Login

देवा सोड गाभारा

Our World Is Sad God Come
कोठे आहेस देवा सांग
कोठे आहे तुझे बस्तान
सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित गाभारा
फक्त हेच आहे ना तुझे वसती स्थान

तुझ्यासाठी चंदनाचा देव्हारा
हार फुले चांदी सोनं
संगमरवरी तुझे मंदिर
जाणशी का किती दुःख बाहेर
उघड्यावरचा संसार
नाही पाणी, नाही भाकर
किती भूक किती तहान
पहा फुटतो का पाझर

तुझ्यासाठी होतो घंटा नाद
देव आहे की नाही
नेहमीच होतो वितंड वाद
दुःखितांच्या अश्रूंसाठी
तळमळतो का तुझा प्राण
फक्त एकदा,
बाहेर ये गाभाऱ्यातून
क्षमा मागशील, खजील होऊन