनामिका हसू लागते.
चौघी सुद्धा हातातल्या ग्लासाने चिअर्स बोलतात आणि ग्लास तोंडाला लावतात.... त्या रात्री अनामिका ला जरा जास्तच झाली होती...
रात्रीचे अकरा वाजतात.. तितक्यात रियाच्या मोबाईल वर एका वेगळ्या नंबर ने कॉल येतो...
अनामिका, " इतक्या रात्री कोणाचा कॉल वाजतोय..? "
रिया, " अगं माझा आहे.. मी बघते थांब..!"
असं बोलून रिया मोबाईलवर आलेला कॉल उचलते.
समोरून कॉल वर," हाय रिया तू फ्री आहेस का...? "
रिया मोबाईल घेऊन रूमच्या बाल्कनीत जाते..
रिया उत्तरं देते, " इतक्या रात्री का केला आहेस कॉल, आणि आपण उद्या बोलू मी आता जरा कामात आहे.!"
समोरून कॉल वर, " अरे यार जान, उद्या नाही आत्ताच.."
रिया पुन्हा त्याला बोलते, " सॉरी नाही..!"
रिया हळू आवाजात त्याच्याशी बोलते.
समोरून कॉल वर, " बरं तू कामात आहेस तरं मी, येतो तुझ्या हॉस्टेल जवळ.. पण तू आत्ताच बोल माझ्याशी..!"
रिया त्याचं उत्तरं ऐकून घाबरते, " तू ठीक आहेस ना.? इतक्या रात्री मी तुला नाही भेटू शकत.. बाय, "
असं बोलून रिया कॉल कट करते.
रिया खूप घाबरलेली असते. ती मोबाईल सायलेंट ला टाकते.. आणि पुन्हा ग्रुपमध्ये येऊन बसते.
पुन्हा तिला कॉल येतो. अनामिका चं लक्ष जातं, तिला कळतं की रिया काही तरी टेन्शन मध्ये आहे.
अनामिका, " काय गं, पॅक इतक्या लवकर लागला का..? "
रिया अनामिका चा प्रश्न ऐकून गोंधळते, " म्हणजे...? कळालं नाही मला..? "
अनामिका, " अगं हो हो.. किती घाबरतेस.. तुला घाम फुटला आहे ना, म्हणून म्हटलं... "
सोनाली, " अगं हो की..."
रिया, " अरे ते जरा गरम होतय ना.. फॅन सुद्धा स्लोव आहे... त्यामुळे.. " आणि ती चेहऱ्यावरील घाम फुसते..
पुन्हा तिचा कॉल वाजतो... ती कॉल कट करते..
अनामिका, " अगं तो कॉल तरं घे... "
रिया, " नाही नको..सोड ना पार्टी कशाला खराब करायची...!"
सोनिया काळजीने तिला विचारते, " काही प्रॉब्लेम तरं नाही ना..? "
रिया, " नाही गं, काही असेल तरं सांगेन मी...!"
रिया तिला समजावत बोलते....
सोनिया, " ओके ओके... "
अनामिका, " मी काय बोलते, आपण कुठे तरी फिरायला जाऊया का..? "
अनामिका डोक्यातली आयडिया सांगून त्यांच्याकडे पाहते..
सायली, " हा रे मस्त आयडिया आहे, पण कधी नि कसं..? "
सगळे विचार करतात..
सोनिया, " कसं शक्य आहे.. हिटलर नाही सोडणार.. चौघी ना एकत्र.. "
अनामिका, " हा यार, तस ही ती आपल्यावर लक्ष देऊन टपून आहे... "
रिया, " हो.. बरोबर आहे... बरं चला आवरा पटापट. किती वाजले पहा जरा..!"
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा