गोड नात्यांची वीण.... भाग 1
चॅम्पियन ट्रॉफी 2025
ऋतुजा वैरागडकर
चॅम्पियन ट्रॉफी 2025
ऋतुजा वैरागडकर
गावाकडच्या शांत वातावरणात माधवरावांचं घर होतं. घर जुनं होतं पण संस्कारांनी, प्रेमाने आणि परंपरांनी नटलेलं होतं.
माधवरावांचे दोन मुलं, समीर आणि अमित. मोठा मुलगा समीर नोकरीसाठी मुंबईला गेला होता, नुकतंच लग्न होऊन गावी परतला होता.
माधवरावांचे दोन मुलं, समीर आणि अमित. मोठा मुलगा समीर नोकरीसाठी मुंबईला गेला होता, नुकतंच लग्न होऊन गावी परतला होता.
नवीन सून स्वरा घरात आली. स्वरा सुंदर, हुशार, शहरात शिकलेली. तिच्यात एक आधुनिकता होती, पण मन मात्र साधं होतं.
सासू सुमतीबाई घरातल्या नियमांच्या फार कट्टर. देवपूजा, वेळेवर स्वयंपाक, पाहुणचार, शेजारीपाजाऱ्यांशी बोलणं सगळं ठरावीक चौकटीत रहायचं.
लग्नाच्या पहिल्या काही दिवसांत घरात गोडवा होता. सुमतीबाई सगळ्यांना सांगत होत्या,
"आमच्या घरात लक्ष्मी आली आहे. बघा, किती छान बोलतेय."
"आमच्या घरात लक्ष्मी आली आहे. बघा, किती छान बोलतेय."
स्वरालाही घरचं वातावरण नवीन असूनही आवडलं. पण काळ जसजसा गेला तसतसं छोटे–छोटे मतभेद व्हायला लागले.
एका दुपारी स्वरा थोडी थकलेली होती, थोडा वेळ ती झोपली. तेव्हा सुमतीबाई स्वयंपाकघरात काम करत होत्या.
त्यांच्या नजरेतून हे सुटलं नाही.
"अगं, घरातल्या बायका काम आधी करतात, नंतर विसावतात." त्यांनी टोमणा मारला.
त्यांच्या नजरेतून हे सुटलं नाही.
"अगं, घरातल्या बायका काम आधी करतात, नंतर विसावतात." त्यांनी टोमणा मारला.
स्वराला वाईट वाटलं पण तिने काही उत्तर दिलं नव्हतं. त्यावेळी तिला शांत राहणं योग्य वाटलं.
दुसऱ्या दिवशी स्वरा मोबाईलवर तिच्या आईशी बोलत होती. खूप वेळ बोलल्याचं पाहून सासूबाई म्हणाल्या,
"बाई गं, रोज एवढा फोन? घरातील माणसांकडे पण बघा, त्यांच्याशीही बोलायला हवं."
"बाई गं, रोज एवढा फोन? घरातील माणसांकडे पण बघा, त्यांच्याशीही बोलायला हवं."
स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं –
"मी मनापासून जुळवून घेतेय, पण आईला ते पटत नाही."
"मी मनापासून जुळवून घेतेय, पण आईला ते पटत नाही."
गावातल्या एका नातेवाईकांकडे लग्न होतं. घरात धावपळ सुरू झाली.
स्वरा मनापासून सजावट, स्वयंपाक, पाहुणचार सगळं करत होती.
स्वरा मनापासून सजावट, स्वयंपाक, पाहुणचार सगळं करत होती.
समारंभाच्या आधल्या रात्री ती थकून कोपऱ्यात बसली आणि तिच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं.
हे पाहून सुमतीबाईंचं मन हललं.
त्या जवळ गेल्या आणि विचारलं,
"बाई गं, एवढं का रडतेस? तुला त्रास होतो का इथे?"
त्या जवळ गेल्या आणि विचारलं,
"बाई गं, एवढं का रडतेस? तुला त्रास होतो का इथे?"
स्वरा हळू आवाजात म्हणाली,
"आई, मी खरंच सगळं मनापासून करते, पण तुम्हाला मी कधीच आवडत नाही असं वाटतं."
"आई, मी खरंच सगळं मनापासून करते, पण तुम्हाला मी कधीच आवडत नाही असं वाटतं."
सुमतीबाई गप्प झाल्या. त्यांना त्यांची चूक जाणवली.
'स्वरा तर खरंच खूप करत होती, पण माझं लक्ष फक्त तिच्या चुकांवरच राहिलं.' त्यांना मनोमन वाईट वाटलं.
'स्वरा तर खरंच खूप करत होती, पण माझं लक्ष फक्त तिच्या चुकांवरच राहिलं.' त्यांना मनोमन वाईट वाटलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी स्वराला जवळ घेतलं.
"बाई गं, मला माफ कर. तू माझ्या मुलाची बायको नाही, माझी मुलगी आहेस. थकलीस तर मला सांग, आपण मिळून काम करू."
"बाई गं, मला माफ कर. तू माझ्या मुलाची बायको नाही, माझी मुलगी आहेस. थकलीस तर मला सांग, आपण मिळून काम करू."
स्वराला शब्द सापडेना.
ती फक्त म्हणाली,
"आई, मला तुमच्याकडून शिकायचंय. पण माझ्या चुका प्रेमाने सांगा."
ती फक्त म्हणाली,
"आई, मला तुमच्याकडून शिकायचंय. पण माझ्या चुका प्रेमाने सांगा."
त्या दिवसानंतर घरात नवा रंग भरला.
स्वरा जेवणात नवनवीन पदार्थ करु लागली, सुमतीबाई तिचं कौतुक करायच्या.
सुमतीबाई तिला देवपूजेचे संस्कार शिकवायच्या.
दोघी मिळून गप्पा मारायच्या, बाजारात जायच्या.
हळूहळू नातं आई–मुलीसारखं घट्ट झालं.
एकदा समीर मजेत बोलला,
"आई, आता स्वरा लाडकी झाली तुझी."
एकदा समीर मजेत बोलला,
"आई, आता स्वरा लाडकी झाली तुझी."
सुमतीबाई स्वराचा हात धरून म्हणाल्या,
"मुलाला सून मिळाली नाही, मला दुसरी मुलगी मिळाली. मग लाडकी तर असणारचं."
"मुलाला सून मिळाली नाही, मला दुसरी मुलगी मिळाली. मग लाडकी तर असणारचं."
स्वरा लाजली आणि तिच्या डोळ्यातलं पाणी चमकलं.
तेव्हापासून घरातला प्रत्येक सण, प्रत्येक छोटा क्षण, सासू–सुनांच्या गोड नात्याने उजळून निघाला.
स्वरा लग्न करून आल्यावर पहिलीच दिवाळी होती.
गावात दिवाळी म्हणजे सणांचा सण!
गावात दिवाळी म्हणजे सणांचा सण!
सुमतीबाई लवकर उठून रांगोळी काढायला लागल्या. स्वरा त्यांच्याकडे पाहात होती.
"आई, मला पण शिकवा ना रांगोळी काढायला." ती उत्साहाने म्हणाली.
"आई, मला पण शिकवा ना रांगोळी काढायला." ती उत्साहाने म्हणाली.
सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर हसू आलं.
"चल, हे रंग घे. तुला आधी सोपं शिकवते."
"चल, हे रंग घे. तुला आधी सोपं शिकवते."
दोघी एकत्र जमिनीवर बसल्या, रंग मिसळले, बोटांनी नक्षी ओढली.
थोडी बिघडली, तर सुमतीबाई प्रेमाने दुरुस्त करायच्या.
"अगं, पहिली रांगोळीच आहे. काळजी करू नकोस. हळूहळू हात सराईत होईल."
थोडी बिघडली, तर सुमतीबाई प्रेमाने दुरुस्त करायच्या.
"अगं, पहिली रांगोळीच आहे. काळजी करू नकोस. हळूहळू हात सराईत होईल."
स्वराने पहिली रांगोळी काढली. ती अगदी परफेक्ट नव्हती, पण सासूबाईंच्या डोळ्यात समाधान होतं.
दिवाळीच्या फराळासाठी स्वरा नवीन रेसिपी घेऊन आली होती – चॉकलेट लाडू.
सुमतीबाईंना सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं,
"अगं, लाडवांमध्ये चॉकलेट? हे कसले नवीन प्रकार?"
सुमतीबाईंना सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं,
"अगं, लाडवांमध्ये चॉकलेट? हे कसले नवीन प्रकार?"
पण जेव्हा शेजाऱ्यांनी कौतुक केलं, तेव्हा सुमतीबाई आनंदाने म्हणाल्या,
"हे आमच्या स्वराचे हातचे आहेत!"
"हे आमच्या स्वराचे हातचे आहेत!"
त्या दिवाळीत खरंच घर उजळलं होतं – फक्त दिव्यांनी नाही, तर सासू–सुनेच्या नात्याने.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा